Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Bhagwanta Wayal on Wed, 04/17/2013 - 16:41
आयुषभर कष्ट करुन जिने तुला वाढवल । आयुष्याच्या संध्याकाळी तिलाच तू रडवल॥ध्रु॥ चिऊचा काऊचा घास करुन, जिने तुला भरवल । कड्या खांद्यावर घेऊन तुला, गावभर फिरवल । माझा बाळ्,माझा सोन्या म्हणून, गावभर मिरवल । नऊ महिने तुला आपल्या उदरी वाढवल...॥१॥ अनंत कळा सहन करून, तुला हे जग दाखवल । चिमुकल्या बोटला धरुन, चालायला शिखवल । खोकला येताच तुला, मधाच बोट चाखवल । तळहाताच्या फोडप्रमाणे जिने तुला वाढवल...॥२॥ तुझ्यासाठी तिने आपल, रक्त आटवल । शिक्षणासाठी तुला, चांगल्या शाळेत पाठवल । जीवनभराच दु:ख , आपल्या पोटात साठवल । स्वतःच्या स्वप्नांना तिने पायदळी तुडवल...॥३॥ सगळेच काय अगदी, श्रावण किंवा पुंडलीक नसतात। जे अखंड आईवडिलांची, सेवा करतात । परंतु कंसासारखेही, काही जण असतात । त्यांना ही समर्थांनी उत्तमच घडवल....॥४॥

Submitted by पक पक पक on गुरुवार, 04/18/2013 - 10:21

Permalink

छान...

छान...
  • Log in or register to post comments

Submitted by Bhagwanta Wayal on Sun, 05/12/2013 - 10:34

Permalink

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...!!
  • Log in or register to post comments

Submitted by Bhagwanta Wayal on Sun, 05/12/2013 - 17:36

Permalink

"मदर डे" निमित्त पुनःर्वाचन..

"मदर डे" निमित्त पुनःर्वाचन...!
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक वायळ on Sun, 05/12/2013 - 20:12

Permalink

चिऊचा काऊचा घास करुन,

चिऊचा काऊचा घास करुन, जिने तुला भरवल । कड्या खांद्यावर घेऊन तुला, गावभर फिरवल । माझा बाळ्,माझा सोन्या म्हणून, गावभर मिरवल । नऊ महिने तुला आपल्या उदरी वाढवल. आई खूप छान असते
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 05/12/2013 - 22:32

Permalink

साधीसुधी कविता

साधी आणि मनापासून लिहिलेली.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1752 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com