✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चिन्यांचा उपद्व्याप

क
कोमल यांनी
Fri, 04/26/2013 - 15:45  ·  लेख
लेख
दोन तीन दिवसांपूर्वीच्या पेपर मध्ये आलेल्या बातमीने मनात खळबळ माजवली.
  • चीनी हेलिकॉपर्ट्सची भारतीय हवाई हद्दीत ३०० किमी पर्यंत घुसखोरी
  • चीनी सैन्याची देप्सांग खोऱ्यात सुमारे १० किमी पर्यंत घुसखोरी, ६ दिवसांनंतर भारताला खबर
आणि यावर संरक्षण मंत्रांचे वक्तव्य काहीसे असे होते- "चीनकडून होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर 'शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चा' सुरू आहेत. देशाची एकात्मता आणि सुरक्षा यांचे रक्षण करण्यासाठी सरकार आवश्‍यक ती सर्व पावले उचलत आहे." ghusakhori आहोत कुठे आपण?? नक्की काय सुरु होणार आहे?? कि झालं आहे पण आपल्याला अजून सुगावा लागलेला नाहीये? १९६२ च्या युद्धाची ऐंशीत आणि नव्वदीत जन्मलेल्या आमच्या सारख्यांना फारच पुसट (किंवा अगदी नाहीच) झळ लागलेली. इंडो चायना वॉर बद्दल आम्ही ऐकल आमच्या आजी आजोबांकडून, तत्सम व्यक्तींकडून, वाचलं आंतरजालावरील माहितीपर लेखांतून किंवा भा. रा. भागवतांच्या मानस पुत्र फा. फे. कडून. फा. फे. चा गमतीचा मुद्दा सोडला तर आम्हाला फक्त एवढंच माहित आहे कि चीन सारखा बलाढ्य शत्रू खिशात सुरा घेऊन आपल्या शेजारी येउन बसला होता आणि संधी साधून त्याने आपल्यावर हल्ला केला. तात्कालिक राजकीय परिस्थितीमुळे म्हणा किंवा हिमालयात लष्करास आलेल्या अडचणींमुळे म्हणा आपला त्या युद्धामध्ये पराभव झाला. आता पुन्हा जर फिरून तशी परिस्थिती निर्माण झाली तर परिणाम काय होऊ शकतील? आजवर चीन ने या न त्या मार्गाने भारतासाठी प्रश्न निर्माण केले आहेतच. पाकिस्तानला केलेले अप्रत्यक्ष सहकार्य, गेल्या ३ वर्षांत ६०० वेळा केलेली घुसखोरी, याव्यतिरिक्त चिनी साहित्यांनी भारताची बाजारपेठ आणि खाद्यपेठ मोठ्याप्रमाणात बळकावली आहेच. "हिंदी चीनी भाई भाई(??)" म्हणत म्हणत या भाईने तर दादागिरी दाखवायला सुरुवात केली आहे असे वाटते. भारताचा आणि किती भूभाग हा भाई घशात घालणार आहे कुणास ठाऊक?? आजच्या घडीला भारतात असलेली राजकीय परिस्थिती किंवा राजकीय इच्छाशक्ती(!!)(एका दैनिकाच्या संपादकांच्या मते) चीन ला थोपवू शकेल का? (चीनी बातम्यांनी सुन्न झालेली) कोमल फोटो गूगल कडून साभार
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
102713 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

काय वक्त्व्य आहे राव??

कोमल
Sat, 04/27/2013 - 23:51 नवीन
भारताच्या पं.प्र.च्या मते चीनचा मुद्दा फार गंभीर नाही... काय बरं म्हणावं याला?? माझी शब्द्संपदा (मिपाच्या धोरणांना विचारात घेता) संपली ओ... Image removed.
  • Log in or register to post comments

अहो त्यांच्या मते म्हणजे

शिल्पा ब
Sun, 04/28/2013 - 09:45 नवीन
अहो त्यांच्या मते म्हणजे मैडमच्या मते ! बोलविता धनी कोण हे लक्षात घेतलं नै तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

त्यांच्या मते म्हणजे मैडमच्या

मदनबाण
Sun, 04/28/2013 - 11:26 नवीन
त्यांच्या मते म्हणजे मैडमच्या मते ! Image removed. (चित्र जालावरुन) बाकी आता देशाचा प्रतंप्रधान सुद्धा जपान मधुन इंपोर्ट करावा म्हणतो ! बाकी सरकारची सर्व परिस्थीती येणार्‍या काही निकालां नंतर युपीए-२ चे दिवस भरले असे समजुन येईल. बाकी देशातली राजकिय तसेच सामाजिक अस्थिरता, लयाला गेलीली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था,चीनची घुसखोरी आणि सबजितल सिंगला पाकिस्तानात झालेली जिवघेणी मारहाण याचात मला एकसुत्रता दिसु लागली आहे. जाता जाता :--- स्वकीयच जर राष्ट्राची लुट करण्यात मग्न असतील,तर परकियांनी अतिक्रमण केले याचे नवल का वाटावे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

या काही दिवसात २ पुस्तके

मदनबाण
Tue, 04/15/2014 - 15:45 नवीन
या काही दिवसात २ पुस्तके प्रकाशित केली गेली,एक संजय बारू यांचे आणि दुसरे पी सी पारख यांचे. या दोघांनीही मौनी मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यावर तोफ डागली आहे,या विषयालाच अनुसरुन असणारे वरती दिलेले व्यंगचित्र परत एकदा आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

>>> भारताच्या पं.प्र.च्या मते

श्रीगुरुजी
Sun, 04/28/2013 - 12:31 नवीन
>>> भारताच्या पं.प्र.च्या मते चीनचा मुद्दा फार गंभीर नाही... गांधी घराण्याची चमचेगिरी हे एकच काम ते गंभीरतेने करतात. बाकी सर्व म्हणजे देश, जनता, देशाची सुरक्षा, दुष्काळ इ. किरकोळ गोष्टींना ते फार महत्त्व देत नाहीत. शेवटी काही झालं तरी ते थोर अर्थतज्ज्ञ, निधर्मी, हाडाचे राजकारणी नसलेले, सभ्य, सुसंस्कृत वगैरे आहेत. त्यामुळे त्यांच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. कालचे ते सांगत होते की सर्व जग भारताला हसत आहे. वयोमानानुसार त्यांच्या हे लक्षात आलेले नाही की जग भारताला हसत नसून त्यांच्यासारख्या कठपुतळ्यांना व त्यांच्या महाभ्रष्टाचारी व निष्क्रीय सरकारला हसत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

दादु मनमोहन च्यां मते ही

श्री गावसेना प्रमुख
Sun, 04/28/2013 - 10:15 नवीन
दादु मनमोहन च्यां मते ही समस्या स्थानीक आहे,टेंशन नै लेनेका http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19760729.cms
  • Log in or register to post comments

आजच सुशील शिंदेचे विधान आहे

अप्पा जोगळेकर
Sun, 04/28/2013 - 12:04 नवीन
आजच सुशील शिंदेचे विधान आहे की ती नो मॅस लॅन्ड आहे. मनमोहन म्हणतो की हा स्थानिक मुद्दा आहे. काही कळेनासे झाले आहे.
  • Log in or register to post comments

+११११११११११११११११

अग्निकोल्हा
Sun, 04/28/2013 - 12:36 नवीन
आजच सुशील शिंदेचे विधान आहे की ती नो मॅस लॅन्ड आहे. मनमोहन म्हणतो की हा स्थानिक मुद्दा आहे. काही कळेनासे झाले आहे.
हा हा हा एक लंबर. खरं तर आता जनतेनेच तिथे आंदोलनाला गेले पाहिजे. हे राजकारणी काही हलचाल करणार नाहितच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

>>> आजच सुशील शिंदेचे विधान

श्रीगुरुजी
Sun, 04/28/2013 - 12:51 नवीन
>>> आजच सुशील शिंदेचे विधान आहे की ती नो मॅस लॅन्ड आहे. मनमोहन म्हणतो की हा स्थानिक मुद्दा आहे. काही कळेनासे झाले आहे. १९६२ मध्ये चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली होती तेव्हा नेहरू असे म्हणाले होते की "तिथे गवताचे पातेही उगवत नाही" (म्हणजे तो भाग महत्त्वाचा नाही). वाचाळवीर शिंदे अगदी त्याच अर्थाचे बोलले आहेत. १९६२ ची पुनरावृत्ती होताना दिसते आहे. तेव्हा नेहरूंसारखे भोंगळ पंतप्रधान होते, आज त्यांचीच दुसरी आवृत्ती पंतप्रधानपदावर आहे. मनमोहन सिंगांना या घुसखोरीचे काहीच महत्त्व वाटत नाही. साहजिकच आहे. ते आपल्याला व आपल्या सहकार्‍यांना कोळसा घोटाळा व २जी घोटाळ्यातून वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चीनची घुसखोरी अशा किरकोळ मुद्द्यांकडे लक्ष द्यायला त्यांना सवड नाही. एकदा त्यांनी 'Clean Chit' मिळविली की ते ताठ मानेने वावरायला लागतील. पण जनतेच्या मनात मात्र त्यांची 'Clean Cheat' अशीच प्रतिमा कायम राहील.
  • Log in or register to post comments

सुशील शिंदे यांचे डोके ठिकाणावर आहे काय??

कोमल
Sun, 04/28/2013 - 23:48 नवीन
आजच सुशील शिंदेचे विधान आहे की ती नो मॅस लॅन्ड आहे.
बापरे..
  • Log in or register to post comments

उठा,शिका आणि शाहणे व्हा

मदनबाण
Mon, 04/29/2013 - 10:35 नवीन
उठा,शिका आणि शाहणे व्हा ! ड्रॅगनचे फुत्कार
  • Log in or register to post comments

सत्ताधार्‍यांना कुणी तरी

कोमल
Mon, 04/29/2013 - 10:57 नवीन
सत्ताधार्‍यांना कुणी तरी इतिहासाचे पुस्तक आणून द्यायला पाहीजे आणि त्यांची नंतर परिक्षा पण घ्यायला पाहीजे. केंद्रातील कुणालाच देशाची फिकीर नाहीये. काय होणार आहे भारतात देव जाणे. किंवा मैडम जाणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

स्थानिक मुद्दा ? अहो मनमोहन

मदनबाण
Mon, 04/29/2013 - 11:10 नवीन
स्थानिक मुद्दा ? अहो मनमोहन सिंग तुम्ही याच देशाचे पंतप्रधान आहात ना ? मग हा स्थानिक मुद्दा कसा होउ शकतो ? चीन ने असे उद्गार काढले असते तर आम्ही समजु शकलो असतो कारण चीन चे धोरण समजणे तसेही कठीण्,पण या देशाचा भागावर अतिक्रमण झाल्यावर तो राष्ट्रीय मुद्दा झाला त्याला तुम्ही स्थानिक मुद्दा म्हणण्याची गोडचुक कशी करु शकता ?शिंदेच्या बेताल वक्तव्यांचा मक्ता आता तुम्ही घेतलात काय ?आपल्या देशाच्या आत चीन घुसखोरी करुन तंबु ठोकुन बसला हे आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला दिलेले सरळ सरळ आव्हान असताना मनमोहन सिंग तुम्ही याला स्थानिक मुद्दा म्हणता ? याचा अर्थ तो भाग आपल्या देशाचा नाही असे तुम्ही जनतेला आडुन सुचवु इच्छिता काय ? सरकारकडुन कठोर वक्तव्याची अपेक्षा असताना हे भलतेच वक्तव्य तुम्ही कसे काय करु शकता ? प्रतंप्रधानांच्या या वक्तव्याचा एक हिंदुस्थानी नागरिक म्हणुन मी निषेध करतो ! Chinese incursion: 'India should be ready for the worst'
  • Log in or register to post comments

तुमच्या निषेधाने काय फरक

शिल्पा ब
Mon, 04/29/2013 - 11:14 नवीन
तुमच्या निषेधाने काय फरक पडणार आहे? बाकी कशानेच काय फरक पडणार आहे हा सुद्धा एक मुद्दा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुमच्या निषेधाने काय फरक

मदनबाण
Mon, 04/29/2013 - 11:25 नवीन
तुमच्या निषेधाने काय फरक पडणार आहे? बाकी कशानेच काय फरक पडणार आहे हा सुद्धा एक मुद्दा आहेच. राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर आपल्या प्रतंप्रधानांनी इतके बेताल विधान करावे हे अपेक्षित नाही,इतरवेळी आघाडीचे सरकार आहे अशी हतबलता हे मनमोहन सिंग सातत्याने बोलुन दाखवत आले आहे,पण देशाच्या सुरक्षतेत सुद्धा आम्ही हतबल आहोत असा संदेश एका प्रकारे त्यांनी आपल्या राष्ट्राला दिला आहे याची चीड मला आली आणि मी निषेध नोंदवला. एका निषेधाने सरकारला काही फरक पडणार नाही, परंतु या देशाचा नागरिक म्हणुन प्रत्येकाने जिथे जमेल तिथे तो योग्य वेळीच नोंदवलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

(No subject)

मदनबाण
Mon, 04/29/2013 - 11:59 नवीन
  • Log in or register to post comments

माझ्या इथला ( आणि तुमच्या

प्रसाद१९७१
Mon, 04/29/2013 - 12:18 नवीन
माझ्या इथला ( आणि तुमच्या इथला पण ) नगरसेवक, आमदार खोर्‍यानी पैसा खातो आहे. पण हे सत्य जर मी सार्वजनिक रित्या बोललो तर माझे हात पाय एक दिवस पण जागेवर रहाणार नाहीत. ह्याला तुम्ही लोकशाही म्हणता का? अल्पवयिन मुली वर ( ५ वर्षाच्या ) बलात्कार केला म्हणुन तक्रार करायला गेलेल्या बापाला पोलिस २००० रुपये घे आणि गप्प बस असे सांगतात. ह्याला तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था आहे असे म्हणता का? त्या पेक्षा चीन काय वाईट. कष्ट केले तर नीट जगता तरी येते.
  • Log in or register to post comments

चीन मध्ये यापेक्शा वाइट आहे..

टवाळ कार्टा
Sun, 09/08/2013 - 08:15 नवीन
चीन मध्ये यापेक्शा वाइट आहे...मी ३ महिने होतो तिथे ....तिथल्याच लोकांकडुन ऐकले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

पुढे जायचे असेल तर दुसर्‍याचे

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/08/2013 - 11:13 नवीन
पुढे जायचे असेल तर दुसर्‍याचे गुण घ्यावे आणि त्याच्या दुर्गुणांपासून धडा घेऊन त्यांचा उपयोग आपण ते टाळण्यासाठी करावा. दुसर्‍याच्या दुर्गुणामुळे आपले दुर्गुण झाकून जात नाहीत आणि सद्गुणही बनत नाहीत. चीनमधील राजकिय परिस्थिती फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही. शिवाय कम्युनिझमपेक्षा लोकशाही ही केव्हाही जास्त चांगली राजकिय व्यवस्था आहे. तेथले लोक, विशेषतः तरूण, सरकारबद्दल नाराज आहेत आणि तसे उघडपणे बोलूनही दाखवतात. पण, चीनमध्ये जी काही मूलभूत विकासाची कामे केली गेली आहेत (रस्ते, रेल्वे, विमानसेवा, स्वच्छता, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्योगधंदे, इ.) याबाबतीत भारत त्यांच्या पासंगालाही पुरत नाही हे ढळढळीत सत्य तेथल्या काही दिवसातच दिसते. अर्थात हे सगळे चीनसारख्या आवाढव्य देशात सगळिकडे आहे असे मला म्हणायचे नाही, पण निदान २०-३० टक्के (चीनच्या नागरी विभागांत) तरी नक्की आहे. त्यामानाने आपल्या येथील सार्वजनीक क्षेत्राची कामगिरी (नागरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत) कशी आहे हे सांगायला पाहिजे काकाय? विकास कामांवर कागदोपत्री खर्च भरपूर आहे पण पावसाच्या दोन थेंबांनी विरघळणारे रस्ते बनवण्याच्या पेटंटावर सर्व जगात केवळ आपलाच पहिला हक्क आहे ! थोडक्यात, भ्रष्टाचार दोन्हीकडेही आहे, पण भारत त्याबाबतीत दर क्षेत्रात आघाडी राखून आहे... ही आजचीच ताजी बातमी "CAG unearths Rs 17,000 crore scam in railways".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

भारतीय सैन्यानीच हात वरती करावेत

प्रसाद१९७१
Mon, 04/29/2013 - 12:23 नवीन
बिचार्‍या भारतीय सैनिकांनी का आपले जीवन धोक्यात घालावे ह्या खा खा खाणार्‍या पुढार्‍यांसाठी आणि IPL बघणार्‍या जनते साठी. आता निवड्णुक आली की राजकारणी लोकांना युद्धज्वर चढेल, तेंव्हा भारतीय सैन्यानी हात वर करावेत. सर्व नगरसेवक, आमदार, खासदार यांची मुले , भाचे , पुतणे जर सैन्यात जाउन सीमेवर लढणार असतील तर च लढावे.
  • Log in or register to post comments

आंतरजाला वरुन साभार..

कोमल
Wed, 05/01/2013 - 00:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

जे काही चीन सध्या करत आहे ते

खबो जाप
Mon, 04/29/2013 - 12:43 नवीन
जे काही चीन सध्या करत आहे ते फक्त नाटक आहे, आपल्या सरकारला इकडे अडकवून दुसर्या भागात ( अरुणाचल किव्हा पी वो के मध्ये ) भयंकर काहीतरी करत आसवे किव्हा तयारी करत आसवे असे वाटते आहे. शिवराज साहेब म्हणा प्रतिभा बाई म्हणा किव्हा सुशीलकुमार साहेब म्हणा आपल्या महाराष्ट्रीय नेत्यांची राष्ट्रीय पातळीवर राजकारण किव्हा पद भूषवायची लायकीच नाही आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते आहे.
  • Log in or register to post comments

भारतात मिलिटरी सर्व्हिस

मालोजीराव
Mon, 04/29/2013 - 13:54 नवीन
भारतात मिलिटरी सर्व्हिस कंपल्सरी व्हावी अशी तीव्र इच्छा आहे (किमान १२ महिन्यांसाठी तरी)
  • Log in or register to post comments

+१०००

मन१
गुरुवार, 05/02/2013 - 12:12 नवीन
+१००० सिरियसली सहमत. मिलिटारी सर्व्हिस कंपल्सरी करत नाहित तर मग निदान ऐच्छिक तरी करा म्हणावं. "मला मिलिटारीत यायचे आहे" असे जो कुणी म्हणेल त्याला निदान नकार तरी देउ नका. (सध्या नाकारल्या जाणार्‍या उमेदवारांचे प्रमाण खूपच अधिक आहे, काटेकोर नियमांमुळे.) ह्याचा फायदा फक्त लष्करी संख्याबळ वाढण्यात होइल असे नाही तर नागरी/सिव्हिलियन जीवनातही एक शिस्त्,निष्ठा आणि एक प्रकारची जबाबदारीची जाणीव्/जाण निर्माण होइल अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

मन१ आणि मालोजीराव

सुबोध खरे
Fri, 05/03/2013 - 10:23 नवीन
मिलिटारी सर्व्हिस कंपल्सरी किन्वा"मला मिलिटारीत यायचे आहे" असे जो कुणी म्हणेल त्याला निदान नकार तरी देउ नका. हि वाक्ये व्यासपीठावरून बोलायला छान आहेत. एकदा लष्करी भरती च्या छावणी मध्ये जाऊन पहा बाराशे लोकांची भरति असेल तर तेथे पन्नास हजाराचा जमाव असतो यातील फक्त दोन हजार केवळ दहावी/ बारावी झालेले कच्चे लोक निवडून काढून त्यांना दोन वर्षे प्रशिक्षण देऊन पोलादी हृदयाचा सैनिक बनवणे हे सोपे काम नाही. मुळात दर वर्षी होणार्या भरती साठी सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटाच ठेवावा लागतो त्यात जे लोक नापास होतात ते भ्रष्टाचाराचे आरोप करून दंगल करतात हा प्रकार थांबवणेच इतके कठीण आहे कि एकशे विस कोटी लोकसंख्येच्या दहा टक्के म्हणजे बारा कोटी तरुणांना एक वर्ष लष्करी शिक्षण कोण देणार आणि त्यांच्या एक वर्षाच्या खाण्या पिण्याचा खर्च कोण करणार? मुळात बारा लाख लष्करापैकी दीड लाख हे लष्कराच्याच प्रशिक्षणात आणि आधुनिकीकरणात गुंतलेले आहेत. त्यांना तेथून बाहेर काढून बारा कोटी लोकांना एक वर्ष प्रशिक्षण देणे हे शक्य आहे का? अवांतर चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

अगदी अगदी... लष्करातील नोकरी

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 05/05/2013 - 17:42 नवीन
अगदी अगदी... लष्करातील नोकरी आणि खिरापत यात मनोबांचा अंमल घोळ झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

नाही रे बाबा

मन१
Tue, 05/07/2013 - 12:41 नवीन
विमे, खिरापत कसली? कंपल्सरी लष्करी प्रशिक्षण असलेले देश जगात नाहितच का? खरे ह्यांनी सांगितलेल्या व्यावहारिक अडचणी मान्य आहेत. पण त्यावरही काही उपाय काढता येतो का हे पहायला हवं. अधिक संख्येनं खडं लष्कर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही मला आवश्यक वाटतं. निदान अंतर्गत सुरक्षितता ठेवण्यास लष्कर मिळेल. व बाकी काही नाही झाले तरी नागरी जीवनात शिस्त येइल. त्याहून महत्वाचे म्हणजे एक मोठा reserve force तयार होइल. (अशाच रिझर्व फोर्समुळे रशियाला दुसर्‍या म्हायुद्धात बरीच मदत झाली होती.) . नागरी जीवनात शिस्त का आवश्यक आहे, हे मी वेगळे सांगायची गरज आहे का? शेकडो हजारो मुद्दे देता येतील. सध्या एकच उदाहरण सांगतो. १९६५ आणी १९७१ च्या युद्धाच्या वेळी मुंबैसारखा शहरांत रात्री युद्धजन्य आणीबाणी घोषित केली होती. रात्री दिवे लावू नयेत अशा सूचना होत्या.(दिवे लावल्यास शत्रू विमानांना शहरे अचूकतेने ओळखता येतील असे भय होते.) इतके असूनही भारतीय फार मोठ्या संख्येने ह्या सूचनेचे उल्लंघन करीत होते. ह्याबद्दल ज्यांच्यावर अंतर्गत सुरक्षेची जिम्मेदारी आहे(जे थेट सीमेवर लढत नाहियेत) अशा त्यावेळच्या कित्येक लष्करी अधिकार्‍यांनी नापसंती नि चिंता व्यक्त केली होती. पण सवयीप्रमाणे तिकडे दुर्लक्ष केले गेले. नशीब हेच की इतके असूनही आपल्या शहरांवर खरोखर हल्ल झाला नाही. बाकी विषयांतर होतय हे मान्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अबे बाकी ठीके, पण आर्थिक

बॅटमॅन
Tue, 05/07/2013 - 12:57 नवीन
अबे बाकी ठीके, पण आर्थिक मुद्दा बघ ना. जास्त लष्कर म्हंजे हौ जास्त इज इनफ अ‍ॅण्ड हौ मच फर्दर इज अ बर्डन? आपली लोकसंख्याच तेच्यायला इतकी आहे की हे सांभाळणं लै कठीण होईल. अनझेपेबल होण्याच्या एकमेव कारणामुळे मला हे नको वाट्टेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

कंपल्सरी लष्करी प्रशिक्षण

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/08/2013 - 02:30 नवीन
कंपल्सरी लष्करी प्रशिक्षण असलेले देश जगात नाहितच का?
लष्करी प्रशिक्षण की लष्करात नोकरी?? दोन्हीत फरक असेल असा माझा अंदाज आहे. जाणकार प्रकाश टाकतीलच. शिवाय त्या देशांची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या यात प्रचंड फरक आहे. भारतात हे कठीण आणि मुख्य म्हणजे अनावश्यक आहे.
बाकी काही नाही झाले तरी नागरी जीवनात शिस्त येइल.
असे वाटत नाही. रेल्वेत सैनिकांना अनावश्यक दादागिरी करताना पाहिले आहे. (सैन्यातील अधिकारी आणि इतर सैनिक यांच्यात किती आणि कसा फरक असतो हे नीटसे माहित नाही). बेशिस्त हा आपला सर्वात मोठा दुर्गुण आहे हे मान्य, पण हा उपाय कितपत जमेल ते माहित नाही.
अशाच रिझर्व फोर्समुळे रशियाला दुसर्‍या म्हायुद्धात बरीच मदत झाली होती
रशियन सैन्याची संभावना बाजारबुणग्यांचे सैन्य असे होत असे असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

त्याला अनेक ऑप्शन्स आहेत.

अर्धवटराव
Wed, 05/08/2013 - 00:21 नवीन
शिस्त, धैर्य वगैरे सद्गुण बाणवायला सैनीक भरती कंपल्सरी करण्याची काहि आवश्यकता नाहि. मैदानी खेळ, सामाजीक उपक्रम (अगदी नदी सफाई पासुन ते बालवाडी शिक्षण वगैरे) यांचा शैक्षणीक जीवनात व्यवस्थीत समावेश झाला तरी काम भागेल. महिन्यातुन एकदा जरी गाव खराटा घेऊन उभं राहिलं तरी रोगराई खलास होईल. मुंबई शहराने अगदी ठरवुन पावसाळ्यापुर्वी दोन रविवार आपले मनोरंजन कार्यक्रम बंद ठेऊन नाले साफसफाई केली तर रस्ते तुंबण्याची शक्यता शुण्य होईल... (पण हे होण्याची शक्यता देखील शुण्य आहे ;) ) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

आत्ता असं नाहीये म्हणता?

प्यारे१
Wed, 05/08/2013 - 02:21 नवीन
आत्ता असं नाहीये म्हणता? एन एस एस च्या नावाखाली १० १० दिवसांचे कँप होतात वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे. फोटो येतात पेप्रात, आहात कुठं? व्हेअर आर यु? ह्या कॅंपांमध्ये नेमकं काय चालतं नि कसं चालतं हा संशोधनाचा विषय आहे म्हणा. संघाचे वर्ग, एन सी सी कँप असं बरंच बरंच आहे. पण अवाढव्य लोकसंख्येला पुरेसं होत नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ताजा कलम...

मदनबाण
Tue, 04/30/2013 - 19:57 नवीन
चिनी सैनिक घालतायेत घिरट्या.... India to take ‘every step’ to deal with Chinese incursion जाता जाता :--- "This is the most serious incursion by the Chinese in over a quarter of a century," Brahma Chellaney, {professor of strategic studies}
  • Log in or register to post comments

ते काँग्रेसप्रेमी चाचा कुठे गेले

sagarparadkar
Tue, 04/30/2013 - 22:02 नवीन
ते काँग्रेसप्रेमी चाचा कुठे गेले .... अशा विषयांवर ते बरोब्बर गप्प कसे बसतात ....
  • Log in or register to post comments

असो.

नितिन थत्ते
Wed, 05/01/2013 - 14:45 नवीन
असो. हा धागा वाचून मागे मिपावर असाच एक मॅरॅथॉन धागा आपण इंचाइंचाने काश्मीर घालवतो आहोत म्हणून निघाला होता त्याची आठवण झाली. शेकडो प्रतिसादानंतर काश्मीरात आपण माघार घेत नसून प्रगती करत आहोत असे धागाकर्त्यांनीच येऊन सांगितले. शेवटी लष्करी आणि राजनैतिक डावपेच वगैरे बाबत मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा सल्ला घेत नाहीत हे देशाचे दुर्दैवच. नाहीतर एव्हाना आपले लष्कर बीजींगमध्ये सूप पीत बसलेले दिसले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 05/02/2013 - 08:04 नवीन
मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा सल्ला घेत नाहीत हे देशाचे दुर्दैवच. नाहीतर एव्हाना आपले लष्कर बीजींगमध्ये सूप पीत बसलेले दिसले असते.
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>>> शेवटी लष्करी आणि राजनैतिक

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/02/2013 - 11:55 नवीन
>>> शेवटी लष्करी आणि राजनैतिक डावपेच वगैरे बाबत मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा सल्ला घेत नाहीत हे देशाचे दुर्दैवच. नाहीतर एव्हाना आपले लष्कर बीजींगमध्ये सूप पीत बसलेले दिसले असते. मनमोहन सिंगांनी मिपाकरांचा सल्ला घ्यावा किंवा अजून कोणाचाही घ्यावा. अगदी प्रियांकाच्या बाळांचा सल्ला घेतला तरी हरकत नाही. पण नुसता सल्ला घेऊन डोळे मिटून चेहर्‍यावर दीन, पतित, अन्यायी, केविलवाणे भाव आणून स्वस्थ बसून राहू नका. निष्क्रीयता सोडा, दुर्बलता सोडा, कोळसा घोटाळा/२जी घोटाळा/राष्ट्रकुल घोटाळा इ. अगणित घोटाळ्यातील भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणे सोडा, चौकशी अहवाल बदलून खोटे अहवाल तयार करणे सोडा, सोनिया किंवा राहुल कडून आदेशांची वाट बघू नका. योग्य ती लष्करी कारवाई करून भारतीय भूमीत घुसलेल्या चिन्यांना हाकलून लावा. अर्थात तुमच्याकडून अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे चंद्र मागण्यासारखे आहे. पण काय करणार, राहवत नाही म्हणून लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

शेवटी लष्करी आणि राजनैतिक

मदनबाण
गुरुवार, 05/02/2013 - 13:11 नवीन
शेवटी लष्करी आणि राजनैतिक डावपेच वगैरे बाबत मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा सल्ला घेत नाहीत हे देशाचे दुर्दैवच. नाहीतर एव्हाना आपले लष्कर बीजींगमध्ये सूप पीत बसलेले दिसले असते. हॅहॅहॅ... चच्चांकडुन अपेक्षित असलेलीच प्रतिक्रिया ! मनमोहन सिंग यांना सध्या कोणा-कोणाचा सल्ला घ्यावा हाच प्रश्न पडलेला असावा.बाकी चच्चा तुमच्या आवड्या कॉग्रेस बद्धल हा लेख सुद्धा वाचा जरा... सारवासारवीतली सक्रियता जाता जाता :--- आपल्या लष्कराचे दुर्दैव असे की आपल्या वायझेड राजकारण्यांमुळे त्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे,मग कारगील योद्द्यांना अमानुषपणे ठार करणे असो,वा सैनिकांची मुंडकी तोडुन नेणे असो...आमचं सरकार फक्त "शाब्दिक" निषेध नोंदवण्यापलीकडे काहीच करत नाही,आणि हेच आता चीन बाबत घडताना आपण सर्व हतबलतेने पाहत आहोत. चीनने आपल्या देशात तंबु ठोकुन आज बहुतेक १८ दिवस पूर्ण झाले आहेत आणि लष्करी तत्परतेचा (कारगिल प्रमाणेच यावेळी देखील आपल्या लष्कराचे इंटलिजन्स फेल्युअर झाले.) आणि राजकिय धोरणाचा पार चुरळा झाला आहे. :( जग आपल्याकडे पाहुन हसतय ! हे हिंदुस्थानी म्हणे महासत्ता होण्याच्या बाता मारतात,जे साध्या ४० सैनिकांना त्यांच्याच देशातुन हुसकवुन लावु शकत नाही... Chinese troops may never leave Ladakh: Intelligence officials
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

चिंतेची बाब

श्रीरंग_जोशी
Tue, 04/30/2013 - 22:08 नवीन
चिनी सैन्यतुकडीची घुसखेरी चिंतेची बाब आहे. मला अशी आशा वाटत आहे की, भारतीय लष्कर प्रत्यूत्तराची पूर्वतयारी करत आहे. अन चिन्यांना गाफील ठेवण्याचा डावपेच म्हणून सरकार एकदम संयमीत प्रतिक्रिया देत आहे. याप्रकारची रणनिती बांग्लादेश मुक्तीसंग्रामात यशस्वीरित्या वापरली गेली होती
  • Log in or register to post comments

त्यावेळी

कोमल
Tue, 04/30/2013 - 22:43 नवीन
त्यावेळी पंतप्रधान पद इंदिरा गांधींकडे होतं, त्यांनी नाही म्हटलं तरी भारतासाठी बरचं काम केलं होतं. आत्ताची परिस्थिती याच्या पूर्ण उलट आहे. आता ममो खेळणं पंतप्रधान आहे. जर तुम्ही म्हणलात तसा सरकारचा डाव(???) असेल तर "जिओ युपिए२". पण हे कल्पनातीतच वाटतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

येणारा काळ उत्तर देईलच

श्रीरंग_जोशी
Tue, 04/30/2013 - 22:48 नवीन
सध्या केवळ अंदाजच बांधल्या जाऊ शकतो. चीन आपल्याला दुखावेल असे वाटत तरी नाही. बारीक सारीक कुरापती काढत राहणे हे नेहमीचेच आहे. काही दिवसांनी / आठवड्यांनी हे घुसखोर परत जातील अर्थात भारताकडून काही अटींची पूर्तता करून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

काय म्हणायचे आहे??

कोमल
Tue, 04/30/2013 - 23:53 नवीन
काही अटींची पूर्तता करून
नक्की कसल्या अटी याचे अंदाज नाही बांधले का तुम्ही अजुन??
चीन आपल्याला दुखावेल असे वाटत तरी नाही
तुम्ची दुखावण्याची व्याख्या मला कळू शकेल का?? भारताच्या हद्दीच्या आत तंबू ठोकले आहेत त्यांनी.. अजून काय करायला पाहीजे त्यांनी म्हणजे "आपण" दुखावले जाऊ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

बातम्यांमध्ये वाचले

श्रीरंग_जोशी
Wed, 05/01/2013 - 00:06 नवीन
वॄत्तपत्रांतील बातम्यांमध्ये याबाबत लिहून आले आहे. भारत सीमाभागात लष्करी पायाभूत सुविधा मजबूत करत आहे. टेळहणी साठी युद्धसज्ज तुकड्या तैनात करत आहेत. या सर्व गोष्टींची तीव्रता कमी व्हावी यासाठी दबावाची खेळी खेळली जात आहे. जोवर हल्ला व लष्करी चकमकी होत नाही तोवर तरी आपण अधिकॄतरित्या दुखावले जाऊ असे दिसत नाहीये. लष्करी प्रत्युत्तर हि अधिकृतरित्या दुखावले जाण्याची खूण समजावी. फार पूर्वी जे एन दिक्षित यांचा लेख वाचला होता तेव्हा वाटाघाटी करताना चिनी केवढे संयमी चिवट असतात अन भारतीय बाजू घाई गडबड करून स्वतःच्या अडचणी वाढवते याबाबत लिहिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

एक दुवा पाहावा..

कोमल
Wed, 05/01/2013 - 00:32 नवीन
मराठी मधील एका अग्रणी वृत्तपत्रातील बातमी विरोधी पक्ष काय बोलत आहेत किंवा का बोलत आहेत हा वादाचा मुद्दा आहे.. पण वृत्तपत्र तरी हेच दाखवत आहेत.. याला काय म्हणावे?? आणि या बातमी खालीच असलेली बातमी, पंप्र निवडणुकीच्या प्रसारात मग्न आहेत. तुम्ही म्हणत आहात तशी ही जर दबावाची खेळी असेल तर उत्तमच, पण अशी कृती जर भारतीय सैनिकांनी केली असती तर चीन एवढा संयमी राहीला असता का?? वाटाघाटीच्या भानगडीत पडला असता का?? जाता जाता- वाटाघाटीची वेळ नेहमीच का हो येते आपल्यावर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Wed, 05/01/2013 - 00:42 नवीन
दुवा पाहिला. विरोधी पक्ष आपले काम करत आहेत. माझ्या निरिक्षणानुसार भारत सरकार (कुठल्याही पक्षाचे / आघाडीचे असो) व भारतीय लष्कर माध्यमांद्वारे आक्रमकता न दाखवता प्रत्यक्ष कारवाईवर भर देतात. मागे एका चर्चेत याचे एक उदाहरण दिले होते. वाटाघाटी द्विपक्षीय असतात. ती वेळ सर्वांवरच येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

चर्चा वाचली

कोमल
Wed, 05/01/2013 - 20:09 नवीन
चर्चा वाचली आणि तुमचा लेखही वाचला. लेख खुप आवडला. पण ती चर्चा ज्या वर आहे ती परिस्थिती (कंदहार अपहरण) आणि सद्द परिस्थिती(चीनची) यांची तुलना होऊच शकत नाही. त्यावेळी वाटाघाटी केल्या होत्या कारण कैक लोक प्रत्यक्ष ओलिस होते. आणि त्वरीत निर्णय घेणे गरजेचे होते. आताच्या मुद्याबद्दल विचार केला तर १० दिवस झाले आहेत चिन्यांना भारतात तंबू ठोकून, त्यांनी (अजूनतरी) अपहरण करणे, ओलिस ठेवणे या गोष्टींना सुरवात केली नाहीये, पण म्हणून सरकारने काहीच ठोस पावले न उचलता भारतीय जनतेला आणि पर्यायाने जगाला काही वेगळा संदेश दिला आहे अस नाही वाटत का?? चीनने सुद्धा अशा गोष्टींना सुरवात करावी का, जेणे करून वाटाघाटीची वेळ येइल आणि चीन अजून आपल्या देशाचा काही हिस्सा खिशात घालेल, (कदाचीत) परत जाइल आणि पुन्हा काही दिवसांनी परत येइल.. तुम्ही
पण अशी कृती जर भारतीय सैनिकांनी केली असती तर चीन एवढा संयमी राहीला असता का?? वाटाघाटीच्या भानगडीत पडला असता का??
याबद्द्ल काहीच मत नाही मांडलेलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/02/2013 - 04:13 नवीन
मी वर जो दुवा दिला होता तो ज्या प्रतिसादाचा होता त्यात हे उदाहरण लिहिले होते.
जॉर्ज फर्नांडिस यांची संरक्षणमंत्री म्हणून शेवटची कारकिर्द सुरू झाल्या झाल्या भारतीय लष्कराने काश्मीरमधील नियंत्रणरेषेच्या अनेक किमी पलिकडे असलेली अतिरेक्यांची ठाणी धडक कारवाई करून नष्ट केली होती. व स्वतःच्या तिथे असण्याचे कुठलेही पुरावे शिल्लक न ठेवता आपल्या सैन्याची तुकडी सुखरूप परत आली होती. त्यावेळी इंडिया टुडे मध्ये यावर लेख आला होता.
या घटनेचा अजिबात गाजावाजा होऊ दिला गेला नाही. असे काही घडलेच नाही या प्रकारचीच उत्तरे माध्यमांच्या प्रतिनिधींना भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांकडून मिळत होती. सदर प्रकरणात पहिली आगळीक भारताकडून घडावी याची व्युहरचना चीनने केलेली असावी असा अंदाज आहे. हेच जर याविरुद्ध घडले असते तर चीनची प्रतिक्रिया काय राहिली असती यावर मी काही बोलू शकत नाही कारण त्या विषयाचा माझा अभ्यास नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की प्रत्येक देशाची एक प्रकृती असते त्याविरुद्ध वागायला गेले की फसगत होऊ शकते. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची विश्वासहर्ता चीनपेक्षा केव्हाही अधिक आहे. बाकी आपल्याला चीनबाबत जसे वाटते की आपल्या भूभागात त्यांनी घुसखोरी केलेली आहे तसेच तिकडल्या लोकांचेही म्हणणे असणार की भारताने चीनच्या बर्‍याच भूभाग साडेसहा दशकांपासून बळकावलेला आहे अन चिनी सरकार हातावर हात ठेवून बसले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

काही तरी गैरसमज होतोय.

कोमल
गुरुवार, 05/02/2013 - 18:06 नवीन
नक्कीच काही तरी गैरसमज होतोय.
भारतीय लष्कराने काश्मीरमधील नियंत्रणरेषेच्या अनेक किमी पलिकडे असलेली अतिरेक्यांची ठाणी धडक कारवाई करून नष्ट केली होती
१)पाक विरोधी केलेली ही कारवाई स्तुत्यच आहे, पण हे घडलं भाजप सत्तेवर असतांना, सध्या सत्ता काँग्रेस कडे आहे. (मी भाजप ची समर्थक नाही, हं पण काँग्रेस विरोधक नक्की आहे) २)भारत-पाक संबंध आणि भारत- चीन संबंध खूप वेगळे आहेत. जे पाक सोबत घडवून आणलं ते चीन सोबत शक्य वाटत नाही. भारताचे पाक बद्द्लचे धोरण आणि चीन बद्दलचे धोरण यांत प्रचंड तफावत आहे, दोन्ही देश भारताचे कट्टर शत्रु असले तरी. त्यामुळे पाक वर केलेल्या कारवाईचा मुद्दा चीन प्रकरणी तुलनात्मक नाही ठरु शकत.
बाकी आपल्याला चीनबाबत जसे वाटते की आपल्या भूभागात त्यांनी घुसखोरी केलेली आहे तसेच तिकडल्या लोकांचेही म्हणणे असणार की भारताने चीनच्या बर्‍याच भूभाग साडेसहा दशकांपासून बळकावलेला आहे अन चिनी सरकार हातावर हात ठेवून बसले आहे.
३)अतिशय असहमत. अस्काइ चीन अर्थात चीनने बळकावलेला प्रदेश तर त्यांच्याच ताब्यात आहे. Image removed. शिवाय यात सध्या चीन ने धुसखोरी केलेला प्रदेश दौलत बेग ओल्डी दिसत आहे. आणि हा प्रदेश चीनचा नाही हे कुणीही सांगु शकेल. आणि राहीली गोष्ट "चिनी सरकार हातावर हात ठेऊन बसलं असेल" असे चीनी जनतेला वाटत असण्याची तर ती शक्यता नसावीच कारण तेथील सरकारने तेथील जनतेलाच खूप हवालदील केले आहे. असो, माझे म्हणणे एवढेच आहे की चीन बाबत एकदा तोंड पोळलं आहे, पाकविरूद्ध केलेल्या काही यशस्वी कारवायांमुळे सरकारकडून युद्धनीतीची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

गैरसमज नाहीये

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/02/2013 - 18:43 नवीन
हे प्रकरण असो वा इतर कुठले, माझे विचार असेच आहेत की जेव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो व परराष्ट्र धोरणांचा विषय असतो तेव्हा कुठल्याही पक्षाचे आघाडीचे सरकार असो सरकारचे धोरण व लष्कराचे धोरण फारसे वेगळे नसते. अन या बाबतीत आपली सरकारी व्यवस्था बेजबाबदार असते असे मी मानत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या डावपेचांत कधी आपले शत्रू वरचढ ठरू शकतात तर कधी आपण. उठसूठ स्वतःच्या देशाच्या धोरणकर्त्यांवर अविश्वास दाखवणे मला पटत नाही. नोव्हे २०१२ मध्ये कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी कशी सफाईने करण्यात आली याबाबत संबंधितांचे अभिनंदन करणारे स्टेटस मी माझ्या चेपूवर टाकले तर लगेच कुणीतरी जालावर फिरत असलेले १० प्रश्न त्यावर प्रतिक्रिया म्हणून टाकले त्यापैकी काही तर अक्षरशः कॉमन सेन्सने उत्तर देण्यासारखे होते. त्यावर मी उत्तर दिले कसलेही ठोस कारण नसताना मी माझ्या देशाच्या व्यवस्थेबद्दल उगाचच संशय निर्माण करण्यात सहभागी होणार नाही. अनेकांच्या चेपूवर इतर देशांचे नागरिक मित्र असतात. काय प्रतिमा बनत असेल आपल्या देशाची? प्रत्येक सरकार निवडून देण्यात आपला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष वाटा असतोच. ५ वर्षांसाठी त्यांच्यावर कामगिरी सोपवली आहे ना मग प्रत्येक कृतीवर अविश्वास दाखवण्याची घाई करणे बरोबर नाही. सतत अविश्वास दाखवणे खूप नुकसानदायी असते, मग तो मैत्रीत, नात्यात असो वा स्वतःच्या सरकारविषयी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

असो..

कोमल
गुरुवार, 05/02/2013 - 23:17 नवीन
विषयांतर होत आहे आता.. तुमच्या विचारांनुसार चर्चा वाढवली तर बरेच फाटे फुटतील. एकच छोटीशी कथा सांगते, "एक आटपाट नगर होते. बाकीच्या नगरांसारखेच. एके दिवशी त्या नगरीत एक माणूस येतो अन नगरीतील लोकांच्या सोबतीने राहु लागतो. काही दिवसांनी तो त्या नगरीत दंगे-धोपे सुरु करतो. लोक त्याला समजावतात. तो समजतो. अजून काही दिवसांनी तो चोरी मारी करू लागतो. लोक त्याला प्रचंड दम भरतात. तो काही दिवस दबून वावरू लागतो. पुन्हा थोड्या दिवसांनी सक्रिय होतो आणि प्रमाणापेक्षा जास्त वाइट धंदे सुरु करतो. लोक त्याला गावातून हाकलू लागतात, तो खूप गयावया करतो, माफी मागतो, पण लोकांचा त्याच्यावरील विश्वास उडालेला असतो." तुम्ही जर त्या नगरीतील एक नागरिक असले असता तर तुम्ही काय बरं केलं असतं?? विषयांतर झाल्याबद्दल क्षमस्व..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

रूपककथा आवडली

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/02/2013 - 23:26 नवीन
पण मी ज्या नगरीत लहानाचा मोठा झालो त्या नगरीत एवढेच होत नाही. मी सरकारी अनुदानाच्या शाळा कॉलेजात शिकलो. सरकारी धोरणांमुळे उद्योगधंद्यांना पोषक वातावरण निर्माण झाले. त्यातून निर्माण झालेल्या रोजगारामुळे माझ्या घरात चूल पेटते. सरकारी अनुदानाचं इंधन मी वापरतो. सरकारच्या सौजन्याने विकसित झालेल्या पायाभूत सुविधांचा मी पुरेपूर वापर करतो. अतिरेकी नकारात्मकतेमुळे विशेषकरून गेल्या तीन वर्षांत देशाचे बरेच नुकसान झाले आहे. विषयांतराबद्दल क्षमस्व!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा