मी नक्कीच येइन.
कट्टा माझ्या घरी केल्यास चालू शकेल. मी फ्रिमाँट येथे रहातो. त्यामुळे ईस्ट बे मधील मंडळींना देखील सोयीचे होईल..
साधारणतः किती लोकं येणार हे जर कळले तर 'ईतर' व्यवस्था करणे सोपे पण होईल..
- नाटक्या
मस्त! भरपूर मिपाकर सहकुटुंब, सहमित्र जमूदेत! मजा करा. आमच्या शुभेच्छा.
(खुदके साथ बातां : रंग्या, एखादी कॉन्फरन्स नाही का रे त्या सुमारास बे-एरियात? ;) )
चतुरंग
याहू वर कॉन्फरन्स् करता येईल. रंगाशेठलाही तिकिट एक्स्पेन्स् क्लेम् करायची भानगड नको ;)
तूर्तास शनिवार २७ सप्टेंबर २००८ रोजी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ ते ७ हीच निश्चित वेळ. एखाद दिवस थांबून मग शिक्कामोर्तब करून टाकायचा विचार आहे.
(आमंत्रक)बेसनलाडू
२० ला मला नाही रे जमणार!
१५ ते १९ मी सॅन डियागोमध्ये आहे (विसरलास?:))
लगेच २० ला विरुद्ध दिशेला इतक्या लांब यायला नाही जमणार...
(घरची लाकडं फोडायची असतात!!!!:))
२७ असेल तर काही विचार करता येईल...
त्यानंतरच्या तारखांनाही विचार करता येईल....
करा मज्जा :)
सही रे बेसनलाडु!
एकदम मिटींगीचा अजेंडाच लिहिला हैस की रं :)
करा करा, च्यायला, केव्हाचं घोळतंय तिकडं कट्टा करायचा, आमच्या डांबिसकाकांना आता किती बरं आणंद झाला असेल :)
मस्त मजा करा, आणि हो, फोटो बिटो द्या इथं चढवून.
कट्ट्याला शुभेच्छा!
(जमल्यास त्या नंदनला काँप्युटर्सपलिकडे लिवंत माणसंही असतात ह्याची आठवण करुन द्या.)
जर सगळ्यांना शक्य असेल आणि मंजुर असेल तर आपण संध्याकाळी ६:३० वा. जमूया. शनिवार असल्यामुळे दुसर्या दिवशी उठण्याची पण घाई नसेल तेव्हा रात्री उशीरापर्यंत कट्ट्यावर निवांत गप्पा हाणता येतील. खाणे-पिणे पण चापून करता येईल. मिसळ-पाव, पुलाव, मसाला-पापड, सॅलड वगैरे वगैरे असा भक्कम बेत करावा म्हणतो.. मिसळ-पाव ची जवाबदरी माझी. बाकी सगळ्या गोष्टी सारख्या वाटून घेवू. काय पटते का?
- नाटक्या...
जर सगळ्यांना शक्य असेल आणि मंजुर असेल तर आपण संध्याकाळी ६:३० वा. जमूया. शनिवार असल्यामुळे दुसर्या दिवशी उठण्याची पण घाई नसेल तेव्हा रात्री उशीरापर्यंत कट्ट्यावर निवांत गप्पा हाणता येतील. खाणे-पिणे पण चापून करता येईल. मिसळ-पाव, पुलाव, मसाला-पापड, सॅलड वगैरे वगैरे असा भक्कम बेत करावा म्हणतो.. मिसळ-पाव ची जवाबदरी माझी. बाकी सगळ्या गोष्टी सारख्या वाटून घेवू. काय पटते का?
- नाटक्या...
कट्ट्यासंबंधी सर्वांच्या सोईचा एकत्रित विचार करता पुढील वेळ आणि स्थळ निश्चित झाले आहे.
स्थळ - नाटक्याचे घर, फ्रीमॉन्ट - विस्तृत पत्ता लवकरच देण्यात येईल.
वेळ - शनिवार दि. २७ सप्टेंबर २००८, स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ ते ७ (किंवा ५ ते ८?); गरज पडल्यास सर्वांची सोय पाहून घड्याळी वेळ पुढे-मागे करता येईल, पण तारीख हीच सोईची आहे, असे दिसते.
निश्चित सहभाग -
१. नाटक्या २. सर्किट ३. बेसनलाडू ४. एक ५. बबलु-अमेरिकन हे मिपाकर आणि काही मित्रमंडळी आणि/किंवा कुटुंबिय
सहभागाच्या प्रतीक्षेत (?) - १. फटु २. श्रीकृष्ण सामंत ३. पिवळा डांबिस ४. भाग्यश्री
यापुढील चर्चा - कट्ट्यासाठीचा मेनू (मिसळपावसोबत आणखी काय? :) ) आणि (असल्यास) प्रस्तावित कार्यक्रम.
कट्ट्याला येण्यासाठी सॅन होजे, मिल्पिटास,सनीवेल,सॅन्ता क्लॅरा भागातून कोणाला राइड हवी असल्यास माझ्या गाडीत २ ते ३ जणांसाठी जागा असेल.
(आमंत्रक)बेसनलाडू
फोटो येतीलच. रेकॉर्डींगही करा. सर्कीटराव हे उत्तम गाणार्यांपैकी आहेत. (ध्वनिमुद्रणाच्या प्रतीक्षेत असणारे एक हौशी गायक. ) त्यांची दादागिरी ( या बाबतीत तरी) सहन करू नका. गायल्याशिवाय थेंबसुद्धा चाखायला मिळयची नाही म्हणावे ;-)
आणि हो , बाकीच्याही गुणी मिसळपावकरांना ऐकायला आवडेल !
४-७ (किंवा ५-८) असण्या पेक्षा ७ ते कितीही करुया का? म्हणजे खादाडी करुन गप्पा टाकायला बसता येईल आणि खाण्यामध्ये गप्पांचा (आणि गप्पांमध्ये खाण्याचा) व्यत्यय येवून रसभंगही होणार नाही.
मेनू (माझ्या मताप्रमाणे):
१. मिसळ-पाव
२. पुलाव (किंवा कुठला तरी भात)
३. भाताबरोबर काहीतरी (कढी/आमटी सारखा एखादा पदार्थ)
४. एखादा गोड पदार्थ
५. जमल्यास एखादे appetizer.
५. शितपेये(म्रुदु किंवा कठीण)/ज्युसेस ;-)
मिसळीची जवाबदारी माझी (जर कोणाची हरकत नसल्यास).
- नाटक्या...
मला नाही जमणार.. २०च्या विकेंडला येणं होतंय माझं.. परत एकदा जमणं अवघड.. :(
तरी, कट्ट्याला शुभेच्छा! वेस्ट कोस्टातला बहुचर्चित पहीला वहीला कट्टा दणक्यात होऊन जाऊदे!
गाणी असतील तर रेकॉर्डींग करा प्लीज..
मला वाटले होते की तुम्ही याल म्हणून. आला असता तर बरे झाले असते. हरकत नाही कधीतरी तुम्ही कट्टा आयोजीत करा. आम्ही नक्की येऊ. तोवर आमच्या फोटो/रेकॉर्डींग वर समाधान माना.. ;-)
- नाटक्या..
ह्ये मस्त झाले...
आम्ही लक्ष ठेवूनआहोतच्...कट्ट्याला शुभेच्छा...
आता अजून एकदा फोटो , रेकॉर्डिंग ची वाट पाहतोय...
___________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
नक्कीच..
अरे वा, बे-कट्टा होणार तर आता!
कट्टा..
कॉन्फरन्स
आमची..
सर्किटराव अनुभवी आहेत आणि मनकवडेही!
अरे वा
बहोत अच्छे !
हो..
सहमत
मी येईन.
आधी/नंतर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
२० ला ये तू
> अनधिकृत
एका पायावर ...
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
२० ला
नाही रे!
करा मज्जा
मला वाटते..
मला वाटते..
मला पण यायची इच्छा आहे पण...
हा हंत!!!
२० ला जमू शकेल बहुतेक..
अंतिम निर्णय
विनंती
वेळ
मला नाही
अरेच्या
क्यालेंडर...
मीपण येणार
उत्तम!
ह्ये मस्त
गोड पदार्थ
उत्तम
बे एरियाच्या
माझ्याही..
पत्ता आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्र.
सरप्राईज
अहो..
काय
गोड पदार्थाची डीश सरप्राईज.