मोदक
काल मी रात्री मोदक केले होते.
गणपतीच्या दिवसात एकदातरी करावेत अस वाटल म्हणुन,तर त्याची पा.कॄ. देत आहे.
मला माहीतेय की मोदक सगळ्यांनाच करता येतात पण मी पहील्यांदाच केले, ते सुद्धा सुचतील तसे :)
सांगायला कोणी नव्हत कसे करायचे म्हणुन.
आणि इथे ही पा.कॄ. टाकावीशी वाट्टेय कारण "मी " केले कोणी सांगीतले नाही.
सारण :-
१ नारळ खोवलेला, १ वाटी गुळ, २-३ वेलदोडे.
कृती :-
नारळाचा चव एका पातेल्यात गरम करत ठेवावा त्यात गुळ घालुन ते मिश्रण एकजीव करावे आणि शीजवत ठेवावे.
त्याचा रंग बदलला की त्यात वेलदोड्याची पुड करुन घालावी.
हे झालं सारण तयार :)
पारीसाठी :-
१ भांड तांदुळाची पीठी, थोड मीठ्,चमचाभर तेल (लहान चमचा),१ भांड पाणी (जीतकी पीठी तितकच पाणी घ्यावे.)
कृती :-
एका भांड्यात भांडभर पाणी उकळत ठेवावे.त्याला १ उकळी आली की त्यात चिमुटभ्र मीठ आणि तेल घालावे.
अजुन १ उकळी येऊ द्यावी. मग त्यात तांदुळाची पीठी घालावी आणि २ वाफा आणाव्यात. (पीठीचा रंग थोडा बदलतो.)
ही झाली पारी.
आता पारीच पीठ मळुन घ्यावे (हाताला चि़कटणार नाही इतपत)
मोदक करायला घ्यावे.
आणि उकड्त ठेवावे,मी कुकरमधे ठेवले होते १५ मिनिटं.
अजुन ह्यात काही बदल असेल तर सांगा :)
याद्या
7628
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
हा हा हा
छान!!!!!
असेच..
In reply to छान!!!!! by स्वाती राजेश
मस्त!
:)
In reply to मस्त! by ३_१४ विक्षिप्त अदिती
केळीचे पान...
काका, तोस्सी ग्रेट हो!
In reply to केळीचे पान... by प्रभाकर पेठकर
अरे १
पारीचे...
लोणी सुद्धा वापरतात..........
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे वा! काल
सहीये ऋचा!
केलेस की
In reply to सहीये ऋचा! by मेघना भुस्कुटे
नक्की.
In reply to केलेस की by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
शब्बाश....
खवा...
In reply to शब्बाश.... by शितल
त्यात अगदी थोडा
In reply to खवा... by प्रभाकर पेठकर
मस्त
>>बाकी, या
In reply to मस्त by वर्षा
अरे वा.. ऋचा