पन्नालाल घोष यांच्याविषयीची माहिती वाचून फार आनंद झाला. माझ्या लहानपणापासून मी त्यांच्या बासरीवादनाचा चाहता आहे. विशेषतः त्यांनी निर्माण केलेला राग चन्द्रमौळी तर फारच सुंदर आहे. तुमच्याकडून अजुन बर्याच कलाकारांविषयी वाचायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
मुशाफिर.
पं. घोषबाबूंच्या अजून काही चिजा इथे ऐकता येतील -
राग हंसनारायणीदादराराग हंसध्वनीराग सारंग - हा वृंदावनी सारंग आहे (वृंदावनी सारंग हाच मूळ सारंग. मधमाद सारंग, शुद्ध सारंग, मियां की सारंग, लंकादहन सारंग, बडहंस सारंग वगैरे त्याचे डेरिव्हेटिव्हज आहेत. अधिक माहितीसाठी हे वाचा.)
राग शुद्ध भैरवीराग भूपाल तोडीखमाज ठुमरी
पं. घोष यांच्या पूरिया रागाचे पण एक ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे असे कळते. पूरिया रागातील मंद्र निषादापासून निघून थेट मध्य सप्तकातील तीव्र मध्यम गाठणार्या 'नी -म्' या मींडमुळे बासरीवादक सहसा या रागाच्या वाटेला जात नाहीत. पण पन्नालाल बाबूंची बातच और आहे. ते ध्वनिमुद्रण मिळाल्यास जरूर टाकीन.
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
पन्नालाल घोष ह्यांचे वादन आकाशवाणीवरून भरपूर ऐकलंय पण त्यांच्याबद्दल इतकी माहीती नव्हती. आपल्यामुळे ती मिळाली. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
अवांतर: पन्नालाल घोष हे आमच्या मालाडमध्ये बरीच वर्षे मुक्कामाला होते असे ऐकलंय. मी त्यांना पाहू शकलेलो नाही कारण ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मी केवळ आठ वर्षांचा होतो. मालाडमधल्या(पश्चिम) एका रस्त्याला पन्नालालजींचे नाव दिलेले आहे. आज मी जिथे राहतोय तिथले एक मूळ रहिवासी डॉक्टर चंद्रकांत जोशी हे पन्नालालजींचे शिष्य होते. आज वयाच्या ८५+ वर्षातही ते उत्तम बासरी वाजवतात.
तात्या, रामदासजी, भट साहेब, देवसाहेब, सहजशेठ, यशोधरा ताई व इतर मित्रांनो आपाल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. मला अपेक्षित होते त्यापेक्षा जास्तच प्रतिक्रिया आल्यात. मला माहित आहे की ह्या लेखाला फारशी प्रतिक्रिया मिळणार नाही. मुळात शास्त्रीय संगीताबद्दल आपल्याच समाजात मोठाच गैरसमज व अनास्था आहे. त्यामुळे नाउमेद होउन चालणार नाही.
पुढचा लेख हा संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्यावर लिहीन असा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं?
आपलाच,
मुकुल
नक्कीच लिहा!!!
आणि जमल्यास पं. ओंकारनाथ ठाकुरांपासून सुरुवात करुन विष्णु दिगंबर पलुसकर, कृष्णराव शंकर पंडित, विनायकराव पटवर्धन, नारायणराव व्यास, वामनराव पाध्ये, बापूराव पलुसकर आणि अगदीच मागे जायचे झाले तर इचलकरंजीकर बुवांबद्दल पण लिहा...आणि सगळी ग्वाल्हेर सीरिज कव्हर करा. मग बाकीच्या घराण्यांकडे वळा आणि त्यांच्याबद्दलही लिहा...
बस्स!!! एवढंच....लै नाही मगणं...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
पुढचा लेख हा संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्यावर लिहीन असा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं?
आँकारनाथ ठाकूर यांच्या गाण्यात काही ग्रेट गोष्ट आहे असे मला वाटत नाही!
असो, व्यक्तिगत मत. आपला लेख अवश्य येऊ द्या!
आपला,
(ओंकारनाथांच्या गाण्यात काहीही 'राम' न दिसलेला!) तात्या.
पन्नाबाबूंचे नाव खरंतर मी प्रथमच ऐकले. इतकी सुंदर माहीती दिली आहेत तुम्ही की, त्यांच्याबद्दल आणखी यापेक्षा वेगळी माहीती कुठे मिळेल असे वाटत नाही.
सुरेख लेख. अभिनंदन. आणि धन्यवाद इतक्या मोठ्या कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
'बासरी' हे माझं अतिशय आवडतं वाद्य. पन्नालाल घोष आणि हरिप्रसाद चौरासिया म्हणजे देवस्थानी.
हौस म्हणून बासरी शिकायला सुरूवात केली तेव्हा जाणवलं हे फारच अवघड काम आहे. दिसायला सोपं पण वाजवायला अवघड !
(असाच अनुभव नंतर 'गोल्फ' ह्या खेळाबाबत आला :) टीव्हीवर पाहताना वाटायचं -- त्यात काय अवघड आहे? खेळायला लागल्यावर समजलं की अवघड तर आहेच पण खिशालाही चुना आहे ! शहाण्यासारखा परत गोल्फ टीव्हीवर बघायला लागलो :)
खूप खूप धन्स ह्या लेखासाठी.
मायबाप मि.पा. कर आणि संगीत रसिक व जाणकार मंडळींनो,
आपला हा सांगितीक वारसा आपण जपणे गरजेचे आहे असं मला मनापासून वाटतं. त्यामुळेच आपल्यासारख्या मित्रांच्या प्रतिक्रियेमुळे थोडा उत्साह वाटला.
शतशः धन्यवाद प्राजु ताई, संदिप शेठ, सर्किट शेठ, डॉ. साहेब आणि चतुरंग जी तुम्हा सगळ्यांना...
जाता जाता, मी तुमच्याएवढाच आहे वयाने. तेव्हा अरे म्हटलं तरी चालेल किंवा तसच असुद्या..
आपलाच,
मुकुल
प्रतिक्रिया
तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे.
अजून काही चिजा
छान माहिती दिलीत.
छान लेख.
मुकुलजी
उत्तम
लेख आवडला
मित्रहो...
+१
असेच म्हणतो
+++१
सुंदर माहितीपूर्ण लेखन!
पुढचा लेख
येऊ द्या.
अतिशय सुरेख लेख.
धन्यवाद मुकुल !
आपल्या सगळ्यांचे आभारा....
>>पुढचा लेख