.
नाचते नार तोऱ्यात फार नखऱ्यात माळुनी गजरा
चाळ ते पायी तालात छान डौलात खिळवती नजरा
ओठिचे हास्य मधुजाल गाल ते लाल भान हुरहुरते
होउनी दंग चोळीत तंग वेडात ध्यान भिरभिरते
हातची काकणे नाद घालुनी साद दावती मेंदी
ती अदा करतसे फिदा विसरुनी क्षुधा वाढती धुंदी
चमकती नयन सोडुनी तीर हृदयात थेट ते त्यांच्या
मेखला खास झुलवून हात अदबीन हाती ये त्यांच्या
भिंगरी गरगरा फिरत राही भरभरा सावजा पाठी
रंगता महल रंगात येतसे शीळ कुठुनशी ओठी
पापी ते पोट बोटात नोट थाटात ओढ गाठीची
थिरकतो ताल दावी कमाल ती नार नजर भेटीची
.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2735
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबराट
हांगाश्शी, ह्ये जबराट एकदम. :)
छान!
छान!
तान तान तान ता..नानानानाना...
तान तान तान ता..नानानानाना...
जबरी जमलय
आज शाहिर पा.भे.यांची लैच आठवण येऊन र्हायली राव...
सह्हीच!!
In reply to तान तान तान ता..नानानानाना... by अत्रुप्त आत्मा
हाहाहा..अगदी ठेक्यात म्हणून पाह्यली हि लावणी..
पाभेंच्या आठवणीसाठी +१
(कुठे गेलेत राव हे पाभे)
छान जमली आहे लावणी...
छान जमली आहे लावणी... :-)
चपखल शब्दरचना.
चपखल शब्दरचना.
वा..! जबरदस्त...! लावणी आवडली
वा..! जबरदस्त...! लावणी आवडली.
आभार !
अभ्या,
साऊ,
अतृप्त आत्मा,
विसोबा खेचर,
महेश नामजोशि,
Bhagwanta Wayal ......
प्रतिसादाबद्दल सर्वान्चे आभार !
व्वाह
फक्कड जमलंय कि काम