Skip to main content

मध्य वयातील वादळ -पुढे

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 09/05/2013 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
कर्करोग स्तनांचा मध्य वयातील वादळ मध्यवयातील वादळ- पुढे ----------------- काही गोष्टीत आपल्या मित्रांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन आपण पुढे जात आहोत. चीड चीड कोणी स्वतःहून करीत नाही तर चिडचिड हि होते. जेंव्हा एखादी परिस्थिती आपल्या हातात नसते आणि तो बदलण्याचे आपल्याला सामर्थ्य नसते तेंव्हा माणसाची/ बाईची चिडचिड होते १ ) पुरुषांना पण असे(रजोनिवृत्ती सारखे) होते हे थोड्याप्रमाणात सत्य आहे पण पुरुषांची संप्रेरके साठीच काय सत्तरीपर्यंत कार्यरत असतात त्यामुळे त्या वयालाही पुरुषाला मूल होऊ शकते. पण स्त्रीच्या बाबतीत हि शक्यता एकदम संपत असते. या गोष्टीचाही पुष्कळ स्त्रियांवर खोलवर मानसिक परिणाम होत असतो. आता आपल्याला मुल होऊ शकणार नाही. हि निसर्गाने दिलेली आपल्यासारखा चालता बोलता जीव निर्माण करण्याची अफाट शक्ती आता संपली असे निराशावादी विचार मनात येतात. २)ज्या वयात स्त्रीची रजोनिवृत्ती येते त्याच काळात पुरुषाचे पोट सुटणे, टक्कल पडणे, चष्मा येणे इ. घडत असते. त्यालाही हे सर्व जाणून वाईट वाटत असते पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो. याच वयात स्त्रियांनाही चष्मा(चाळीशीचा) लागलेला असतो वजन वाढलेले असते,चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. पण यात अधिक म्हणून रजोनिवृत्ती येते. आणि ती अशी त्वरित आल्यामुळे त्यांचे भावविश्व सैरभैर होते. अशीच परिस्थिती पुरुषाची त्या वयात होते जर त्याची नोकरी गेली धंद्यात खोट आली किंवा आर्थिक स्थिती नाजूक झाली तर. कारण जसे सुंदर दिसणे हा स्त्री स्वभावाचा भाग असतो तसे आपल्या पायावर आर्थिक डोलारा सांभाळणे हे पुरुषाच्या स्वभावाचा भाग असतो. या काळात जर आर्थिक स्थिती नाजूक झाली तर पुरुषाचे भावविश्व असेच कोलमडते. परंतु त्याला जगापुढे आपले असे स्वरूप दाखवता येत नाही त्यामुळे पुरुषांचा असा कोंडमारा होतो असो स्त्रियांमध्ये हे शारीरिक बदल होतात त्याबरोबर त्यांच्या लैंगिक आयुष्यात फार मोठे बदल होतात. त्यांच्या संप्रेरकांमुळे मेंदूतील कामजीवनाची केंद्रे कमी काम करू लागतात त्याचा परिणाम पाच बाबतीत होतो. १.- कामेच्छा desire २.उद्दीपन arousal ३.-स्नेहन lubrication ४.- दाह pain ५.- अत्त्युच्च आनंद -orgasm यात उद्दीपन स्नेहन आणि दाह या तीन गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचे कामजीवन अस्ताव्यस्त होते. यात कामेच्छा कमी झाली नाही तरी उद्दीपन कमी होते स्नेहन कमी होते त्यामुळे कोरडेपणा जाणवतो यामुळे योनीमध्ये दाह होतो त्यामुळे स्त्रीला अत्त्युच्च आनंदापर्यंत पोहोचणे कठीण होते. या कारणा मुळे स्त्रीया कामसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. याचवेळी नवर्याकडून मानसिक आधाराची गरज असल्यामुळे त्या जवळीक( intimacy) करण्याचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्ष शरीरसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. या अशा द्विधा वागण्यामुळे पुरुष अतिशय गोंधळात पडतो. बायको जवळ आल्यामुळे तो उद्दीपित होतो पण संबंध नाकारल्यामुळे तो दुखावला जातो. पुढच्या वेळी अशी अवहेलना होऊ नये म्हणून तो बायकोशी भावनिक जवळीक टाळतो. त्यामुळे आधीच तणावपूर्ण वातावरणात भर पडते. स्त्रियांनी जर आपल्या नवर्याला सुरुवातीलाच स्पष्ट सांगितले कि मला फक्त जवळीक हवी आहे संबंध नको तर पुरुषाची उद्दीपित होणे आणि नंतर थंड पडणे अशी कुचंबणा टळेल आणि निदान संबंधात तणाव वाढणार नाही. कोरडे पणामुळे योनीला जंतुसंसर्ग होतो आणि त्यामुळे खाज येणे जळजळ होणे पांढरे पाणी जाणे हे प्रकार सुद्धा वाढतात. याचा वेळेत इलाज करणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने स्नेहन(lubrication) साठी क्रीम वापरणे आणि जन्तुसंसार्गासाठी प्रतिजैविक घेणे हे त्यांच्या संबंधाना पुनर्प्रस्थापित करण्यासाठी फार महत्त्वाचे ठरते. शेवटी कामसुख हे एक असे सुख आहे कि ज्यासाठी दोन्ही साथीदारांचा सहभाग आवश्यक आहे. जसे पुरुषांनी दोन पायर्या उतरणे आवश्यक आहे तसेच स्त्रियांनी दोन पायर्या चढणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा दुरावलेले संबंध पुनर्प्रस्थापित करणे फार कठीण जाते. कारण हे सुख मिळवण्यासाठी बाहेर जाणे हे कोणाच्या हि हिताचे नाही. मानसिक आजार -२० टक्के स्त्रियांना या काळात नैराश्य येते( मेंदूत होणारा केमिकल लोच्या) हे असे का होते आहे हे स्त्रियांना काळात नाही आणि ती नाटके करीत आहे असे पुरुषांना वाटत असते. दुर्दैवाने हे नैराश्य( depression) आहे कि लक्ष वेधून घेण्यासाठी( attention seeking) केले जाते ते सहज सांगणे कठीण जाते. यासाठी पुरुषांना फार धैर्याने आणि संयमाने वागणे आवश्यक असते. पण हाच काळ त्यांच्या कर्तृत्वाचा असल्याने त्यांना आपल्या बायकोला तेवढा वेळ देत येतोच असे नाही आणि ती स्त्री एकटी पडते. ४० -५० टक्के स्त्रियांना निद्रानाशाचा त्रास होतो. त्या बोलत असताना नवरा घोरू लागला हे हटकून दिसणारे चित्र आहे. मग यातून बायका नाही नाही ते अर्थ काढू लागतात. नवर्याचे माझ्याकडे लक्ष नाही मी आता तेवढी सुंदर नाही पासून त्याचे बाहेर बहुतेक लफडे असावे इथपर्यंत. यावर उपाय काय? १) आपली शरीर प्रणाली मंद होत आहे आणि पाळी अनियमित होत आहे हे जाणवल्यावर स्त्रियांनी स्त्री रोग तज्ञाकडून तपासणी करणे आवश्यक आहे हे रजोनिवृत्ती मुले आहे हे नक्की झाले म्हणजे पुढच्या उपाया कडे वळता येते. २) पहिली गोष्ट म्हणजे आपली शरीर प्रणाली मंद होत आहे तर ती परत वेगवान करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे सर्वात चांगला व्यायाम म्हणजे चालणे. रोज ३५ ते ४० मिनिटे वेगाने ( गाडी पकडण्यासाठी चालतो त्या वेगाने) चालायला सुरुवात करा. रिक्षा/ दुचाकीचा वापर अत्यावश्यक असेल तरच करा. याने आपल्या स्नायुंना व्यायाम मिळून मेंदूत इंडोर्फिन नावाची संप्रेरके तयार होतात( रजोनिवृत्तीमुळे हि संप्रेरके कमी झाली असल्याने स्त्रीला उदास/ निरुत्साही वाटत असते ते नक्कीच कमी होते. शरीर थकल्यामुळे झोप चांगली लागते आणि सकाळी उठल्यावर जो निरुत्साह वाटतो तो कमी होतो. ३) आहार दहा टक्क्यांनी कमी करा यात तेलकट मसालेदार गोष्टी कमी करून फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे.(तोच वापरून दोन्ही बाजूनि गुळगुळीत झालेला सल्ला)ज्यांना वाताचा त्रास आहे अशा भगिनींनी (जवळ जवळ ६० टक्के ना हा त्रास होतो ) सकाळी उठल्यावर दात घासल्यावर अंशे पोटी एक लिटर कोमट पाणी प्यावे या पाण्यात एक लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा मध घालावा याने आपले पोट साफ होईल रात्रभर शरीरात साठलेली दुषित द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडाला मदत होईल आणि स्वस्तात निपटेल (काहीच नाही तर अपाय नक्कीच होणार नाही) ४) एखादा छंद लावून घ्या --(परत तेच -छंद असा सहज लावून लागत नाही) म्हणून साधारण चाळीशीनंतर स्त्रियांनी आपल्याला काय आवडते आणि काय करायचे होते जे राहून गेले याची यादी करायला घ्या आणि त्यातील एक एक गोष्टी करण्याचा प्रयत्न करा यातील एखादी गोष्ट आपल्याला जमू शकेल. आता जी जमू शकली आहे ती गोष्ट रजोनिवृत्ती नंतर पूर्ण झोकून देऊन करत येईल. ५) इतर आजार -चक्कर येणे गरम वाटणे (hot flushes) यासठी तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे HRT (hormone replacement therapy) घेत येईल. हि घ्यावी किं घ्यावी याबद्दल जगभर मोठी चर्चा चालू आहे आणि मी वादात न पडता एकच सांगतो तुमच्या स्त्री रोग तज्ञाच्या सल्ल्याप्रमाणे करा. HRT ने रजोनिवृत्तीचे बरेचसे परिणाम काही काळा पुरते दूर करता येतात. एकदा तुम्ही त्या मानसिक स्थिती शी जुळवून घेतले कि हि औषधे बंद करता येतात. ६) नैराश्य यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मनोविकार तज्ञाकडे जाऊन उपाय करता येईल. पण हा आजार आहे हे घरच्यांनी/ नवर्याने जाणून घेणे आवश्यक आहे. बाकी अदिती ताईनी दिलेल्या दुव्यांमध्ये शारीरिक आजाराची माहिती सुरेख तर्हेने दिलेली आहेच. घरच्यांसाठी-आपल्या बायकोला/ आईला समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा. कदाचित एवढ्यावरच काम भागेल. तिच्या अशा काळात तिला आपल्या मदतीची अतिशय जास्त गरज आहे. ऑफिसात बॉस ची बकबक गपचूप ऐकून घेताच मग थोडीशी बायकोची ऐकली तर काय बिघडले ? बरेच लोक हेच म्हणतील कि ऑफिसात डोके पिकवून आलो तर घरी तेच मग फरक काय? स्त्रियांसाठी -- आपल्याला काय होते आहे याचे शांत डोक्याने परीक्षण करा कुठे चुकते आहे त्याचा विचार करा आणि संवाद ठेवण्याचा प्रयत्न करा पहा काही फरक पडतो का?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 53677
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

