✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डोंबिवली कट्टा....

म
मुक्त विहारि यांनी
Wed, 05/08/2013 - 22:30  ·  लेख
लेख
प्रिय मित्रांनो आणि मत्रिणींनो, दि, २६/०५/२०१३ रोजी डोंबिवली कट्टा आयोजीत केला आहे. नंदी पॅलेसला सं.७:३० वाजता जमायचे ठरवले आहे. ज्या कोणाला शक्य असेल त्याने यावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी कट्ट्याचा व्रुत्तांत वाचून समाधान व्यक्त केलेत तरी चालेल. प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे. ठिकाण जरी डोंबिवली असले तरी, फक्त प्रुथ्वीवरीलच नाही तर आकाशगंगेतील सर्व मिपा वाचकांना जाहीर आमंत्रण आहे... मला व्य. नी. केलात तरी चालेल. किंवा इथे प्रतिसाद दिलात तरी चालेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
19238 वाचन

💬 प्रतिसाद (117)

प्रतिक्रिया

नुसते समाधान व्यक्त करत आहे.

रेवती
Wed, 05/08/2013 - 22:31 नवीन
आधी नुसते समाधान व्यक्त करत आहे.
  • Log in or register to post comments

हम्म!

किसन शिंदे
Wed, 05/08/2013 - 22:34 नवीन
हम्म! या मेल्या स्पावड्याने राजकारण केलंन..!!
  • Log in or register to post comments

स्पा चा काही दोष नाही आहे...

मुक्त विहारि
Wed, 05/08/2013 - 22:44 नवीन
दोष माझा आहे... मी खूप दिवसांनी सुट्टीवर येत आहे... माझ्या मनांत होते... मी स्पा जवळ फक्त विषय काढला.. ठि़काण, वेळ आणि दिवस ,,, हे सगळे मी ठरवले आहे.. दोष द्यायचाच असेल तर मला द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मी हे याचसाठी म्हणालो कारण,

किसन शिंदे
Wed, 05/08/2013 - 23:00 नवीन
मी हे याचसाठी म्हणालो कारण, २५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय. त्यासंबधी सगळी जुळवा जुळव चालूय. आणि या कट्ट्याची कल्पना स्पासहीत आणखी काही मिपाकरांना दिलेली आहे. वेळ आणि जागा नक्की झाल्यानंतर धागा काढायचं ठरलं होतं. असो. कट्ट्याला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अरे व्वा!!! मस्तच...

मुक्त विहारि
Wed, 05/08/2013 - 23:05 नवीन
आम्ही दोन्ही ठिकाणी येवू,,, आहे काय आणि नाही काय... उलट मला तर दोन्ही ठिकाणी यायला आवडेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मध्यवर्ती मुंबईकरांनो....

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 05/09/2013 - 00:22 नवीन
मध्यवर्ती मुंबईकरांनो.... कितीही कट्टे करा पण ठिकाण स्टेशनजवळ ठेवा. आम्हा खाचीकोपऱ्यातल्या मुंबईकरांची सोय बघा, अशी नम्र विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

ठाणे..

सूड
गुरुवार, 05/09/2013 - 00:36 नवीन
ठाणे मध्यवर्ती मुंबैत येतं अशी मध्यंतरी ज्ञानात भर पडली होती, आता डोंबिवली पण यायला लागलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ते वाक्य "....२५ तारखेला

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 05/09/2013 - 00:42 नवीन
ते वाक्य "....२५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं..." या वाक्यावर लिहिले आहे. आणि सूड, शब्द जपून वापर... ठाणे मध्यवर्ती मुंबैत येत नाही, ठाणे हेच मध्यवर्ती मुंबै आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नो प्रॉब्लेम...

