हवं असं कुणीतरी
लेखनविषय:
आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर असो तुझा साथ
काटेरी वाटेवर विश्वासाचा घट्ट हात
शोधात अशा मी प्रेमा तुझ्या
ओवाळून टाकीन जीव तुजवर , होशील का तू माझा सख्या ?
ना कधी सोडून जाईन
ना अंतर तुला मी देईन
वचन हे माझे नाहीत नुस्तेच शब्द ,
नाही हे खोटे, ना हे म्रुगजळ,
तुझे आश्रू सामावण्यात - सदैव माझी ओंजळ
एकट्याने जगणे नाही हे इतके सोपे
एकमेकांवर अवलंबून जगण्यात देखील वेगळीच मजा असते
" काळजी करू नकोस , आहे मी " असे एकच प्रेरणादायी वाक्य
अनेक अडचणींना सामोरे जाणे होते ज्याने शक्य
पटेल तुला हे नक्की कधीतरी
तेव्हा तू ही म्हणशील , हवं असं कुणीतरी
-- प्रिया
वाचने
1788
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
छान आहे. समोरच्या व्यक्तीला
कविता छान आहे, आवडली...
काळजी करू नकोस , आहे मी तुझ्या पाठीशी"
मस्त एकदम.
...." काळजी करू नकोस , आहे मी
In reply to ...." काळजी करू नकोस , आहे मी by चित्रगुप्त
हो ना?
...पटेल तुला हे नक्की कधीतरी.