In reply to by आजानुकर्ण

एका सद्गृहस्थांकडून ऐकलेले आर्ग्युमेंटः- अनेक बायकांवर प्रेम असूही शकते. तुम्हाला दोन्-तीन बहीण कींवा दोन्-तीन भाउ असतील तर तेव्हा सारेच आवड्तात की नाही? भावंडात बंधूभाव असतोच की नाही? किंवा तुम्हाला अनेक अपत्ये आहेत, आणी सारीच प्रियही आहेत असे असू शकते. तिथे "प्रेमाच्या वाटणीचा" प्रश्न येत नाही.मग दोन बायका असतील तर मग त्या दोघीही प्रिय असणे ह्यात चूक ते काय? --आर्ग्युमेंट संपले.

In reply to by मन१

काय आर्ग्युमेंट आहे.. झकास. मलाही अनेक स्त्रिया आवडणे आवडेल.. पण त्या सर्व स्त्रियांना मी एकटाच आवडावा असा माझा आग्रह राहील.. या समस्येमुळे एकच स्त्री मला आवडते आणि तिलाही मी एकच पुरुष आवडतो असं स्वतःच्या मनाशी खोलवर मानणे अशी लग्न नामक करारवजा रचना आपण करुन घेतली आहे. ;)

In reply to by गवि

अहो गवि, आणि आता तुम्हा लोकांकडे तेवढा वेळ कुठे आहे? पूर्वीच्या संस्थानिकांना पोटासाठी नोकरी करायला लागत नव्हती त्यामुळे त्यांना सगळ्या बायकांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत असेल. आता एकुलती एक बायकोच रोज उठून ओरडत असते की नवर्‍याला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून!

In reply to by गवि

लग्न नामक करारवजा रचना ही शिंची अलिकडेच मगच्या सात आठ दशकात उपटलेली बंधने आहेत. त्यापूर्वी कित्येक स्त्रियांशी विवाह करायचेच की राजेरजवाडे(किंवा ज्यांना झेपेल ते). शिंचा ब्रिटिशांनी एकावेळी एकपत्नीत्व घ्यायला लावून लैच अन्याय केलाय आख्ख्या भारतावर. प्राचीन परंपराच लोपली की हो.

In reply to by मन१

अहो बरेच झाले की.. बहुपत्नीत्व शिल्लक ठेवले असते तर वरील न्यायानेच (पक्षी: अनेक भाऊ असले तर बहिणीचे सर्वांवर सारखेच प्रेम असू शकते..) अनेक पुरुषांवर सारखेच प्रेम करणार्‍या या बायका आपल्या सद्य पतीकडे बहुपतित्वाची मागणी करु लागल्या असत्या.. लई भानगडी उद्भवल्या असत्या राव.. आणि टीव्ही सीरियल्समधल्या गुंतागुंती तर १०^१०३ इतक्या वाढल्या असता असा एक अंदाज आहे.

In reply to by सुबोध खरे

god has linked procreation with recreation.otherwise no man will marry.याचा अर्थ धार्मिक असा अजिबात नाही.
१. देवाचा उल्लेख करूनही हे वाक्य धार्मिक कसं नाही हे मला समजलं नाही. २. दुसरं महत्त्वाचं कारण हे की विज्ञान, मनोव्यापार, इतिहास इत्यादि विषयांच्या अभ्यासातून हे वरचं वाक्य साफ चूक आहे हे दिसलेलं आहे. अभ्यास नाकारून "बाबा वाक्यं प्रमाणम्" मानणं हे धर्म आणि धार्मिकपणाचं एक लक्षण आहे. त्या दृष्टीनेही हे वाक्य धार्मिक आहे.
जर संभोगात आनंद मिळणार नसेल तर मानवी नर कोणत्याही स्त्री च्या जवळ जाणार नाही.
आत्तापर्यंत जी काही उत्क्रांतीशास्त्र, मानववंशशास्त्राची पुस्तकं वाचलेली आहेत त्यात असं काहीही लिहीलेलं नाही. या सगळ्यांच्या संशोधनानुसार मानवी नर आणि अन्य प्राण्यांमधला नर यांची प्रेरणा समान असते, स्वतःची गुणसूत्र पुढे ढकलणं. प्रेयिंग मँटीस या कोळ्यांच्या जातीत आणि अन्य काही प्राण्यांच्या जातीमधे मादी नरांकडून स्पर्म घेतल्यानंतर त्याला खाते, त्यातून पोषण मिळवते आणि तरीही हे नर मेटींग करतात.
शिवाय एक स्त्री गरोदरपण आणी मुलाच्या जन्माच्या वेळी जवळ जवळ ११ -१२ महिने पूर्ण परावलंबी असते आणी त्यापुढे १३ ते १४ वर्षे अपत्य संगोपनात जर एखाद्या स्त्रीला द्यावी लागतात. पुरुषाला जर संभोगात आनंद नसेल तर पुरुष एवढी जबाबदार का घेईल?
१. याच धाग्यात खालच्या प्रतिसादांमधे 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या पुस्तकाची लिंक दिलेली आहे. इतिहासाचार्य राजवाडेंनी त्यात शेतीपूर्वकालीन आणि शेतीच्या शोधानंतरचा मनुष्यांमधले लैंगिक संबंध, कुटुंबसंस्था आणि पुनरूत्पादनाचा इतिहास दिलेला आहे. खासगी मालमत्ता जमा करण्याची सुरूवात झाल्यानंतर, आपल्या कष्टांनी जमा केलेली मालमत्ता आपल्याच मुलांना मिळावी या विचारांपोटी पुरुष स्वतःच्या मुलांची जबाबदारी घेतो. २. (जशी अनेक स्त्रियांना अपत्य संगोपनाची इच्छा नसते तसंच) अनेक पुरुषांनाही अपत्य संगोपनाची इच्छा आणि हौस असते असं समाजात दिसतं. या पुरुषांवर तुमचं हे वाक्य प्रचंड अन्याय करणारं आहे. (हे एक उदाहरण) ३. हे "पूर्ण परावलंबीपण" अलिकडे फारच कमी झालेलं दिसतं. प्रसिद्ध स्त्रियांचं उदाहरण द्यायचं तर नोबेल पारितोषिक विजेत्या मेरी क्यूरी, गेर्टी कोरी या स्त्रिया प्रसूतीच्या दोन-तीन दिवस आधीही प्रयोगशाळेत काम करत होत्या. सर्वसामान्य आयुष्यात बघायचं तर मुंबईच्या लोकल ट्रेनमधेही पाच-सहा महिने गर्भार असणार्‍या स्त्रिया नियमितपणे ऑफिसात जाताना दिसतात. प्रसूतीच्या पुढच्या आठवड्यात स्त्रिया कामालाही लागलेल्या दिसतात. अशी एक बाई आमच्या ऑब्झर्व्हेटरीतही पाहिली आहे; शुक्रवारी संध्याकाळी नेहेमीप्रमाणे निघाली, सोमवारी मुलं झाली. ही बाई पुढच्या सोमवारी तिचं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी लिखाण करायला लागली होती. बांधकामाच्या साईटवरही तान्ही पोरं एकीकडे आणि त्यांच्या आया विटा वहाताना दिसणं हे प्रकार दिसतात. Evolution of sexual reproduction, Kin selection आणि तत्संबंधी पानांवर बरीच तपशीलवार माहिती आहे. तुमच्या प्रतिसादातली अधलीमधली वाक्य ठीकठाक असली तरी त्यातला कार्यकारणभाव सुसंगत नाही; लैंगिकता, शरीरसंबंध, अपत्यसंगोपनाची आवड वगैरे गोष्टींमधेही बरीच गडबड दिसते आहे. स्त्री-स्वातंत्र्यामधे कुटुंब नियोजनाची साधनं स्त्रियांच्या हातात येणं महत्त्वाचं असलं तरी हेच एकमेव कारणही नाही. माझा प्रतिसाद फारच त्रोटक आहे. मानववंशशास्त्र, उत्क्रांती, यांचा इतिहास या विषयांवर आणि स्त्रियांचं समाजातलं खालचं स्थान कशामुळे आलं याबद्दलही लिहीण्यासारखं बरंच काही आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१. देवाचा उल्लेख करूनही हे वाक्य धार्मिक कसं नाही हे मला समजलं नाही. देवाचा उल्लेख असलेलं सगळंच धार्मिक असतं असं थोडंच आहे. नुसतीच गुणसुत्र पुढं ढकलणे हाच एक नाही तर संभोगात आनंद नसेल तर संभोग फारसा होणार नाही.. हेच प्रेयिंग मँटीसच्या बाबतीतसुद्धा सत्य आहे. - डिस्कवरीवरच पाहीलंय म्हणुन. बाकी चालु द्या.

In reply to by शिल्पा ब

माझ्या वरच्या प्रतिसादातलं संबंधित वाक्यः "देवाने मानव (किंवा अन्य प्राणी) यांच्यात संभोगात आनंद निर्माण केलेला आहे, असं म्हटल्यावर हे धार्मिक प्रतिपादन नाही असं कसं म्हणायचं?" असं वाचावं. जेनेरिक देव, धर्म, त्यांचा परस्परसंबंध वगैरेबद्दल चर्चा म्हणजे इथे अवांतर होईल; ते अन्यत्र बोलता येईल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धागा बराच भरकटलेला आहे आणि मूळ मुद्दा बाजूला राहिला आहे म्हणून मी शेवटी वेगळ्या प्रतिसादात मला काय म्हणायचे होते ते सांगतो

In reply to by सुबोध खरे

त्यापेक्षा वेगळा धागाच टाका. नैसर्गिक प्रेरणा आणि त्यामुळे घडलेले बदल, सामाजिक परिणाम वगैरे विषय बराच मोठा आहे. त्यामुळे मूळ लेखनाचा जीव नको गुदमरायला. संपादकांना विनंती: या विषयावरचे प्रतिसाद वेगळे काढता आले तर दोन्ही विषय स्वतंत्रपणे चर्चा/प्रश्नोत्तरांसाठी वेगळे ठेवता येतील.

त्यात स्री देह पुरूष देहाला आकर्षित करण्यासाठी तयार झालेला आहे जेव्हा होमो सेपियन्स ही प्राणिजात घडत होती त्या प्रारंभीच्या काळात कदाचित मादी होमोसेपियनदेह नर होमोसेपिअन देहाला आकर्षित करण्यासाठी बनला असेलही.(तसेही,केवळ देह देहाला आकर्षित करीत नसतो. त्यामधला मन हा भाग ते करीत असतो.नुसत्या कलेवररूपी देहांमध्ये आकर्षण उरत नाही.) पण हजारों-लाखों वर्षांनंतर होमोसेपियन्सच्या मज्जासंस्थेत काही सूक्ष्म बदल घडले असतीलच ना, की ज्या योगे मादी होमोसेपियनला असे वाटू लागले असेल की नर होमोसेपियनला आकर्षित करण्यापुरतेच आपले अवतारकार्य नाही,किंबहुना ते प्रयोजन अगदी दुय्यम असून इतरही अनेक उद्दिष्टे असू शकतात? विनोदाच्या अंगाने पाहिले (ते खरेच आहे म्हणा) तरी स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते. म्हणजे तिचा पुष्कळसा काळ संगोपनात खर्ची पडतो. मग तिला मारूनमुटकून सदासर्वकाळ प्रणयिनी,अभिसारिका किंवा इतर कोणी शृंगारनायिका ठरवण्यात काय अर्थ? मेंदू हा प्राणिदेहाचा आणि प्राणिदेह हा निसर्गाचा भाग मानला तर मेंदू म्हणजेच निसर्ग. निसर्गच हे बदल घडवीत आला आहे. त्यामुळे होमोसेपियन मादीने स्वतःचे आयुष्य आपल्या मेंदूच्या प्रेरणांनुसार ठरवणे हे निसर्गाविरुद्ध नाही. असो. एक दृष्टिकोन मांडला इतकेच. आणखी : "न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यते | हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ||"

In reply to by राही

आणखी थोडी भर. प्रत्येक पुढच्या पिढीत अधिक चांगल्या प्रजेसाठीच निसर्गाचा हा सगळा खेळ चाललेला असतो. म्हणजे सुप्रजनन हा मूळ हेतू आहे आणि त्यासाठी योग्य त्या नराला/मादीला आकर्षित करणे हा त्यासाठी पूरक हेतू.

In reply to by राही

राही, तुम्हाला रस असेल तर रिचर्ड डॉकिन्सने उत्क्रांतीशास्त्रावर लिहीलेली पुस्तकं जरूर वाचा. (या संदर्भात विशिष्ट कोणतं पुस्तक ते आठवलं की किंवा बघून सांगते.) दोन लिंग असणं उत्क्रांतीमधे फायद्याचं का ठरतं हे त्याने फार सुंदर लिखाण केलेलं आहे. मराठीत याबद्दल लिखाण आहे का नाही माहित नाही. संक्षींचा (निदान या संदर्भातला) दृष्टीकोन प्रचंड हास्यास्पद आहे याची वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार काही कारणं: १. निसर्गाचा काही उद्देश आहे असं म्हणलं तर निसर्गाला काही जाणीव आहे असं म्हणावं लागतं. हे चूक आहे. २. स्त्री आणि पुरुष अशी दोन लिंग तयार होण्यात पुनरुत्पादन आणि झालेली संतती पुनरुत्पादनाच्या वयाला येणं यात फायदा होतो, त्यामुळे अशा प्रकारचं विभाजन झालेली जनता टिकून राहिली. ३. गेल्या काही दशकांमधे, विशेषतः दुसर्‍या महायुद्धानंतर माणसाच्या बाबतीत सामाजिक परिस्थिती फारच बदलल्यामुळे सगळ्या नैसर्गिक गोष्टींचं तस्संच्या तस्सं पालन करणं हे माणसाच्या प्रगतीमधे खोडा घालण्यासारखं झालेलं आहे. . . . ही यादी बरीच वाढवता येईल आणि यातल्या प्रत्येक मुद्द्यावर लोकांनी मोठमोठी पुस्तकं लिहीलेली आहे. पण आत्ता वेळ नाही, तेवढी आवश्यकताही नसावी. संक्षींचाच एक फार प्रसिद्ध न झालेला पण पोटेंशियल असणारा विनोदः लाघवी मूल काय आणि काय काय.

या विषयावर थोडेफार वाचन झालेले आहे. लेन्स्की वि.श्लाफ्ली वाचले आहे. मला वाटते माझ्या प्रतिसादातून आपला वरील मुद्दा क्र. तीनच डोकावतो आहे. बाकी सहमत.

स्त्री-पुरूष संबंध आणि उत्तररंगातल्या कौटुंबिक संबंधांवर त्यांचा होणारा परिणाम याविषयी आहे. अर्थात भारंभार अनावश्यक माहितीनं इतका वैचारिक गोंधळ झालेला असतो की नेमकं काय चाललंय, कशासाठी चाललंय आणि काय साधायचंय ते लक्षात येणं असंभव.

In reply to by संजय क्षीरसागर

>>अर्थात भारंभार अनावश्यक माहितीनं इतका वैचारिक गोंधळ झालेला असतो की नेमकं काय चाललंय, कशासाठी चाललंय आणि काय साधायचंय ते लक्षात येणं असंभव. -- भारंभार माहिती आवश्यक असते. कन्क्ल्युजन निघण्यापुर्वी वैचारीक गोंधळ देखील आवश्यक असतो. विचार प्रकियेचं ते आवश्यक अंग आहे. कन्क्युजनची घाई कशाला? अर्धवटराव

In reply to by संजय क्षीरसागर

गैरसमज आणि तथ्ये या दुव्याचा लाभ आपण घेणे अत्यंत आवश्यक आहे. सत्याची जाणीव कधीही झाली तरी चालू शकते असे आमचे प्रामाणिक मत आहे. http://sogc.org/publications/female-orgasms-myths-and-facts/

In reply to by आजानुकर्ण

ते म्हणतात अहंकार हा तुमचा भ्रम आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

काही तरी गल्लत आहे. इन्फर्टाइल असणे आणि फ्रिजिड असणे हे दोन वेगवेगळे दोष अथवा विकार असावेत. फ्रिजिडिटी दूर झाली तरी इन्फर्टाइल अवस्था जैसे थे राहिली तर गर्भधारणा होऊ शकणार नाही. येथे इन्फर्टाइल चा अर्थ वंध्य असा घेतला आहे.

छान. उपाययोजना व्यवहार्य आहेत.

याचा अर्थ असा आहे कि जर माणसाला संभोगाचे काम हे फक्त शुक्राणू दाना पुरते असते तर संभोगानंतर पुरुष आणी स्त्री आपापल्या वाटेने गेले असते ( जसे मांजर, वाघ कुत्रा इ जनावरात होते.) तरुणपणात संभोगेच्छा हि पुरुष स्त्री च्या बरोबर राहण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. सहवासाने प्रेम निर्माण होते आणी त्यानंतर समागमाचे प्रमाण कमी झाले तरी स्त्री पुरुष एकत्र राहतात. वंध्यत्व यात काम करताना ज्यावेळी स्त्रीबिजाची वाढ पूर्ण होते(OVULATION) तेंव्हा त्या जोडप्याला संबंध ठेवण्यास सांगण्यात येते. कारण स्त्रीबीज फक्त चोवीस तास फलनशील असते या काळात संबंध आला नाही तर एक पूर्ण महिना फुकट जातो. ( वर्षात गर्भ धारणा होण्यासाठी फक्त १२ दिवस संधी असते. एकदाच भेटले आणी गरोदर राहिले हे सिनेमापुर्ते ठीक आहे). यासाठी त्या जोडप्याला स्त्री बीज पक्व होण्याच्या अगोदरचे दिवस संबंध न ठेवण्यास सांगितले जाते आणी ते पक्व झाल्यादिवशी आणी दुसर्या दिवशी संबंध ठेवण्यास सांगितले जाते. असे तीन चार महिने केल्यावर त्या जोडप्याची सम्भोगातील मजा कमी होऊन ते एक काम म्हणून व्हायला लागते यासाठी त्यांना समुपदेशन करून त्यांच्यातील आकर्षण कायम ठेवायला सांगायला लागते. कारण जर संभोगाचा मूळ हेतू हा गर्भधारणा असेल तर ती स्त्री गरोदर झाल्यावर संबंध ठेवण्याचे कारण उरणार नाही आणी मग त्या युगुलातील परस्पर संबंधावर परिणाम होतो यास्तव हे सर्व समुपदेशन करावे लागते. आता राहिला दुसरा प्रश्न-- मार्जार कुळातील काही प्राण्यात म्हणजे मांजर, चित्ता आणी बिबळ्या या प्राण्यात स्त्री बीज पक्व होण्याची क्रिया हि संभोगाच्या वेळेस होते त्यामुळे या प्राण्यांच्या माद्या संबंधासाठी तयार नसतात. त्यांच्यात नर त्यंच्यावर संबंधासाठी जबरदस्तीच करतात आणी या संबंधाच्या वेळी होणार्या वेदनेमुळे स्त्री बीज पक्व होते आणी गर्भधारणा होते. याकारणास्तव या प्राण्यांचे प्रणयाराधन अतिशय वादळी आणी नादमय(!) असते बोके दिवसेंदिवस मांजरीच्या मागे घोगरा आवाज काढीत फिरत असतात आणी मांजर त्याला दाद देत नाही. यातून त्यांचे भांडण चालू असते. संधी मिळेल तेंव्हा बोके जबरदस्तीने संभोग करतात आणी त्यातून गर्भधारणा होते. यानंतर बोका आणी मांजरी परत भेटत नाहीत. त्यामुळे काही प्राण्यात सम्भोगामुळे संप्रेरकाचे प्रमाण एकदम उच्चीला जाऊन गर्भधारणा होते. मानवात सम्भोगामुळे संप्रेरके वाढतात काय हे मला नक्की माहित नाही. तिसरा मुद्दा हा आहे कि स्त्री बीज पक्व होण्यासाठी दोन तर्हा वापरल्या जातात. एक म्हणजे बाहेरून संप्रेरकाचे इंजेक्शन देऊन ते प्रमाण वाढवत नेले जाते जेणेकरून अशा पातळीवर आणले जाते कि बीजांड कोषात स्त्री बीज पक्व होईल.(RECEPTOR UPREGULATION ) याउलट जेंव्हा जास्तीत जास्त प्रमाणात संप्रेरके देऊनही जर स्त्री बीज पक्व होत नसेल तर सर्व औषधे बंद केली जातात आणी तीन महिने काहीच दिले जात नाही (RECEPTOR DOWNREGULATION) यामुळे शरीरातील संप्रेरके अगदी कमी होतात आणी शरीर अगदी कमी संप्रेरकांना प्रतिसाद देऊ लागतात. दोन्ही तर्हेने काम होते हे सिद्ध झाले आहे. एक महिन्यापूर्वी (एप्रिल मध्ये) माझ्याकडे एक पस्तिशीच्या स्त्री रुग्ण आल्या होत्या त्यांना चार महीने पाळी आली नव्हती. त्यांनी IVF (टेस्ट ट्यूब बेबी) चे तीन प्रयत्न केले त्यात गर्भधारणा झाली पण दुर्दैवाने गर्भपात झाला होता. यामुळे अतिशय निराश होऊन त्यांनी मुलाची आशा सोडून दिली होती आणि वंध्यत्वावरील उपचार पण सोडून दिले होते. त्यांच्या यजमानांचे वय ४४ असल्याने त्यांना दत्तक देण्यास नकार मिळाला होता( याचे कारण आणि कायदा काय आहे हे माहित नाही). त्या चक्कर येते म्हणून माझ्याकडे सोनोग्राफी साठी आल्या होत्या आणी काय आश्चर्य त्या चार महिन्याच्या गरोदर होत्या. त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना मुलाचे हात पाय हृदय इ सर्व दाखवले तेंव्हा त्यांचा विश्वास बसला. त्यांना आणी त्यांच्या यजमानांना अश्रू आवरत नव्हते. ते परत परत मला धन्यवाद देत होते( ?).मी त्यांना हेच सांगत होतो कि निसर्ग म्हणा किंवा देव म्हणा जे करू शकते ते कितीही निष्णात डॉक्टर करू शकत नाही. मला धन्यवाद देण्याचे काहीच कारण नाही. अशी बरीच उदाहरणे( का चमत्कार) मी स्वतः माझ्या व्यवसायात पाहिली आहेत. यामुळे मी स्वतः साधारणपणे कोणाच्या श्रद्धेवर( अंधश्रद्धेवर) टीका करीत नाही.

