तू
ओठांवर चिकटलेल्या मधाच्या
थेंबासारखी तू
.
पापण्यांच्या काठावर तरळणार्या
पाण्यासारखी तू
.
पहाटेच्या वेळी झाडावरुन घरंगळलेल्या
प्राजक्तासारखी तू
.
कमळाच्या पानावरुन नुकतेच गळालेल्या
दवथेंबासारखी तू
.
हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली
थरथरणार्या मांजराच्या पिलासारखी तू
.
टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून
वाहणार्या थंड वार्याच्या झुळकीसारखी तू
.
सूर्यास्ताच्या वेळी सागराच्या त्या दुसर्या टोकावर
दिसणार्या परिघरेघेसारखी तू
.
मनातल्या शेवटच्या कप्प्यातल्या लपवलेल्या
सोनगुपितासारखी तू
....
तू, तू आणि तू
...
सांग गं सखे, हो तूच
तू कुठे नाहीस?
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२८/०४/२०१३)
क्या बात!
मस्त
:)
घाइघाईत
जर्राशी
अलबत
(No subject)
ओके!!
खूप आवडली.
आवडली आहेच्च!
>>सूर्यास्ताच्या वेळी
मस्त !!!!
पहिल्यांदाच अनुभवलेल्या
आवडली...!!!!!