✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अत्यावश्यक निवेदन...

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 05/15/2010 - 17:27  ·  लेख
लेख
नमस्कार, गेले काही आठवडे माझ्या अनुपस्थितीत धनंजय आणि निल गंधार यांनी लिहीलेल्या लेखांना उत्तर देण्यासाठी म्हणून हे निवेदन तुमच्या वाचनासाठी ठेवत आहे. माझ्या वैयक्तीक स्वरुपाच्या काही अडचणीमुळे मी हे निवेदन लवकर देऊ शकलो नाही पण आज वेळ मिळताक्षणी हे काम पूर्ण करत आहे. ही सत्य परिस्थिती आहे की मिपाच्या खालील सदस्यांसोबत माझे आर्थिक व्यवहार आहेत .त्यांची यादी मी सोबत देत आहे. १ सुधीर काळे २ चतुरंग ३ विकास ४ वेदनयन ५ सुनील ६ समीर गोगटे ७ कुंदन ८ मुक्तसुनीत ९ शेखर १० पिम्पळखरे ११ धनंजय १२ संतोष जोशी पण रक्कम किती आणि कोणत्या बोलीवर घेतली आहे याची माहीती सध्या गोपनीय ठेवत आहे. हा व्यवहार खाजगी स्वरुपाचा असल्यामुळे ही गोपनियता पाळणे हा माझा आणि त्यांचाही हक्क आहे. परंतू बुडीत खाते आणि बुडीत खाते २ या लेखात आणि त्यानंतर झालेल्या चर्चेची पूर्तता करावी म्हणून हे निवेदन करीत आहे. १) माझे आणि वर उल्लेखीत सदस्यांचे आर्थिक व्यवहार खाजगी स्वरुपाचे आहेत. माझ्या अनुपस्थिती आणि संपर्काचा अभाव यामुळे धनंजय यांना पब्लीक फोरमचा उपयोग करावा लागला . माझ्याकडून झालेल्या दिरंगाईसाठी मी दिलगीर आहे. आता हे सगळे व्यवहार ताबडतोब पूर्ण करण्यासाठी आजच्या घडीस मी असमर्थ आहे. पण माझी जबाबदारी मी नाकारत नाही आहे. आजची घडी उद्याला टिकत नाही. जरी उशीर झाला असला तरी योग्य वेळ आणि संधी या दोन्हीचा उपयोग करून मी हे सर्व आर्थिक व्यवहार मी पूर्ण करीन याची ग्वाही मी आपल्या सर्वांसमोर देत आहे. आर्थिक व्यवहारासाठी मी जे आवाहन सगळ्यांना केले होते आणि त्या आवाहनला ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांची फसवणूक करणे हा माझा उद्देश नव्हता. मी फसलो आणि त्यामुळे ते ही फसले.परंतू ह्या सदस्यांच्या संपर्कात कायम न राहू शकल्यामुळे जो गैरसमज झाला त्याची जबाबदारीही माझीच आहे.या सर्व सन्माननीय सदस्यांनी मला काही वेळ द्यावा अशी मी विनंती करत आहे. २) मी कॅन्सर ग्रस्त महीलेच्या मदतीसाठी केलेले आवाहन कपोलकल्पीत कहाणी आहे असा समज होऊ देउ नका. मला थोडा वेळ मिळाल्यास त्या कुटुंबासोबत मी त्या सदस्यांशी रुजवात करून देईन ज्यांनी मला मदतीसाठी पैसे पाठवले होते. इतर सदस्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. तरीपण ज्या सद्स्यांनी त्या महीलेच्या साठी निधी पाठवला होता त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत १) गणपा २) नंदन ३) एकलव्य ४) प्रभाकर पेठकर ५) सायली पानसे ६) अमोल ७) भोचक ३) हे सर्व व्यवहार करताना मी संपादकांना त्याची माहीती दिली नव्हती .त्यामुळे माझे इतरांशी असलेले व्यवहार त्यांना माहीती नव्हते. सदस्यांनी संपादकांविषयी असलेला गैरसमज काडून टाकावा ही विनंती.आतापर्यंत ज्या प्रेमभावनेनी संपादकांनी जबाबदार्‍या पार पाडल्या त्याबद्दल मी आभारी आहे आणि माझी नियमीत येणे होईपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळावी ही विनंती. ४) सध्या मी आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलो तरी मी दिवाळखोर नाही. घरच्या काही अडचणींमुळे वेळेची कमतरता आहे. याचा फायदा मिपा च्या हितशत्रूंना मिळू नये म्हणून हे निवेदन करीत आहे.यापुढे ज्या सदस्यांना मला संपर्क करायचा असेल त्यांनी पूर्ववत व्यनी करावेत आणि उत्तराची वाट बघावी.थोडा उशीर होण्याची शक्यता आहे पण उत्तर मिळेल. ५) मिपाच्या मालकीहक्काचा प्रश्न आवश्यकता नसताना वारंवार उभा केला जात आहे. याबाबत मला इतकेच म्हणायचे आहे की हे संस्थळ खाजगी मालकीचे आहे. तात्या अभ्यंकर यांचे आहे.यातील वाद आणि हक्क(जर असतील तर) याची पूर्तता खाजगी पत्रव्यवहारातून होईल.सदस्यांना अकारण मालकी हक्काबद्दल प्रश्न उभे करण्याचा आणि वाद घालण्याचा हक्क नाही.कदाचीत आज माझ्याकडे ताबा नसेल पण मिपाचे तूर्तास सर्व हक्क असलेल्या नीलकांतने तसे जाहीर केल्याशिवाय मिपा हे संस्थळ हे माझ्या मालकीचे आहे, असणार आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. ६) माझ्या अनुपस्थितीत जे लेख आणि प्रतिसाद आले त्यामुळे मालकासोबत संस्थळाची बदनामी होत असल्याचे पाहून फार वाईट वाटले. ह्या निवेदनानंतर झालेल्या प्रकरणात संस्थळाची वाढ थांबू नये म्हणून हे निवेदन लिहीत आहे.मिपा फुलण्यात सर्वच सदस्यांचा सहभाग आहे .मी मिपाला पूर्ण वेळ देऊ शकेन अशी घडी बसेपर्यंत आपण सदस्यांनीच मिपाला सांभाळायचे आहे. मालक असोत नसोत मिपा सदस्यांशिवाय फुलणार नाही. ७) या निवेदनावर हवी तेव्हढी चर्चा करावी पण त्यात संस्थळाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी. ८) मा. नीलकांत : हा धागा जेव्हा मागच्या पानावर जाईल तेव्हा जाऊ देत पण ह्याच विषयावर आणखी नवे धागे आले तर ते आपण संपादीत करावेत.दंगलीचा फायदा घेऊन आपसातील उणेदुणे मिटवणारांना थारा मिळू नये हीच इच्छा. ९) ह्या सर्व समस्यंतून बाहेर येण्याची प्रामाणीक धडपड मी करतो आहे पण आपल्या सगळ्यांच्या सदभावना आणि ईश्वरी कृपेशिवाय हे शक्य होणार नाही. १०) जेव्हा शक्य होईल तेव्हा मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करीनच पण तोपर्यंत व्यनीचा वापर करावा . माझे हितचिंतक व मिपाचे एक जेष्ठ सन्माननीय सदस्य श्री रामदास यांचे हे निवेदन लिहिण्याकरता मला मोलाचे सहकार्य झाले याबद्दल मी कृतज्ञ आहे... आपलाच, तात्या अभ्यंकर.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27823 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

हाताचेच अंगठे धरुन मान खाली

प्यारे१
Wed, 05/08/2013 - 19:15 नवीन
:( हाताचेच अंगठे धरुन मान खाली घालून उभा असलेला प्यारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

काय झाल? पायाच्या अंगठ्यांची

स्पंदना
Wed, 05/08/2013 - 19:24 नवीन
काय झाल? पायाच्या अंगठ्यांची अ‍ॅलर्जी आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>>पायाच्या अंगठ्यांची अ

प्यारे१
Wed, 05/08/2013 - 19:40 नवीन
>>>पायाच्या अंगठ्यांची अ‍ॅलर्जी आहे काय? क्काय चाल्लंय काय? ऑ??? धाग्याचा विषय काय? तात्यांनी एवढ्या सीरियसली धागा टाकलाय. मिसळपावचा एवढा महत्त्वाचा धागा आहे हा. त्यावर अवांतर व्हायला लागलं म्हणून मी म्हटलं, वेगळा धागा काढलाय त्यावर प्रतिसाद शिफ्ट करा जमल्यास तर मलाच??? आज दिवस वाईट आलेत मला, अ‍ॅलर्जी आहे तर त्याची अशी खिल्ली उडवली जाते? हे बघा आपातै, आमी रिस्पेक्ट करतो बाईमाणसाचा पण म्हणून काय पण ऐकून घेणार नाही आधीच सांगून ठिवतो हा! - नाराज प्यारे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

ओ प्यारेकाका !!

सूड
Wed, 05/08/2013 - 20:30 नवीन
तुम्हाला मदत करायलेत तं असं कशापायी बोलताय्सा? तुम्हाला अ‍ॅलर्जीवरच उपाय पाह्यजे ना मग कंच्याबी धाग्यावं का मिळंना, असं म्हनायचं आसंल त्येस्नी. बाकी आंबे खावा की राव, कंच्याबी झाडावरले का आसंना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

उद्या उत्तर देतो.

प्यारे१
Wed, 05/08/2013 - 20:36 नवीन
उद्या उत्तर देतो. आज काळ खराब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अवांतर - तुमचा आजचा सुविचार

इनिगोय
Wed, 05/08/2013 - 21:48 नवीन
अवांतर - तुमचा आजचा सुविचार हे तुम्ही मिपाचे पहिल्या बाकावरचे अ. वि. असल्याचे चिन्ह मानावे काय? ;-) अतिअवांतर - स्वाक्षरीतले लेखन मूळ आयडीने आणि त्यावरचे डूआयडीने केले आहे काय? की उलट? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बडी जालिम दुनिया है यारों

प्यारे१
Wed, 05/08/2013 - 22:03 नवीन
बडी जालिम दुनिया है यारों हमारा दर्द किसीको दिख ही नही रहा, अवांतर पे अतिअवांतर किये जा रहे है. मोदका, मोदका येत्या संकष्टीला चंद्रोदयाआधीच खाणार बघ तुला. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

मोदका, मोदका येत्या संकष्टीला

सस्नेह
Wed, 05/08/2013 - 22:16 नवीन
मोदका, मोदका येत्या संकष्टीला चंद्रोदयाआधीच खाणार बघ तुला.
आँ ? मोदकाची अ‍ॅलर्जी आहे ना प्यारेभौ तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आयला , खरंच की. बरेच दिवस

प्यारे१
Wed, 05/08/2013 - 22:26 नवीन
आयला , खरंच की. बरेच दिवस मोदकच नाही खाल्ला. अ‍ॅलर्जी आहे की नाही ते खाल्ल्यावरच कळेल. बाकी तुम्हाला साखरेचा मोदक आवडतो का गुळाचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हाहाहा

श्रावण मोडक
Wed, 05/08/2013 - 18:59 नवीन
माझा सल्ला लैच ऑट साईड ऑफ लेग अंपायर वाईड बॉल वाटू लागला आहे अचानक!!
हाहाहा... होतं असं कधी कधी... अर्थात, वाईड बॉल असला तरी पिचवरच आहे हे भारीच. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

>>>>वाईड बॉल असला तरी पिचवरच

प्यारे१
Wed, 05/08/2013 - 19:02 नवीन
>>>>वाईड बॉल असला तरी पिचवरच आहे हे भारीच. 'हे विश्वची माझे पिच' असं कुणाथोर संतांनी 'मागे 'च म्हणून ठेवलंय श्रामो. आम्रिकेत देखील लोक यॉर्करवर नाचतात तसे वाईडबॉल वर त्यामुळं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

तिकडे कुणाला श्रावण घेवड्याची

स्पंदना
Wed, 05/08/2013 - 19:37 नवीन
तिकडे कुणाला श्रावण घेवड्याची अ‍ॅलर्जी आलीय ते पाहिल का श्रामो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

तिकडे

श्रावण मोडक
Wed, 05/08/2013 - 20:09 नवीन
तिकडे म्हणजे कुठं? जरा दुवा दे की... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

वेताळ बुवांना श्रावण

मोदक
Wed, 05/08/2013 - 21:42 नवीन
वेताळ बुवांना श्रावण घेवड्याची अ‍ॅलर्जी आहे. कृपया प्यारेच्या अ‍ॅलर्जीच्या धाग्यावर पहावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हा धागा मी कधीची शोधतेय.

साऊ
Wed, 05/08/2013 - 18:44 नवीन
हा धागा मी कधीची शोधतेय. मिळाला एकदाचा. बघा लिहण्याच कसब बघा. अशी लेखणी असावी माणसाची.
  • Log in or register to post comments

धारदार

jaypal
Wed, 05/08/2013 - 18:51 नवीन
लेखणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साऊ

+१

विकास
Wed, 05/08/2013 - 19:41 नवीन
बघा लिहण्याच कसब बघा.
खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साऊ

असं पण झालं होतं काय?

सुधीर
Wed, 05/08/2013 - 21:13 नवीन
बापरे असं काही झालं होतं यावर "विश्वास" नाही बसत. मी सगळेच धागे वाचत नाही. पण या निमित्ताने काही धागे वाचण्यात आले आणि काही घटना कळल्या. असो, "विश्वास" खूप मोठी गोष्ट असते. खास करून पुन्हा संपादन करणं खूपच कठीणं. काय खरं-खोटं देव (आणि मंडळी) जाणो. पण संस्थाळावर साहित्य, चर्चा आणि खास करून "प्रतिसादांच्या धमालीचं" रोपटं सदा बहरत राहो ही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

आईला लाईच स्फोटक धागा आहे.

पिंपातला उंदीर
Wed, 05/08/2013 - 21:21 नवीन
आईला लाईच स्फोटक धागा आहे. आमच्यासारख्या नवीन लोकाणा हे काहीच माहीत नव्त. भयानक.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा