तुमच्या प्रतिसादात हे अध्याहृत आहे की भाजपा आणि संघपरिवार हे एकमेकांशी संबंधित आहेत. हे मिपावर आम्ही जे काही शिकलो आहोत त्याच्याशी विसंगत आहे. मिपावरील माहितीनुसार मुळात भाजपा आणि संघपरिवार या अगदी वेगळ्या संघटना असून अटलबिहारी वाजपेयी यांची भाजपाकडून पंतप्रधानपदासाठी झालेली निवड व त्यांचे सरकार टिकवण्यासाठी कलमाडींनी केलेले प्रयत्न याच्याशी संघपरिवाराचा काही संबंध असू शकत नाही. पुण्यात अधिकृत भाजपा उमेदवाराऐवजी कलमाडींना पाठिंबा दिल्याने संघस्वयंसेवकांना काही फरक पडू नये कारण संघ व भाजपा हे वेगवेगळे आहेत.
त्यामुळे तुमचा मुद्दा रॉंग आहे.
आता संघ व भाजपा वेगवेगळे आहेत मात्र संघस्वयंसेवक व भाजपा कार्यकर्ते एकच असू शकतात असा काहीसा युक्तिवाद तुम्हाला करता येईल.
>>> कारण संघ व भाजपा हे वेगवेगळे आहेत.
नक्कीच. संघ अराजकीय संघटना आहे तर भाजप राजकीय पक्ष आहे. संघाचा स्वतःचा अजेंडा आहे व स्वतःची विचारसरणी आहे. भाजपचा स्वतःचा अजेंडा आहे व भाजपची स्वतःची विचारसरणी आहे.
संघाचा स्वतःचा अजेंडा आहे व स्वतःची विचारसरणी आहे. भाजपचा स्वतःचा अजेंडा आहे व भाजपची स्वतःची विचारसरणी आहे.
धन्यवाद. थोडेथोडे कळत आहे. कदाचित या विचारसरणी व अजेंडे योगायोगाने सारखे असल्याने काँग्रेसपुरस्कृत मीडियामुळे आमचा गैरसमज होत आहे. मिपावरील स्पष्टीकरणांमुळे हे गैरसमज दूर होतात ही मोठीच मिळकत आहे.
>> भाजप हा संघपरिवारचा बॅड बॉय आहे
बाकी भाजप माहीत नाही
पण पुण्यापुरते म्हणायचे तर ते मनाने अतिशय उदार असल्याने
कुणालाही आपलेसे करु शकतात.
बा द वे
साठ खासदार एकत्र केले होते(?)
अहो ५४ खासदारवाले देवीगौडा पंतप्रधान होतात
मग साठ खासदारवाला स्वतःच पी एम झाला नसता का
आज पवारसाहेबांच्या पक्षाचा आकडा ११ च्या वर जात नाही
तेव्हा ६० खासदार यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.
भर सभेत अटलजींच्या तोंडून सुरुवातीला कलमाडी नव्हे तर धर्माधिकारींचे नाव बाहेर पडते
आणि सगळी खेळी उघडी पडते.
त्या वेळचे काही युक्तिवाद पहा
१. स्वतःच्या मुलावर काय कुणीही प्रेम करेल ? दुसर्याच्या मुलावर प्रेम करायला मोठं मन लागतं
२. आपद्धर्म आहे
३. घराला आग लागली आहे शुद्ध पाण्याचा आग्रह कशाला ? गटारातील पाणीही चालेल.
या सगळ्या आत्मघातकी प्रचाराचा उलटा परीणाम झाला
त्यात धर्माधिकारींनी चालवलेली मोहीम.
अनेकांनी त्यांना मत दिले नाही तरी
कुठला उमेदवार नको हे त्यांच्यामुळे मनाशी स्पष्ट झाले
आणि मग नकोशा उमेदवाराला कोण पाडू शकेल त्याच्या पारड्यात मत टाकले गेले
नव्वद हजाराने पराभव झाला तेव्हा या लोकांचा आनंद गगनात मावेना.
>>> साठ खासदार एकत्र केले होते(?)
अहो ५४ खासदारवाले देवीगौडा पंतप्रधान होतात
मग साठ खासदारवाला स्वतःच पी एम झाला नसता का
देवेगौडाला २७३ पेक्षा अधिक खासदारांनी पाठिंबा दिला होता. साठवाल्याला तितका पाठिंबा मिळविता आला असता तर तो पंतप्रधान झाला असता.
>>> आज पवारसाहेबांच्या पक्षाचा आकडा ११ च्या वर जात नाही
तेव्हा ६० खासदार यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.
मग नका ठेवू विश्वास.
>>> त्या वेळचे काही युक्तिवाद पहा
१. स्वतःच्या मुलावर काय कुणीही प्रेम करेल ? दुसर्याच्या मुलावर प्रेम करायला मोठं मन लागतं
२. आपद्धर्म आहे
३. घराला आग लागली आहे शुद्ध पाण्याचा आग्रह कशाला ? गटारातील पाणीही चालेल.
हे कोण व कधी बोलले याची कल्पना नाही. पण यातले क्र. (३) वाक्य वाचून चर्चिलच्या खालील वाक्याची आठवण आली.
"हिटलरचा नाश करायला मला सैतानाची मदत सुद्धा चालेल"
हा धागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी असल्यामुळे पुरुष विभागात आहे असं समजावं का? तसं असेल तर इथे प्रतिसाद लिहू दिल्याबद्दल धागालेखक श्री. विजुभाऊ आणि अन्य पुरुष आयडींचे मी आभार मानते.
When you get in to the fight with pig , it is the pig who enjoys.. you only get dirty !
असा प्रसाद
या धाग्यावर
तुम्हाला मिळाला होता. त्याला तुम्ही उत्तर दिलं नव्हतत.
नेहमीप्रमाणे लिहिताना तुम्ही लाइन ऑफ कंट्रोल क्रॉस करण्यापूर्वीच सागून ठेवतो.
बाकी आपली मर्जी...
When you get in to the fight with pig , it is the pig who enjoys.. you only get dirty !
सल्ल्याचं तंतोतंत पालन केलेलं होतंच की!
त्याला तुम्ही उत्तर दिलं नव्हतत.
त्यातून आमच्या भागात गेली दोन वर्ष दुष्काळ सुरू आहे. "पाणी वाचवा" असं स्थानिक सरकार वारंवार विनवून सांगतं आहे, तर कुठे डुकरांशी मस्ती करून घाण व्हायचं आणि पुन्हा शुचितेखातर पाणी वाया घालवायचं? म्हणून उत्तर दिलं नाही.
बाकी माझं खर्र खर्र प्रेम आहे हो तुमच्यावर. आय लौ यू! त्या प्रेमाला कधी प्रतिसाद देणार?
तुम्ही एवढ्या प्रेमाने विचारतंय. माझ्या डोळ्यात बै टचकन पाणीच आलं हे वाचून. कुण्णी, कुण्णी मला कधी एवढ्या आपुलकीने विचारलं नव्हतं हो आत्तापर्यंत. प्रेमाला असा प्रतिसाद दिला की किती भरून येतं यावर मी तर बै एक कविताच लिहीणार आहे.
> मी लिहिले त्यात नक्की कोणते असम्पशन आहे आणि, असल्यास, त्यातले कोणते राँग आहे?
श्रीगुरुजी
कुणीतरी स्थानिक पातळीवर कलमाडींशी समेट केला.
त्यासाठी अटलजींचे नाव वापरले आणि साठ खासदार इ. गोष्टी सांगितल्या
या त्या गोष्टी
>>> कुणीतरी स्थानिक पातळीवर कलमाडींशी समेट केला.
त्यासाठी अटलजींचे नाव वापरले आणि साठ खासदार इ. गोष्टी सांगितल्या
यात असम्प्शन कोणते आहे व असल्यास त्यात काय राँग आहे?
श्रीगुरुजी
> यात असम्प्शन कोणते आहे व असल्यास त्यात काय राँग आहे ?
यात केवळ माझे अंदाज नव्हे प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. पुन्हा वाचा म्हणजे कळेल
> "हिटलरचा नाश करायला मला सैतानाची मदत सुद्धा चालेल"
धिस इज नॉट अॅप्लिकेबल हियर ना !
बा द वे
तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी ऐकीव दिसताहेत हे उघड आहे
रास्वस हा कायमच स्फोटक विषय आहे. इतके समाजकार्य, शिस्तपालनाची आवड, संघटन वगैरे अनेक चांगल्या बाबींचा एककल्ली विचारसरणीने केलेला चुथडा म्हणजे रास्वसं. मुसलमान द्वेष, गुजरात दंगलीच्यावेळी मतदार याद्या वापरुन मुसलमानांची घरे शोधण्याचा केलेला घॄणास्पद वापर, ओरिसातल्या ख्रिश्चनांविरुद्ध केलेल्या दंगली , हिटलर सारख्या लोकांचे आदर्श आणि त्यायोगे येणारे हिंसेचे आकर्षण इ.इ. अनेक गोष्टी शाखा/संघ इत्यादींपासुन दूर रहाणेच चांगले मानायला लावतात.
+१००००
घोर अज्ञान..
मी राष्ट्र सेविका समितीची लहानपणापासून सेविका आहे. आणि भाऊ आणि बाबांबरोबर संघाच्या शाखेवर लहानपणी गेले आहे.
बाकी एवढे अज्ञान पाजळणार्यांनी संघाबद्दल कितीही तारे तोडले तरी संघाला काही फरक पडत नाही. कुणा चार-पाच विचारवंत म्हणवणार्यांची मते वाचून संघाबद्दल खूप काही माहीत असल्याचा आव आणणार्यांची कीव येते.
मग तुमच्यासाठी मला कधीचे पडलेले प्रश्न आहेत:
१. राष्ट्रसेविका समितीचं नक्की काम काय? (ओन्व्हलोप, गोळाबेरीज माहिती आहे ... धर्म, संस्कृती रक्षण वगैरे. मला थोडे तपशील हवे आहेत.)
२. सेविकांना भाजपमधे कितपत रस असतो? समितीमधे भेटल्यावर सेविका राजकारणाबद्दल चर्चा करतात का?
३. समिती कितपत स्त्रीवादी आहे? आधुनिक स्त्रीवादी मूल्यांसंदर्भात समितीची (आणि/किंवा सेविकांची) मतं कुठे वाचायला मिळतील?
४. समितीची एक आदर्श झाशीची राणी आहे असं त्यांच्या संस्थळावर लिहीलेलं आहे. ती पारंपरिक लिंगसंकल्पना मोडून काढणारी होती. तिचे यजमान साड्या गुंडाळत, पाळी आल्यासारखं महिन्यातले चार दिवस बाजूला बसत आणि राणी मात्र पुरुषी कपडे घालून तलवारबाजी करत असे. तिचा उल्लेख ह्यू रोजनेसुद्धा '१८५७ च्या युद्धातला एकमेव मर्द' असा (काहीसा अतिशयोक्तपूर्ण असला तरी) पुरुषी समजले जाणारे गुण (लढाई, नेतृत्त्व) दाखवणारी असा केला आहे. (लैंगिकतेचं असं दर्शन परदेशी लोकांना चक्रावणारं होतं.) अशा प्रकारचे गुण वाढीस लागावेत, स्त्रियांना संधी मिळाव्यात अशा प्रकारचं काही काम समितीमधे होतं का?
५. समिती आणि संघाचं कितपत इंटरॅक्शन आहे. त्यांचं काम परस्परपूरक असं असतं का? असल्यास त्याचे तपशील?
६. समितीशी संबंधित इतर काही माहिती तुम्हाला द्यावीशी वाटली तर ती ही द्याल का?
इथे अवांतर वाटत असेल तर वेगळा धागा किंवा व्यनी/खरडीतून कळवलंत तरी चालेल.
या आणि अशा प्रश्नांची उत्तरं समितीच्या संस्थळावर आणि विकीपानावरही मिळाली नाहीत. असे प्रश्न पडल्यापासून भारताबाहेर असल्यामुळे प्रत्यक्ष समितीत जाऊन माहिती मिळवणंही जमणें नाही.
जमेल तेवढा प्रयत्न करते.
१. राष्ट्र सेविका समितीचं काम संघाच्या धर्तीवर चालतं. पूर्,भूकंप अशा ठिकाणी मदतकार्य तर बरंच चालतं. पण स्त्रियांचे काही वेगळे प्रश्न असतात. अशा ठिकाणी सेविका आवर्जून काम करतात. याव्यतिरिक्त अनेक सेवाकार्ये समितीत होतात.
हे मोठ्या पातळीवरचं काम झालं. आमच्या शाखेने छोट्या पातळीवर केलेले काही प्रयत्न म्हणजे झोपडपट्टीतील मुलींसाठी शाखा लावणे. रोजच्या किचकिचाटातून दूर होऊन शाखेत येण्यासाठी त्या मुली खूप उत्सुक असायच्या. सगळ्या मुलींसोबत राहिल्याने,चर्चा केल्याने त्यांच्यात खूप फरक पडला. तसेच शाखेवरच्या आम्हा अन्य मुलींनाही त्यांच्याकडून काही ना काही शिकता आले.
दुसरा प्रयत्न कॉलेज तरुणींचं साप्ताहिक मेलन. या मुलींचा संघाशी काही संबंध नव्ह्ता. पण शाखेपूर्वीच्या तासाभराच्या भेटीत एखादा सामाजिक विषय घेऊन त्यावर चर्चा व्हायच्या.
हे असे अनेक छोटे छोटे उपक्रम समितीच्या शाखांवर चालतात. मुलींनी नेहमीच्या जगातून बाहेर पडून सामाजिक भान जपावं अशी एक गोष्ट यातून नक्कीच साधली जाते.
२. भाजप आणि संघपरिवार या स्वतंत्र गोष्टी आहेत. माझ्या लहानपणापासून मी अनेक पक्षातील महिलांना समितीत येताना पाहिलं आहे. समितीचे उद्दिष्ट राजकारण नसून समाजकारण आहे. अर्थात राजकारणाविषयी भान आणि जागरुकता सेविकांना नक्कीच असते.
३ व ४ याचं उत्तर एकत्र द्यायचा प्रयत्न करते. समिती तीन स्त्रियांना आदर्श मानते. जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई व देवी अहिल्याबाई होळकर. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व असे हे तीन आदर्श आहेत. आधुनिक राहूनही हे तिन्ही आदर्श जपता येऊ शकतात असं माझं स्वतःचं मत आहे. बाकी मते वाचण्यासाठीचे जमतील तसे संदर्भ मी व्यनी/खरडीतून कळवेन.
'स्त्रियांना संधी' म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे ते मला नीटसं कळलेलं नाही. जे कळलं त्याला उत्तर देते. समितीच्या शिबिरांमधे कराटे,लाठी इ.सहजपणे उपलब्ध असलेल्या शस्त्रांचा व पद्धतींचा वापर शिकवला जातो. अचानक आलेल्या संकटांना तोंड कसं द्यावं याची तयारीही काही पद्धतींनी,काही प्रमाणात करून घेतली जाते. सकाळी हे प्रशिक्षण, संध्याकाळी मैदानी खेळ व मधल्या वेळात चर्चा, बौद्धिक इ. असा साधारण साचा असतो. स्वसंरक्षणाची शारीरिक तसेच मानसिक तयारी शाखेवरही करुन घेतली जाते.
५.समिती आणि संघाचं काम समांतर चालतं. समिती संघाचा भाग नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे मदतकार्य इ.करताना परस्परपूरक काम आपोआप होतं.
६.
प्रतिसाद मोठा दिसला तरी अजून थोडेसेच प्रश्न आहेत:
समितीच्या साधारण किती सदस्या/सेविका आहेत? (अंदाजे आकडा असेल तरी चालेल. म्हणजे दोन लाख, दीड कोटी अशा प्रकारचा. दोनाच्या जागी एक असेल किंवा चार असतील, त्याने फार फरक पडणार नाही.)
समितीचे उद्दिष्ट राजकारण नसून समाजकारण आहे.
हे असं असेल तर (झाशीची) राणी या साच्यात कुठे बसते ते लक्षात येत नाहीये. झाशीच्या राणीचा मुख्य वारसा आपले (भारतीय) आणि बाहेरचे (ब्रिटीश) हे लक्षात घेऊन त्यासंदर्भात राजकारण (तिच्या बाबतीत राजनैतिक तह, ते न जमल्यास युद्ध) असा आहे. तेव्हा भारत असा काही देश नसूनही राणीला हे 'आपलं' आहे असं लक्षात आलं आणि ते टिकवून ठेवण्याचा तिने प्रयत्न केला असा तिचा राजकारणाचा वारसा आहे.
समितीचं उद्दीष्ट राजकारण नसल्यास समितीची राणीसंदर्भात काय मतं आहेत याबद्दल मला अधिक कुतूहल आहे. (दोन महायुद्धांच्या मधल्या काळात जर्मनीमधे जर्मन विज्ञान आणि ज्यू विज्ञान अशी विभागणी होत असे. क्वांटम मेकॅनिक्स, सापेक्षतावाद यांना ज्यू विज्ञान समजलं जात असे. अशा प्रकारची विभागणी अयोग्य, अग्राह्य आहे असं विज्ञानात सरसकट समजलं जातं.) इतिहास हा विषय विज्ञानासारखा स्वच्छ, स्पष्ट नाही. शिवाय इतिहासाची मांडणी आपापल्या दृष्टीकोनातूनही करता येते. त्यामुळे इतिहास-संशोधकांचं राणीबद्दल, तिच्या वारशाबद्दल काही एक मत असलं तरी ते सगळ्यांनाच ग्राह्य वाटेल असंही नाही. तसा समितीचा इतिहास कशा प्रकारे मांडलेला आहे?
'स्त्रियांना संधी' यात मला राजकारण या पैलूबद्दलच कुतूहल आहे. महिला आरक्षण, एखाद्या ठिकाणी महिला आरक्षण असेल तर तिच्या घरातल्या पुरुषांनी तिला प्रॉक्सी म्हणून वापरून घेणं वगैरे विषय आजच्या, स्त्रियांसंबंधीच्या राजकारणासंबंधीचे आहेत. सुषमा स्वराज, वृंदा करात किंवा सोनिया गांधी यांच्यासारख्या नाही तर सामान्य स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी राजकारण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. नर्मदा बचाव किंवा काश्मीरमधे चालणार्या घटनांमधे महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणावर होताना दिसतं. या महिला मोठ्या प्रमाणात राजकारणात सहभागी होताना दिसतात.
आधुनिक होऊनही समितीच्या तीन आदर्शांबद्दल मला फार प्रश्न नाहीत; प्रश्न तपशीलांसंदर्भात आहेत. आधुनिक जगात येणार्या अडचणींसंदर्भात आहेत. उदाहरणार्थ:
१. स्त्रियांवरच मूल वाढवण्याची जबाबदारी असेल तर आधुनिक जगात जी लिंग समानता मानली जाते ती तिथे मोडते. त्यासंदर्भात समिती सेविका किंवा संपर्कात येणार्या इतर स्त्रियांना काय शिकवते?
२. आधुनिक जगात स्त्रियांना शिक्षण, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक वेळेस कराटे शिकून नाहीतर पाच-सात किलोची वजनं उचलून फायदा होईलच असं नाही. अनेकदा डोकं लढवून परिस्थितीतून सुटका करून घ्यावी लागते. कोणी समोर चाकू नाहीतर पिस्तूल घेऊन आला तर कराटे किंवा पुष्ट स्नायूंचा फायदा होत नाही. कधी सुटका झालीच नाही तर मानसिक तयारी असणं महत्त्वाचं समजलं जातं. एखादी दुर्दैवी घटना घडली तरीही त्याबद्दल व्यापक विचार करावा लागतो. (सोहेल अब्दुलाली हे एक उदाहरण.) एकेकाळी बलात्कार झाला तर बायका बहुतांशी आत्महत्या करत असत. आता तसं होत नाही, होऊ नये यासाठी समाज प्रयत्नशील आहे. पण अजूनही "आता या मुली/स्त्रियांचं लग्न कसं होणार?" याच चिंतेत समाज अडकलेला दिसतो. पीडीतेला त्रास होतो पण बलात्कार करणार्याचं जगणं समाज मुश्कील करत नाही.
या संदर्भात समितीचे विचार आणि/किंवा काम काय आहेत?
धर्म, संस्कृती, परंपरेत योनीशुचितेला फार महत्त्व आहे. पण आधुनिक जगात योनीशुचितेला महत्त्व नाही. दुसर्या एका धाग्यावर लग्न ठरवण्याच्या परंपरेत मुलीची अन्याय्य पद्धतीने अधिक चिकीत्सा होते असा एक मुद्दा आलेला आहे. पारंपरिकरित्या स्त्रियांना पुरुषापेक्षा खालचं स्थान दिलेलं आहे; धार्मिक विधींमधे एकटी स्त्री धर्मकार्य करू शकत नाही, विधवा तर नाहीच नाही.
अशा अडचणीच्या प्रसंगांमधे जिथे धर्म, परंपरा, संस्कृती सरळसरळ आधुनिक मूल्यांच्या आड येतात तिथे समितीची भूमिका काय असते?
संघ परीवाराला आपल्या निष्ठा अर्पण केलेल्यांना दुसरी बाजू मांडली की राग येणे स्वाभाविक आहे. मग कुणाला तो प्रोपागंडा वाटेल कुणाला खोटारडे पणा. पण ज्यांना तटस्थ वृत्तीने विचार केल्यास संघ परीवाराची ही दुसरी बाजू कुणाच्याही लक्षात येईल.
संघ परीवाराला मुसलमान/ख्रिश्चन धर्मांविषयी प्रतिकुल मते आहेत हे कुणीही शाखा अटेंड केलेला किंवा अॅक्टीव संघ कार्यकर्त्याच्या संपर्कात आलेला सांगू शकेल. त्यासाठी ओरिसा दंगलींचे दाखले, नानावटी रिपोर्ट, किंवा संघ परीवारातल्या बाबू बजरंगीचे कारनामे असले संदर्भ द्यायची काही गरज नाही.
संघाला कायमच हिटलर सारख्यांचे आकर्षण होते/आहे हे ही छुपे रहस्य नाही. माधव गोळवलकरांचे त्यावरील विवेचन प्रसिद्ध आहेच. शिवाय अनेक लेखकांनी नाझीझम/फॅसीझमशी संघाच्या विचारसरणीशी केलेली तुलना बिनबुडाची म्हणून उडवुन लावण्याइतकी पोकळ नाही. (संघनिष्ठांना मात्र ती तशीच जाणवणार कारण त्यांचा उघड बायस)
अर्थात त्यामुळे संघाने केलेले समाजकार्य (विशेषतः नैसर्गिक आपत्ती प्रसंगी) आणि त्यांचे चांगले गुण नाहिसे होत नाहीत जे मी ही माझ्या प्रतिसादात नाकारलेले नाहीत.
खोटारडेपणा आहे कारण कुठलाही पुरावा नाही. उगाच मंथरेने चार चार वेळातीच गोष्ट सांगायची आणि रामायण घडवायचे, त्यातलाच हा प्रकार आहे.
संघ परीवाराला मुसलमान/ख्रिश्चन धर्मांविषयी प्रतिकुल मते आहेत हे कुणीही शाखा अटेंड केलेला किंवा अॅक्टीव संघ कार्यकर्त्याच्या संपर्कात आलेला सांगू शकेल.
तुम्ही आला असला तर तसे सांगा. मी संपर्कात आलो आहे आणि मला कधीच असे जाणवले देखील नाही. त्यामुळे तुमचे मुद्दे खोटे आहेत असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही. त्यातही एखाद्या व्यक्तीने तसे म्हणले असे वादासाठी गृहीत धरले तरी ती व्यक्ती त्या संघटनेत नक्की कुठे आहे हे देखील सांगा.
संघाला कायमच हिटलर सारख्यांचे आकर्षण होते/आहे हे ही छुपे रहस्य नाही. माधव गोळवलकरांचे त्यावरील विवेचन प्रसिद्ध आहेच.
पुरावा द्या, उत्तर मिळेल. पुरावा नसल्यास खोटेपणा आहे हे सिद्ध होईलच.
शिवाय अनेक लेखकांनी नाझीझम/फॅसीझमशी संघाच्या विचारसरणीशी केलेली तुलना बिनबुडाची म्हणून उडवुन लावण्याइतकी पोकळ नाही. (संघनिष्ठांना मात्र ती तशीच जाणवणार कारण त्यांचा उघड बायस)
परत तेच जे लेखक म्हणता त्याचे पुरावे द्या. मी देखील असे लेखक वाचले आहेत. त्यांनी त्यांना काय वाटते ते लिहीले आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी ना धड तळटीप, ना धड संदर्भ.
खोटारडेपणा आहे कारण कुठलाही पुरावा नाही.
हा तर अतिरेक झाला. मिपावर येणारे ९०%च्या वर प्रतिसाद हे कुठल्याही तळ्टीपा आणि संदर्भ ह्याशिवाय येतात. ह्या सर्व लेखनाला तुम्ही खोटारडेपणा म्हणता का? खाली श्रीगुरुजींनी संघांवर स्तुतीसुमने उधळणारा भला मोठा प्रतिसाद दिला आहे. पण कसलाही संदर्भ न दिल्याने त्याला खोटारडेपणा म्हंटले तर चालेल का?
थोडा शोध घेतला असतात तर, गोळवलकारांचे हिटलरची स्तुती करणारे विधान तुम्हाल सहज सापडले असते.
To keep up the purity of the Race and its culture, Germany shocked the world by her purging the country of the Semitic races—the Jews. Race pride at its highest has been manifested here. Germany has also shown how well nigh impossible it is for Races and cultures, having differences going to the root, to be assimilated into one united whole, a good lesson for us in Hindustan to learn and profit by"
— M. S. Golwalkar
विंदांच्या कवितेचे शिर्षक आठवले.. "तेच ते नि तेच ते" :)
गुरूजींचे हे वाक्य तुम्ही दिले पण परत संदर्भ न देता. त्यात काही आश्चर्य नाही म्हणा, संदर्भ देणे हे का कोणास ठाऊक, अनेक भारतीयांना कमीपणाचे वाटते. जणू काही संदर्भ मागितला म्हणजे तुम्हाला कोणी खोटेच ठरवत आहे. मिपावरील लेखांमधे अहो अगदी राहूल गांधींवर पण टिका करताना पब्लीक वृत्तपत्रीय संदर्भ देते. इथे तुम्ही एका संस्थेवर गंभीर आरोपच नाही, टिकाच नाही तर संदर्भाविना अनुमान काढत आहात. जे आक्षेपार्ह आहे. म्हणून तुमच्या विधानास खोटे म्हणण्याशिवाय पर्याय राहीला नाही. असो.
तुम्ही दिलेले गुरूजींचे वाक्य हे मार्च १९३९ साली त्यांनी लिहीलेल्या "वुई ऑर अवर नेशनहुड डिफाईन्ड" या पुस्तकातील आहे. ते बाबाराव सावरकरांच्या राष्ट्रमिमांसेचे, गोळवलकरांनी, ३२ व्या वर्षी, सरसंघचालक होण्याआधी केलेले भाषांतर आहे. जे काही या संदर्भात वाचले आहे त्याप्रमाणे, त्याची शेवटची आवृत्ती ही १९४७ ला निघाली होती आणि गांधीहत्येनंतरच्या बंदीत ते पुस्तक जप्त् झाले. तात्पर्यः गोळवलकारंच्या हयातीत आणि नंतरही हे पुस्तक १९४८ सालानंतर प्रकाशनात आले नाही. नंतरच्या काळात जेंव्हा हिटलरची विकृती आणि दूष्कृत्ये बाहेर आली तेंव्हा गोळवलकरांनी, "The Christians committed all sorts of atrocities on the Jews by giving them the label “Killers of Christ”. Hitler is not an exception but a culmination of the 2000-year long oppression of the Jews by the Christians." असे देखील त्यांच्या "बंच ऑफ थॉट्स" ह्या पुस्तकात म्हणलेले आहे.
तरी देखील त्या संदर्भात थोडे अधिक सांगतो....
त्याआधी म्हणजे डिसेंबर १९३८ मधे टाईम मॅगझीनने हिटलरला "मॅन ऑफ दी इअर" घोषित केले होते आणि नोबेल समितीच्या शांततापुरस्कारासाठी देखील हिटलरचे नाव घेतले गेले होते. सांगायचा हेतू एकच की हिटलर नक्की काय आहे हे पब्लीकला समजलेले नव्हते. इतकेच काय, १९४० साली I do not want to see the allies defeated. But I do not consider Hitler to be as bad as he is depicted. He is showing an ability that is amazing and seems to be gaining his victories without much bloodshed. Englishmen are showing the strength that Empire builders must have. I expect them to rise much higher than they seem to be doing. - मे १९४० साली, राजकुमारी अम्रित कौर यांना लिहीलेल्या पत्रात आणि Germans of future generations will honour Herr Hitler as a genius, as a brave man, a matchless organizer and much more. - "हरीजन" २२ जून १९४० अशी दोन्ही गांधीजींची विधाने आहेत. सुभाषबाबूंनी तर काय हिटलरशी हातमिळवणी केली होती... मग आता काय गांधीजीना अथवा सुभाषबाबूंना हिटलरच्या हिनकृत्यांचे पुरस्कर्ते म्हणणार आहात का? मी तसे म्हणत नाही, मला तसे वाटत देखील नाही आणि हा धागा गांधीजींवर, टाईम मॅगझीन अथवा नोबेल समितीवर लिहीण्यासाठी देखील नाही. लिहायला भाग पडते कारण जेंव्हा एखादे संदर्भहीन वाक्य जेंव्हा परत परत (आत्ताच्या काळात) जालावर वापरून एखाद्या व्यक्तीस/संघटनेस बदनाम करायला वापरले जाते तेंव्हा त्याच संदर्भात इतरांबद्दल देखील काय भुमिका घेतली जाते हे दाखवण्याचा उद्देश होता.
तुम्हाला इतर कुठले तुमच्या विधानास पूष्टी देणारे संदर्भ माहीत आहे का? पण अर्थातच ते तुम्हाला माहीत नसणार कारण तुम्ही ज्या अनेक लेखकांनी नाझीझम/फॅसिझम आणि संघ अशी तुलना केलेली आहे, ती या एका वाक्याचा उपयोग करत संदर्भाविना आणि स्वतःच्या डाव्या विचारांच्या सोयीसाठी केलेल्या इतिहासाच्या विश्लेषणाला धरून आहे, म्हणून ती देखील खोटी आहे. असो.
विकास,
उत्तम प्रतिसाद!
पण हा प्रतिसाद म्हणजे 'पालथ्या घड्यावर पाणी' असेच होणार आहे. संघाची ज्यांना कावीळ झाली आहे, त्यांना संघाची प्रत्येक गोष्ट वाईटच दिसणार.
संदर्भ मागणे ह्यात चुकिचे काहीच नाही. पण तो मिळायच्या आत समोरच्याला खोटारडा ठरवणे हे असंमजसपणाचे लक्षण आहे. मला वाटतय माझा हा मुद्दा तुम्हाला आणि श्रीगुरुजींना नीट समजलाच नाहीये
गोळवलकरांचे वाक्य हे मी माझ्या प्रतिसादातील मुद्याला संदर्भ म्हणूनच दिले आहेत. आता त्या पुस्तकाची छपाईच होत नाही, खूप पुर्वी लिहिलेले वाक्य आहे वगैरे पळावाटा आहेत. गोळवलकरांनी हे वाक्य कधी जाहीरपणे नाकारले आहे का? असल्यास त्याचा पुरावा द्या. तुम्ही दिलेल्या संदर्भात (ज्याचाही पॄष्ठ क्रमांक दिलेला नाही) हिटलरच्या संहाराविषयी असलेले मत आहे, पण मुळात त्याच्या रेशीयल प्युरिटीच्या आयडियोलॉजीला विरोध केल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे त्यांचे मी दिलेले वाक्य हे अजुनही ग्राह्य धरले जाते.
संदर्भ मागण्यात चुकीचे नसते तर तो न देण्यात चूक असते. वर देखील आधी म्हणले आहेच. एखाद्या व्यक्तीस अथवा संघटनेस एखाद्या गोष्टीविषयी अनुमान काढत गंभीर आरोप करायचे आणि ते देखील संदर्भ न देता हे चुकीचे आहे. या उपचर्चेत देखील जर तुम्हाला संदर्भ मागितला नसता तर तुम्ही देणार होता का? नसलात तर ती दिशाभूल करणे आहे ज्यातून खोटा मतप्रवाहच तयार केला जातो. कदाचीत तुम्ही देखील तुमचे मत असेच तयार केले असेल. एका प्रकारच अंधश्रद्धाच ती... आणि माझा आक्षेप त्याला आहे. तुम्हाला संघ आवडतो का नाही, गुरूजी प्रात:स्मरणीय वाटतात का नाही, असल्या वैयक्तिक गोष्टींच्या संदर्भात नाही...
गोळवलकरांचे वाक्य हे मी माझ्या प्रतिसादातील मुद्याला संदर्भ म्हणूनच दिले आहेत.
अहो पण आधी सुरवात तुम्ही संघावर गंभीर आरोप करून करता. मग त्याला पुरावा विचारल्यावर तो गोळवलकरांच्या एका वाक्याचा देता, जे वाक्य एका पुस्तकातले आहे, जे त्यांनी सरसंघचालक होण्याच्या आधी लिहीलेले आहे आण जे पुस्तक संघाने संघसाहीत्यात धरलेले नाही, अर्थात त्यातील मते ही संघाने संघटनेची मते म्हणून मानलेलीच नाहीत. एखाद्या संघकार्यकर्त्यास अथवा स्वयंसेवकास जर विचारले तर "वुई" माहीत असलेले किती असतील ते पहा. केवळ स्युडोसेक्यूलर्सच मिळतील. त्या ऐवजी "बंच ऑफ थॉट्स" मात्र माहीत असलेले लक्षात येइल... म्हणून परत विचारतो की संघाच्या संदर्भात असा काही पुरावा तुमच्याकडे आहे का? नसल्यास असले गंभीर आरोप करणे म्हणजे काय सत्यवादीपणा आहे असे म्हणायचे का?
आता त्या पुस्तकाची छपाईच होत नाही, खूप पुर्वी लिहिलेले वाक्य आहे वगैरे पळावाटा आहेत.
पळवाटा कसल्या? एखाद्या गोष्टीचे विश्लेषणच करायचे असले तर त्याच्या मागेपुढे बघणे महत्वाचे नसते का? मग त्याच प्रमाणे गांधीजी, सुभाषचंद्र बोस, टाईम मॅगझीन, नोबेल समिती यांनी (आणि तसेच चर्चिलचे पण सांगू शकेन) हिटलरबद्दलचे जे बोलणे/समजणे होते त्यावरून या सर्वांना तुम्ही काय नाझी प्रेमी म्हणणार आहात का? त्याचे उत्तर दिलेत तर बरे होईल. खूप पूर्वी लिहीले होते असे म्हणायचे कारण इतकेच की गुरुजींना जर्मनीत काय घडले हे समजल्यावर त्यांनी त्यांचे हिटलरबद्दलचे म्हणणे स्पष्टपणे सांगितले जे आधीच्या प्रतिसादात दिले आहेच. पण तसे जर गांधीजींचे दिसले नाही अथवा सुभाषबाबूंचे दिसले नाही तर मग तुमचे काय म्हणणे आहे? म्हणून विश्लेषण न करता कुठल्याही नेतृत्वाचे एक वाक्य घेयचे आणि तेच ते बोलायचे हे जे काही डाव्या विचारवंत लेखकांनी केले आहे ते चुकीचे आणि खोटारडेपणाचे आहे...त्या व्यतिरीक्त कुणाचिही लेटेस्ट मते बघणे हे जास्त योग्य असते. कारण तरूण पणातली अनेक मते पौढपणी बदलू शकतात.
गोळवलकरांनी हे वाक्य कधी जाहीरपणे नाकारले आहे का?
त्यांना कधी कोणी जाहीरपणे तसे विचारले होते का? अरूंधती रॉय ज्यांचा संदर्भ आपण दिलेल्या वाक्यासाठी विकीमध्ये दिलेला आहे, त्या तर गुरूजींच्या हयातीत नावारूपाला आलेल्या देखील नव्हत्या! त्या व्यतिरीक्त त्यांच्या हयातीतले जे कोणी ह्या वाक्याचा उपयोग करून त्यांच्यावर टिका करत होते त्यांनी कधी गुरूजींची भेट घेऊन विचारले आहे?
तुम्ही दिलेल्या संदर्भात (ज्याचाही पॄष्ठ क्रमांक दिलेला नाही) हिटलरच्या संहाराविषयी असलेले मत आहे, पण मुळात त्याच्या रेशीयल प्युरिटीच्या आयडियोलॉजीला विरोध केल्याचे दिसुन येत नाही.
बंच ऑफ थॉट्स, पृष्ठक्रमांक: १३४ of ३६४. येथे हे वाक्य आहे. परत त्या संदर्भातले तुमचे "रेशीयल प्युरिटी" संदर्भातील विधान, हे न वाचता अनुमान काढण्याचे उदाहरण आहे... त्याच पानावर (१३४), "दि सेमिटीक कॉन्ट्रॅस्ट" मथळ्याखाली लिहीलेल्या भागात गुरूजींनी हिंदूधर्म आणि सेमिटीक रिलीजन यातील फरक सांगताना ते लिहीलेले आहे. अर्थात त्यांच्या लेखी हा मुद्दा वंशाशी / रेशिअल प्युरीटी संबंधीत नसावा तर हिंदू धर्म आणि सेमिटीक रिलीजन्स यातील फरकामधे असावा असे वाचताना लक्षात येते.
थोडक्यात येनकेन प्रकारेण डावे बुद्धीभेदी लेखक (उ.दा. अरूंधती रॉय आणि अनेक) लिहीत रहातात, आणि त्यांनी लिहीले म्हणजे खरेच असणार असे समजणारे देखील असतात. असो.
माझा आक्षेप हा संदर्भ मागण्या आधीच एखाद्याला खोटारडा ठरवण्याला आहेत. संदर्भाची मागणी ह्यात काहीच अयोग्य नाही असे मीच म्हंटले आहे.
रास्वसं हा हिटलरच्या नाझीझम किंवा मुसोलिनीच्या फॅसीझमने प्रभावित होता/आहे हे संतुलित विचार करणार्या कुणालाही स्पष्ट दिसेल. त्यांचा गणवेश, संचलन, मानवंदना, एक राष्ट्र एक धर्म असल्या खुळ्या कल्पना हे सगळे नाझी लोकांशी साधर्म्य दाखवणारे आहे. बरं संघाने इतके चांगले संघटन असुन त्याचा देशासाठी काय उपयोग केला? संघसमर्थक हे लगेच आपत्कालिन मदती विषयी बोलतात कारण त्यापलिकडे संघाने काहीही कर्तुत्व दाखवलेले नाही. आणि हे आपत्कालिन कार्य देखिल बाळासाहेब देवरसांच्या आगमनानंतर सुरु झाले. तोपर्यंत ३०-४० वर्षे (माझ्या अंदाजाने) संघ काहीही भरीव कामगिरी करत नव्हता नुसत्या राष्ट्रप्रेमाच्या गप्फा हाणणे सोडल्यास. आणि आपत्कालिन कामही कुठे आपत्ती आल्यास केले जाते. इतकी मोठी संघटना आणि संघटन असताना आपत्ती येण्याची वाट का बघीतली जाते? आपल्या देशात समस्यांची काही कमी नाही. अनेक लोक मूलभुत गरजांपासुन वंचित आहेत. अशांसाठी संघाने आजपर्यंत काय केले आहे? श्रीगुरुजींनी म्हंटले आहे की संघ अतिशय हार्मलेस आहे, अहो पण तो हार्मलेस नसुन आजच्या समाजातला 'युसलेस' घटक आहे. स्वातंत्रवीर सावरकरांचे आणि संघाचेही ह्याच कारणावरुन वाजले होते. संघाने वैज्ञानिक दॄष्टीकोनाचा प्रसार करावा, अनिष्ठ रुढी प्रथांना हद्दपार करावे असा सावरकरांचा आग्रह होता. संघाने अर्थातच ह्यातले काहीही केलेले नाही. सावरकरांचे हे उद्गार बरेच काही सांगुन जातात, "the epitaph for the RSS volunteer will be that he was born, he joined the RSS and he died without accomplishing anything".
अर्थात हे सगळे संघाला निष्ठा अर्पण केलेल्या समर्थकांना पटवुन सांगणे अशक्य कोटीचे काम आहे, हे मी आधीच मान्य केलेले आहे.
अर्थात हे सगळे संघाला निष्ठा अर्पण केलेल्या समर्थकांना पटवुन सांगणे अशक्य कोटीचे काम आहे, हे मी आधीच मान्य केलेले आहे.
स्वतःचेच विधान स्वतःस मान्य आहे का?
रास्वसं हा हिटलरच्या नाझीझम किंवा मुसोलिनीच्या फॅसीझमने प्रभावित होता/आहे असे केवळ असंतुलीत व्यक्तीसच खरे वाटू शकते आणि अशा तथाकथीत बुद्धीवाद्यांना ज्यांना संघटन करणे कधी जमलेच नाही. जमले ते फक्त बोटे मोडणे. असो.
त्यांचा गणवेश, संचलन, मानवंदना, एक राष्ट्र एक धर्म असल्या खुळ्या कल्पना हे सगळे नाझी लोकांशी साधर्म्य दाखवणारे आहे.
गणवेश, संचलन, मानवंदना म्हणजे तुम्हाला खालील छायाचित्रांमधे दिसत आहेत त्यांना म्हणायचे आहे का?
राष्ट्रसेवादलाची मानवंदना स्विकारतानाचे सोनीया गांधींचे छायाचित्र (कॉपिराईट असल्याने नुसता दुवा देत आहे).
आणि राष्ट्र - धर्म या संदर्भात या धाग्यात देखील पहील्यापानावर उत्तरे दिली आहेत. त्यामुळे परत लिहीत बसत नाही...
तोपर्यंत ३०-४० वर्षे (माझ्या अंदाजाने) संघ काहीही भरीव कामगिरी करत नव्हता नुसत्या राष्ट्रप्रेमाच्या गप्फा हाणणे सोडल्यास.
नक्की का? का अभ्यास कमी पडतोय? का वाचन कमी पडतयं?
अधिक नंतर...
काय कमाल करता बुवा तुम्ही. सिरियसली? तुम्ही दिलेल्या फोटोंमधले गांधी टोपी आणि खादी सदरे घातलेले लोक तुम्हाला नाझींची किंवा मुसोलिनिच्या रेड आर्मीची आठवण करतात?
हा फोटो बघा..
दुसरे म्हणजे मी गणवेष, संचलन, विचारसरणी हे एकत्रितरीत्या नाझी किंवा रेड आर्मीचे भारतीय रुप वाटते असे लिहिले होते.
नक्की का? का अभ्यास कमी पडतोय? का वाचन कमी पडतयं?
माझा असेल बॉ कमी पडत पण सावरकरांचा ह्या विषयतील अभ्यास तरी नक्कीच कमी पडत नसणार.
नाझी विचारसरणीत वंशवाद होता... तसा येथे कोठे दिसतो ते सांगू शकाल का? आणि हो आधी गणवेश, मानवंदना म्हणाला होता... आता राहूलबाबांची (आणि इतर काँग्रेसींची) मानवंदना दाखवल्यावर जरा वाक्य बदलणे आले... तुम्ही दाखवलेला गणवेष तर सरकारमान्य शाळेतली मुले पण घालतात (आम्ही पण घातले होते. मग काय ती मुले, शाळा पण नाझी असे म्हणायचे आहे का? आणि दंडच म्हणत असाल तर नाझी अथवा रेड आर्मी काय दंड घेऊन संचलन करत होती/(रेड आर्मी अजूनही) करत असते असे म्हणायचे आहे का? तरी देखील तुम्ही साधर्म्य दिसते म्हणतच आहात म्हणून खालील छायाचित्रे पहा आणि नक्की काय साधर्म्य आहे ते सांगा...
गणवेषधारी नाझी आर्मी
गणवेषधारी रेड आर्मी
काहीही आपलं उगाचच. लहानमुलांना नसलेल्या बागूलबुवाची भिती दाखवण्यातला प्रकार. कोणी तरी तथाकथीत विचारवंत दाखवतात आणि झापडे लावलेले त्यावर विश्वास ठेवतात, झालं! तरी बरं गेल्या ८८ वर्षात कुठे असा वंशवाद केलेला दिसला नाही. जेंव्हा केंव्हा संघावर आरोप केले गेले, बंदी घातली गेली तेंव्हा देखील काहीच सिद्ध न करता आल्याने ती उठवावी लागली. तरी बोटे मोडणे चालूच आहे... म्हणूनच आधी देखील म्हणल्याप्रमाणे, कुणाला संघ आवडतो का नाही ह्या बाबतचा मुद्दा नाही. पण मुद्दा हा खोटे आरोप करण्याबाबतचा आहे.
माझा असेल बॉ कमी पडत पण सावरकरांचा ह्या विषयतील अभ्यास तरी नक्कीच कमी पडत नसणार.
अहो असेल नाही, अभ्यास नक्कीच कमी पडतोय. अजून नक्की का म्हणून विचारतो. आणि हो सावरकरांच्या इतर मतांशी देखील आपण ते बरोबर असल्याने सहमत असालच असे (आत्ता पर्यंत नाही न म्हणल्याने) समजतो.
तरी देखील तुम्ही सावरकरांच्या १९३८च्या एका वाक्याला चिकटूनच बसत असाल तर बसा... पण तरी देखील थोडक्यात : सावरकर असे म्हणाले त्या आधी हेगडेवारांना कोणीतरी (अशा अर्थाचे) विचारले होते की एकदा संघटन झाले की काय करणार? त्यांनी उपरोधीकपणे सांगितले की सगळ्यांना झोपायला सांगणार! त्यावर सावरकरांची तुम्ही सांगितलेली प्रतिक्रीया होती. त्याआधी ब्रिटीश गृहखात्याने संघास हिंदूमहासभेचाच भाग असल्याचे मानलेले होते... तर स्वयंसेवकांनी १९३७ साली सावरकरांची पूर्णमुक्तता झाल्यानिमित्त मानवंदना दिली होती. अर्थात १९३८ सालानंतर १९४० साली डॉ. हेडगेवारांच्या निधनानंतर हिंदूमहासभेतर्फे शोक पाळला गेला होता... १९४३ साली गुरूजी, डॉ. मुंजे आणि भावाबरोबर संघ शिक्षा वर्गासमोर बोलताना, त्यांनी संघ देशभरात वाढतो आहे याबद्दल समाधान आणि अभिमान व्यक्त केले होते.
विकास,
उत्तम प्रतिसाद! पण आधी लिहिल्याप्रमाणे हा प्रतिसाद देखील "पालथ्या घड्यावरच्या" पाण्याप्रमाणे वाहून जाणार. कितीही दाखले दिले तरी मनात अत्यंत पूर्वग्रह ठेऊन लिहिणार्यांच्या मतात बदल होणार नाही.
>>> तुम्ही दिलेल्या फोटोंमधले गांधी टोपी आणि खादी सदरे घातलेले लोक तुम्हाला नाझींची किंवा मुसोलिनिच्या रेड आर्मीची आठवण करतात?
मग काय वरील फोटोतील हातात लाठी घेतलेले स्वयंसेवक नाझी किंवा रेड आर्मीचे वाटतात?
>>> दुसरे म्हणजे मी गणवेष, संचलन, विचारसरणी हे एकत्रितरीत्या नाझी किंवा रेड आर्मीचे भारतीय रुप वाटते असे लिहिले होते.
काहीतरीच काय. नाझींची विचारसरणी वांशिक श्रेष्ठत्वाची व हिंसाचाराची होती. संघाची अशी विचारसरणी कधीही नव्हती. गणवेष, संचलन इ. अनेक जण करतात. म्हणून ते लगेच नाझी/फॅसिस्ट होतात का? याउलट गणवेष, संचलन इ. न करता सुद्धा गुंडगिरी करणारे व इतर जातींना कनिष्ठ मानणारे ब्रिगेडी हे नाझीझम/फॅसिझमच्या जास्त जवळ आहेत.
प्रतिक्रिया
मी लिहिले त्यात नक्की कोणते
अझम्पशन
>>> कारण संघ व भाजपा हे
धन्यवाद
.
>>> साठ खासदार एकत्र केले
चर्च्या आता कुठे रन्गात येवु लागलि आहे.
हा धागा राष्ट्रीय स्वयंसेवक
देवी आणि त्यांच्या गोंधळींसाठी
केलं की सल्लापालन
उसने अवसान
.
प्रपोजलबद्दल काय मत आहे?
पाणी आलं ...
.
>>> कुणीतरी स्थानिक पातळीवर
श्रीगुरुजी
>>> तुमच्यासाठी या सगळ्या
.
रास्वस हा कायमच स्फोटक विषय
आरोप पटले नाहित
False progaganda at its best!
खोटारडेपणा
खिक्क!
संघाची शाखा कधी बघितलीत का हो
तुम्ही कधी गेला आहात शाखेवर?
तिथे बायकाना प्रवेश नाही. >
+१००००
कधीचे पडलेले प्रश्न
.
जमेल तेवढा प्रयत्न करते.
http://rashtrasevika.org/
धन्यवाद
वरच्या प्रतिसादात सोहेल
हे थोडे अवांतर वाटू लागले आहे
त्यांच्याशी प्रथमच बोलत आहात
संघ परीवाराला आपल्या निष्ठा
कारण
+१
खोटारडेपणा आहे कारण कुठलाही
तेच ते आणि तेच ते...
विकास,
संदर्भ मागणे ह्यात चुकिचे
संदर्भ मागण्यात चुकीचे नसते
माझा आक्षेप हा संदर्भ मागण्या
.
काय कमाल करता बुवा तुम्ही.
विचारसरणी
विकास,
>>> तुम्ही दिलेल्या फोटोंमधले