एखादा कर लागू होताना इतका धुरळा उडालेला मी तर कदाचित पाहिल्यांदाच पहात आहे. औरंगजेबाने जिझीया कर लावला तेव्हा कदाचित असे झाले असण्याची शक्यता आहे. (अर्थात दोघांची तुलना हा उद्देश येथे नाही).
स्थानिक स्वराज्य संस्था कर ( एलबीटी ) म्हणजे काय ?
पुर्वी कोणत्याही नगरपालिका / महानगरपालिका हद्दीत प्रवेश करतांना जकात भरावा लागत असे. उदाहरणार्थ मी एक संगणक विक्रेता आहे आणी मी जर रु. २५,०००० किमतीचा संगणक मुंबईत विकत घेतला व तो ठाण्यात नेला तर मला त्या किमतीवर ५ ट्क्के जकात द्यावी लागत असे. म्हणजे माझी खरेदी किंमत रु. २६,२५०.०० झाली.
आता मला जकात भरावी लागणार नाही मात्र एलबीटी भरावा लागेल. तो कदाचित २ - ३.५० % च्या आसपास असेल. म्हणजेच माझी एकूण खरेदी किंमत रु. २५,५०० ते रु. २५,८५० च्या दरम्यान होईल. म्हणजे ही किंमत जकात भरुन खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा साधारण ५०० रुपयांनी कमीच झाली.
मग मी (व्यापारी) एलबीटी भरायला का रडतो ?
जकात लागू असतांना :
१. मी रु. २५,०००० चा संगणक रु. १५,००० ला खरेदी केल्याचे खोटे बिल नाक्यावर दाखवून वरच्या १०,००० किमतीवरील जकात वाचवू शकतो.
२. जकात नाक्यावरील कामगाराला ( हापीसरला) चिरिमीरी देऊन ( याची पण टक्केवारी ठरलेली असते बरकां !) माल तसाच नेऊ शकतो.
३. मी खरेदी केलेली वस्तू जकात नाक्याच्या तपासणीत पकडली न गेल्यास वरील दोन्ही उपायांचा अवलंब न करता जकात वाचवू शकतो.
४. जकात चुकवून माल नेताना पकडला गेलो तर एकूण जकात किमतीच्या ५ पट दंड आकारला जात असे.
एलबीटी लागू झाल्यावर :
१. मला जकात नाक्यावर थांबावे लागणार नाही.
२. माझ्या माल वाहतुकदाराचा वेळ व डिझेल वाचणार.
३. माझ्या सेल्स रजिस्टरमधे जी किंमत नोंदलेली असेल त्या रकमेवर कर भरावा लागेल. (म्हणजे जास्तीत जास्त प्रामाणिकपणा दाखविणे आले.)
४. मला दर महिना हिशोब ठेऊन प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपर्यंत एलबीटी भरावा लागेल.
५. तो चुकविण्याचा प्रयत्न केल्यास दंड होण्याची शक्यता.
६. महापालिका अधिकार्यांना माझे हिशेब तपासण्याची मुभा. ( म्हणजे हा एलबीटी बाबू माजी लुंगी बनियान देखील काढून घेणार वर कर भरणे चुकणारच नाही).
मनपा / त्यांचे कर्मचारी का रडतात ?
१. एलबीटीचे दर जकातपेक्षा कमी असल्यामुळे उत्पन्न कमी होणार.
२. बहुसंख्य जकात नाक्यावरचे काम करणारे कर्मचारी उन्हातान्हात काम करतात, घाम गाळतात व घामाचा पैसा कमावितात. त्यांचे काम कमी झाल्यावर सुर्यप्रकाशापासून मिळणारे विटामिन डी व विटामिन एम (मनी) कमी होणार.
३. जकात नाक्यावरील दलालांचे काम बंद होणार
तर सध्या अशी विन-विन सिच्युएशन आहे !!!!!!!
वाचने
6144
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणजे एलबीटी फक्त त्यांनाच
तसं नाही ....
आता पर्यंत वाचलेल्या
बरेचसे खरे आहे !
In reply to आता पर्यंत वाचलेल्या by ज्ञानोबाचे पैजार
समजा
नाही दाखविता येणार....
In reply to समजा by इरसाल
ओके
एलबीटी
अशीच व्यवस्था महानगरपालिकांच्या बाबतीत करता आली असती.
In reply to एलबीटी by नितिन थत्ते
आहेराच्या वस्तूवर जकात कर
In reply to अशीच व्यवस्था महानगरपालिकांच्या बाबतीत करता आली असती. by धर्मराजमुटके
एलबीटी मध्ये काही जाचक अटी आहेत
खरेदी केलेला माल ३ महिन्यात विकलाच पाहिजे
In reply to एलबीटी मध्ये काही जाचक अटी आहेत by वेताळ
वॅट आणि सीएसटीत गुडस रिटर्नवर कालमर्यादा आहेत
In reply to खरेदी केलेला माल ३ महिन्यात विकलाच पाहिजे by धर्मराजमुटके
"हिशोब ठेवायला लागणार" हा
+१
In reply to "हिशोब ठेवायला लागणार" हा by नितिन थत्ते
लेख वाचला
In reply to +१ by ऋषिकेश
माफ करा..
In reply to लेख वाचला by धर्मराजमुटके
व्हॅटद्वारा वसुली आणि एलबीटी वसुली यात फरक फक्त
त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्यापार्यांना सहमती दर्शवून सरकारचा डा
सोने-चांदी व्यापारी त्याच्या धंद्यात
कॅरेट
In reply to सोने-चांदी व्यापारी त्याच्या धंद्यात by वेताळ
सर्वच भ्रष्ट
भ्रष्ट प्रजा