Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेल्लाभट on Fri, 05/03/2013 - 14:31
सरबजीत. सोडला म्हणायचं की सुटला म्हणायचं ते कळत नाही. गेली अनेक वर्ष काहीही चूक नसताना तो (ना)पाक हैवानांचे अत्याचार सहन करत होता. आपण कल्पनाही करू शकत नाही की त्याच्यावर काय प्रसंग ओढवले असतील. पाकांनी त्याला मृत्यू दिला म्हणजे एक प्रकारे 'सोडला'च. कारण आणखी असे किती महिने किती वर्ष त्यावर अत्याचार होत राहिले असते याचा नेम नाही. आणि मेला, म्हणून तो सुटलाच. एकीकडे अत्याचार सहन करायचे आणि दुसरीकडे आपला देश आपल्यासाठी, आपल्याबरोबर इथे अडकलेल्या ५४ पेक्षा जास्त युद्धकैद्यांसाठी काहीही.... करत नाही, या गोष्टीपायी मनस्ताप भोगायचा; यापेक्षा मरण बेहत्तर, असा त्यानेही विचार केला असेल. युगं लोटली, पण अजूनही आपली अवस्था एखाद्या 'उंदराला घाबरणा-या मांजरीसारखी' आहे. (इथे ४ वेळेला वाघासारखी असं लिहून खोडलं मी; ही उपमा डिझर्वच करत नाही आपण.) आज जवान मारले, उद्या घुसखोरी, परवा काय आरोपच केले उलटे, मग आपले '#क्के' जरा काही बोलले की अमेरिकेच्या पदरामागे लपून आपल्याकडे बोट केलं;.... चीन चा उल्लेख नाही करत, कारण तो एक वेगळा विषय आहे. स्वतंत्र. आपले मिलिटरी वाले मधे एक दोन वेळा म्हणाले न्यूज चॅनल वर, की आम्हला पाकिस्तान चं वाळवंट करायला १० मिनिटंही बास होतील. ते ऐकून काही काळ खूप चेव आला. रस्त्यावर चालतानाही चाल नकळत जलद व्हायची; जणू एखाद्या 'त्यांच्यातल्याला' मारायला चाललो आहे. पण तो चेव लवकरंच मावळला. अहो; वर्षानुवर्ष जे झालं नाही, ते आता का होईल? आताही तेच होणार. तुम्ही मारा लाथेवर लाथ आम्ही ठेवू हातावर हात.. आता बास ! असं म्हणून शब्दशः अखिल भारतीय 'उठाव' जर झाला, लोकंच्या लोकं रस्त्यावर बसली, स्वप्नवत काही झालं, तरंच आशा... पण नाही. थिंक रियल. धिस इज इंडिया.
  • Log in or register to post comments
  • 16477 views

प्रतिक्रिया

Submitted by गणामास्तर on Sat, 05/04/2013 - 17:29

In reply to + by नितिन थत्ते

Permalink

अगदी टिप्पिकल चिच्चा प्रतिसाद

=)) =)) =)) अगदी टिप्पिकल चिच्चा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Sat, 05/04/2013 - 18:06

In reply to + by नितिन थत्ते

Permalink

-

http://www.aicc.org.in/new/ अखिल भारतीय काँग्रेस कमिटी हे संस्थळ उघडून पाहिले. त्यात थत्ते चाचा हे नाव दिसले नाही.. भ्रमनिरास झाला.. disappoint झालो.. काँग्रेसने काही घोषणा केली नाही त्यामुळे कदाचित आता यावर अतिशय नाइलाजाने मान्य करणं भाग आहे की प्रवक्तेपदाबद्दल मिपावर जे ऐकलं किंवा वाटलं ते खात्रीशीर सत्य नसावं. भविष्यात सत्य होईल अशी मनापासून अपेक्षा आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 05/05/2013 - 23:12

Permalink

पाकीस्तान म्हणजे एक ढेकुण आहे

पाकीस्तान म्हणजे एक ढेकुण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 05/06/2013 - 00:38

In reply to पाकीस्तान म्हणजे एक ढेकुण आहे by शिल्पा ब

Permalink

अपमान...

ढेकणांचा अपमान केल्याबद्दल निषेध...
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 05/06/2013 - 09:37

Permalink

आपल्या देशातले नागरिक

आपल्या देशातले नागरिक बॉम्बस्फोटात आपला जीव गमवत आहेत्,हे सत्र अखंडपणे सुरुच आहे.सैन्याचे जवान एखादा बकारा हलाल करावा किंबहुना त्यापेक्षाही भयानक पद्धतीने ठार केला जातो यावर आपण काय करतो ? असा प्रश्न वारंवार मनात येतो,पण स्पष्ट उत्तर काही मिळत नाही. :( आपल्या दुर्वैवाने पाकिस्तान आपला शेजारी आहे,असा देश ज्याला त्याचे भविष्य काय असावे हे ही ठावुक नाही...तो मोठ्या अराजकतेकडे वेगाने धावत आहे आणि त्याची झळ वारंवार आपल्या देशाला बसत आहे.आपण सगळे पाकिस्तानला दोष देत आहोत पण आपण स्वसंरक्षणात दुबळे आहोत हे मान्य करायला तयार नाही.दरवेळी इंटलिजन्स फेल्युअरच्या नावाने बोंब मारली जाते पण परिस्थिती मधे बदल होत नाही.काही छोट्या बोटींमधुन कसाब आणि त्याची जन्नत प्रेमी जिहादी वेडामुळे आपल्या देशात घुसतात आणि अख्ख्या मुंबईला वेठीस धरतात...आपल्या पोलिस अधिकार्‍यांचे बळी जातात यातुन आपण काय धडा घेतला ? काहीच नाही ! अजुनही सिसीटीव्ही बसवण्याचे भिजत घोंगडे तसेच पडुन आहे,गस्त घालण्यासाठी घेतलेल्या नौका भंगारात गेल्या ! स्वसंरक्षणात जर आपण इथे बेफिकर आहोत तर पाकिस्तानला दोष देण्यात काय हाशिल आहे.? पाकिस्तान त्याला जसे वागायचे आहे तसेच तो वागतो आणि आपल्याला सारखे जीभ काढुन दाखवत राहतो आणि आपण फक्त "निषेध" नोंदवत राहतो... सरबजित सिंगच्या बाबतीत हेच घडले.पाकड्यांना हवे तसेच ते वागले आणि परत जीभ दाखवुन मोकळे झाले...ही जीभ आपण कधी हासडणार ? आणि ती का हासडु नये ?परंतु हे सर्व करण्या आगोदर स्वसंरक्षणात गाफिल राहणार्‍या आपल्या देशाकडुन अशी अपेक्षाच चुकीची आहे हे आपल्याला कळले पाहिजे....टिव्हीवर डिबेट कार्यक्रम असेच रंगतील पाकडे,चीन असेच घुसखोरी करत राहतील अन् मिपावर सुद्धा या विषयांवर असेच धागे येत राहतील...पण तरी सुद्धा आपण हातावर हात किंवा गेला बाजार मेणबत्या पेटवुन श्रद्धांजली देउन गप्पच राहु !
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 05/06/2013 - 11:33

Permalink

ह्म्म !!

ह्म्म !!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com