हल्ली मिपावर पारंपारिक रेशिप्या येतायेत. त्यातही कोकणातल्या फणसाच्या रेशिप्या जास्त!! उकडगरे, फणसाचा पुलाव ...म्हटलं आपणही फणसाच्या भाजीची रेशिपी टाकावी (जी अजून मिपावर आलेली नाही असं मला वाटतं). फणसाची भाजी म्हणजे जीव की प्राण. जवळजवळ दोनेक वर्ष ही भाजी केलीच नव्हती. फणस चिरायची उकडायची माहिती होती, पण मसाले? ते नक्की कोणकोणते ते आठवेना. मागे एकदा पिकनिक निघाली तेव्हा वेळासला जाणं झालं होतं. तिथं फणसाची भाजी खाल्ली होती, अतिशय सुंदर चव!! न राहावून भाजी कशी केली ते विचारलं. तर उत्तर मिळालं की, 'काही विशेष नाही जिरं मोहरीच्या फोडणीत उकडलेल्या फणसाचे तुकडे घातले, लाल तिखट घातलं आणि उतरता उतरता एक गुळाचा खडा टाकला'. तर हे येवढेच जिन्नस वापरुन भाजी चविष्ट करण्याइतकी चव काही माझ्या हातात नव्हती. मग फोनाफोनी झाली, दोन तीन ठिकाणी जालावर रेशिपी शोधणं झालं आणि सगळ्याचा सुवर्णमध्य काढून ही रेशिपी केली.
आता साहित्य:
एक कच्चा फणस
अर्धा नारळ
चार सुक्या लाल मिरच्या
एक छोटी कैरी (चिंच सुद्धा चालेल)
दोन छोटे चमचे एव्हरेस्ट किचनकिंग मसाला
हळद
जिरं
मोहरी
हिंग
कडीपत्त्याची सात-आठ पानं
साखर
मीठ
आधी फणस चिरायला घ्यावा. हा चिरताना घ्यायची काळजी म्हणजे दोन तीन मोठी जुनी वर्तमानपत्रं हाताशी घेऊन ठेवा. त्यातलं एक, फणस चिरायला घेतलेल्या विळीखाली अंथरा. म्हणजे फणसाच्या चिकाने फरशीची वाट लागणार नाही. आता विळीवर चिरता येत असेल तर ठीक नाहीतर सरळ विळीच्या पाटावर तो फणस ठेवा आणि सुरीने देठ कापा (त्याआधी सुरीला आणि हाताला तेल लावून घ्यायला विसरु नका). देठ कापल्या कापल्या चिकाचा ओघळ येईल तो हाताशी असलेल्या वर्तमानपत्रांचे तुकडे फाडून पुसून घ्या. बाजूचा काट्यांचा भाग तासून फणसाचे छोटे तुकडे करा. आणि निदान दोन वेळा तरी स्वच्छ धुवून घ्या. ते या फोटोत दाखवल्याप्रमाणे दिसायला हवे.
आता या तुकड्यांमध्ये थोडं मीठ आणि अंदाजे दोनेक वाट्या पाणी घालून ते कुकरला लावून चार शिट्या होऊ द्या. तोवर सुक्या लाल मिरच्या साधारण कुरकुरीत होतील इतपत मध्यम आचेवर परतून घ्या. नारळाचे तुकडे करून तेही वरचेवर परतून घ्या आणि नंतर त्यात थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
फणसाचे तुकडे उकडल्यानंतर असे दिसतील. ते आणखी बारीक चिरुन घ्या.
आता एका कढईत तेल तापत ठेवा. चांगलं तापलं म्हणजे मग त्यात मोहरी घाला. ती तडतडली मग जिरं घाला. मग हिंग आणि कडीपत्त्याची पानं घाला. त्यानंतर मिरची खोबर्याचं वाटण घालून नीट परतून घ्या. हा मसाला रंग बदलू लागला की मग त्यात उकडलेल्या फणसाचे तुकडे घालून नीट परता, थोडं पाणी घाला. फणसाचे तुकडे ज्यात शिजवले त्यात पाणी उरलं असेल तर ते घातलं तरी चालेल. मग झाकण ठेवून एक वाफ निघू द्या.
वाफ निघतेय तोवर कैरी सोलून, किसून घ्या. पाच सहा मिनीटांनी भाजीवरचं झाकण उघडून त्यात किसलेली कैरी, दोन चमचे किचन किंग मसाला, दोन चमचे साखर आणि अंदाजे मीठ घाला. नीट परतून परत झाकण ठेवा. साधारण पाच मिनीटांनी गॅस बंद करा. भाजी तयार !!
तळटीपा:
१) मिरची खोबर्याच्या वाटणासोबत खडा गरम मसाला भाजून वाटतात, पण मी किचनकिंग वर भागवलंय.
२) फणस चिरुन झाल्यानंतर विळीच्या पाटाला आणि सुरीला लागलेला चिक नीट धुवून काढायची मानसिक तयारी ठेवा.
३) उकडल्यानंतर फणस चिरताना त्यातल्या आठळ्यांना सालं धरलीयेत का ते बघा, तसं असेल तर ती सालं काढून टाकावीत. नाहीतर खाताना दाताखाली येतील.
४) अतिमहत्त्वावी गोष्ट; मी अंडं घालत नसल्यामुळे ही भाजी अंडं घालून करता येते की नाही त्याचा अनुभव नाही. ज्यांना अंडी घालून पदार्थ करता येतात त्यांना कृपया असे प्रश्न विचारावे. ;)

वाचने
12278
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
लय भारी!
सुड तू स्वतः फणस कापायच धाडस
फणस कापणे फारसे अवघड नसते,
In reply to सुड तू स्वतः फणस कापायच धाडस by स्पंदना
कच्चा फणस
In reply to फणस कापणे फारसे अवघड नसते, by मोदक
यु टु ब्रुट्स?
गणपा दादा आता पाककृती का
In reply to यु टु ब्रुट्स? by गणपा
सह्हि
ब्येस्ट
वाह !
शेवटचा फोटो गंडल्यामुळे काही
आयला भारीच बे सुडकेश!!!!! मान
खटपटीची भाजी.
आवडती भाजी!
अगदी अगदी
In reply to आवडती भाजी! by यशोधरा
अप्रतीम,प्रथमच पाहतोय ही भाजी
भाजी-केली,,,सूड घेतला...!!!
खी: खी:
In reply to भाजी-केली,,,सूड घेतला...!!! by अत्रुप्त आत्मा
क्या बात है!!
मस्तच लागते.
वाह....
जबरदस्त रे सूड
मस्तच.. खुप आवडीची भाजी..
सर्वांचे आभार!!
फार झकास.
ह्याला आम्ही चारकुटा / चाका
कोकण वारी मधे तर, असे म्हणाला होतात की,
असं मी म्हणालो होतो?
In reply to कोकण वारी मधे तर, असे म्हणाला होतात की, by सामान्य वाचक
नाही हो,
हॅ हॅ.. मला वाटतं खाणार्याला
In reply to नाही हो, by सामान्य वाचक
अगदी सहमत,
भारी रे!!!