Skip to main content

निसर्ग सौंदर्य

लेखक सौरभ उप्स यांनी शुक्रवार, 03/05/2013 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
मी क्लिक केलेला नैसर्गिक सौंदर्याचा हा फोटो कल्याण-ठाकुर्ली दरम्यान रेल्वेलाईन लगत असलेल्या खाडीच्या आवारात काढला आहे, अचानक लक्ष गेल तेवा हे दृश्य दिसलं,जणूकाही बल्ब लावला आहे हा भास दाखवणार ते दृश्य होत… आजच्या (०३ मे १३) महाराष्ट्र टाईम्स मध्ये हा फोटो मुंबई टाईम्स या पुरवणीत प्रकाशित झाला आहे, जरूर पहवे…. 1 2

वाचने 7898
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

वाह सौरभ अभिनंद्न आणी मस्त आलाय फोटो.

व्वा... फारच छान. एकंदरित कांपोझीशनही खूपच छान आहे.

अरेव्वा अभिनंदन :) (मिसळपावची पोरं हुशार!!!)

सुंदर चित्र..आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळे हार्दिक अभिनंदन..जियो..! :)

.

सुरेख. एकदम जिवंत प्रकाशचित्र आहे. आणि मटातून अनेक वाचकांपर्यंत पोचलात याबद्दल अभिनंदन. कॅमेरा कुठला होता आणि तो कसा वापरलात याचीही माहिती दिलीत तर माझ्यासारख्या हौशी लोकांना मदत होईल. (की मदत मिळेल?)

असा योगयोग यायला नशीब लागते. बाकी हातावर पिसाचा मनोरा घेणे ई ई कल्पना आता जुन्या झाल्या !!! सौरभशेट अशा प्रकारच्या फोटोचा मोठा संग्रहच आजावर आहे. तो सर्च करून पहावा ही सूचना व शुभेच्छा ! हा फोटो विषय व तंत्र दोन्ही बाबीत सरस !

सुंदर आहे फोटो. हा फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याबद्दल अभिनंदन.

झकास टायमिंग, अभिनंदन...अजून असे मस्त फटू येऊद्या.

काय टिपलाय!!! अफलातून!

धन्यवाद सर्वांचे… @ अतिवास - असा फोटो काढायला विशेष अश्या कॅमेरा ची गरज नाही खरतर, एक्स्पोजर कंट्रोल करता येईल असा कॅमेरा हि चालू शकतो .. हा फोटो मी Nikon Coolpix L610 या कॅमेरा ने काढला आहे फोटो नॉर्मलच काढला आहे फक्त एक्स्पोजर कमी केलय, बाकी त्यावेळी योग्य क्षण टिपण्याची बुद्धी झाली म्हणून जमलं ब्वा…

फोटो खूप आवडला. कॉम्पोझिशन विषयी चित्रगुप्त यांच्याशी सहमत आणि चौरा यांच्याशी असहमत.

व्वा..! सृजनशिल नजर आणि कल्पकतेची जोडच अशी अप्रतिम छायाचित्र निर्माण करू शकतात. अभिनंदन.

खुपच सुन्दर फोटो.

असे दृश्य दिसणे , त्यावेळी जवळ कॅमेरा असणे , आणि फोटो घेणे या सर्व गोष्टी छान जुळून येणे हा खरोखरच योगायोग आहे. फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....