कैरी केशर सरबत
साहित्यः

कच्च्या (व शक्यतो आंबट) कैर्या - चार ते पाच
साखर - अर्धा किलो (साखरेचे नक्की प्रमाण पाककृती करताना स्पष्ट होईलच)
वेलदोडा पावडर - १ चमचा
प्रिझर्वेटीव्ह - आवश्यकतेनुसार
केशर - चवीप्रमाणे
पाककृती:
१) सर्वप्रथम कैर्या स्वच्छ धुवून व स्किन करून घ्याव्यात.

२) स्किन केलेल्या कैर्या खिसून घ्याव्यात. कैर्या खिसताना कोयीचा / बाठीचा कोणताही भाग खिसला जाणार नाही याची काळजी घ्यावी. कोय खिसली जावून कैरीच्या गरामध्ये मिसळली गेल्यास चवीत फरक पडतो.

३) कैरीचा खिसलेला गर हाताने घट्ट पिळून त्याचा रस काढावा व तो रस गाळण्याने गाळून घ्यावा.

४) एक वाटी रसाला दोन वाट्या साखर या प्रमाणामध्ये साखरेचा पक्का पाक तयार करावा.

५) साखरेचा पाक गरम असतानाच त्यामध्ये केशर व वेलदोडा पूड मिसळावी व लगेचच एकत्र करावे.

६) वरील मिश्रण संपूर्णपणे थंड झाले की त्यामध्ये कैरीचा रस मिसळावा व पुन्हा एकत्र करावा.

७) सरबत तयार आहे. चवीप्रमाणे थंड पाण्यात मिसळून आस्वाद घ्यावा!

******** अधिक माहिती ********
१) कैर्या शक्यतो आंबट असाव्यात.
२) सरबतामध्ये आवश्यक असल्यास सर्वात शेवटी प्रिझर्वेटीव्ह मिसळावे.
३) आमच्याकडे हे सरबत "वार्षिक व टिकाऊ खाद्यपदार्थांच्या गटात" येत असल्याने एप्रिल / मे महिन्यात एकदम तयार केले जाते. तसेच मागच्या वर्षी केलेले सरबत या वर्षी वापरात आणले जाते. वर्षभरात केशर आणि वेलदोडा मुरल्यामुळे अफलातून रंग व चव येते.
***********************डिस्क्लेमर***********************
सदर पाककृतीचे संपूर्ण श्रेय मातोश्रींना. मी फक्त क्लिकक्लिकाट करून येथे अपलोडवले. ;-)
****************************************************
प्रतिक्रिया
होतकरु उमेदवाराची छान पाककृती
छान आहे हो
गल्ली चुकलास काय विचारणार होतो.
+१
In reply to गल्ली चुकलास काय विचारणार होतो. by सूड
+२
In reply to +१ by लाल टोपी
लग्नाळू झाल्याची झायरात आवडली
रोचक पाकृ
फोटो मस्त!
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
In reply to फोटो मस्त! by पैसा
कोण म्हणे नवलेखक? तू? हॅ हॅ
In reply to प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. by मोदक
ते सगळं राहू दे
In reply to कोण म्हणे नवलेखक? तू? हॅ हॅ by रेवती
होय होय, हल्ली ब-याच
In reply to ते सगळं राहू दे by पैसा
सौ
In reply to ते सगळं राहू दे by पैसा
हाहाहा!
In reply to सौ by रामदास
अप्रतिम.
पन्ह्यात कैरीचा गर शिजवून
In reply to अप्रतिम. by प्रभाकर पेठकर
बरोबर आहे
In reply to पन्ह्यात कैरीचा गर शिजवून by इनिगोय
पन्हे वेगळे.. सरबत वेगळे.
In reply to बरोबर आहे by पैसा
हेही पन्हे आणि तेही पन्हे.
In reply to पन्हे वेगळे.. सरबत वेगळे. by मोदक
आपल्या माऊलीच्या जिवावर
मस्त रे.
कोण मोदक राव?
अहो एवढे दिवस तिकडं चिंचवडात
In reply to कोण मोदक राव? by स्पंदना
मोदकनं वास्तुशांतीला न
In reply to अहो एवढे दिवस तिकडं चिंचवडात by ५० फक्त
वा ! मस्त..
आई ने केलं असणार हे मला धागा
ह्हा........!!! पहिला/शेवटचा
मोदक कधी येऊ रे घरी?
मस्त दिसतय कैरीचे सरबत.
व्वा व्वा... भन्नाट रे !!
मस्त !!
मस्तं!!
सरबत छानच
जबरा..!
तुम्हाला चालणार असेल तर आम्ही
या की.. जरूर.
In reply to तुम्हाला चालणार असेल तर आम्ही by त्रिवेणी
मस्त दिसतेय !
मस्त !
मस्त...
जब्रा
प्यायलाशिवाय कळणार नाही, कसे
एक नंबर.. हे करून बघणार..