Skip to main content

शोध

लेखक यशोधरा यांनी बुधवार, 24/04/2013 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
इतकं कशाला झाकोळायला हवं माझ्या नसण्याने? मला शोध ना.. इथं, तिथं, फुललेल्या रानफुलात, कोमेजल्या निर्माल्यात. दवानं भिजलेल्या रानात, अंगार ओकणार्‍या वाळवंटात. पक्ष्यांच्या स्वैर गाण्यात, कुठल्याश्या चिरंतन वेदनेतही. निळ्या मुक्त आकाशात, अन् करड्या फांदीवरल्या हळूच डोकावणार्‍या, बंदिस्त चार काड्यांच्या घरट्यातही. जन्म मृत्यूच्या उत्सवात, आणि निराकार निर्गुणात. वार्‍याच्या सळसळीत, हवेच्या झुळुकीत, जीवघेण्या वादळात, नि:शब्द, नीरव शांततेत, न सरत्या कोलाहलात. हास्याच्या लकेरीत, पापणीआडच्या पाण्यात. पहा नीट एकदा, कदाचित सापडेनही तुझ्या मनाच्या एखाद्या, खोलश्या कप्प्यात.
लेखनविषय:

वाचने 11279
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

ओघवत्या तरल भावना.. आवडलीच कविता! हं पण, नसण्याचा नुसत्या भासानेही झाकोळायला होवू शकतं.. संदीप म्हणतो तसं.. 'नसतेस घरी तू जेव्हा.. जीव तुटका तुटका होतो...' :)

वाचक, प्रतिसादकांचे मनापासून आभार. @आतिवास, तुम्ही सुचवल्याप्रमाणे बदल केला आहे, थ्यांक्यू.

कविता समजली तरी समजलीच नाही, बघु पुर्णपणे केव्हा समजते ती. केव्हातरी समजेलच, इथे घाई कुणाला आहे.

आज यशोतैची खूप आठवण आली. जरा तिचं जेवढं मिळालं तेवढं वाचत बसलो होतो. ही रचना वाचून एकदम समाधान वाटलं. खूप खूप सुंदर रचना. स्पर्शणारी. :-)