Skip to main content

♥ क्षण...! ♥ विस रुपये...!♥

लेखक Piyush mrudung यांनी शुक्रवार, 26/04/2013 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण ♥ ♥ क्षण...! ♥ विस रुपये...! आज सहजच बाजारात जाण्याचा योग आला, रविवार म्हणून मटणाचा बेत सो थोडी कोथिंबीर, आले आणि उद्या बाबांच्या डब्यासाठी पावभर वांगे घेण्यानिमित्त गाडीचे वळण बाजारा कडे झाले, नेहमीचीच थोडी घासाघीस करून वजनात थोडं जास्तच घेतलं. सगळ लवकर आटोपून एखादी सिगरेट प्यायला सवड मिळावी म्हणून आधी सांगितलेली कामे हाता वेगळी केली, सगळे गाडीच्या हॅंडलला आरामात झुलत ठेऊन जवळच्याच टपरीवाल्या कडून माझ्या ब्रॅंडची एक सिगरेट घेतली तिचेपण पैसे लगेच देऊन टाकले उगा मधेच फोन वाजला तर लगेच निसटायला बरं... झुरक्यांचे आस्वाद घेत, गडद धुराचे वलय सोडत टपरीच्याच बाजूला सावलीत मस्त रमत गमत आजूबाजूला बघत उभा राहिलो, काही क्षणांनंतर एक मध्यम वयस्क स्त्री थोडे जीर्ण झालेले लुगडे, एका हातात खेडूत साधारण परवडेल अशी नायलॉनची विजीर्ण झालेली पिशवी, हातात एक छोटी जर्मनची प्लेट.... हळद अन् कुंकू मुळे प्लेट नेमकी कशाची आहे ते कळले नाही पण जाडी वरून अन् कडेला असलेल्या अर्ध गोल रिंग वरून बहुदा जर्मनचेच असावे त्यात बहुतेक पितळ्याची लक्ष्मीची मूर्ती ती पण नक्की पितळ्याची का तिला पण बरेच दिवस हळदीच्या सहवास झाल्याने तिने घेतलेला तो पिवळा रंग माहित नाही, ती बाई माझ्या जवळ आली आणि दक्षिणा / दान मागू लागली, माझी निरीक्षणाची नजर त्या बाईला कळली असावी पेहराव्या वरून शेतात मोल-मजुरी करणारी वाटली अन् दान मागायची कला नुकतीच आत्मसात केली असावी अस बोलण्यात अवघडलेल्या शब्दांमुळे वाटले मी आपला सहज सुटे आहेत का म्हणून खिसे चाळू लागलो, खिसे चाळता चाळता सहज विचरले माऊशी दुष्काळा मुळे का दान मागता, जणू तिच्या दुखर्‍या जखमेवर नकळतच मी बोट ठेवलं, तिच्या डोळ्यात राग दिसला थोडी संतापाने कापुही लागली मी तसच बाजूला झालो माझी सिगरेट फेकली आणि पाण्याच पाऊच घेऊन आलो अन् तिला दिले, तिने ते निमूट घेतले आणि उभ्या असलेल्या जागेवरच बैठक मारून पाणी पिऊ लागली, जरा तरतरी आली वाटत तिला की बंर वाटल माहित नाही एव्हढंच बोलली स्वताची शेती आहे भाऊ पण कर्ज आहे सरकारने माफ केलंय पण कलेक्टर हापिसात कोणी दाद देत नाही गरीब म्हणून लाथाडले जातो, उपोषणावर बसलोही त्याच झाल काय आमची सोडून इतरांची रक्कम परत केली आमची ठेवली तशीच अजून अडकवून आम्ही पण किती निर्लज्ज म्हणून जायचं आम्हाला नाही का लाज? शेवटी दिले पत्रक देयची तेव्हा द्या आमची रक्कम, सरकार दरबारी पण तक्रार अर्ज केला पण दाद काय लगेच मिळते होय शेतकर्‍याला? सतत आमचाच हक्क वारंवार मागायची आता लाज वाटते, लोकांकडे घर कामाला जायचे म्हंटले तर या घरकामवाल्या बायकांची युनियन त्यात त्यांची ठरलेली घरे ठरलेली कामे आम्हीपण करू म्हंटले तर नका आमच्या पोटावर लात मारू म्हणतात त्यांचही बरोबर मग उरल काय(?) भिक मागायची तर हल्ली कोणी देत नाही ही देवाची मूर्ती पाहून दिवस दोन दिवसाचा गुजरा होईल इतक मिळते, दोन दिवसांनी फिरते काय करू हेच एक साधन आहे मी फ़क्त सुन्न देवाच्या ताटाकडे पाहिले पाकीट काढून तिला विसची नोट देयला काढली तर तिने ताट पुढे केलं, मी हटकले! मी देवाला तस मानत नाही माणूस म्हणून देतोय हातात घ्या ताटात मी टाकणार नाही तिचा प्रश्नार्थक चेहरा अजूनही डोळ्यापुढून हलत नाही तिने मुकाट्याने हातात घेतले पैसे अन् गेली मी होतो तिथेच क्षणभर थबकलो कुणाची पिळवणूक देवही किती करतो...अन् स्वतःच्याच दगडी रूपाने पोट भरून श्रेयही घेतो वाह रे तुझी लीला... बरंय माझं तुला अन् तुला पुजणार्‍यांना दुरूनच नमस्कार...! . © मृदुंग
लेखनविषय:

वाचने 4128
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

तुम्ही देवाला न देता त्यांना पैसे दिले ते आवडले. जरा जायच ना त्यांच्या बरोबर. बघायच नक्की काय आहे. जमवायची चार माणस. कुणीतरी लक्ष द्यायला हवे म्हणता म्हणता आता आपणच लक्ष द्यायला हवे पियुष! लेखनाचा शेवट आवडला.

एकदा माझ्याकडे जोगवा मागायला एक धष्ट्पुष्ट बाई आली होती. तिला म्हटले, 'अंगण झाडून दे, तुला वीस रुपये देते. देवाचं नाव काढशील तर काही नाही.' तर शिव्याशाप देत गेली. परत काही आली नाही जोगवा मागायला.

नाही म्हणता पिच्छाही पुर्वावासा वाटला पण नाही जमले त्यात चार दहा लोकांची वयक्तिक "विनाकारणे" आडवी आली, आपलं आपण बघाव असा फुकटचा सल्ला न मागता मिळाला. "नुसत्या भानगडीत आपल्यासोबत इतरांचा वेळ वाया घालऊ नये अशी प्रांजळ विनंती केली गेली" त्यात प्रोत्साहन देणारे कोणी नव्हते आणि पुढे जाऊ देणारेही, मला लिहायला आयता विषय मिळाला माझं मला खात राहणार मन या मी रुपात व्यक्त करून घेतलं आणि या विषयापासून वेगळा झालो... स्तब्ध-हतबद्ध-चौकटीत बंधिस्त पुढे या विषयाच काय झालं म्हणून त्या "स्त्री" ला भेटून चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण अजून तरी त्यांचा काही पत्ता लागला नाही, आजूबाजूला विचारले असता कुणाला काही कल्पना नाही. ३१.०३.२०१३ रोजीची ही घटना आज तारीख २६.०४.२०१३ जेव्हढी मला तोंडी या बाबत माहिती होती तिच्या आधारावर मागोवा घेण्याचा प्रयत्न केला पण कलेक्टर कार्यालयातून विशेष दाद आणि माहिती अशी मिळालीच नाही शेवटी राहतात काही गोष्टी अधुर्‍याच म्हणून आता सोडून दिले तरी शोध चालू आहे बघूया.... काही समजले तर... अन्यथा इतकेच ...! . आभारी आहे...! © मृदुंग

In reply to by अग्निकोल्हा

शेवटी राहतात काही गोष्टी अधुर्‍याच म्हणून आता सोडून दिले तरी शोध चालू आहे बघूया.... काही समजले तर... अन्यथा इतकेच ...
खरयं. इथे कोणी महाराज क्लॅरिटी आणायचा प्रयत्न करतय, तर कोणी स्त्रियांची खिल्ली उडवतय. कुठे स्त्रियांकडून अपमान होतोय तर कुठे सम वर नाराजी व्यक्त होतीय. एकुणकाय प्रतिसादांचा खच असा तसा सगळिकडे दिसतोय... पण या खेळात आतुनच हिम्मत मात्र होत नाही तो धागा उघडायची जो मुटे साहेंबांनी लिहला असेल तर, मग त्यावर प्रतिसाद लिहणे तर दुरच, उगाचच स्वतःची/आगतिकतेची लाज वाटत राहते. अपराधि वाटतं... सगळा गोंधळ... कोणाला कशाच तर कुणाला कशाचं... :(

असाही..

प्रसंग चटका लावणारच आहे !!! पण जेव्हा आपण म्हणतो >>" कुणाची पिळवणूक देवही किती करतो...अन् स्वतःच्याच दगडी रूपाने पोट भरून श्रेयही घेतो वाह रे तुझी लीला... बरंय माझं तुला अन् तुला पुजणार्‍यांना दुरूनच नमस्कार...!" जर लीलेबद्दलच म्हणत असाल तर कदाचित हे सर्व भोगणारा पण देवच आहे!!! (अगदी अल्प अश्या माहितीवर आधारित माझा विचार आहे. )

तुम्ही लिहिलात तो प्रसंग वारंवार दिसतो. अगदी तशाच हळदीकुंकवाने माखलेल्या मूर्तीसह. :( स्नेहातैने सांगितलेले वास्तव परफेक्ट. पण ती शीर्षक लिहिलेली नोट अशी स्कॅन करुन वापरु नका हो. आणि त्या इमेजवर सुध्दा काही लिहू नका.

In reply to by अभ्या..

ती शीर्षक लिहिलेली नोट अशी स्कॅन करुन वापरु नका हो. आणि त्या इमेजवर सुध्दा काही लिहू नका. => ओक्के

... !!!

सिगरेट ओढणे शरिरास अपायकारक आहे. बाकि लेख आवडला>>>