Skip to main content

प्रवास वेगळाच घडला…

लेखक मनिष यांनी बुधवार, 01/05/2013 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा हात सोडला अन् प्रवास वेगळाच घडला मी मृगजळाचा नाद सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. तुझीच शक्ती, तुझीच भक्ती; हिच इथली वहिवाट मी हा शिरस्ता मोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. आपलं ओझं आपल्याच खांद्यावर अन् रखरखीत पाऊलवाट, मी धोपटमार्ग सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. माझे प्राक्तन, माझीच दृष्टी अन् माझेच हे दोन हात मी अट्टहास फळाचा सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. फाटलेले शीड, वादळाची साथ अन् संकटांची लाट पण हा कणा नाही मोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. अविरत कष्टांची लांबलचक रात्र अन् मग स्वप्नांची पहाट मी प्रयत्न नाही सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. मुक्कामही विसरलो, अशी सापडली ही माझी वाट मी मार्ग माझा शोधला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. ~ मनिष (१/५/२०१३ --> ६/४/२०१२)
लेखनविषय:

वाचने 2206
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आवर्जुन प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांनाच धन्यवाद. थोडे मनातले: हे विचार मनात घोळतच होते, आणि देऊळ पाहिल्यावर ३-४ ओळी लिहिल्या होत्या. मग खूप महिन्यांनी कविता पूर्ण केली. मला स्वतःला ही कविता नीट जमली आहे असे वाटत नाही. असो!