मुक्त विहारि
गुरुवार, 05/09/2013 - 00:38 नवीन
रात्री राहायची सोय करायचा प्रयत्न केला जाईल. महिलांसाठी सोय केली आहे. पुरुषांसाठी पण केल्या जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

स्पष्टीकरण

स्पा
गुरुवार, 05/09/2013 - 10:00 नवीन
या मेल्या स्पावड्याने राजकारण केलंन..!!
मा/श्री किसनजी शिंदे साहेबांना माझ्या (न) केलेल्या राजकारणामुळे जो त्रास झाला, याबाबत त्यांची मी जाहीर क्षमा मागतो, ते मोठ्या अंत:करणाने मला क्षमा करतीलच,यात शंकाच नाही .
५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय. त्यासंबधी सगळी जुळवा जुळव चालूय. आणि या कट्ट्याची कल्पना स्पासहीत आणखी काही मिपाकरांना दिलेली आहे. वेळ आणि जागा नक्की झाल्यानंतर धागा काढायचं ठरलं होतं.
यावरून तरी किसनजीना कल्पना यायला हवी होती कि, मुंबईच्या मध्यवर्ती भागात एवढा महाकट्टा आयोजित केलेला असताना म्या पामर डोंबिवली सारख्या खेड्यात कट्टा करण्याचा विचार तरी करू धजेन काय हॅ हॅ.. असो मुवि काका येथे येणार असून त्यांना मिपाकरांना भेटायची प्रचंड इच्छा आहे, त्यातूनच त्यांनी कट्ट्याचा प्रस्ताव मांडला. त्यांना मी ह्या प्रकारची पूर्ण कल्पना दिली कि म्हटलं अहो. डोंबिवली ठाण्यापासून तब्बल १७ किमी एवढ्या प्रचंड अंतरावर आहे, आणि मुंबईपासून तर अतिभयंकर ४८ किमी. कोणी येथे येणं कसं शक्य आहे? तुम्ही सरळ इथल्याच मेम्ब्रांना व्यनी करा , विषय संपवा. पण त्यांच्या उत्सुकतेने घात केला :D असो .. किसनजी शिंदे साहेबांची मी परत माफी मागतो. यापुढे त्यांना असा पत्रास होणार नाही, सदर घोषणेतून आमचे नाव वगळलेले आहे,सबब आम्हास कुठलाही व्यनी,करू नये मुवि काका , आपण भेटूच :) अवांतर : यापुढे उत्तर ,दक्षिण, पूर्व , पश्चिम, आग्नेय, वायव्य अशा मुंबईच्या दश दिशा , आणि मध्य (ठाणे) येथे आयोजित होणार्या सर्व कट्ट्याना आमच्या अनंत शुभेच्छा - खेडवळ स्पा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

हम्म्म.

प्रचेतस
गुरुवार, 05/09/2013 - 10:08 नवीन
हम्म्म. बाकी आमच्या पुण्याचे कट्टे असे गाजावाजा करून ठरवत नसल्याने अशी ऐनवेळी तोंडघशी पडायची वेळ येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

जौन्द्या हो

स्पा
गुरुवार, 05/09/2013 - 10:10 नवीन
चालायचंच , मुवि काकांना आला असेल आता अनुभव परत अशी चूक नाही करणार ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

का रे मेल्या

पैसा
गुरुवार, 05/09/2013 - 10:11 नवीन
काड्या टाकतो आहेस! तुम्ही लोक सुधारायचे म्हणून नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काड्या???

प्रचेतस
गुरुवार, 05/09/2013 - 10:12 नवीन
काड्या??? नाय ब्वा. सत्य ते सांगितलं. बाकी सत्य हे कटू असतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो हो

पैसा
गुरुवार, 05/09/2013 - 10:14 नवीन
सत्य सांगितल्यावर मीठ मिरच्यांचा मार खावा लागतो बरेचदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
गुरुवार, 05/09/2013 - 10:20 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

होना, इतके सुमडीत होतात की

यशोधरा
गुरुवार, 05/09/2013 - 11:28 नवीन
होना, इतके सुमडीत होतात की पुण्यातल्या लोकांनाही कळत नैत! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी.

प्रचेतस
गुरुवार, 05/09/2013 - 11:31 नवीन
अगदी अगदी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वल्ल्या तू "पुणेकर" आहेस..?

मोदक
गुरुवार, 05/09/2013 - 12:43 नवीन
वल्ल्या तू "पुणेकर" आहेस..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे तिकडं कर्जतच्या पुढे जसं

प्रचेतस
गुरुवार, 05/09/2013 - 12:58 नवीन
अरे तिकडं कर्जतच्या पुढे जसं मुंबै तस इकडं लोणावळ्याच्या पुढे पुणं. --- कट्टर चिंचवडकर (वल्ली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

गुड. मग आता तुमचा पुढचा कट्टा

मोदक
गुरुवार, 05/09/2013 - 13:10 नवीन
गुड. मग आता तुमचा पुढचा कट्टा भोसरी / उंद्री एमआयडीसी मध्ये का..? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भोसरिचा कट्टा

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 05/09/2013 - 17:21 नवीन
हा शब्द प्रयोग करतान्ना जपून्...शिवि वाट्ते...:)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

भोसरिचा कट्टा

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 05/09/2013 - 17:30 नवीन
हा शब्द प्रयोग करतान्ना जपून्...शिवि वाट्ते...:)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अवो

चाणक्य
Fri, 05/10/2013 - 12:00 नवीन
उंड्री लई लांब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ओके हं बाळ, तुला बक्षीस देऊ

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 05/10/2013 - 01:25 नवीन
ओके हं बाळ, तुला बक्षीस देऊ हं आपण. तोंडघशी न पडण्याची इतकी मोठी achievement केल्याबद्दल. (तिऱ्हाईतांच्या कृतींनुसार आपल्या आयुष्यातले निर्णय न बदलणारा) विमे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मा श्री किसनचन्द्र साहेब

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 05/10/2013 - 01:19 नवीन
मा श्री किसनचन्द्र साहेब (मिपाचे तरुण सळसळते आणि धमन्या फोडून ओसंडून वाहू पाहणारे रक्त इ इ ), राजकारण वगैरे असे घाणेरडे आरोप जाहीरपणे करण्यापूर्वी फोन उचलून एकदा बोलायची तसदी घेतली असतीत तर बरे झाले असते. कट्टा आहे की सरकारनामाची स्क्रिप्ट ??
२५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय
चाय से ज्यादा केटली गरम ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

थट्टे ने

सूड
Fri, 05/10/2013 - 07:51 नवीन
बोलले असतील हो !! काय येवढं मनाला लावून घ्यायचं. आणि समजा बोललाच असेल मुद्दाम, पण आपण राजकारण केलेलं नाही तर मग असल्या प्रतिसादांकडे लक्ष का दया? लोक काय सतरा तोंडांनी बोलणार.* *मला माहितीये असले समजुतदारपणाचे प्रतिसाद शोभत नाहीत माझ्याकडून तरी जे वाटलं ते लिहिलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

थट्टे ने बोलले असतील हो !!

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 05/10/2013 - 10:47 नवीन
थट्टे ने बोलले असतील हो !! काय येवढं मनाला लावून घ्यायचं.
ठीक आहे, तू म्हणतोस तशी शक्यता आहे. मला थट्टेचा सूर कळला नसेल नीट.
आणि समजा बोललाच असेल मुद्दाम, पण आपण राजकारण केलेलं नाही तर मग असल्या प्रतिसादांकडे लक्ष का दया? लोक काय सतरा तोंडांनी बोलणार.*
असा पण तो आरोप माझ्यावर नव्हता रे. नाहीतर इतकेच बोलून थांबलो असतो का ?
मला माहितीये असले समजुतदारपणाचे प्रतिसाद शोभत नाहीत माझ्याकडून तरी जे वाटलं ते लिहिलं.
काय दिवस आलेत बघ रे ;-) पुण्याला जाऊन भलताच सुधारालास म्हणायचे. आजचा सुविचार :- यौवनं धनसंपत्ती प्रभुत्वमविवेकीता । एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ओक्के

सूड
Fri, 05/10/2013 - 14:11 नवीन
>>यौवनं धनसंपत्ती प्रभुत्वमविवेकीता । एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ।। याचा अर्थ पण सांगा आमच्यासारख्या संस्कृत कळत नसणार्‍यांसाठी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

असा पण तो आरोप माझ्यावर

अग्निकोल्हा
Fri, 05/10/2013 - 14:13 नवीन
असा पण तो आरोप माझ्यावर नव्हता रे. नाहीतर इतकेच बोलून थांबलो असतो का ?
चाय से ज्यादा केटली गरम ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

कोण स्पा? धन्यवाद.

कवितानागेश
Wed, 05/08/2013 - 22:43 नवीन
कोण स्पा? धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वाह, व्वा... नक्किच येणार.

अग्निकोल्हा
Wed, 05/08/2013 - 22:53 नवीन
कोण म्हणतं येणार नाही... कट्याला आल्याशिवाय रहावणार नाही!
  • Log in or register to post comments

फोर्टचा कट्टा आठवतो का हो??

किसन शिंदे
Wed, 05/08/2013 - 22:56 नवीन
:) फोर्टचा कट्टा आठवतो का हो??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

होय तर. सॉलिड मज्जा केली होती मिपाकरांनी. मिपाकर आहेतच तसे.

अग्निकोल्हा
Wed, 05/08/2013 - 23:27 नवीन
असो, माझा वरील प्रतिसाद कृपया वैयक्तिक मानु नये. कारण मी त्यातुन फक्त सर्वसामान्य मिपाकरांच्या मनातील भावनांना शब्दरुप द्यायचा प्रयत्न माझ्या अल्पमतिनुसार केला आहे. चुभुद्याघ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अरे वा!! पण

किलमाऊस्की
Wed, 05/08/2013 - 22:56 नवीन
सध्या समाधान व्यक्त करत आहे.
  • Log in or register to post comments

सॉरी..

मुक्त विहारि
गुरुवार, 05/09/2013 - 01:28 नवीन
तुम्ही आलात की, परत कट्टा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किलमाऊस्की

असेच म्हणते.............

निवेदिता-ताई
गुरुवार, 05/09/2013 - 09:27 नवीन
:) कट्ट्याला शुभेच्छा.!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किलमाऊस्की

कट्ट्याला शुभेच्छा!!

श्रीरंग_जोशी
Wed, 05/08/2013 - 22:58 नवीन
मुविंचा बहुधा पहिलाच कट्टा असावा. आयोजनाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा!! मजा करा, ऐश करा, हा कट्टा आता तुमचा झाला :-).
  • Log in or register to post comments

बरोब्बर..

मुक्त विहारि
Wed, 05/08/2013 - 23:09 नवीन
आणि मी तर ह्या वेळी जमल्यास (इंतर व्ह्यू आणि त्या अनुषंगाने येणारी इतर झंझटे नसतील तर) सगळ्या कट्ट्यांना हजेरी लावणार.. बायको गेली तेल लावत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

लेखनविषय अन लेखनप्रकारावरून

सस्नेह
Wed, 05/08/2013 - 23:07 नवीन
लेखनविषय अन लेखनप्रकारावरून कट्ट्याच्य विस्तृत व्याप्तीची कल्पना आली ! Image removed.
  • Log in or register to post comments

असो.

सूड
Wed, 05/08/2013 - 23:22 नवीन
शुभेच्छा!! आम्हाला अटेंड करता येणार नाहीत असे कट्टे करायचं सगळ्या मुंबैकरांनी/ ठाणेकरांनी ठरवलंच असेल तर काय करणार. :)
  • Log in or register to post comments

व्य.नी केला आहे..

मुक्त विहारि
Wed, 05/08/2013 - 23:53 नवीन
व्य.नी केला आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

डोम्बिवली कट्टा..!!

विनोद१८
गुरुवार, 05/09/2013 - 00:00 नवीन
या कट्ट्याचे स्वागत करतो. येवा मिपाकरान्नो डोम्बिवली आपलीच असा. विनोद१८
  • Log in or register to post comments

लागोपाठ दोन दिवस दोन कट्टे

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 05/09/2013 - 00:19 नवीन
लागोपाठ दोन दिवस दोन कट्टे करण्याऐवजी एकच करूया.
  • Log in or register to post comments

+१

सुहास झेले
गुरुवार, 05/09/2013 - 00:38 नवीन
ह्येच बोलतो... :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

चालेल....

मुक्त विहारि
गुरुवार, 05/09/2013 - 00:50 नवीन
एकत्र येणे मह्त्वाचे आहे. ठिकाण मह्त्वाचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मेनु देखिल महत्त्वाचा असतो.

चैदजा
Sat, 05/11/2013 - 19:25 नवीन
मेनु देखिल महत्त्वाचा असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आहे कुठे

कुंदन
गुरुवार, 05/09/2013 - 00:38 नवीन
आहे कुठे ह्यो नंदी पॅलेस?
  • Log in or register to post comments

करामा आणि बुर्ज-अल-अरब

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 05/09/2013 - 00:54 नवीन
करामा आणि बुर्ज-अल-अरब यांच्या बरोब्बर मध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

हाहाहा..

मुक्त विहारि
गुरुवार, 05/09/2013 - 00:58 नवीन
वि.मे., अजून खूण राहीली.. शारजाच्या डोंगरावरून दिसते हे हॉटेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा