Skip to main content

पौरुषाला आव्हान...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 06/05/2013 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, आपले एक आदरणीय सभासद आणि माझे ज्येष्ठ स्नेही श्री रामदास.. अर्थात, मिपाकर रामदास.. फार पाल्हाळ लावत नाही.. पण एकच सांगतो की हा एक अफाट प्रतिभा असलेला परंतु तेवढाच अगम्य माणूस आहे.. त्यांचा माझ्यावर लोभ आहे, आमचा दोस्ताना आहे हे खरं तर माझं भाग्य.. परंतु आपले हे रामदासबुवा तसे थोडे दूर दूर राहणारे, वाटल्यास थोडे बुजरे म्हणुया.. त्यांनी एक अप्रतिम मुक्तक लिहिलं आहे..आणि आज त्यांनी मला ते सहजच दाखवलं.. परंतु का माहित नाही, रामदासबुवांना ते मिपावर टाकणं तेवढंसं प्रशस्त वाटेना.. परंतु मला मात्र त्या मुक्तकामधली ताकद, त्यातील अफाट ऊर्जा जाणवली आणि 'तुम्ही नाही तर निदान मला तरी हे मिपावर लिहू द्या आणि मिपाकरांना एका छोटेखानीच परंतु जबरदस्त कलाकृतीचा आस्वाद घेऊ द्या..' असं मी रामदासबुवांना म्हटलं आणि अखेर हो, ना करत त्यांनी परवानगी दिली.. --------------------------------------------------------------------------------------------- सदर मुक्तकातली बच्यकी ही एक वेश्या आहे आणि तिचं हे प्रकटन आहे... पौरुषाला आव्हान.. (शीर्षकश्रेय - तात्या.) कथा जशी सरकत जाते त्याप्रमाणे बच्यकीची अनेक नॅरेशन्स आहेत .त्यापैकी एक... ये ना पुढे. ये..! माझ्या लाखो पेशी वाट बघतायत.. त्या पुरुषोत्तमाची जो भोगेल मला नजरेच्या हजारो कोनांतून.. भिरकावून टाकेल त्याच्या श्वासांच्या वावटळीत झेलेल अल्लद त्याच्या अनेक हातानी... आणि मी म्हणेन सोडू नको मला आता...! मी वाट बघते त्याची, जो करेल मोकळे आतून बंद झालेले झरे आणि न्हाऊ घालेल मला माझ्या बेबंद निर्वस्त्र अस्तित्वाला.. पुरून उरेल ज्याची वाफ, अशा ढगासारखा येईल... कधीही...! आणि मलाही लाज वाटणार नाही माझ्या ओलेत्या अंगाची... ये.., ये ना पुढे. लाखो डोळ्यानी - लाखो इंद्रीयाचा इंद्र होउन ये...! एक बाई म्हणजे दारु ठासून भरलेल्या फटाक्यांची पेटी असते... एक फुलबाजी म्हणजे दिवाळी नाही. एका चार क्षणाच्या आतषबाजीत तुझी आग संपत असेल तर.... तर जा बघ.. सिनेमाच्या पडद्यावरचेच प्रेमालाप.. आणि कुढत-कुरवाळत बस तुझ्या आखूड पौरुषाला पाप पुण्याच्या अंधारात...! -- रामदास.
लेखनविषय:

वाचने 39915
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by jaypal

आणि नशा कशात नाही? हे संकेतस्थळ काय कमी नशेमन आहे? इथे लिहीण्यात नशा आहे. एकेकाशी प्रतिवाद करण्यात नशा आहे. तुझ्या आणि रामदासजींच्या प्रतिसादातल्या दिलदारीला दाद देण्यात नशा आहे. परवा मित्रांच्या मैफिलीत प्रत्येकी चार पेग झाल्यावर `स्त्री काय चिज़ आहे' यावर एकानं सांगितलेला हा ज्योक ऐकः बराकच्या सेकंड टर्म प्रेसिडेंशियल विजयानंतर मिशेल म्हणते; बॅरी आपण हा आनंद व्हाइट हाऊसचा कोणताही प्रोटोकॉल न पाळता, दोघंच कुठं तरी दूर जाऊन, आपल्या पहिल्या दिवसांसारखा साजरा करू. बराक म्हणतो, मला मंजूर आहे, कुठे जायचं ते ठरव. मिशेलनं ठरवलेल्या एका दूरच्या साध्याश्या हॉटेलात दोघं सामान्य नागरिक म्हणून जातात. हॉटेल मालक म्हणतो, `मिस्टर प्रेसिडेंट, माझ्यासारख्याचं हॉटेल तुम्ही सेलिब्रेशनला निवडलं यात माझ्या जीवनाचं सार्थक झालंय. तुमच्या इच्छेप्रमाणे इथे तुम्हाला इतरांसारखच वागवलं जाईल. माझी फक्त एक विनंती आहे, मला मिशेलशी दोन मिनीटं बोलायचंय. बराक म्हणतात, वाय नॉट? प्लीज गो अहेड. मालक आणि मिशेल तब्बल वीस मिनीटांनी परत येतात आणि सुहास्य वदनानं मिशेल सांगते : बॅरी, तू मला प्रपोज करण्यापूर्वी वी हॅड अ‍ॅन अफेअर. याच्याशी गपा मारतांना मी नॉस्टॅलजिक झाले आणि वेळेचं भान राहिलं नाही' बराक पण मिश्कीलपणे म्हणतो, तू याच्याशी लग्न केलं असतंस तर आज या हॉटेलची मालक असतीस. मिशेल म्हणते, बॅरी तसं नाही. मी त्याच्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकाचा प्रेसिडेंट असता!'

In reply to by संजय क्षीरसागर

तात्या, जगणं हीच एक नशा आहे त्यामुळे मला तर कायम चढलेलीच असते
हरकत नाही.. उतार्‍याची घ्यायला या.. :)
मिशेल म्हणते, बॅरी तसं नाही. मी त्याच्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकाचा प्रेसिडेंट असता!'
मस्त.. :)

नो वे !! (कुठल्याही) स्त्रींच मन, पुरूष कसा काय ओळखु शकतो व्बा ? काल्पनिक प्रकटन म्हणुन आवडली असे म्हणायचे धाडस रामदास काकांशी असलेल्या सख्यामुळे करताही येत नाही.

आणि कुढत-कुरवाळत बस तुझ्या आखूड पौरुषाला पाप पुण्याच्या अंधारात...!
ह ह पू वा