In reply to by सुबोध खरे

त्यानंतर समागमाचे प्रमाण कमी झाले तरी स्त्री पुरुष एकत्र राहतात.
सुबोधजी या पेक्षाही प्रेमाला वेगळा अर्थ आहे. एकमेकांचा सहवास, एकमेकांना हात देत जगणं, मुलं, त्यांचं संगोपन अश्या अनेकानेक प्रसंगातून दोघांचे सूर जमत जातात. आकर्षण केवळ शारीरिक असेल तर प्रणय हा विवाहाचा केंद्रबिंदू ठरेल पण तुम्ही आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे :
मानवी बालपण हे प्राणीमात्रात सर्वात लांब म्हणजे जवळ जवळ पंधरा ते अठरा वर्षे असते या काळात एकट्या स्त्री ला बालकाचे पूर्ण पालन पोषण हे अशक्य आहे म्हणून वर लिहिलेले वाक्य बरोबर आहे असे वाटते
त्यामुळेच तर विवाह हे अत्यंत बहुपेडी नातं आहे आणि एकमेकांतला अनुबंध हे उत्तररंगातल्या रम्य जीवनाचा (जो या लेखनाचा विषयी आहे) महत्त्वपूर्ण आधार आहे.

लेख आणि प्रतिसाद दोन्ही उत्तम. डॉक्टरसाहेब तुमचे या लेखमालेबाद्दल अभिनंदन!

हि जी चर्चा चालु आहे, प्रॉब्लेम्सचं स्वरुप जसं स्पष्टीकरणासहीत दिल्या जातय... समजेल अशा शब्दात यापुर्वी कधीच असं कुठे वाचलं नाहि. धन्यवाद हो डॉक्टरदादा. दिवसेंदीवस मी देवाप्रती अधिकाधीक कृतज्ञ होतोय कि ज्याने मला मनुष्यदेहाने हा जगात पाठवले व विज्ञान समजण्याजोगी बुद्धी दिली :) ... आयला.... काय अफाट पसारा आहे... तरिही किती सुत्रबद्ध... व्वाह. अर्धवटराव

मराठी विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक जालावर उपलब्ध आहे. हा दुवा आजानुकर्णाने बहुदा वाचलेलं असेलच; त्याला जे म्हणायचं आहे तेच राजवाडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून, पुराव्यानिशी सांगत आहेत. संक्षींना काही सांगायची आवश्यकता नाहीच; त्यांना सगळं ज्ञान आधीच झालेलं आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे नवीन पुस्तक आहे का? मी राजवाड्यांचे "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" वाचले आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला वाटलं हा कोणतरी राजा राजवाडेसारखा नवा लेखकु आहे की काय. बाकी तुमच्यासारख्या थोर लोकांनी सांगितलं म्हंजे ते खरेच असणार असा विचार केला होता. आम्हाला आपलं काय कळतंय! आम्ही विहिरीत उड्या मारणारे.

In reply to by पैसा

चाळ्ळं फक्त. होतं काय ल्हिलंय तसं होतं. मान्य. फुडं???? 'मागच्या जन्मीची पापं' म्हणून भारतासारख्या 'मागास' देशात काही लोकांना जन्म मिळतो. काय करणार? सो सॅडच ना! महाभारतातनं आम्ही काय टिपतो? तर हे! भगवद्गीता, भीष्मगीता वगैरे झूठ हो सगळं. अस्लं काही विचारात तरी घ्यायचं का कधी? छे! कृशिसानविवि. आम्ही मागासच बरे!

मूळ धागा हा स्त्री च्या रजोनिवृत्ती च्या वेळच्या प्रश्नाबद्दल आहे. त्यात मला जे म्हणायचे होते ते असे कि चांगले असणे आणि दिसणे हे मूळ स्त्रीस्वभावाचा पैलू आहे किंवा स्त्रीची नैसर्गिक प्रेरणा आहे. ( तो पुरुष स्वभावाचा नाही असे माझे म्हणणे नाही) पण आपली मनोवृत्ती आजही साचे बद्ध असल्यामुळे स्त्री ने सुंदर दिसले तर लग्नाच्या बाजारात किंवा त्यानंतरही तिची किंमत जास्त असते. रजोनिवृत्ती नंतर स्त्रीच्या शरीरात जसे बदल होतात तसेच तिच्या मानसिक स्थितीत बदल होतात हे सम्प्रेरकांचा मेंदूवर होणार्या परिणामामुळे होतो यात स्त्रीने काय करावे कि जे नैसर्गिक प्रेरणेच्या विरुद्ध जाणार नाही हा त्यात विचार होता. नैसर्गिक प्रेरणा म्हणजे काय ? आपल्या लहान मुलाला तूप किंवा अमूल बटर का आवडते?त्याला काहीही न शिकवता. कारण चरबी युक्त पदार्थ आपल्याला अन्नाच्या दुर्भिक्ष्याच्या काळात तारून नेतील हे त्याच्या डी एन ए स्मृती वर छापलेले असते. लहान मुल तोंडात बोट किंवा स्तन दिल्यावर चोखु का लागते? हे पण त्याच्या डी एन ए स्मृती वर छापलेले असते.या नैसर्गिक प्रेरणा आहेत. आपल्याला सध्या पदार्थांपेक्षा भाजलेले पदार्थ का आवडतात तंदूर मध्ये भाजलेले चिकन किंवा पनीर का जास्त आवडतात कारण भाजलेले पदार्थ हे पचायला हलके असतात आणि विषबाधेपासून मुक्त असतात हे आपल्या डी एन ए स्मृती वर छापलेले असते.म्हणूनच आपल्याला सातारी कंदी पेढा साध्या पेढ्या पेक्षा जास्त आवडतो कारण त्यात भाजलेल्या दुग्ध प्रथिनाची चव असते. मानवाची नैसर्गिक प्रेरणा काय आहे तर आपला जीव वाचवणे. म्हणूनच मरण येण्याची शंभर टक्के शक्यता असूनही देश देव किन्वा धर्मासाठी लढाई करून बलिदान दिलेल्या सैनिकाला जगभरच्या इतिहासात फार मोठा मान दिला गेला आणि जातो. या नैसार्गिक प्रेरणेचा विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला होता. नैसर्गिक प्रेरणेचा विचार केल्यास हे लक्षात घेत येते कि ती व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत कशी वागते. त्यामुळे त्यावर इलाज करणे जास्त सोपे होते. दुर्दैवाने मी थोडक्यात लिहिले होते त्याचा विपर्यास झाला आणि मला एका विशिष्ट वृत्तीचा म्हणून शिक्का मारला गेला. असो मला त्याचे दुखः नाही. आपला धागा लोकांनी मानवी विचार शक्ती आणि इतर गोष्टी कडे नेल्याने मार्गावरून भरकटला हे टाळता आले असते असे वाटते .

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, काही लोक अमूक एक समजूत घट्ट धरून धाग्याच्या मूळ विषयाकडे दुर्लक्ष करतात तर कधी कधी चांगला चाललेला धागा काही विशिष्ट उद्देशाने मुद्दाम भरकटवण्याचे प्रकारही इथे अनेकदा घडतात. मी त्या वादात आता पडत नाही. सर्वसामान्य वाचकही अशा वादात पडत नाहीत कारण त्यांना धाग्याशी मतलब असतो. पण तरीही कृपया नेहमीप्रमाणे लिहीत रहा ही विनंती. आम्ही सगळे वाचत आहोत!

In reply to by पैसा

>>>>काही लोक अमूक एक समजूत घट्ट धरून धाग्याच्या मूळ विषयाकडे दुर्लक्ष करतात तर कधी कधी चांगला चाललेला धागा काही विशिष्ट उद्देशाने मुद्दाम भरकटवण्याचे प्रकारही इथे अनेकदा घडतात. 'तीच त्यांची 'नैसर्गिक प्रेरणा' असते' असं म्हणावंसं वाटत आहे तरीही म्हणणार नाही कारण मी सर्वसामान्य वाचक आहे. ;)

In reply to by सुबोध खरे

आपला धागा लोकांनी मानवी विचार शक्ती आणि इतर गोष्टी कडे नेल्याने....
हे माझ्या प्रतिसादांना उद्देशून असेल तर 'नैसर्गिक प्रेरणा' म्हणजे काय अभिप्रेत आहे हे जे धाग्याच्या शेवटास सांगितले आहे तेच धाग्याच्या पहिल्या परिच्छेदात समाविष्ट केले असते तर समजण्यास अधिक सोपे झाले असते. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. मला जे जाणवले ते मी लिहीले. धागा भरकटवणे हा उद्देश कधीच नव्हता.
मला एका विशिष्ट वृत्तीचा म्हणून शिक्का मारला गेला.
असे संदिग्ध लेखन करण्यापेक्षा उलगडून स्पष्ट शब्दांची वाक्य रचना केली तर आपला निर्देश कुठे आहे समजेल आणि प्रतिसाद लिहीणे सोपे जाईल. वाचकाच्या मनांत गोंधळ निर्माण होणार नाही अशा विधानांची गरज आहे. फार दु:खाने म्हणावे लागते आहे की हा ह्या धाग्यावरील माझा शेवटचा प्रतिसाद समजावा. धन्यवाद.

पेठकर साहेब मी माझ्याबद्दल बोलत होतो मला स्त्रीमुक्ती विरोधी किंवा MCP हा शिक्का बसला. (तसा मी बर्यापैकी गेंड्याच्या कातडीचा आहे त्यामुळे मला फरक पडत नाही ) आपण गैरसमज करून घेऊ नये.