✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पूल

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Sun, 05/19/2013 - 04:30
हा पूल कधीच शांत नसतो ---- कधी 'तो' असतो तिथे धुकेही असते त्याच्या बरोबर हो, रात्रिचे गर्द धुके... गुढ... बर्‍याचदा 'ति'चा आवाज गारुड करतो त्या धुक्यातून त्याच्या पोटात एकच प्रश्न या धुक्यात आवाज'सुद्धा' अडकतो? हम्म.. हा पूल कधीच शांत नसतो ---- कधी 'ती' असते तिथे त्याने दिलेले पिंपळपान घेऊन जिर्ण, जर्जर, जाळीदार अन् गडद खुप जपलयं तिने ते पान ऊन-वार्‍यापासून, पावसापासून कधी कधी तिला प्रश्न पडतो तिच्या हातातले पिंपळपान जास्त जिवघेणी शिक्षा, कि, तिच्या डोळ्यातली डबडबलेली 'त्या'ची प्रतिक्षा? पूलावरचा मिणमिणता दिवा थकुन थरथरत क्षीण झाल्यावर ती निघुन जाते दिवा तसाच तिथे फडफडत असतो हम्म... हा पूल कधीच शांत नसतो ---- आता त्या पूलाचा ताबा नभातला चंद्र आणि पूलाखालून वाहणारे पाणी घेते त्यांच्या ओढाताणीत पूलाची फरफट होते त्याची अडचण हि की दोन्ही किनार्‍यांना या ओढाताणीत धरुन कसे ठेवायचे? ह्या विवंचनेचा अंधांर त्याला पुन्हा एकदा घेरतो हम्म... हा पूल कधीच शांत नसतो ---- असं म्हणतात कि पूल दोन किनार्‍‍यांना जोडण्यासाठी असतात.. पण ते खरं नाही किनारे किनार्‍यांच्याच जागेवर राहतात पूल मात्र बिचारे उगाच आपला जीव टांगणीला लावतात ----- खरचं हा पूल कधीच शांत नसतो |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१८/०५/२०१३)

प्रतिक्रिया द्या
2856 वाचन

💬 प्रतिसाद (15)

सु रे ख.

यशोधरा
Sun, 05/19/2013 - 04:50 नवीन
सु रे ख.
  • Log in or register to post comments

वाह!!!!!! मिका वाह!!!!!!!!!!

प्रचेतस
Sun, 05/19/2013 - 08:34 नवीन
वाह!!!!!! मिका वाह!!!!!!!!!! अप्रतिम.
  • Log in or register to post comments

अस्वस्थ.

प्रभाकर पेठकर
Sun, 05/19/2013 - 10:33 नवीन
अरे व्वा! मस्त आहे कविता. पुलाची अशांतता अस्वस्थ करणारी आहे.
  • Log in or register to post comments

क्या बात है !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/19/2013 - 10:45 नवीन
किनारे किनार्‍यांच्याच जागेवर राहतात पूल मात्र बिचारे उगाच आपला जीव टांगणीला लावतात क्या बात है ! हे एकदम भावलं !!
  • Log in or register to post comments

+1 टु इस्पिक काका

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/19/2013 - 11:37 नवीन
+1 टु इस्पिक काका :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आवडली

तिमा
Sun, 05/19/2013 - 11:06 नवीन
विशेषतः किनारे व पूल यावरील भाष्य. कवितेतली ही ओळ वाचताना, पिंपळपान घेऊन जिर्ण, जर्जर, जाळीदार अन् गडद उगाचच, आचार्य अत्र्यांनी उद्धव ज. शेळके यांच्या एका गोष्टीची केलेली चिरफाड आठवली.
  • Log in or register to post comments

क्या बात

चाणक्य
Sun, 05/19/2013 - 12:49 नवीन
शेवट विशेष आवडला.... क्या बात है..
  • Log in or register to post comments

मस्त

अभ्या..
Sun, 05/19/2013 - 14:15 नवीन
मस्त मिका. आवडली पुलाची व्यथा. आजकाल सगळ्यांच्या व्यथा यायलागल्यात. पुलानेच काय घोडे मारलेय. ;) बाकी मध्यस्थांची होतेच अशी ओढाताण.
  • Log in or register to post comments

कविता आवडली रे.

प्यारे१
Sun, 05/19/2013 - 14:43 नवीन
कविता आवडली रे. (त्या पुलाला बरं वाटेल असं लिही एकदा. ;) )
  • Log in or register to post comments

कविता आवडली!!

किसन शिंदे
Sun, 05/19/2013 - 16:40 नवीन
कविता आवडली!!
  • Log in or register to post comments

मस्त रे!

पैसा
Sun, 05/19/2013 - 17:15 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments

हा पुल कधीच शांत नसतो...

Bhagwanta Wayal
Sun, 05/19/2013 - 19:32 नवीन
हा पुल कधीच शांत नसतो... वाहवा..! क्या बात है. सुरेख रचना..
  • Log in or register to post comments

हा पूल कधीच शांत नसतो

Bhagwanta Wayal
Sun, 05/19/2013 - 19:34 नवीन
हा पूल कधीच शांत नसतो ---- वाहवा..! क्या बात है. सुरेख रचना.
  • Log in or register to post comments

क्या बात है.....!!!!

अनिदेश
Mon, 05/20/2013 - 16:11 नवीन
असं म्हणतात कि पूल दोन किनार्‍‍यांना जोडण्यासाठी असतात.. पण ते खरं नाही किनारे किनार्‍यांच्याच जागेवर राहतात पूल मात्र बिचारे उगाच आपला जीव टांगणीला लावतात काय लिहिलय....सुभान अल्लाह ....!!!
  • Log in or register to post comments

असं म्हणतात कि पूल दोन किनार्

आगाऊ म्हादया......
Fri, 05/24/2013 - 08:41 नवीन
असं म्हणतात कि पूल दोन किनार्‍‍यांना जोडण्यासाठी असतात.. पण ते खरं नाही किनारे किनार्‍यांच्याच जागेवर राहतात पूल मात्र बिचारे उगाच आपला जीव टांगणीला लावतात ----- खरचं हा पूल कधीच शांत नसतो मिका …ख़ुप भारी मित्रा !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा