सेकंड लाईफ
नमस्कार ! मी योगेश.
ही कथा आहे माझ्या सेकंड लाईफ ची. लहानपणापासूनच मला वाचनाची फार आवड. इतकी मी ठरवूनच टाकले की मोठे झाल्यावर आपण पेपरस्टॉलच टाकायचा. का ? तर धंद्यापरीस धंदा होईल आणि सगळे पेपर, मासिके, दिवाळी अंक फुकटात वाचता येतील. मराठी लेखक वाचता वाचता नंतर कंटाळा येऊ लागला. पुढे पुढे तर मला इंग्रजीतुन मराठीत अनुवादीत झालेल्या कादंबर्याच आवडू लागल्या. त्यातल्या त्यात गुप्तहेरांच्या रहस्यमय कथांनी तर माझ्या मानाची पुरतीच पकड घेतली. त्यातील हेरांचे दुहेरी जगणे मला हळुहळू आवडू लागले. नाहितरी प्रत्येकजण काही प्रमाणात दुहेरी आयुष्य जगतच असतो नाही का ?
तर सांगायचा मुद्दा असा की आपल्याला कधी ना कधी नक्कीच असे वाटते की आपण आहोत त्यापेक्षा कुणीतरी वेगळे असतो तर मजा आली असती. निदानपक्षी बरे तरी वाटले असते. जसजसे माझे वाचन वाढू लागले तसतशी मला दुहेरी जगण्याची प्रबळ इच्छा निर्माण होऊ लागली. बर्याच विचाराअंती मी हा निर्णय प्रत्यक्षात उतरविण्याचे ठरविले.
मात्र मला माझ्या सेकंड लाईफबद्दल सांगण्याअगोदर माझ्या फर्स्ट लाईफबद्दल सांगीतलेच पाहिजे तरच तुम्हाला अंदाज येईल की या दोन्ही लाईफ्स मधला थरार किती रोमांचक असेल.
मी जन्मलो, वाढलो आणी शिकलो मुंबईतच. मुंबईत आता बेदखलपात्र असलेल्या चाळ सिस्टम (संस्कृती नाही बरं !) मधे एका १२ बाय २० च्या खोलीत आई, बाप, आणि आम्ही ३ भावंडे लहानाची मोठी झालो. चाळीत राहण्याचा मला फार त्रास झाला नाही मात्र जे मित्र फ्लॅट्मधे राहायचे त्यांना घरी आणायची लाज वाटायची आणी चाळीतच आजुबाजुला राहणार्या पोरींसमोर संडासचे डबडे घेऊन लायनीत उभे राहणे नकोसे वाटायचे. त्या पोरी जर माझ्याच शाळेतल्याच असतील तर जास्तच. अर्थात आपल्यासारखा विचार करणारे बरेच जण आपल्या आजुबाजूला असतातच. पोरींना देखील असेच काहितरी वाटत असणार त्यामुळे त्या शक्यतो रात्रीच्या अंधारातच हा कार्यक्रम उरकायच्या.
तुम्ही जर चाळीत राहिले असाल तर तुम्हाल मी काय म्हणतोय ते नक्कीच कळेल. संडास, मोरी, डबडे, टमरेल, गटार, उसनं-पासनं, चांभारचौकशा हे खास चाळीतले शब्द आहेत नव्हे चाळीचे व्ययछेदक लक्षण आहे.
तुम्हाला ठराविक लोकलला ठराविक डब्ब्यात ठराविक वेळेला जशी ठराविक मंडळी दिसतात तस्साच माहोल इथे असायचा. रो़ज लायनीत ठराविक मंडळी ठराविक वेळेला दिसायचीच. जर चुकून एखादा नवा मेंबर दिसला की आश्चर्य देखील वाटायचे. आपल्याआधी आत जाऊन आलेल्या व्यक्तीने रात्री काय खाल्ले असले पाहिजे रादर काय पिले असले पाहिजे याचा अंदाज आत गेल्या गेल्याच लागायचा. ( वासाने हो ! ) मग अशा सुवासिक मंडळींना टाळण्यासाठी वेळ बदलण्याचा प्रयत्न करावा लागे मात्र ते सहजासहजी शक्य नसे. असो.
तर शिक्षण पूर्ण केल्यावर मी नाना धंदे (ज्यात नीट कमाई नाही आणी कष्ट जास्त ते धंदे : इति आमच्या माताजी) करुन पाहिले. पेपर टाकले, गाडया पुसल्या, टाईपिंग केली, प्रिंटींगची कामे केली आणि शेवटी आय.टी. हार्डवेअर मधे येऊन बुड टेकलय. आता ते इथे किती दिवस टिकतयं ते पाहायचं !
आता समाज्याच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न झालयं, बायको आहे, एक गोड मुलगा आहे. मुझको भी तो लिफ्ट करा दे अशी आरती दररोज देवाकडे केल्यामुळे चाळीतून फ्लॅट्मधे शिफ्ट झालोय. मात्र हा सेकंड लाईफ चा किडा अजुनही मनात वळवळतोय. तर अशा चारचौघांसारख्या लाईफ मधून मी एन्ट्री घेतोय सेकंड लाईफ मधे. मात्र हिंदी चित्रपटात हिरो जसा एकाचवेळी डब्बल रोल करतो तसाच.............
क्रमशः
Book traversal links for सेकंड लाईफ
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
पहिला गेअर मस्त टाकलाय.
सर्वप्रथम नवीन फ्लॅट मध्ये
सेकन्ड लाईफ
छोटासा भाग छान झालाय.
वाचतोय
छान
मस्त सुरुवात.
काहीही झाले तरी जुने दिवस
येऊद्य पुढचाही भाग... वाचतोय.
वाचतेय.
येक्जॅक्ट्ली हाच्च प्रश्न मला
छोटा भाग.
चांगले लेखन....
चाळीतील काळ सुखाचा
लेख आवडला.
मस्त सुरुवात!