मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

.....वाहवा.....

चाणक्य · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मी तुझ्या डोळ्यात काही पाहिले होते बहुधा भास ते माझ्या मनातले होते कितीदा मी स्वतःलाच समजावतो फायदे मिळाले ते तहातले होते फुलवायचे तुला जे चार भिंतीत होते स्वच्छंद ते फुल रानातले होते विचारे का हसलो तिला एकटे पाहून मी सुख ती दुस-या कुणाची नसण्यातले होते मिळविली वाहवा माझिया गज़लांनी खरे ते दुःख काही उरातले होते

वाचने 2527 वाचनखूण प्रतिक्रिया 9

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/16/2013 - 12:41
मिळविली वाहवा माझिया गज़लांनी खरे ते दुःख काही उरातले होते छान. अजून येऊ द्या. -दिलीप अबिरुटे