✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष

व
वाटाड्या... यांनी
गुरुवार, 09/11/2008 - 02:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7120 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

म
मुशाफिर गुरुवार, 09/11/2008 - 03:30 नवीन

तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे.

पन्नालाल घोष यांच्याविषयीची माहिती वाचून फार आनंद झाला. माझ्या लहानपणापासून मी त्यांच्या बासरीवादनाचा चाहता आहे. विशेषतः त्यांनी निर्माण केलेला राग चन्द्रमौळी तर फारच सुंदर आहे. तुमच्याकडून अजुन बर्‍याच कलाकारांविषयी वाचायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुशाफिर.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 09/11/2008 - 05:17 नवीन

अजून काही चिजा

पं. घोषबाबूंच्या अजून काही चिजा इथे ऐकता येतील - राग हंसनारायणी दादरा राग हंसध्वनी राग सारंग - हा वृंदावनी सारंग आहे (वृंदावनी सारंग हाच मूळ सारंग. मधमाद सारंग, शुद्ध सारंग, मियां की सारंग, लंकादहन सारंग, बडहंस सारंग वगैरे त्याचे डेरिव्हेटिव्हज आहेत. अधिक माहितीसाठी हे वाचा.) राग शुद्ध भैरवी राग भूपाल तोडी खमाज ठुमरी पं. घोष यांच्या पूरिया रागाचे पण एक ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे असे कळते. पूरिया रागातील मंद्र निषादापासून निघून थेट मध्य सप्तकातील तीव्र मध्यम गाठणार्‍या 'नी -म्' या मींडमुळे बासरीवादक सहसा या रागाच्या वाटेला जात नाहीत. पण पन्नालाल बाबूंची बातच और आहे. ते ध्वनिमुद्रण मिळाल्यास जरूर टाकीन. --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 09/11/2008 - 09:36 नवीन

छान माहिती दिलीत.

पन्नालाल घोष ह्यांचे वादन आकाशवाणीवरून भरपूर ऐकलंय पण त्यांच्याबद्दल इतकी माहीती नव्हती. आपल्यामुळे ती मिळाली. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद अवांतर: पन्नालाल घोष हे आमच्या मालाडमध्ये बरीच वर्षे मुक्कामाला होते असे ऐकलंय. मी त्यांना पाहू शकलेलो नाही कारण ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मी केवळ आठ वर्षांचा होतो. मालाडमधल्या(पश्चिम) एका रस्त्याला पन्नालालजींचे नाव दिलेले आहे. आज मी जिथे राहतोय तिथले एक मूळ रहिवासी डॉक्टर चंद्रकांत जोशी हे पन्नालालजींचे शिष्य होते. आज वयाच्या ८५+ वर्षातही ते उत्तम बासरी वाजवतात.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/11/2008 - 09:58 नवीन

छान लेख.

छान लेख. आवडला.
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 09/11/2008 - 10:00 नवीन

मुकुलजी

आपला लेख आवडला.पु.ले.शु. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/11/2008 - 11:40 नवीन

उत्तम

उत्तम लेख.... आम्हाला रघुनाथ सेठ यांची बासरी फार आवडते! तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/11/2008 - 11:48 नवीन

लेख आवडला

लेख आवडला. मुकूल व भट दोघांना दुव्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... गुरुवार, 09/11/2008 - 18:20 नवीन

मित्रहो...

तात्या, रामदासजी, भट साहेब, देवसाहेब, सहजशेठ, यशोधरा ताई व इतर मित्रांनो आपाल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. मला अपेक्षित होते त्यापेक्षा जास्तच प्रतिक्रिया आल्यात. मला माहित आहे की ह्या लेखाला फारशी प्रतिक्रिया मिळणार नाही. मुळात शास्त्रीय संगीताबद्दल आपल्याच समाजात मोठाच गैरसमज व अनास्था आहे. त्यामुळे नाउमेद होउन चालणार नाही. पुढचा लेख हा संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्यावर लिहीन असा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं? आपलाच, मुकुल
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/11/2008 - 22:01 नवीन

+१

नक्की लिहा !! वाट पाहतो. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/11/2008 - 22:02 नवीन

असेच म्हणतो

नक्की लिहा !! वाट पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
घ
घाटावरचे भट Fri, 09/12/2008 - 03:01 नवीन

+++१

नक्कीच लिहा!!! आणि जमल्यास पं. ओंकारनाथ ठाकुरांपासून सुरुवात करुन विष्णु दिगंबर पलुसकर, कृष्णराव शंकर पंडित, विनायकराव पटवर्धन, नारायणराव व्यास, वामनराव पाध्ये, बापूराव पलुसकर आणि अगदीच मागे जायचे झाले तर इचलकरंजीकर बुवांबद्दल पण लिहा...आणि सगळी ग्वाल्हेर सीरिज कव्हर करा. मग बाकीच्या घराण्यांकडे वळा आणि त्यांच्याबद्दलही लिहा... बस्स!!! एवढंच....लै नाही मगणं... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चतुरंग गुरुवार, 09/11/2008 - 22:04 नवीन

सुंदर माहितीपूर्ण लेखन!

जवळजवळ सगळीच माहिती नवी होती! मुकुल, तुम्ही नक्की लिहा. पुढच्या लेखाची वाट पहातोय. (अजून थोडे विस्ताराने लिहिले तर आणखीन आवडेल.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
व
विसोबा खेचर Fri, 09/12/2008 - 01:36 नवीन

पुढचा लेख

पुढचा लेख हा संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्यावर लिहीन असा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं? आँकारनाथ ठाकूर यांच्या गाण्यात काही ग्रेट गोष्ट आहे असे मला वाटत नाही! असो, व्यक्तिगत मत. आपला लेख अवश्य येऊ द्या! आपला, (ओंकारनाथांच्या गाण्यात काहीही 'राम' न दिसलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
प
प्रमोद देव गुरुवार, 09/11/2008 - 19:32 नवीन

येऊ द्या.

पुढचा लेख हा संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्यावर लिहीन असा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं? येऊ द्या बिनधास्त.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 09/11/2008 - 20:11 नवीन

अतिशय सुरेख लेख.

पन्नाबाबूंचे नाव खरंतर मी प्रथमच ऐकले. इतकी सुंदर माहीती दिली आहेत तुम्ही की, त्यांच्याबद्दल आणखी यापेक्षा वेगळी माहीती कुठे मिळेल असे वाटत नाही. सुरेख लेख. अभिनंदन. आणि धन्यवाद इतक्या मोठ्या कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 09/11/2008 - 21:28 नवीन

धन्यवाद मुकुल !

'बासरी' हे माझं अतिशय आवडतं वाद्य. पन्नालाल घोष आणि हरिप्रसाद चौरासिया म्हणजे देवस्थानी. हौस म्हणून बासरी शिकायला सुरूवात केली तेव्हा जाणवलं हे फारच अवघड काम आहे. दिसायला सोपं पण वाजवायला अवघड ! (असाच अनुभव नंतर 'गोल्फ' ह्या खेळाबाबत आला :) टीव्हीवर पाहताना वाटायचं -- त्यात काय अवघड आहे? खेळायला लागल्यावर समजलं की अवघड तर आहेच पण खिशालाही चुना आहे ! शहाण्यासारखा परत गोल्फ टीव्हीवर बघायला लागलो :) खूप खूप धन्स ह्या लेखासाठी.
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... गुरुवार, 09/11/2008 - 22:55 नवीन

आपल्या सगळ्यांचे आभारा....

मायबाप मि.पा. कर आणि संगीत रसिक व जाणकार मंडळींनो, आपला हा सांगितीक वारसा आपण जपणे गरजेचे आहे असं मला मनापासून वाटतं. त्यामुळेच आपल्यासारख्या मित्रांच्या प्रतिक्रियेमुळे थोडा उत्साह वाटला. शतशः धन्यवाद प्राजु ताई, संदिप शेठ, सर्किट शेठ, डॉ. साहेब आणि चतुरंग जी तुम्हा सगळ्यांना... जाता जाता, मी तुमच्याएवढाच आहे वयाने. तेव्हा अरे म्हटलं तरी चालेल किंवा तसच असुद्या.. आपलाच, मुकुल
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/11/2008 - 23:11 नवीन

>>पुढचा लेख

>>पुढचा लेख हा संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्यावर लिहीन असा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं?>> अरे वा! लिहा लवकर! लेखाची वाट बघते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा