✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

डाम्बीसपणा

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 09/11/2008 - 09:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12402 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

पाहिली

गणा मास्तर
गुरुवार, 09/11/2008 - 09:38 नवीन
पाहिली स्वप्ने तुझ्या केसांत माळण्याची ती फुले माळुनी मी निर्माल्यातला हार झालो गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

विजूभाऊ,

चतुरंग
गुरुवार, 09/11/2008 - 09:44 नवीन
येत होता तू क्रमाने मी जरी बेजार झालो पाहुनी या गजलपंक्ती डांबिसा मी ठार झालो! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

रंगाराव

आनंदयात्री
गुरुवार, 09/11/2008 - 09:51 नवीन
ठोकण्याच्या या भ्रमाने मी जरी तलवार झालो पाडु नका या गझलपंक्ती मी पुन्हा ट्टुक्कार झालो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अजुन एक

गणा मास्तर
गुरुवार, 09/11/2008 - 09:54 नवीन
मौन जेथे बोलले गुज मनीचे नेत्रातुनी स्वप्न ते भंगूनी मूक मी हुंकार झालो - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

क्या बात है मास्तर....

शिवा जमदाडे
गुरुवार, 09/11/2008 - 12:21 नवीन
आवडले... - शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

मला नाही कळला डांबीसपणा.

रामदास
गुरुवार, 09/11/2008 - 10:07 नवीन
सातार, सावकार , तडीपार, व्यापार, आचार,लाचार, उच्चार, असे शब्द जुळवून लावायचे आहेत का? कठीण आहे. no bid .pass. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments

भौ, ही

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/11/2008 - 10:23 नवीन
भौ, ही शुद्ध फसवणूक आहे. "जे न देखे रवी"वर मी हल्ली टिचकी मारत नाही .... पण आता तुमचं नाव पाहूनही विचार करावा लागेल. :W
  • Log in or register to post comments

पण आता

विजुभाऊ
गुरुवार, 09/11/2008 - 10:29 नवीन
पण आता तुमचं नाव पाहूनही विचार करावा लागेल. पागलपन भी थोडासा जरुरी है. म्हणुनच मी त्याला थोडा डाम्बीसपणा म्हणालो आहे. असो. गझलेतल्या शेरांमधुन अर्थाचा प्रवाह आवश्यक नाही की कसे हे आजमावयला काय हरकत आहे? इथे या विषयावरचे तज्ञ आहेत. माझी शंका व्यवस्थीत निरसून मिळेल इथे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

मिटले असो

घाटावरचे भट
गुरुवार, 09/11/2008 - 11:48 नवीन
मिटले असो खुले वा हे दोन नेत्र माझे पाही छबी तुझी मी, मी नजरबंद झालो --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

फाट्यावर.... :)

बबलु
गुरुवार, 09/11/2008 - 12:07 नवीन
. धोका देऊनी गेली मज ती | आयुष्यात मी गपगार झालो ||........ (स्वगत -- जाऊदे च्यायला... दुसरी येईल)....... धोका देऊनी गेली मज ती | आयुष्यात मी गपगार झालो || फाट्यावर मारूनी सर्वांना | माझा मीच साहुकार झालो || :) :) :) ....बबलु-अमेरिकन
  • Log in or register to post comments

होउनी

आंबोळी
गुरुवार, 09/11/2008 - 12:22 नवीन
होउनी साहुकार सर्वां मारले मी फाट्यावरी! गजाली करण्यास गावात अंमळ मोकळा झालो!! आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

हाण्ण

धमाल मुलगा
गुरुवार, 09/11/2008 - 12:23 नवीन
हाण्ण तिच्याआयला.... चालुद्या... आम्ही जातिवंत औरंगजेब, आम्ही आपले टोप्या विणत तुम्हा सगळ्यांना ब्याकिंग देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

होउनी

विजुभाऊ
गुरुवार, 09/11/2008 - 12:46 नवीन
होउनी साहुकार सर्वां मारले मी फाट्यावरी! गजाली करण्यास गावात अंमळ मोकळा झालो!! यातले "मोकळा झालो!!" हे सावकार , कट्यार , पार अशा यमकात बसत नाही. गझलेचा तेवढा एक नियम तरी पाळुन लिहुयात पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

