Skip to main content

Madeira Loaf Cake

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 19/05/2013 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १७५ ग्राम बटर (रुम टेंपरेचरला असलेले) १७५ ग्राम साखर २०० ग्राम Self-Raising Flour (किंवा २०० ग्राम मैदा+ १ टेस्पून बेकिंग पावडर एकत्र करुन घेणे) ५० ग्राम बदामाची पावडर (मी सालींसकट बदामाची पावडर वापरली आहे) ३ अंडी (रूम टेंपरेचरला असलेली) दीड टेस्पून लिंबाचे साल किसलेले १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स १/४ वाटी दूध (गरज लागल्यास) . पाकृ: ओव्हन १७० डिग्री सें वर प्री-हीट करण्यासाठी सेट करावा. मिक्सींग बाऊलमध्ये साखर व बटर एकत्र करुन ईलेक्ट्रीक बीटर ने हलके व क्रिमी होईपर्यंत फेसावे. त्यात एक अंडे घालून मिश्रण फेटावे, असे एक-एक करुन बाकीची दोन अंडी घालून फेटत रहावे. व्हॅनिला एसेन्स व किसलेले लिंबाचे साल घालून एकत्र करावे. मिश्रणात चाळून घेतलेले Self-Raising Flour व बदामाची पावडर घालून लाकडी चमाच्याने किंवा स्पॅट्यूलाने मिश्रण फोल्ड करावे. मिश्रण जर घट्ट वाटले तर थोडे-थोडे दूध घालून एकत्र करावे. साधारण चमच्याने सहज लपका पडेल असे मिश्रण असावे. केक लोफ-टीनला बेकिंगपेपर लावून घ्यावा. . त्यात मिश्रण ओतून व्यवस्थित पसरवून घ्यावे. प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १७० डीग्री सें वर ५०-५५ मिनिटे बेक करावे. केक पूर्ण बेक झाला का स्क्युअरने टोचून पहावे. केक टीनमध्येच १५ मिनिटे गार होऊ द्यावे. नंतर बेकिंग पेपर काढून केक कुलिंग रॅकवर पूर्ण गार होण्यासाठी काढून ठेवावा. . केक गार झाल्यावर त्यावर थोडी पिठीसाखर गाळणीने भुरभुरून घ्यावी व स्लाईसेस करावे. हा केक तुम्ही असाच किंवा व्हिप्ड क्रिम, चॉकलेट सॉस किंवा चहा - कॉफीबरोबर ही सर्व्ह करु शकता. . .

वाचने 9618
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

मस्त मस्त... ओ तुमच्या स्किल चा लै लै हेवा वाटतो राव!! __/\__

__/\__ क्या बात, क्या बात, क्या बात!

केक तर एक नंबर हाय सानिका. भारीच एकदम. पण फोर्कचे स्टेन्सील वापरुन केलेल्या साखरकामाबद्दल हे सुपरलेटीव्ह भारी. :) Laibhari

दिसत नाहीयेत.

तुमच्याकडं स्वयंपाक आणि तुमच्या नव-याकडं फुड फोटोग्राफी शिकायला यावं म्हणतो, गुरुकुलात अ‍ॅडमिशन कधी सुरु होतात. घरात पाणी भरणे (पंप सुरु करणे),रुम हिटर चालु बंद करणे,अशी मेहनतीची कामं करायची तयारी आहे माझी. फॉर्म पाठवुन द्यावा ही नम्र विनंती.

In reply to by स्पंदना

नाही हो, आमच्या एका चमच्यावर समाधान आहे. चमच्यांना नसते दु:ख, चमच्यांना सुखही नसते| ते वाहतात जे सारे, ते तुमचे ओझे असते ||

In reply to by ५० फक्त

तुम्ही केव्हाही या ओ त्यासाठी कुठल्या घरगुती मेहनतीची कामं करायची गरज नाही ... आणी हो पदार्थांचे फोटो मीच काढते ओ ५० फक्त कधीतरी तुम्ही ह्याचे क्रेडिट मला द्या ;)

In reply to by सानिकास्वप्निल

अरे मला माहित नव्हतं फोटोंचं, मला वाटलं तसं लिहिलं की प्रतिसाद कसा स्त्री पुरुष समानतेच्या बाजुने सुद्धा संतुलित होईल, म्हणुन तसं लिहिलं. 'कुठल्या घरगुती मेहनतीची कामं करायची गरज नाही ..'' म्हणजे, बागेत गवत कापायला नाहीतर जंगलात ससे किंवा हत्ती पकडायला पाठवणार मला बहुतेक. नाहीतर त्या एका शिष्योत्तमासारखं तु नदी आडवुन धर आम्ही मासे पकडतो म्हणाल.

In reply to by ५० फक्त

असे कसा विचार करता हो तुम्ही ५० फक्त... अहो या निमित्ताने मस्त एका फी मधे दोन कोर्सची (पाकॄ आणि फोटोग्राफी) डब्बल बेनिफिट स्कीम मागायची सोडून स्वयंपीडनाच्या आयडिया स्वतःहून सुचवताय ! ;)

In reply to by ५० फक्त

कृपया पाककृतींच्या धाग्यावर (त्यातही सानिकाच्या) ससे वगैरे 'टेस्टी' प्राण्यांचा विषय काढू नये. ५० - तुम्हाला लै शंका ब्वा..

मस्त!! मी मधात बुडवुन / मध लावुन खाणार:)

फोटो आणि पाकृ जबरदस्त...मला आणि माझ्या पिल्लुला हा केक खुप आवडतो त्यामुळे नक्की करणार :)

मस्त !! मस्त !!,मस्त !!!