काही दिवसांपूर्वी ‘We are not here to make friends ..’ या नावाचा श्री छोटा डॉन यांचा धागा वाचनात आला. ऑफिसच्या ठिकाणी जमलेल्या गाढ मैत्रीचा, मित्र दुरावल्याचा सल सांगणारा. ऑफिसात मित्र असू नयेत या निष्कर्षावर उतरलेला....
...खरं सांगायचं तर पटलं नाही !
मुळात माणूस (त्यातून मराठी माणूस) हा ‘माणूसवेडा’ माणूस . जिथं जाईल तिथं स्वाभाविकपणाने आपुलकीचे बंध निर्माण करणारा. काही वेळा बोलण्याबोलण्यातून दुरावाही निर्माण करणारा.
सुमारे दहा तास जेव्हा आपण जेव्हा घराबाहेर राहतो, तेव्हा साहजिकच एक ‘घराबाहेरचं घर’ नकळत तयार करतो. दीर्घ सहवासातून इतर बाह्यविश्वापेक्षा ऑफिसच्या विश्वाशी भावनिक जवळीक साधली जाते. अनुभव, माहिती शेअर केली जाते. छोटी मोठी सेलिब्रेशन्स एकत्रच होतात. सुखदु:खाच्या गोष्टी होतात. जिव्हाळा आपोआप निर्माण होतो. हेवेदावेही होतात. असे संबध ही एक नैसर्गिक भूक आहे. ऑफिसमध्ये अतिशय फॉर्मल वागण्याने ताणतणाव वाढण्याचीच शक्यता जास्त. उलट वातावरण अनौपचारिक असेल तर मनेही स्थिर राहतात, कामाचा उत्साह वाढतो. ऑफिसातही वावरताना अवघडलेपणा न राहता एक प्रकारचा मोकळेपणा येतो.
माझा स्वत:चा अनुभव असा की ऑफिसमधल्या मैत्रीतून जोडलेले लोक्स अडचणीच्या वेळी सख्ख्या नातेवाईकांपेक्षा जास्त मदत करतात. स्त्रिया अन पुरुषही. असेच एक दोन किस्से.
नोकरीला नवीनच लागले तेव्हा खूप बिचकल्यासारखं व्हायचं. फॉर्मल वातावरणाची सवय नसल्याने अवघडायला व्हायचं. हाताखाली नाईक नावाचे एक मध्यमवयीन क्लार्क होते. काम नेमस्त अन स्वभाव बोलका. बॉससमोर मोजकंच बोलणार पण नंतर तब्येतीत निवांत गप्पा मारणार . त्यांनी सगळ्या office procedures शिकवल्या. Material Requisition पासून ते WCR (Work Completion Report) पर्यंत.
एकदा म्हणाले , ‘बाई तुम्हाला आज मासा कसा करायचा ते शिकवतो.’
मी ‘आ’ वासला . ‘अहो नाईक, इथं ऑफिसात मासा करायचा ?’
तसे ते खो खो हसले, ‘अहो, मासा म्हणजे Material At Site Account.’
त्यानंतर त्यांची अन माझी इतकी दोस्ती झाली की वीस वर्षांनी परवा रिटायर होताना आवर्जून येऊन बसून बोलून जेवणाचं आमंत्रण देऊन गेले.
तसेच पुण्याच्या ऑफिसात नवीन नवीन join झाले तेव्हा वेल्हाळ म्हणून सहकारी शेजारी बसायचे. रिटायरमेंट एक वर्षावर आलेली त्यांची. उंच धिप्पाड अन साधारण हबशासारखी चेहेरेपट्टी. आठेक दिवस ते अगदी जुजबी बोलत. कामापुरते. मात्र माझ्या हालचालींवर बारीक लक्ष. मला ते जाणवे. आधी मला थोडीशी भीती वाटली. नंतर मात्र राग येऊ लागला.
दुपारच्या सुट्टीत डबा झाल्यावर मी पर्समधून पुस्तके काढून वाचत बसे. तेही त्यांच्या नजरेतून सुटले नाही. आठव्या दिवशी डबा झाल्यावर मला म्हणाले, ‘बाई, वाचनाची आवड दिसते तुम्हाला.’
‘हो. का ?’ मी जरा उर्मटपणेच उत्तरले.
‘समोरचे कपाट उघडा.’
मी उठून कपाट उघडले. त्यात खालच्या दोन कप्प्यातून हारीने नामवंत साहित्यिकांची पुस्तके लावलेली !
‘तुम्हाला हवे ते घ्या वाचायला.’ वेल्हाळ म्हणाले. ‘माझीच आहेत.’
मला खजिना सापडावा तसे झाले. अगदी चोखंदळपणे मी त्यातले जयवंत दळवींचे एक पुस्तक निवडले.
वेल्हाळानी उत्सुकतेने ते पाहिले. अन जे खूष झाले !
‘बाई, तुमची नि आमची आवड निवड जमतेय बरं का ! हे दळवींचं पुस्तक मी अन दळवींनी बसून एडीट केलंय बरं ! मासे फार आवडतात दळवींना..तुम्हाला येत असले करायला तर ओळख करून देतो...!’
अन खुदुखुदु हसू लागले.
नंतर मला समजले, एडिटिंग हा त्यांचा छंद कम साईड बिझनेस होता अन पुण्यातले नामवंत साहित्यिक त्यांच्या रोजच्या बैठकीत असत... !
अन त्यानंतर पुण्यातली दोन वर्षे ते माझे मार्गदर्शक कम साहित्यिक मित्र कम वडील होऊन राहिले !
परवाच समजले ते वारले म्हणून. डोळ्यात आपोआप भरलेल पाणी, सख्खे काका वारले तेव्हासुद्धा नव्हतं भरलं...!
जुदा तो होनेवाले है कभी, लेकीन क्या वजह मिलनकी हसरतही छोड दे.. ?
..तुमचं काय मत, ...make friends here or not ?
वाचने
5879
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त लिहिलं आहेस! दोन्ही
छान लिहीलय
मुक्तक आवडलं
लेख आवडला.
अगदी खरे आहे... माझे पण असे
छान लिखाण. तुमच्या आयडीतच
लिखाण आवडले.
कळाले नाही..
दुर्दैव
In reply to कळाले नाही.. by परिकथेतील राजकुमार
एक विचार
In reply to कळाले नाही.. by परिकथेतील राजकुमार
गल्लत होते आहे बहुतेक...
+१
In reply to गल्लत होते आहे बहुतेक... by छोटा डॉन
शुचितै
In reply to +१ by शुचि
मला पण समजल्यासारखा वाटला लेख
In reply to गल्लत होते आहे बहुतेक... by छोटा डॉन
ओहो, म्हणजे तो धागा
In reply to गल्लत होते आहे बहुतेक... by छोटा डॉन
मला दोन्ही लेख आवडले
In reply to गल्लत होते आहे बहुतेक... by छोटा डॉन
छान लिहिलय.
अतिशय हृदयस्पर्शी दोन्ही
छान लिहिलंय
लेखन आवडले. आणि डॉनला श्री
सहमत आहे ...
In reply to लेखन आवडले. आणि डॉनला श्री by रेवती
व्वा व्वा
In reply to सहमत आहे ... by छोटा डॉन
वाचुन असं आणि असं ... असं
स्नेहा नेम जरी चुकीचा लावला
भावले
लेखन आवडलं...
आवडले लेखन.. किस्से.. विचार..
आपले अनुभव सविस्तर विषद (हा
In reply to आवडले लेखन.. किस्से.. विचार.. by तुमचा अभिषेक
सविस्तर म्हणाल तर कधीतरी
In reply to आपले अनुभव सविस्तर विषद (हा by प्यारे१
एम बी ए
In reply to सविस्तर म्हणाल तर कधीतरी by तुमचा अभिषेक
हा हा... छान फुलफॉर्म... पण
In reply to एम बी ए by सुबोध खरे
"प्यार पर बस तो नही लेकीन फिर
In reply to आवडले लेखन.. किस्से.. विचार.. by तुमचा अभिषेक
नाही हो.. तुम्ही म्हणता ते
In reply to "प्यार पर बस तो नही लेकीन फिर by शुचि
असू शकते बुवा.
In reply to नाही हो.. तुम्ही म्हणता ते by तुमचा अभिषेक
आपला अनुभव ...
अतिशय समर्पक प्रतिसाद.
In reply to आपला अनुभव ... by चौकटराजा
मैत्री ही प्रीतीप्रमाणेच
In reply to आपला अनुभव ... by चौकटराजा
मस्तच..
In reply to आपला अनुभव ... by चौकटराजा
दोन्ही
हृद्य आठवणी!