विजुभाऊ,

स्वाती राजेश
गुरुवार, 09/11/2008 - 12:12 नवीन
मस्त जमला आहे डांबिसपणा...:) आम्ही काय या प्रांतातील नाही.:) त्यामुळे प्रतिसादापलिकडे काही लिहू शकत नाही...माफी असावी.. बक अप!!!!!! गणा मास्तर. चतुरंग, आनंदयात्री, घाटावरचे भट यांनीही छान साथ दिली आहे....:)
  • Log in or register to post comments

गीत तुझ्या

गणा मास्तर
गुरुवार, 09/11/2008 - 12:37 नवीन
गीत तुझ्या ओठीचे ऐकताना वेडावुनी जी कुणी न छेडीली ती ह्रद्याची तार झालो - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

आप्ल्याला

विसोबा खेचर
गुरुवार, 09/11/2008 - 12:42 नवीन
आप्ल्याला तर काव्यातलं काय पन कळत नाय बा! चालू द्या.. :)
  • Log in or register to post comments

आप्ल्याला

विजुभाऊ
गुरुवार, 09/11/2008 - 12:49 नवीन
आप्ल्याला तर काव्यातलं काय पन कळत नाय बा! तात्या हे असे लिहिले तर? काव्यातलं आप्ल्याला तर काय पन ना कळाले म्हणुनी स्वतः होऊनी मीच त्यातुनी डीबार झालो पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

सरपंच

गणा मास्तर
गुरुवार, 09/11/2008 - 13:12 नवीन
लोकशाहीचा पुरस्कर्ता मी नवा मंच झालो लादुनी आणीबाणी मी पुन्हा सरपंच झालो (स्वगत : मास्तरा मरशील लेका) अवांतर : नाना चेंगटा अन शिवा जमदाड्या आंबोळीच्या वखारीतन लाकड आणुन ठेवा भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

लाकड वल्ली

अवलिया
गुरुवार, 09/11/2008 - 18:20 नवीन
लाकड वल्ली हायत पेट्रल टाकायच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

नाना लाकड

विजुभाऊ
Fri, 09/12/2008 - 10:15 नवीन
नाना लाकड वल्ली हायत पेट्रल टाकायच का? हे असे नका लिहु. त्याऐवजी हे कसे वाटेल बघा कापलेले झाड लाकुड ;सर्वांगी ओलाच् राहीलो पेट्रोलनेही जळेना ;मी ती लाकडाची वखार झालो पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वीजदाहिनी

गणा मास्तर
Fri, 09/12/2008 - 10:26 नवीन
वीजदाहिनीत वीज नाही लाकडे ओली मिळाली पेट्रोलचा तो भाव पाही , मास्तरा सोडुन देइ गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लावूनी

आंबोळी
गुरुवार, 09/11/2008 - 13:04 नवीन
लावूनी कंदीलास आम्ही पोचवीले अनेकांस ! लाकडे पुरवीता पुरवीता त्याना शेवटी वखार झालो !! (सावकार , कट्यार , पार अशा यमकात वखार बसला का?) आंबोळी
  • Log in or register to post comments

देउनी

आनंदयात्री
गुरुवार, 09/11/2008 - 14:41 नवीन
देउनी प्रतिसाद आम्ही खरडीलेही अनेकांस ! छान छान म्हणता कविंना शेवटी टुक्कार झालो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

बेजार

हसरा सुहास
गुरुवार, 09/11/2008 - 13:21 नवीन
खुपकाहि वाचले फाडूनी डोळे वाचता वाचता पुरता बेजार झालो.
  • Log in or register to post comments

विस्फारुनी

डोमकावळा
गुरुवार, 09/11/2008 - 14:36 नवीन
विस्फारुनी मी डोळे तिज पाहिले कितीदा भावास हाक देता ती मीही पसार झालो. ;) - डोम ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.
  • Log in or register to post comments

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/11/2008 - 14:51 नवीन
लागले डोक्यास शॉट, मी इथे सैरभैर झालो, माझ्याच ओळी वाचूनी, मी पुन्हा शुद्धीत आलो.
  • Log in or register to post comments

. . . . . ?

