साहित्यः
१७५ ग्राम बटर (रुम टेंपरेचरला असलेले)
१७५ ग्राम साखर
२०० ग्राम Self-Raising Flour (किंवा २०० ग्राम मैदा+ १ टेस्पून बेकिंग पावडर एकत्र करुन घेणे)
५० ग्राम बदामाची पावडर (मी सालींसकट बदामाची पावडर वापरली आहे)
३ अंडी (रूम टेंपरेचरला असलेली)
दीड टेस्पून लिंबाचे साल किसलेले
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
१/४ वाटी दूध (गरज लागल्यास)
पाकृ:
ओव्हन १७० डिग्री सें वर प्री-हीट करण्यासाठी सेट करावा.
मिक्सींग बाऊलमध्ये साखर व बटर एकत्र करुन ईलेक्ट्रीक बीटर ने हलके व क्रिमी होईपर्यंत फेसावे.
त्यात एक अंडे घालून मिश्रण फेटावे, असे एक-एक करुन बाकीची दोन अंडी घालून फेटत रहावे.
व्हॅनिला एसेन्स व किसलेले लिंबाचे साल घालून एकत्र करावे.
मिश्रणात चाळून घेतलेले Self-Raising Flour व बदामाची पावडर घालून लाकडी चमाच्याने किंवा स्पॅट्यूलाने मिश्रण फोल्ड करावे.
मिश्रण जर घट्ट वाटले तर थोडे-थोडे दूध घालून एकत्र करावे.
साधारण चमच्याने सहज लपका पडेल असे मिश्रण असावे.
केक लोफ-टीनला बेकिंगपेपर लावून घ्यावा.
त्यात मिश्रण ओतून व्यवस्थित पसरवून घ्यावे.
प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १७० डीग्री सें वर ५०-५५ मिनिटे बेक करावे.
केक पूर्ण बेक झाला का स्क्युअरने टोचून पहावे.
केक टीनमध्येच १५ मिनिटे गार होऊ द्यावे.
नंतर बेकिंग पेपर काढून केक कुलिंग रॅकवर पूर्ण गार होण्यासाठी काढून ठेवावा.
केक गार झाल्यावर त्यावर थोडी पिठीसाखर गाळणीने भुरभुरून घ्यावी व स्लाईसेस करावे.
हा केक तुम्ही असाच किंवा व्हिप्ड क्रिम, चॉकलेट सॉस किंवा चहा - कॉफीबरोबर ही सर्व्ह करु शकता.

वाचने
9618
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
वॉव !
मस्त मस्त...
__/\__
सुरेख दिसतो आहे केक.
व्वा. मस्त आहे केकची पाकृ.
लै भारी
धन्यु. मला फाऽऽऽर आवडतो मदेरा
छानच दिसतोय केक
मस्त दिसतो आहे केक !!
फस्कल्लास!
सानिकातै, हा स्पॅनिश प्रकार
छे:
In reply to सानिकातै, हा स्पॅनिश प्रकार by आदूबाळ
फोटो
तुमच्याकडं स्वयंपाक आणि
नको!!
In reply to तुमच्याकडं स्वयंपाक आणि by ५० फक्त
नाही हो, आमच्या एका चमच्यावर
In reply to नको!! by स्पंदना
चमच्यांना नसतो चटका,
In reply to नाही हो, आमच्या एका चमच्यावर by ५० फक्त
तुम्ही केव्हाही या ओ
In reply to तुमच्याकडं स्वयंपाक आणि by ५० फक्त
अरे मला माहित नव्हतं फोटोंचं,
In reply to तुम्ही केव्हाही या ओ by सानिकास्वप्निल
असे कसा विचार करता हो तुम्ही
In reply to अरे मला माहित नव्हतं फोटोंचं, by ५० फक्त
कृपया पाककृतींच्या धाग्यावर
In reply to अरे मला माहित नव्हतं फोटोंचं, by ५० फक्त
मस्त!!
मला पार्सल करा ना प्लीज
मस्तच
...... !!!! _/\_ _/\_ _/\_
यापुढं सानिकेच्या पाकृंना
Winner of This Season MasterChef Of MIPA Is Sanika Swapnil..,
अप्रतिम..... सुरेख........
यम्मी!!!
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
केक खुपच छान !!
:)