Skip to main content

वॉटरमेलन पिनाकोलाडा

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 02/05/2013 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
Colada साहित्यः १. कलिंगडाच्या फोडि - २ कप २. अननसाच्या फोडि - १/२ कप (फ्रेश किंवा टिन मधल्या) ३. नारळाचं घट्ट दुध - १/२ कप किंवा क्रिम कोकोनट - पाव कप ४. बर्फाचे तुकडे ५. साखर किंवा मध - कलिंगड/अननसाच्या गोडानुसार कमी/जास्त ६. सजावटिसाठि पुदिना पान किंवा कलिंगड/अननसाची फोड कॄती: १. सर्विंग ग्लास (रिकामे :D) फ्रिजर मधे गार करण्यास ठेवा. असं केल्याने कोलाडा थंड राहण्याचा काळ वाढतो. २. दिलेल सर्व साहित्य मिक्सर मधे एकत्र करुन स्मुथ होईस्त ब्लेंड करा ३. चिल्ड झालेल्या सर्विंग ग्लास मधे तयार कोलाडा हळुवारपणे ओतुन पुदिना किंवा कलिंगड/अननसाच्या फोडनी सजवा.... कोलाडा तयार झाल्यावर मला रहावलं नाहि म्हणुन मी काहि पानं/बिनं लावत बसलो नाहि :D. जेमतेम फोटो काढण्यापुरतं धीर धरला आणि ग्लास गट्ट्म केला :D.

वाचने 7641
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

मस्त!! कलिंगड आणि अननसाचं कॉम्बिनेशन मस्तच लागत असेल.

उन्हाळ्याचा दिवसात एकदम मस्त रेसीपी दिलीत. नक्की करुन बघणार. :)

http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink009.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink009.gif

थोडी व्होडका आणि जिन टाकली, की काय मस्त बहार येईल..

मी नारळाच्या दुधाऐवजी केवळ माईल्ड फ्लेवर येण्यासाठी शहाळ्याचं पाणी वापरतो. आता एकदा नारळाचा चव काढून त्याचं दूध वापरून बघतो.

पिनाकोलाडा बघून तरतरी आली, एकदम रिफ्रेशींग ड्रिंक :)

भन्नाट आवड्तं कॉम्बिनेशन. :)

नारळाचं दूध घातलेलं कोणतंच कॉकटेल व्यक्तिगत टेस्टमधे बसत नसल्याने नारळपाणी वापरुन करुन पाहण्यात येईल. कॉकटेल मस्त आहे, पण प्रेझेंटेशनबाबत असं वाटतं की बाकी सजावट जाऊ दे, किमान फोटोत ग्लासाच्या रिमला जो चिकटलेला रस / धागे इ दिसताहेत ते नसते तर जास्त छान दिसलं असतं. आत्ता उष्टावून ठेवलेला किंवा घाईघाईत भरताना ओव्हरफ्लो झालेला ग्लास वाटतोय. पुन्हा एकदा, हे मत पदार्थाविषयी नसून मांडणीविषयीच आहे.

In reply to by गवि

सुचना एकदम पटली...पण फोटो काढतानाच नाकि नउ आले. मुलाला ते कधी एकदा पितोय असं झालेलं...सारखा ग्लासला येउन हात लावत होता...त्यामुळे त्याच्या ईच्छेपुढे सबकुछ नजरअंदाज किया :D

In reply to by दिपक.कुवेत

ग्लास उष्टावलेला वगैरे नक्किच नाहिये :)

In reply to by बॅटमॅन

पिना आणि कोलाडा हे स्पॅनिश शब्द आहेत. पिना - Piña म्हणजे अननस आणि कोलाडा म्हणजे धुणे, गाळणे, पिळणे. त्यामुळे अननस पिळून काढलेला रस असं काहीसं असावे -(साकिया) सोकजी

झकास...फक्त आधी "व्हर्जिन" लिहा,नाहीतर साहित्यात मदिरा अ‍ॅडवा :)

In reply to by मी_आहे_ना

आमच्या मनातल्या ढीगभर विचारांना एका वाक्यात मोक्ष दिलात देवा! दिपकराव, आता तुमची अन आमच्या सोक्याची जुगलबंदीच होऊन जाऊंद्या च्यामारी! तुमची मॉकटेल्स अन सोक्याची कॉकटेल्स! हैऽ...नुसती धुमडी उडवून देऊया! :)

In reply to by धमाल मुलगा

अरे ये तो सुरज को (सोक्याजी) रौशनी दिखाने वाली बात हो गयी. हम तो उनके नाखुन के बराबर भी नहि है|

व्वा! मस्त! करून बघू...