दत्ता काळे
गुरुवार, 09/11/2008 - 15:34 नवीन
विजुभाऊ अर्थ-वेंधळ्या गझलेला प्रसविण्या तय्यार झालो प्रतिसादाच्या भिकेने मी असा लाचार झालो
  • Log in or register to post comments

ती

हसरा सुहास
गुरुवार, 09/11/2008 - 15:51 नवीन
नयनी भिडले नयन माझे तिच्या नंबर चश्म्याचा बघुनी थंडगार झालो. मिलन झाले माझे तीचे गूंजले सूर मधुर संगीताचे.... नंतर गोंधळाने त्याच संगीताच्या बहिरा ठार झालो.
  • Log in or register to post comments

ठेविले

विजुभाऊ
गुरुवार, 09/11/2008 - 17:08 नवीन
ठेविले अनंत्या तैसेचि राहुन चित्ती मी समाधान झालो उत्तम नवी कंपनी मिळताच तेथून पहिला मी पसार झालो पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

के एल पी डी

अवलिया
गुरुवार, 09/11/2008 - 18:14 नवीन
विजुभावुंचा जाहीर निषेध ओ विजुभौ हे तुम्ही चांगले केले नाही अहो मनातल पाहुन व तुमच नाव पाहुन आम्ही घुसलो पण पहातो तर काव्य........ :''( अहो आमचा काय संबंध काव्याशी ? फार दिवस झाले त्या गोष्टीला.... जेव्हा प्रियेचा साखरपुडा चालु होता तेव्हा मी विषाची बाटली रिकामी केली होती जेव्हा ती पत्रिका वाटत होती तेव्हा मी जमीनीवर कोसळत होतो जेव्हा ती मंडपात येत होती तेव्हा डेथ सर्टिफिकेटवर सही झाली होती जेव्हा अक्षता लोक टाकत होते तेव्हा मला तिरडीला बांधले जात होते जेव्हा मंगळसुत्र ती बांधुन घेत होती तेव्हा लोक मला घेवुन चालले होते जेव्हा ती घरात माप ओलांडुन जात होती तेव्हा मला चितेवर निजवले होते जेव्हा सत्यनारायणाचे मंत्र म्हटले जात होते तेव्हा मला अग्नीडाग दिला जात होता जेव्हा ती चुंबिली गेली होती तेव्हा माझी कवटी तडकली होती अन तेव्हापासुन फिरतो आहे वायुयोनीत .... ना रुप... ना नामऽ....ना स्थल काल बंधन काव्य संपले अन भोजन ही संपले त्या दिवशीच तेव्हापासुन न देखे रवि अन पाककृती मी पहात नाही अन आज तुम्ही मला फसवलेत. याला आम्ही के एल पी डी म्हणतो.
  • Log in or register to post comments

हा हा हा

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/11/2008 - 18:20 नवीन
हा हा हा !!! के एल पी डी झालेले खुप पाहीले ;) विजुभाउ तुमच्या कडून अशी अपेक्षाभंगाची अपेक्षा केली नव्हती आम्ही ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

खम्मा घणी

आनंदयात्री
गुरुवार, 09/11/2008 - 18:34 नवीन
खम्मा घणी जैन साब .. पण ते नाना आहेत विजुभाउ नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

अरे

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/11/2008 - 18:38 नवीन
अरे बाबा, "विजुभाउ तुमच्या कडून अशी अपेक्षाभंगाची अपेक्षा केली नव्हती आम्ही ! " हे वाक्य विजुभाउ साठीच आहे रे ... आद्या कधी मोठा होणार तु :? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

जाउद्या बॉ

आनंदयात्री
गुरुवार, 09/11/2008 - 18:41 नवीन
जाउद्या बॉ .. आम्हाला काही उमजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

जेव्हा ती

विजुभाऊ
Fri, 09/12/2008 - 10:36 नवीन
जेव्हा ती चुंबिली गेली होती तेव्हा माझी कवटी तडकली होती नाना हाय तूने मार डाला हे वाक्य मुम्बैतल्या एका मुम्बैय्या ने असे म्हंटले नान्या हाय तूने मार्‍या डोल्या पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वाह वाह !!!

धमाल मुलगा
Fri, 09/12/2008 - 10:59 नवीन
जेव्हा ती घरात माप ओलांडुन जात होती तेव्हा मला चितेवर निजवले होते जेव्हा सत्यनारायणाचे मंत्र म्हटले जात होते तेव्हा मला अग्नीडाग दिला जात होता जेव्हा ती चुंबिली गेली होती तेव्हा माझी कवटी तडकली होती
नाना...नाना... काय दर्द आहे, काय दर्द आहे एकेका वाक्यात! साला काळजाच्या तळापासुन एखाद्यावर प्रेम करुन ज्यावर प्रेम केलं त्यानंच असं काळिज पिळवटून टाकणार्‍या निर्णयांना जवळ केलेलं असल्याशिवाय असं दर्द कागदावर (मॉनिटरवर हो) उतरु शकत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

नाना...नाना..

अवलिया
Fri, 09/12/2008 - 18:25 नवीन
नाना...नाना... काय दर्द आहे, काय दर्द आहे एकेका वाक्यात! साला काळजाच्या तळापासुन एखाद्यावर प्रेम करुन ज्यावर प्रेम केलं त्यानंच असं काळिज पिळवटून टाकणार्‍या निर्णयांना जवळ केलेलं असल्याशिवाय असं दर्द कागदावर (मॉनिटरवर हो) उतरु शकत नाही.... ऑ अरे तु़झे लग्न झालेय ना नक्की? मग तुला नसलेल्या गोष्टी असलेल्या व असलेल्या गोष्टी नसलेल्या असे बोलायची सवय नाही झाली अजुन? शिकुन घे बाबा ! लवकर ! नाय तर पार खुळखुळा होईल तुझा... ( आणि ते बिचार नुसत गप्प गप्प होत अस कुणाबद्दल तरी बोलला होतास ना..... तीच तुझी पण गत होईल. संभाळ रे बाबा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

लिहित

प्राजु
गुरुवार, 09/11/2008 - 19:44 नवीन
लिहित होते लोक आता रोज काही वेगळे मग पाडण्या गझल मीही तय्यार झालो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

माझाही एक प्रयत्न ...

मनीषा
Fri, 09/12/2008 - 02:25 नवीन
वादळे थांबलेली मार्गात माझ्या सारी घेउनी त्यांना सवे , मी पार झालो काळजात या जपली दु:खेही त्यांची सुखाच्या क्षणी मात्र मी, भार झालो |
  • Log in or register to post comments

प्रेमाच्य

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 09/12/2008 - 10:24 नवीन
प्रेमाच्या जगात एक एक वार झाले तीच्या एका नजरेने मी घायाळ झालो ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

हाती घेउनी

गणा मास्तर
Fri, 09/12/2008 - 14:04 नवीन
हाती घेउनी हात, वचनी मी बद्ध झालो स्वप्नातुनी जागता अन, हय कसा मी स्तब्ध झालो - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

विजुभौ, हे

घाटावरचे भट
Fri, 09/12/2008 - 16:24 नवीन
विजुभौ, हे काय केलंत.... विजुभाऊ नाव पाहून मारली टिचकी दुव्यावर पाहुनि डांबिसगिरी पण हाय मी बेशुद्ध झालो --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

विजुभाउ मनात म्हणत असतील-

पद्मश्री चित्रे
Fri, 09/12/2008 - 16:44 नवीन
लोकहो, साधा तसा मी, 'मिपा' मुळे डांबिस झालो दिग्गजांना फसवुनी -चोरावरी मी मोर झालो
  • Log in or register to post comments

विजुभाऊ

डोमकावळा
Fri, 09/12/2008 - 17:46 नवीन
मनात असे म्हणत असतील... लोकहो, साधा तसा मी, मिपावरी विचार झालो परकाया प्रवेशाच्या या आरोपामुळे बेजार झालो ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे

बोळा निघाला पाणी वाहू लागले..

शेखस्पिअर
Fri, 09/12/2008 - 17:59 नवीन
तुकबन्दीच्या धारेचे मीही एक गटार झालो... तिकडून आला गजाली,मी इकडून पसार झालो..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा