Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दासबोध.कॊम on Mon, 04/22/2013 - 16:46
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
-पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांचे व्याख्यानाचा सारांश आज आपला स्वातंत्र्यदिन आहे पण भारतमाता मात्र पूर्ण स्वतंत्र नाही आहे; पण जेवढे स्वतंत्र आहोत त्याचा आनंद आहे पण आपल्या अंतःकरणात दुःख पाहिजे कि सिंधू स्वतंत्र नाहीये, तिबेट आपल्यापासून हरवलेला आहे, नेपाळ, अफगाणिस्तान, ब्रम्हदेश गमावलेला आहे, लंका आपली नाही याबाबत थोडा इतिहास सांगतो तुम्हाला " ज्याला आपण भारत म्हणतो त्या देशाचे नाव 'भारतवर्ष', 'आर्यवर्त' अशी नावे रूढ आहेत" आपली एक फार मोठी चुकीची समजूत आहे कि आपली इतिहासाची पुस्तके म्हणजे काही तरी भाकड साहित्य आहे. आपली १८ पुराणे आहेत हे इतिहासाचेच ग्रंथ आहेत. इंग्रजांच्या पाश्चात्यांच्या नीचपणाने हिंदुंच्या डोक्यात माती कालवण्यासाठी आपल्यात हे त्यानी भिनवलेले आहे कि हे साहित्य टाकावू आहे अरे शस्त्रांनी मारले तर माणसाचे शरीर मरते त्याचे मन मरत नाही ते मन पुनरपी देहाचे वस्त्र पांघरून जन्माला येऊ शकतो. त्या इच्छा, आकांक्षा, भावना, वासना त्या पुनरपी कार्यरत होतात परंतू जर माणसाचे मन मारले तर हत्येचा दोष टळतो आणि तो मन मेलेला हृदय मेलेला जिवंत देहात एक वेगळे जीवन जगायला लागतो, त्याचे वैभव हि नाश करता येते, त्याचे कर्तृत्व संपवता येते, त्याचा जीवन प्रवाह उध्वस्त करता येतो. ज्यांची बुद्धी मारली अशा लोकांचा हा देश आहे आणि मग आपल्याला हिंदुस्थान म्हणायला लाज वाटते मी जे बोलतोय ते अनभ्यासाने बोलत नी कुणाचे खरकटे खाऊन कुणाचे ऐकून बोलत नाही तर देवाने दिलेल्या अति तीव्र प्रज्ञा चक्षुने अभ्यास करून बोलतोय या कातडीच्या डोळ्याने नाही तर अकलेच्या डोळ्यांनी देश भक्ती धर्म भक्ती हा ज्या डोळ्यांचा स्वभाव आहे ज्यात समर्पण आणि मातृभूमीसाठी सर्वस्व गमावून टाकायला तयार असणाय्रा डोळ्यांनी अभ्यास करून मी हे बोलतोय भारत हा शब्दच किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहे "भा" या संस्कृत शब्दाचा अर्थ "तेज" "तेजस्विता" "द्युतीमानता" असा आहे फार सुरेख अर्थ आहे तो जसा भास्कर तो सूर्य "रत" म्हणजे रममाण झालेला म्हणजे त्या तेजास्वीतेत, त्या द्युतीमानतेत रममाण झालेला देश असा जो तो आपला देश भारत आज १५ ऑगस्ट अतिशय आनंदाचा दिवस आहे कसे का असेना पण जे काही मिळाले आहे तुटलेला भंगलेला खंगलेला झडलेला राष्ट्र म्हणून जो काही भाग मिळालेला आहे तो भाग अतिशय पवित्र आहे उदात्त आहे श्रेष्ठ आहे वंद्य आहे पूज्य आहे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण जे यात नाही आहे ते आपण मिळवू शिवाजी महाराज अन संभाजी महाराज चित्तात धरले तर बघताबघता मिळवू एक हिंदुस्थान जर समजून घ्यायचा असेल आपल्या देशाची जर जाणीव व्हायची असेल तर त्यासाठी वाङमय आहे त्यात ४ वेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे, रामायण, महाभारत, भगवतगीता, १०८ उपनिषदे आहेत. हे सगळे आपली धरती आपली माती आपली संस्कृती आपली परंपरा आपला धर्म याची जाणीव करून देणारे हे वाङमय आहे पण या सगळ्या वाङमयाचा आणि आपला काहीही संबंध नाही किंबहुना हे टाकावू. गलिच्छ, बेकार असे आपल्या चित्तात शेकडो वर्षे बिंबवले गेले आहे असो पण हे बदलणार आहोत आपण पुराणे म्हणजे काय आहेत हो! ते हिंदुस्थानच्या इतिहासाचे ग्रंथ आहेत ते काव्यात्मक आहेत रुपकात्मक आहेत पण त्याला कळायला मेंदू बरोबर हृदय असावे लागते देशप्रेम लागते पण हृदय नावाचा जिन्नस आपला झडलेला आहे त्यामुळे काही कळत नाही आपल्याला जी १८ पुराणे आहेत त्यापैकी पहिले पुरण आहे हे 'विष्णूपुरण' आहे यात ज्यांनी लिहिले त्या माणसाचे नाव नाही आहे तर भगवान विष्णू भगवंत त्याला अर्पण केलेले ते पुराण आहे. ज्याने सृष्टी निर्माण केली धरती आपली भारत माता तिचा हा पती आणि त्यांच्या संसारातील लेकरे ते आम्ही हा उदात्त हेतू यात आहे या विष्णू पुराणातला पहिला श्लोक असा उत्तरम्य समुद्रस्य हिमाद्रे शैव लक्षणम वर्षम भारतम नाम भारतीय यत्र संततिः म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत अशी जि भूमी तिचे नाव आहे भारत अन त्या भारतभूमीची संताने ते भारतीय म्हणजे काय आहे हो ? आपले जे सगळे जे पूर्वज आहेत ते कधीही फापट पसारा बोलत नसतं बीजगणितात काही सूत्रे असतात (अ + ब)२ सारखे असे सूत्र थोडे असते त्याचा विस्तार मोठा असतो तसेच हे सूत्र रुपाने मांडलेले आहे || उत्तरम्य समुद्रस्य हिमाद्रे शैव लक्षणम वर्षम भारतम नाम भारतीय यत्र संततिः|| आपल्या इथे महर्षी सातवडेकर नावाचे ऋषी होऊन गेले. ते १०४ वर्षाचे असताना गेले. त्यांनी आयुष्यात फक्त भारतीय साहित्याचा संस्कृतीचा संवर्धन करणारा इतिहास लिहिला आणि प्रचार केला. ते प्रकांड पंडित होते, विद्वान होते, निस्वार्थी होते. कारण साधारण विद्वान माणसे शक्यतो स्वार्थी असतात पण अग्नीला मळ नाही, विटाळ नाही तसा यांच्या बुद्धीला काही स्वार्थाचा विकाराचा स्पर्श होऊ शकला नाही असे ते प्रकांड पंडित होते. चारही वेदांच्यावरती ज्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात टीका लिहिली अशी हि व्यक्ती आहे. पार्डीला गुजरात मध्ये त्यांचा आश्रम आजही आहे त्यांचे वाङमय मी वाचले. त्याच्यात त्यांनी दिलाय या श्लोकाचा अर्थ. कि, तो श्लोक सूत्र रुपाने दिलेला आहे. महर्षी म्हणतात कि, हिमालयाचा मध्य धरून खालती समुद्र पर्यंत त्रिज्या जर घेतली आणि एक आपण वर्तुळ काढले तर त्या वर्तुळात येणारी भूमी त्याचे नाव भारत आहे. याचा अर्थ असा कि ज्याला आपण जपान म्हणतो ना ! त्याचे मुळ नाव आहे 'जयपान' ज्याला आपण तिबेट म्हणतो ना ! त्याचे मूळ संस्कृत नाव आहे 'त्रिबिष्टम' म्हणजे देवांच्या राहण्याचे वस्तीचे ठिकाण. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि शेवटचा संन्यस्ताश्रम म्हणजे शेवटी त्यांनी तिकडे देव लोकाला जायचे, मरणाकडे आपणहून जायचे म्हणजे तिकडे जायचे आणि शरीर विसर्जित करायचे अशी पध्दत होती; आपली त्यांच्याच पुस्तकात मी वाचले आहे. आहे आपल्या देशाचा इतिहास हा किती वर्षांचा आहे हो ! कपाळाला हात लावाल पण ते सत्य आहे त्यांनी लिहिले आहे कि या देशाचे आयुष्य किती तर सर्वात प्राचीन राष्ट्र आपले आहे अमेरिकेचे आयुष्य २०० - २२५ वर्षांचे आहे. इंग्लंड चे असेच एक १३०० वर्षांचे आयुष्य आहे पण आपल्याइतके प्राचीन कोणी नाही तुकाराम महाराज एके ठिकाणी बोलले कि !! जिकडे पाहे तिकडे उभा अवघा गगनाचा गाभा, डोळा बैसले बैसले रूप राहोनी संचले ! ! न व्रजता दाही दिशा जिकडे पाहे तिकडे सरसा, तुकाम्हणे समपदी उभा दिठीचीये आधी !! अरे मी जिकडे पाहीन ना त्या ठिकाणी मला कर कटावरती ठेवून समचरण, नासाग्र दृष्टी भक्तांच्यासाठी अखंड उभा असलेला तो पांडुरंग मला दिसतो आहे हो ! आणि जसा जसा पाहत जातोय तसा तो अधिकाधिक भव्य दिव्य रूप मला दिसतंय आणि त्याला किती वर्ष झाली त्याचा निवडा तुकारामांनी सांगितलाय ||" उभा दिठीचीये आधी "|| म्हणजे दृष्टी नावाचा, डोळे नावाचा पदार्थ अजून जन्माला यायचा होता त्याच्या आधीपासून तो उभा आहे पण हे आपल्याला झेपत नाही याबाबत पंडितजी सतावाडेकर काय सांगत आहेत ते बघा. ते म्हणाले, " नामदेवांनी आरती लिहिली आपण ती म्हणतो कि "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा देगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा". एक युग म्हणजे काय ? आता मी परत अजून जरा आत जातो जगाच्या पाठीवरती आपल्या भारतीय लोकांनी शोधून काढलेल्या कालमापन पद्धती इतकी अचूक पद्धती जगाच्या पाठीवरील कुठल्याही देशात आजतागायत अद्याप अस्थित्वात नाही इतकी अति अति अति श्रेष्ठ ती पद्धती आहे. किती ताकदीची पद्धती आहे ती तुमच्या आमच्या बापजाद्यानी निर्माण केलेली ? समजा आजचा दिनांक किती ? १ मे २०१० . तर १ मे ८०१० ला, १००१० ला, १४०१० ला, म्हणजे १२००० वर्षांनंतर हि एखादे सूर्य ग्रहण असेल तर त्याचा स्पर्श काळ कोणचा?, ते खग्रास कि खंडग्रास? मोक्ष काळ कोणचा? ते आत्ता आपण सांगू शकतो. हे समोर ठेवले तर तुम्हाला हजारो वर्षांच्या तिथ्या, ग्रहणे सगळेसगळे तुम्हाला स्पष्ट कळते . हे किती सुक्ष्म आहे? तर सेकंदाचा हजारावा हिस्सा मोजणारी आपली कालमापन पद्धती आहे तर एक युग म्हणजे ५००० वर्षे २८ युगे म्हणजे १४० हजार वर्षे हा चंद्रभागेच्या काठी उभा आहे म्हणजे भक्तांची परंपरा जर १,४०,००० वर्षांची असेल त्या देवाची आरती करण्याची तर तो देव हा समाज हे राष्ट्र १,४०,००० वर्षाचे आहे असे समजायला हरकत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तू दिठीचीये आधी म्हणजे दृष्टीच्याहि आधी. एवढी १,४०,००० वर्षांची परंपरा असणारा आपला देश आहे त्याच्यात हे संस्कृत वाङमय उत्पन्न झालेले आहे त्याच्यात ते पुराण ग्रंथ आहेत . पुराण म्हणजे काही मागास शब्द नाही आहे भंपक नाहीये भाकड कथा चांदोबा मासिकाचे अंक नाही आहेत ते तर आपण करंटे आहोत !! करंटी येथे जन्मली भुते मातृ संहृते सदविती देहा !! आपण आपल्या आईला न ओळखाणाय्रा अवलादिचे आहोत. म्हणून आपल्याला कळत नाही कि आपली मातृभूमी काय उंचीची आहे ते काय ताकदीची आहे तर या १,४०.००० वर्षांच्या या देशामध्ये काय घडले त्याचे इतिहास लिहून ठेवलेले आहे ते. त्यातील सुरुवातीच्याच श्लोकात काय म्हणले आहे? उत्तरम्य समुद्रस्य हिमाद्रे शैव लक्षणम वर्षम भारतम नाम भारतीय यत्र संततिः = समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत त्रिज्या जर घेतली आणि एक आपण वर्तुळ काढले तर त्या वर्तुळात येणारी भूमी त्याचे नाव भारत आपण खाली जो आहे त्याला हिंदी महासागर म्हणतो. नाही आपण विसरलोत. देशाला विसरलोत आईला विसरलोत तो हिंदी महासागर नाहीये तर तो गंगा महासागर आहे.हिकडचा जो अरबी सागर म्हणून आपण आज ओळखतोय त्याचे मूळचे नाव सिंधू सागर आहे, सिंधू ज्या सागराला मिळते तो सिंधू सागर आहे तो आपण ज्याला मालदीव बेटे म्हणतो ना ती लक्ष्यद्विप बेटेच आहेत ती आपली आहेत ब्रम्हदेश आहे न त्याचे नावच सांगते कि तो आपला आहे श्रीलंका आपला आहे ज्याला आपण अरबस्तान म्हणतो यात 'स' ला 'त' नाही आहे 'थ' आहे ते अरबस्थान. यातील अरब हा संस्कृत शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ अश्व अर्थात घोडा असा आहे उत्तम घोड्यांची पैदास होण्यासाठी लागणारे तापमान वायुमान असणारा देश आहे तो तुर्कस्थान यात आपण 'क' वरती रफार मारतो पण 'तूरग' म्हणजे घोडा तो संस्कृत शब्द आहे त्याचा अपभ्रंश करून आत्ता आपण म्हणतो हे सगळे मूळ देश आपले आहेत आपले भूभाग आहेत इराण हा आपलाच भाग आहे अहो ! खालती ब्राझील आहे ना त्या ब्राझील देशात काय दक्षिण अमेरिकेत काय आजही हिंदू संस्कृतीचे उदंड पुरावे आहेत जाऊन बघा मी वाचले आहे ते बोलतोय हा चीन बघा ! या चीनच्या तिथले सगळे राजे लोक मांडलिक म्हणून धुताराष्ट्राला जेव्हा सप्त सिंधू सप्त गंगांच्या जलाने राज्याभिषेक हस्तिनापूरला केला त्यावेळी मांडलिकत्व मान्य करून आहेर घेऊन आलेले होते त्यासाठी महाभारत वाचा मराठवाडा पब्लिशिंग कंपनीने १० खंड काढले आहेत महाभारताचे त्याच्यात मी बोलतोय ते लिहिलेले आहे असा आपला देश आहे आपण हा आपला देश इतका प्राचीन असून सुद्धा एक गोष्ट अगदी दुर्दैवाची आहे आजची जि स्थिती आहे ती इतकी विलक्षण घाणेरडी आहे कि काहीच आपल्या वाट्याला येणार नाहीये दुःखाशिवाय कशात कमी आहे हो ? मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे " देवाने दिलं अन कर्माने नेलं" आपण म्हणतो एखादयाला कि करंटा आहे तो ! म्हणजे काय सगळे काही चांगले आहे पण कर्तृत्व नाहीये, दृष्टी नाहीये, अक्कल नाहीये. कसं बोलावे? कसं वागावे? कसं जगावे? कसं राहावे हे कळत नाही तो करंटा आहे तसे आपण करंटे आहोत कसे? तुम्हाला ठावूक नसेल तर सांगतो कि, जगाच्या पाठीवरती ज्याची furtility factror म्हणजे उद्बीजक क्षमता असामान्य असलेला एकमेव देश आहे हा. सलग अशी शेकडो हजारो मैल भूमी जिची उत्कृष्ट अशी उद्बिजक क्षमता जगाच्या पाठीवरील अन्य कुठल्याही देशात नाही. मी येथे हिंदुस्थान चा भाडोत्री स्तुतिपाठक म्हणून आलेलो नाहीये. मी सत्य बोलतोय तुमच्या आयुष्यात हे तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल आपल्या सारखी जलसंपत्ती जगात कुठे नाहीये पण तुम्ही आम्ही करंटे आहोत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे स्पष्ट तीन ऋतू असणारा एकमेव देश आहे हा हिंदुस्थान वनसंपत्ती हि हिंदुस्थान सारखी जगात कुठे नाहीये होय ! मलेशियात जंगले आहेत, आफ्रिकेत जंगले आहेत जगाच्या पाठीवरती आणखीनही कुठे आहेत पण विश्वाच्या पाठीवरती ज्या ज्या प्रकारचे वृक्ष ज्या ज्या प्रकारचे गवत ज्या ज्या प्रकारच्या भाज्या ज्या ज्या प्रकारचे तृणांकुर तृणधान्य कि जे जे काही सृष्टीला ठावूक आहे ते ज्या एकाच देशात मिळते असा हा देश आहे आपण मुर्खासारखे म्हणतो कि बटाटा जपान मधून आला आणि टोमॅटो अमेरिकेतून आला आणि गुलाब इराण मधून आला अन भावी पंतप्रधान इटलीतून आला .पण आपल्याला चालते सगळे कारण कारटी करंटी आहेत करणार काय ? तुम्हाला सांगतो कि आपली पशु संपत्ती तर इतकी विलक्षण आहे. आज या आपल्या देशात मोठेले ३७६ कत्तलखाने सरकार मान्य आहेत गावोगावी बकरी कापण्याचा धंदा चाललाच आहे त्याच्यात २६ केवळ गायी मारण्याचे आहेत. निसर्गाने जो जो पशु जन्माला घातलाय कुठे पांढरे कुठे काळे वाघ हि पाली झुरळे डास चिलटे खेचर जलचर जे काही असेल ते सगळे या एकाच देशात मिळतात असे शास्त्रज्ञ बोलतात. आपली पशु संपत्ती इतकी विलक्षण आहे कि शेकडो वर्षांपासून कातडी निर्यात करणारा क्रमांक एक चा देश आहे हा या देशाची खनिज संपत्ती पण काय सांगू ! शास्त्राज्ञाना जाऊन जर विचारले कि, " काय हो! मूलद्रव्ये किती ?" तर ते सांगतील १०८ . हि १०८ Elements ज्यात सोने, चांदी, तांबे. जस्त, पितळ अशी आणखी काही कि जि विश्वात शास्त्रज्ञांच्या नजरेला आढळली ते १०८ धातू ज्या एकाच देशात सापडतात त्याचे नाव आहे हिंदुस्तान. अरे ! कोणी म्हणेल त्या दक्षिण आफ्रिकेत तांब्याच्या खाणी आहेत ऑस्ट्रेलियात सोने सापडते, अमेरिकेत काय कोळसा फार आहे. असे कुठे काही तर कुठे काही. पण हे सगळे धातू ज्या एकाच देशात सापडतात तो देश आहे आपला पुढे बुद्धिमत्ता ! हो || तयासी तुलना कैसी || अरे ! हा नील आर्मस्ट्राँग तो ऑर्लिन्स, तो रॉबर्ट हे तिघेजण उतरले चंद्रावरती १९ जुलै १९६९ ला. तिथून माघारी येताना ते हवेचे काही नमुने , मातीचे काही नमुने, दगडाचे काही नमुने घेऊन आले पण तुम्हाला ठाऊक नसेल तर सांगतो कि हा पराक्रम जो अमेरिकेने केला त्याचे एकूण ३९ प्रयोग झाले पण पहिले ३८ अयशस्वी झाले हा ३९ व तेवढा यशस्वी झाला त्याकाळात Advansments of America in the Scintific World हे पुस्तक माझ्या वाचनात आले. त्याच्या काय होते ते सांगतो म्हणजे आपली बुद्धी काय लायकीची आहे ते तुमच्या लक्षात येईल. त्याच्यात त्यांनी लिहिले होते कि आत्ता पर्यंत ३८ अयशस्वी प्रयोगानंतर ते राष्ट्र जिद्दीने पेटून उठले कि आपण झेप घेतलीच पाहिजे वरती. नासा नावाच्या संघटनेत ८-८ तासांच्या शास्त्रज्ञांच्या संशोधन पाळ्या सुरु झाल्या आणि या संशोधनाच्या आधारावरती ते चंद्रावर उतरले. त्या पुस्तकात त्यांनी पुढे सांगितले होते कि हे कार्य यशस्वी होण्यासाठी ज्यांनी रात्रीचा दिवस केला रक्ताचे पाणी केले हाडाची काडे केली असे तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ लोक २,८२,००० होते या संशोधनात आणि तेच सांगतात कि या २,८२,००० पैकी ८०% लोक हे भारतीय आहेत हि आपली बुद्धिमत्ता आहे अहो ! आत्ता हि परवा एक लेख आला होता अमेरिकेच्या अंतराळ संशोधन कार्याबद्दल लोकसत्ता मध्ये त्यात मी वाचले कि त्यांची जि अंतराळ संशोधनातील १० सर्वोच्च अधिकाय्रांची कि समिती आहेत त्यात ९ जण भारतीय आहेत हिंदू आहेत त्या जीनिव्या मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठा अॅटॉमिक प्लांट आहे तिथे ५०% पेक्षा जास्त शास्त्रज्ञ हे आपले आहेत आत्ताचे हे कॉम्पुटर. या संगणक शास्त्रात जगातील जि एकूण शास्त्रज्ञांची लोकसंख्या आहे त्या ३७% पेक्षा जास्त उत्कृष्ठातील उत्कृष्ठ शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत हि आपली बुद्धिमत्ता आहे अहो ! || मृगचीये अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठावा || भाग्यवंत घेती वेचूनिया मोरे भारवाही मेले वाहता ओझे || त्या कस्तुरी मृगाला तो सुगंध आपल्या पोटात आहे हे ठावूक नसते पण वाय्रामुळे पसरणारा त्याचा सुगंध शोधण्यासाठी काळीज फुटे पर्यंत ते जिकडे तिकडे फिरत राहते. आजही आपण कस्तुरी मृगच आहोत आपल्याला ठावूक नाही कि आपण कोण आहोत अरे ! धर्म कुणाला कळायचं असेल त्यांनी या भारत मातेच्या पायाशी यावे भगवंताने दिलेला मनुष्य जन्म जर सार्थकी लावायचा असेल तर तर तो आत्म्याचा प्रकाश फक्त या भरत भूमीच देऊ शकते अहो ! आपले पसायदान इतके उदात्त आहे कि ज्याला तोड नाही जोड नाही तुलना नाही उपमा नाही केवळ मराठीच नाही तर हिंदुस्थान मधल्या सगळ्या भाषातून धर्म म्हणून जे काही चिंतन केले आहे तुम्ही आम्ही त्याला तोड नाही असे सगळे असून सुद्धा भगवंताने इतक्या उत्कृष्ट संरक्षक सीमा तुम्हाला आम्हाला दिलेल्या आहेत कि असा चहूबाजूनी निसर्गतः च संरक्षण असणारा देश फक्त हिंदुस्थान हा आहे एकीकडे हिमालय, हिंदुकुश तिन्ही बाजूनी समुद्र. एक सर्वात मोठी नदी फक्त हिंदुस्थानात, सर्वात मोठा पर्वत हिमालय फक्त हिंदुस्थानात. जगाच्या कल्याणासाठी अखंड कार्यरत चिंतनात असलेली असंख्य व्यक्तिमत्वे केवळ हिंदुस्थानात झाली आहेत हि उंची कुणी गाठू शकणार नाही कुणाला ते परवडणार नाही हो ! आमच्या तुकाराम महाराजांच्या इतकी उंची असणारा मनुष्य अन्य देशात जन्मू शकणार नाही किती सर्वोत्कृष्ट परंपरा असणारा हा देश आहे. जगातले जे सर्वात उत्तमातले उत्तम ते भगवंताने या भूमीला दिले आहे येथे सहा शास्त्रे आहेत त्यातील ब्राहस्पत्य शास्त्राचा सुरुवातीचा श्लोक आहे त्यात या देशाच्या नावाचा उल्लेख असलेला तो श्लोक आहे || हिमालयात सभारभ्या यावत हिंदू सरोवरं तत् देश निर्मितम् देवं हिंदुस्थानम् प्रचीक्षति || अरे हिमालय पासून खाली हिंदू सागरापर्यंत देवाने निर्मिलेला हा देश आहे. अरे ! ज्यावर खास मायेची पाखर आहे देवाच्या अंतःकरणात ज्याच्या विषयी कौतुक आहे असा हा देश आहे असा १,४०,००० वर्षांची परंपरा असणार हा देश एका आज एका वाईट गोष्टीत क्रमांक एक वर आहे लाज वाटावी शरम वाटावी, अन्न गोड वाटू नये, दुःख व्हावे अशी ती गोष्ट आहे. कोणाची गोष्ट आहे ती ? कि, जास्तीतजास्त काळ पारतंत्र्याच्या नरकात आनंद मानणारा हा देश आहे या देशावर झालेल्या आक्रमणा इतकी आक्रमणे जगात कुठल्याही देशावर झालेली नाहीत. किती देशांनी आक्रमणे केली ? १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत आपल्यावर ७४ देशांनी आक्रमणे केलेली आहेत. कुणी भाषेच्या माध्यमातून, कुणी व्यापाराच्या माध्यमातून, कुणी धर्माच्या माध्यमातून, कुणी संस्कृतीच्या माध्यमातून, कुणी राजकीय माध्यमातून अखंड आपल्यावरती अक्रमाणेच होत आलेली आहेत. तुकोबाराय एका अभंगात बोलतात "त्या पाण्यात राहणारी आणि पाण्यात काय असतील ते कण खाऊन जगणारी जिचा पाण्यातच जन्म आणि पाण्यातच मरण अशी निरपराध बारकी मासोळी तिने काय कुणाचे वाईट केले आहे बरे पण त्या माश्यांना हे कोळी पकडतात आणि खातात. ती हरणे तृणांकुरावरती जगतात, कुणाला मारत नाहीत अतिशय भित्री जात पण त्या हरणांचा व्याध नाश करतात, कातडी सोलतात, मांस खातात तसेच गावातील काही बदमाश माणसे संतांना सज्जनांना तरही भगवान करून सोडतात पण तुकाराम महाराजांनी याचे उत्तर जेवढे चांगले दिले आहे तेवढे कुणालाच जमलेले नाही ते म्हणतात, "हे तर जन्मजात वैर आहे" तसेच आपले आहे. या ७४ राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केले आपण काय काय केलं ? ७५वे चीन ने आपल्यावर आक्रमण केले २० ऑक्टोबर १९६२ ला. पण आपण काय केले? त्यांच्या वाळल्या पाचोळ्यावर तरी कधी पाय दिला ? वाकड्या नजरेने तरी कधी बघितलं का? अरे ! आपला कोणता अपराध ? काय चूक? यात गोष्ट अशी कि दुर्बलांच्या नशिबी जे येते तेच आजवर तुमच्या आमच्या नशिबी आलेले आहे. ससा म्हणून जे जगातील त्यांना कुत्री फाडून खाणारच. मासे आहेत त्यांना कोळी मारणार. हरणे आहेत त्यांना व्याध मारणार म्हणून जगायचे असेल तर सिंह म्हणून जगा. शिवाजी महाराज संभाजी महाराज या पितापुत्रांनी ते केले बघा ! आपली गुणवत्ता इतकी मोठी कि आपले गुणच दोषात रुपांतर झाल्यासारखे झालेले आहेत आणि आपण भक्ष बनलो त्याला काय इलाज. गोष्ट अशी कि, शक, कुशाण, हूण, तार्तर, बलुची, अफगाणी, खिलजी, तुघलक, लोधी, सूर, पठाण, मोगल, डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, चीन इत्यादी आक्रमक. अरे ! खाली एवढीशी लंका त्यांनी आपली काही बेटे लाटलीत २५ वर्षांपूर्वी पण आपण काहीच करू शकलो नाहीआझु आपल्यावर आक्रमणे होतात पण मन मेले कि आक्रमण झालेले कळत हि नाही कल्पना करा कोट्यावधीचा देश आपल्या भूमितून येणारी माणसे इतकी वांझ आहेत का ? कि त्यांच्यावर राज्य करणारी माणसे दुसय्रा देशातून यावीत यासारखी शरमेची गोष्ट नाही पण बुद्धी मारली गेल्यानंतर बाकीचे काही सुचत नाही पण या सगळ्यासाठी हिंदूंचा स्वभाव त्याला कारणीभूत आहे आणि तो आजही कायम आहे यात बदल केल्याशिवाय १५ ऑगस्ट १९४७ सुरक्षित राहणार नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो," पृथ्वीराज नावाचा चौहानांच्या कुळामध्ये जन्मलेला एक अतिशय उदात्त अतिशय कर्तुत्ववान, बुद्धिमान, हिम्मतवान, पराक्रमी, लढाऊ, नेतृत्वाचे गुण असलेला संन्यस्त वृत्तीचा राजा होता त्याच्या वरती मुहम्मद घोरी ने एकूण फक्त १३ वेळा चाल केली. हा मुहम्मद घोरी कोण? तो अरबस्थानातला. काय केले आपण म्हणून तो आला? तर त्यांची ती वृत्ती आहे. पहिल्या १२ वेळा आला त्याच्यात ८ वेळा त्याला पराभूत होऊन पळून जावे लागले आणि ४ वेळा आपण त्याला जिवंत पकडला. कल्पना करा म्हणजे त्या पृथ्विराजाचे बळ त्याचे सैन्य, त्याचे नेतृत्व, त्याची हिम्मत किती विलक्षण आहे पण तो ८ वेळा हल्ला करून आला पण पृथ्विराजाच्या मनात असे आले नाही कि, " हा किडका साप. मी च्या बापाच्या बापाचं, बापाच्या बापाचं काय वाईट केले आहे पण हा का येतोय अंगावरती? अरे! याला संपवला पाहिजे. ज्या वारुळातून हा साप येतोय ते वारूळ जाळून उध्वस्त केले पाहिजे असे त्याच्या हिंदू अंतःकारणात आले नाही. ४ वेळ त्याला आपण जिवंत पकडला त्या सज्जन गडावरती राहणारा गोसावी रामदास स्वामी त्यांच्या एक श्लोक आहे || कुठेही दिसो साप ठेचुनी मारावा, मनी अन्य चर्चेस द्यावा न थारा | विषाचे विना कोणता सर्प आहे , वरुनी कसे पाहुनी ओळखावे || पण हिंदू अंतःकरण त्याला आपण सोडून दिले आजही विमान अपहरण झाले तेव्हा असेच किडके साप जसवंत सिंगांनी लग्न हून माहेरी आलेल्या मुलीला परत सासरी सन्मानाने धाडावे तसे त्या सापांना सोडले. हिंदूंचा स्वभावच बनला आहे कि पडते घ्यायचे, नमते घ्यायचे शरण जायचे आणि जिवंत राहायचा पराक्रम करायचा असा नासका प्रवाह आहे आपला त्या पृथ्विराजालाही वाटले नाही कि कुठेही दिसो साप ठेचुनी मारा तो घोरी तेराव्यांदा आला तेव्हा जयचंद राठोड दिल्ली चे राज्य मिळवण्यासाठी आपल्या सख्या भावाविरुद्ध त्याला जाऊन मिळाला. पृथ्वीराज पराभूत झाला आणि त्याला मृत्युदंड दिला नंतर त्यांनी ते पृथ्विराजाचे पार्सल तिकडे त्यांच्या देशात नेलं. त्याचे डोळे काढले तुकडे तुकडे केले शरीराचे. कारण घोरीला माहित होते || कुठेही दिसो साप ठेचुनी मारा || आणि आपण त्याला १२ वेळा सोडला मोठ्या मनाने; पण १३ व्यांदा आला आणि तुमची माती केली आणि त्या वेळेपासून दिल्लीच्या तख्तावरील आपले निशाण गेले आहे ते पुनरपी कधी आजतागायत आलेले नाही आहे. पृथ्वीराजजी मारले गेले पण नंतर त्यांच्या कुळातील त्यांचा मुलगा, नातू, पणतू कुणालाही वाटले नाही कि याचा सूड घेतला पाहिजे आपण याला मातीत मिळवले पाहिजे पण पुढे सगळे कसे शांत शांत राहिले. पण फक्त महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास त्याला अपवाद आहे अरे ! हे ७४ देश आपल्यावर का चालून आले? चीन का चालून आला? तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. आपले युद्ध झाले पाकिस्तानशी बांगलादेशसाठी १९७१ ला तर १५ ऑगस्ट १९४७ ते १६ डिसेंबर १९७१ पर्यंत २४९ वेळा पाकिस्तान ने आपल्यावर आक्रमण केले पण त्याचे कधी आपण उत्तर दिलेले नाही आजही सीमेवर हेच चालू आहे पण याच्या वार्ता देत नाहीत गाळून टाकल्या जातात त्या. आपण याच्या विचार केला पाहिजे कि आपण इतिहासातून काय शिकलो? हे जर टिकवायचे असेल तर आपण आपल्या मनोवृत्तीत बदल केला पाहिजे इ.सं.१००० ते इ.सं. १०३० या दरम्यानचा आपला इतिहास काय आहे हो ! तर या ३० वर्षात महम्मद गझली आपल्यावर १७ वेळा चालू आला. आणि काय केले तर कत्तल रक्तपात जाळपोळ. आजही पहा मुंबई वरील हल्ल्यात २०७ जण मारले गेले तर दुसय्रा दिवशी वर्तमान पत्रात बातमी का आली तर मुंबई सावरली, जनजीवन पूर्ववत. तुम्ही प्रेतागरात जावा कुठल्याही दवाखान्यातल्या तेथिल प्रेतांमध्ये कधी वाद होत नाहीत कधी भांडणे नाहीत. तसाच कोणी कुणाला चिमटा काढताना दिसत नाही कुणाला राग येत नाही सगळे कसे शांत निवांत असते तसाच हा आपला ११३ कोटी मन मेलेल्या लोकांचा देश आहे म्हणून आम्ही या हल्ल्या नंतर केले काय ? तर फक्त मेणबत्त्या नेवून लावल्या कारण गांडूळ कधी फणा काढत नसतं. कसे आपले स्वातंत्र्य चिरायू राहील काही कळत नाही कारण आपल्या इथे 'सुशिक्षित' नावाचा G A N D U गोत्रातला समाज गेली ६२ वर्षे स्वातंत्र्य भोगतोय. हे जर बदलायचे असेल तर शिवाजी संभाजी मंत्राशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून आपले हे चिंतन जात धर्म पंथ, संप्रदाय भाषा याच्या पलीकडे जाऊन राष्ट्र टिकवण्यासाठी उपयोगी पडणार आहे ... -संभाजीराव भिडे गुरुजी यांचे व्याख्यानाचा सारांश (हा लेख प्रत्येक सच्च्या राष्ट्रप्रेम्याच्या ब्लॊगवर, संकेतस्थळावर, मुखपृष्ठावर,सोशल नेटवर्क वर असावाच असावा) http://shrishivpratishthan.com/ www.dasbodh.com
  • Log in or register to post comments
  • 45214 views

प्रतिक्रिया

Submitted by मन१ on Mon, 04/22/2013 - 16:58

Permalink

पांचजन्य

आज मिपावरती विवेक, पांचजन्य ही नियतकालिके वाचल्याचा भास झाला. मधूनच "सहा सोनेरी पाने" सुद्धा आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद बोरोले on Sat, 05/04/2013 - 14:38

In reply to पांचजन्य by मन१

Permalink

अन भावी पंतप्रधान इटलीतून आला

अन भावी पंतप्रधान इटलीतून आला ........... लय भारि
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 04/22/2013 - 17:09

Permalink

लेख वाचून डोळे खाडकन उघडले.

लेख वाचून डोळे खाडकन उघडले.
  • Log in or register to post comments

Submitted by दासबोध.कॊम on Mon, 04/22/2013 - 17:12

Permalink

भिडे गुरुजींविषयी थोडेसे...

संभाजीराव भिडे गुरुजी हे नाव सांगली जिल्ह्याला नवीन नाही. गुरुजी हे तसे मरठवाड्यातले. शिकले पुण्यात...चांगले अणु शास्त्रात पी.एच.डी. स्वर्णपदकासह मिळवून, फर्गसन मध्ये प्राध्यापकी करीत होते. पुण्यातील प्रभात रस्त्यासारख्या भागातील करोडो रुपायाच्या स्थावराला लाथाडून समाजासाठी बाहेर पडले. पायात वहाणा घालीत नाहीत. एक धोतर,सदरा,टोपी अंगावर, एक १० बाय १० च्या खोलीतील दोरीवर, दार सताड उघडे. आत एक सतरंजी अंथरलेली, उशी घेत नाहीत. एक पाण्याचा तांब्या, शिवचरित्र, गाथा, दासबोध...बस्स....एवढाच पसारा. एक क्षण एका जागी थांबत नाहीत. गाडीत बसत नाहीत. ८०-८५ च्या आसपास वय आहे...परंतु गडकोट मोहीम काढतात ते दरवर्षी त्यात वाघासारखे ५-६ दिवस अनवाणीच चालतात! किल्ले चित्त्याच्या चपळाईने चढतात उतरतात... आजही रोज पहाटे २००-२०० जोर मारतात...पूर्वी ५००-५०० मारत. रोज १२० सूर्यनमस्कार न चुकता... मागच्याच आठवड्यात सांगलीत एक अपघात झाला गुरुजींना, एकाने उडवले....८ तास बेशुद्ध होते...धर्मवीर बलिदान मास असल्याने ते एक घासही अन्न घेत नाहीत महिनाभर! त्याच्या थकव्याने ग्लानी आली....जागे होताच वैद्यांना हातातील नळ्या काढायला लावल्या व तडक सायकल घेऊन पुढच्या कामला निघाले! डॉक्टर म्हणत होते किमान एक महिना बेडरेस्ट हवी! आज संपूर्ण महाराष्ट्रात गुरुजींनी हाक मारली की सुमारे ४-५ लाख तरूण तत्परतेने प्रतिसाद देतात.... उशीरा का होईना या महाराष्ट्राला त्यांच्या कार्याचे मोल कळते आहे... मित्रानो, आयुष्यात एकदाच गुरुजींना भेटा! तुम्हाला लक्षात येईल की अशी व्यक्ती तुम्ही यापूर्वी कधी पाहिली नाहीत व या पुढे तर कधीच पाहाता येणार नाही,,,
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 04/22/2013 - 17:33

In reply to भिडे गुरुजींविषयी थोडेसे... by दासबोध.कॊम

Permalink

४-५ लाख

>>आज संपूर्ण महाराष्ट्रात गुरुजींनी हाक मारली की सुमारे ४-५ लाख तरूण तत्परतेने प्रतिसाद देतात.... ४-५ लाख म्हणजे सॉलीडच आहे. बाळासाहेबांनापण एवढं जमलं नसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 04/22/2013 - 17:44

In reply to ४-५ लाख by नितिन थत्ते

Permalink

हा हा हा

थत्तेचाचा खरं खरं सांगा, तुम्हाला कसा हो, कसा सुगावा लागतो अशा धाग्यांचा आणी त्यातील वाक्यांचा? बाकी, राहूल गांधींनी हाक मारली तर किती माणसे गोळा होतील असा चाचांचा अंदाज आहे ? थत्तेचाचांनी हाक न मारता देखील धावून जाणारा पराण्णा
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 04/22/2013 - 18:30

In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार

Permalink

मी नाही ब्बॉ

>>बाकी, राहूल गांधींनी हाक मारली तर किती माणसे गोळा होतील असा चाचांचा अंदाज आहे ? हा हा हा .... कल्पना नाही. मी जाणार नाही हे नक्की. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 04/22/2013 - 17:46

In reply to ४-५ लाख by नितिन थत्ते

Permalink

लै चोरट्या धावा काढता राव तुम्ही.

>>> ४-५ लाख म्हणजे सॉलीडच आहे. बाळासाहेबांनापण एवढं जमलं नसेल. :) दिली का काडी टाकून... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 04/23/2013 - 00:08

In reply to भिडे गुरुजींविषयी थोडेसे... by दासबोध.कॊम

Permalink

... शिवचरित्र, गाथा, दासबोध..

... शिवचरित्र, गाथा, दासबोध...बस्स....एवढाच पसारा.
अहो पण मोठी माणसं तर नेहेमी अभ्यास वाढवा, वाचन वाढवा, व्यासंग करा असं सांगतात. गुरुजींकडे निदान किंडल वगैरे काही आहे का? किमान दोन-चार संपन्न ग्रंथालयांचं सभासदत्त्व? हे पी.एच.डी.मधे स्वर्णपदक ही काय भानगड असते हो? मुळात या पी.एच.डी. पदवीचा अर्थ सांगाल का?
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Mon, 04/22/2013 - 17:19

Permalink

उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका

उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका का सोडलीत? त्यांना पण काही संस्कृत नाव देउन प्राचीन भारतात विलिन करुन घ्या ना!! आणि एवढं सगळं बदलु शकणारा हा जादुई शिवाजी संभाजी मंत्र काय तो तरी सांगा डिटेलमधे ..
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Mon, 04/22/2013 - 17:23

Permalink

तुम्ही, गुरुजी आणि हाकेला

तुम्ही, गुरुजी आणि हाकेला तत्परतेने प्रतिसाद देणारे ४-५ लाख तरुणसुद्धा "त्याच" गोत्रातले का?? की सगळे अशिक्षित?? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 04/22/2013 - 17:25

Permalink

आत्तापर्यंत (१७:२५ वाजेपर्यंत

आत्तापर्यंत (१७:२५ वाजेपर्यंत) आलेल्या प्रतिक्रियांबाबत : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पुण्याकडे जात असताना तळेगाव टोलनाका ओलांडला आणि अगदी बॅरियरजवळच ट्रॅफिक हवालदार उभा होता. त्याने माझी टोलपावती मागितली. आधीची खालापूर नाक्यावर मिळालेली पावती त्याने पहायला मागितली. त्यावरचा एंट्री टाईम निरखून पाहिल्यानंतर त्याने स्वतःच्या मनगटी घड्याळाकडे पाहिलं आणि मला जाऊ दिलं ..आणि "अशीच सावकाश आणि सुरक्षित गाडी चालवत जा" असंही म्हटलं. पण बर्‍याचजणांचा खालापूर एंट्री टाईम बघून तो त्यांना अडवून ठेवत होता... ......................... अवांतर वाटले तर उडवण्यास हरकत नाही.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 04/22/2013 - 17:36

In reply to आत्तापर्यंत (१७:२५ वाजेपर्यंत by गवि

Permalink

९ तारखेला वरून खाली येताना

९ तारखेला वरून खाली येताना टोल नाक्यानवळ ९३ किमीच्या स्पीडने गाडी चालवल्याबद्दल २०० रु दंड भरला. लोक १४०-१६० ने जातात हे पाहिलेले आहे. असो. मी मर्यादेपेक्षा जास्त स्पीडने गाडी चालवत होतो हे खरेच आहे. अवांतर वाटले तर उडवण्यास हरकत नाही.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 04/22/2013 - 17:40

Permalink

या लेखावरौतारा म्हणून फारएण्ड

या लेखावरौतारा म्हणून फारएण्ड यांचा तिरंगा लेख पुन्हा वाचतो.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 04/22/2013 - 17:40

Permalink

या लेखावर उतारा म्हणून

या लेखावर उतारा म्हणून फारएण्ड यांचा तिरंगा लेख पुन्हा वाचतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/22/2013 - 17:47

Permalink

पु ना ओकांचा अवतार पुन्हा

पु ना ओकांचा अवतार पुन्हा उतरला जणू. तुफान विनोदी एकपात्री प्रयोग.
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Mon, 04/22/2013 - 17:53

In reply to पु ना ओकांचा अवतार पुन्हा by बॅटमॅन

Permalink

+१

काल सेहवाग नंतर आज गॉथमवासी ब्याटम्यान ची इनिंग रंगणार दिसत्ये…गॉथम सुद्धा तत्कालीन भारतात येत असावे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 04/22/2013 - 18:13

In reply to +१ by मालोजीराव

Permalink

-१

संपूर्ण विश्वात महान असलेल्या आणी ह्यापुढे देखील राहणार्‍या भारतीय संस्कृतीची अशी खिल्ली उडवणार्‍या श्री. थत्ते चाचा, श्री. बॅटमॅन, श्री. बॅटमॅन ह्यांना पाठिंबा देणारे मालोजीराव ह्यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी. संबंधीत लोकांना तातडीने हद्दपारी द्यावी, तसेच ह्या प्रतिक्रिया लिहिल्या जात असताना ऑनलाईन असलेल्यास संपादकांना तातडीने सेवामुक्त करून त्यांच्यावरती खटले भरावेत. सायंकाळी आमचा मेणबत्ती मोर्चा धडकी भरवायला येईलच. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 04/22/2013 - 19:14

In reply to -१ by परिकथेतील राजकुमार

Permalink

मेणबत्ती

>>सायंकाळी आमचा मेणबत्ती मोर्चा धडकी भरवायला येईलच. हेच ते. आपल्या सौंस्क्रुतीचं आपल्यालाच काही नाही. समई मोर्चा- गेला बाजार पणती (शाडू मातीच्या) मोर्चा काढला असता तर ... (स्वगत: मोर्चा तरी देशी आहे का?)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 04/22/2013 - 22:20

In reply to मेणबत्ती by नितिन थत्ते

Permalink

(स्वगत: मोर्चा तरी देशी आहे

(स्वगत: मोर्चा तरी देशी आहे का?)
"जपान ते ब्रा़झील भारतच आहे म्हटल्यावर ...."
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर जोशी on Tue, 04/23/2013 - 17:59

In reply to (स्वगत: मोर्चा तरी देशी आहे by परिकथेतील राजकुमार

Permalink

(No subject)

  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/22/2013 - 18:29

In reply to +१ by मालोजीराव

Permalink

गॉथम तर बोलूनचालून आम्रविका

गॉथम तर बोलूनचालून आम्रविका खंडातले. ते भारतात येणार नाही तर अजून कुठले शहर येणार ? हे शहर गौतम बुद्धाच्या काळात वसल्याचे त्याच्या नावावरूनच स्पष्ट होते. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ऐंशी वर्षांनी गॉथमची स्थापना झाली. त्यामुळे "गौतम-अशीति(८०)" असे नाव पडले, त्याचा अपभ्रंश "गॉथम सिटी" असा झाला आहे. शिवाय वाल्गुदेय ऊर्फ बॅटमॅनचा उल्लेख मुक्तेश्वरांच्या कवितेच्या एका (पानशेतच्या पुरात वाहून गेलेल्या) प्रतीत आहे तोच माझी सही म्हणून घेतलेला आहे. मुळात बॅटमॅन हा शब्द तिथे चालणार्‍या बटाट्याच्या शेतीला अनुलक्षून बनलेल्या एका द्राविडी शब्दाचा अपभ्रंश आहे. तिथे मणभर बटाटे पिकत, त्यामुळे बट्ट-मण्ण असे म्हटल्या जाऊ लागले, त्याचाच अपभ्रंश बट्टमण्ण-बटमण-बटमन असा झाला. पुढे इंग्रजांनी तो शब्द ऐकला आणि क्रिकेटमधल्या बॅट्स्मनशी साधर्म्य आढळल्याने त्याचे बॅटमॅन असे रूपांतर केले. बटाटे पिकवणारा मॅन अशीही त्याची व्युत्पत्ती तत्कालीन नवपाणिनीने दिलेली आहे. तर पुढे हेच नाव गॉथम भागात राहणार्‍या प्रतिष्ठित नागरिकांत रूढ झाले. तर असा आहे गॉथम आणि बॅटमॅनचा इतिहास...सर्वार्थाने भारतीय ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 04/22/2013 - 18:41

In reply to गॉथम तर बोलूनचालून आम्रविका by बॅटमॅन

Permalink

अबे मारतो का काय?????????????

अबे मारतो का काय????????????? >>>बट्ट-मण्ण फुटलो. आकाश अंबानीने बॅट मॅनचा ड्रेस घातलाय असं सचित्र दृश्य डोळ्यासमोर येऊन एकदम नीता अंबानी डोळ्यापुढं आली.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/22/2013 - 18:46

In reply to अबे मारतो का काय????????????? by प्यारे१

Permalink

प्यारेजी पण नीता अंबानी कायले

प्यारेजी पण नीता अंबानी कायले आली म्हणे डोळ्यापुढं ;) नै म्हंजे यायला काय कारण पायजेच असं नै पण हिते कळ्ळं नै. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 04/22/2013 - 18:51

In reply to प्यारेजी पण नीता अंबानी कायले by बॅटमॅन

Permalink

आकाश अंबानी की मम्मी बोलकु!

आकाश अंबानी की मम्मी बोलकु! हमें आयपील देखते ना हल्ली. ;) वो मणभर बट्ट वाला आकाश दिखता उसके साईड में बैठी नीता भी दिखती! एकदम बिच्चारी लगती. वो कोई चेपु पे कहा था.... ये देखो 'जिल्ले से बडा तालुका' बोलके! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/22/2013 - 18:55

In reply to आकाश अंबानी की मम्मी बोलकु! by प्यारे१

Permalink

खरंय प्यारेजी

=)) =)) =)) खरंय प्यारेजी ;) अन बिचार्‍या नोलानसाहेबाला आमचे इतिहाससंशोधन धक्कादायक वाटले वाट्टे. त्याला खाजगीत पत्रच लिहितो बगा, काय म्हंटा मालोजीराव?
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Mon, 04/22/2013 - 18:46

In reply to गॉथम तर बोलूनचालून आम्रविका by बॅटमॅन

Permalink

आत्ताच आलेल्या ताज्या

आत्ताच आलेल्या ताज्या बातमीनुसार संगणकावरील काही आंतरजालीय मजकूर वाचता वाचताच क्रिस्तोफर नोलान ला फिट आली म्हणे
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 04/22/2013 - 19:34

In reply to गॉथम तर बोलूनचालून आम्रविका by बॅटमॅन

Permalink

अगागागागागा.... बॅ. मॅ. ओक!

अगागागागागा.... :)) :)) बॅ. मॅ. ओक! प्रतिसाद वाचनखुणेत टाकायची सोय असते का हो? :))
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 04/22/2013 - 21:27

In reply to गॉथम तर बोलूनचालून आम्रविका by बॅटमॅन

Permalink

नाकापेक्षा मोती जड...

... धाग्यापेक्षा प्रतिसादच भारी. दक्षिण भारतात त-थ यांचे गोंधळ असतात हे गौतम->गॉथम यावरून स्पष्ट करणार का कसे?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 04/22/2013 - 22:26

In reply to नाकापेक्षा मोती जड... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

गोंधळ

दक्षिण भारतात त-थ यांचे गोंधळ असतात
म्हणजे निथीन तथ्थे असे का?
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 04/22/2013 - 23:23

In reply to गोंधळ by श्रावण मोडक

Permalink

ओ

हॅलो..... त आणि थ चे गोंधळ नसतात. थ च नसतो. (दाक्षिणात्य) नितिन तत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 04/22/2013 - 22:32

In reply to नाकापेक्षा मोती जड... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

त-थ यांचे गोंधळ

दक्षिण भारतात त-थ यांचे गोंधळ असतात माझाही असाच समज होता पण या धाग्यावरील जाणकारांच्या प्रतिसादांनंतर शंकानिरसन झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 04/22/2013 - 23:35

In reply to त-थ यांचे गोंधळ by श्रीरंग_जोशी

Permalink

गोंधळात गोंधळ

त-थ च्या गोंधळात लिंकांचे गोंधळ? बुद्धा, पहातो आहेस ना कलियुगात हे काय सुरू आहे ते!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 04/22/2013 - 23:50

In reply to गोंधळात गोंधळ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

नकळत झालेला गोंधळ

हा दुवा होता तो. तसदीबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/22/2013 - 23:19

In reply to नाकापेक्षा मोती जड... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अगदी बरोब्बर!!!! कसं सुचतं

अगदी बरोब्बर!!!! कसं सुचतं बै तुला अस्लं ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 04/23/2013 - 12:01

In reply to पु ना ओकांचा अवतार पुन्हा by बॅटमॅन

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Mon, 04/22/2013 - 18:12

Permalink

येथे स्वाभिमान मिळेल...

असे लेख वाचले की १५-१६ च्या वयात काय छाती भरून यायची काय सांगू. साला आपण म्हणजे कुणाचे वंशज आहोत आणि कुणाचे नाही. आणि आता आपल्या बापजाद्यांनी एवढं करून ठेवल्यावर आपण करण्यासारखं काहीच नाही त्यामुळे एवढया तेवढ्यावर भावना दुखावल्या म्हणून, 'आवाज' टाकायचा, निषेध नोंदवायचा, पुतळे जाळायचे असं करायचो. पण आता वय झालंय हो आमचं... आता असं ऐकून मन मोहरत नाही... कारण जपान , ब्रम्हदेश, आज तर अगदी ब्राझीलला सुध्दा आपलं म्हणवणारे लोक यांना केवळ नाव सांगून होत नाही त्यांना आडनाव लागतंच. आडनावात जात समजते हे त्याकाळी कुठे ठाऊक होतं. हिंदू सारा एक म्हणनार्‍यांना काही जाती विशेष स्पेशल वाटतात हे लक्षात आल्यावर मोहरणारं मन कोमेजून गेलंय. प्रश्न उठतातच ना की आपल्या देशातले मुस्लीम हे लोक मुख्य प्रवाहात आणू शकले नाही ते लोक आमच्या मनी करंटेपणाचा न्युनगंड देऊन काय साधणार आहेत? मुस्लीम जाऊद्यात हिंदू धर्मातील जातींविरोधात बोलताना कधी दिसले नाहीत. किंवा जे लोक हिंदू धर्माचा त्याग करून धम्म अथवा ख्रिश्चन धर्मात गेले त्यांच्या विषयी यांना कधी आपल्या चुकीची जाणीव झाली असं कधी जाणवलं नाही. केवळ आम्ही 'जात' मानत नाही असं म्हणून वेळ मारून न्यायची, 'वेळ' गेली आता. वर जसे विष्णु पुराणाचा उल्लेख केला तसा गरूड पुराणाचाही करा, अत्री संहितेचा करा आणि मनुस्मृतीचाही करा की... हे सगळंच आपलं आहे ना? मी हिंदू आहे माझ्या धर्माचा मला अभिमान आहे. मात्र जे माझं आहे ते किंवा तेच चांगलं किंवा चांगलच आहे, असं मला मुळीच वाटत नाही. प्रत्यक्ष जीवणात काय करायचे याचे ध्यान नाही, मात्र अश्या बौध्दीकात रमताना गुडी गुडी वाटलं म्हणजे झालं. जाऊ द्या आता आमचं वय झालंय... - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 04/22/2013 - 18:52

In reply to येथे स्वाभिमान मिळेल... by नीलकांत

Permalink

+

(पहील्या परीच्छेदाचा स्वानुभव नाही पण ते सोडल्यास) वय झालेल्या नीलकांत आजोबांशी सहमत. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 04/22/2013 - 19:01

In reply to + by विकास

Permalink

++

सहमत. आम्ही पण काही वर्षांपूर्वी असेच भारावून जायचो. (वयस्कर) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by प्राध्यापक on Mon, 04/22/2013 - 19:47

In reply to येथे स्वाभिमान मिळेल... by नीलकांत

Permalink

अतिशय नेमका प्रतिसाद,

खरय्,निलकांतजी हे असले लेख १५/१६ वर्षांच्या कोवळ्या मुलांवर फार झटकन परीनाम करतात,आणी मग आपल्या देशाचा खरा इतिहास समजण्याआधीच त्यांच्या मनावर या विचारांच नकळत बिजारोपण होत्,भावनेच्या आहारी जाउन मग काही विशिष्ट विचारांनाच हे तरुन कवटाळुन बसतात्,आणी मग या तथाकथीत राष्ट्रीय विचाराविरोधी कोणी काही बोलायला अथवा लिहायला गेल की त्याच्यावर चोहोबाजुने टिकेचा भडीमार केला जातो. जोपर्यंत आपण इतिहास पुराव्याद्वारे वस्तुनिष्ठ पणे न तपासता भावनेच्या आहारी जाउन तपासतो तो पर्यंत हे असच चालणार अस दिसतय.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 04/22/2013 - 20:03

In reply to येथे स्वाभिमान मिळेल... by नीलकांत

Permalink

हिंदू सारा एक म्हणनार्‍यांना

हिंदू सारा एक म्हणनार्‍यांना काही जाती विशेष स्पेशल वाटतात हे लक्षात आल्यावर मोहरणारं मन कोमेजून गेलंय. अख्ख्या धाग्याच सार या वाक्यात : )
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 04/22/2013 - 22:47

In reply to येथे स्वाभिमान मिळेल... by नीलकांत

Permalink

हा व्हीडो मिळाला पहा.

हा व्हीडो मिळाला पहा. एका आयायटीयनने लेक्चरवलंय म्हंटल्यावर काय बोलणार.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 04/22/2013 - 22:50

In reply to हा व्हीडो मिळाला पहा. by शिल्पा ब

Permalink

तात्पर्य

आय आय टी भारतात आहे आणि आयआयटीअन भारतीय आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 04/23/2013 - 04:41

In reply to तात्पर्य by विकास

Permalink

आधीच सॉरी म्हणते आहे.

पण आय.आय.टी. नावानुसार 'इंडीयन' आहे. भारत का इंडीया?
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 04/23/2013 - 07:18

In reply to आधीच सॉरी म्हणते आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

क्षमा केली गेली आहे...

पण आय.आय.टी. नावानुसार 'इंडीयन' आहे. भारत का इंडीया?
सत्यदेव म्हना की सत्यनारायन म्हना, देव येकच हाय! Image removed. टिपः त्यात असलेले कमळ हे राजकीय पक्षाचे नसावे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 04/22/2013 - 18:40

Permalink

हे विश्वची माझे घर

अशी एक तरी ओवी अनुभवली की जपान ते ब्राझील ओढाताण होत नाही बघा ...
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 04/22/2013 - 19:03

In reply to हे विश्वची माझे घर by कपिलमुनी

Permalink

+१/-१

पर्स्पेक्टिव्ह पूर्णपणे वेगळा आहे. कशाला करावी म्हणतो मी ही धडपड? मागे मीच लिहीलं होतं मिपावर. मणभर सोनं उशाला घेऊन लोकं झोपायचे घरात. मान्य. आज त्या सोन्यातली गुंज शिल्लक नसेल तर उपयोग काय? पूर्वी इतर संप्रदाय/धर्म नव्हतेच. त्यामुळं वैदिक कल्चर वगैरे असेल कदाचित. पण भारत तरी कधी एकसंध होता? गुरुजींबद्दल नितांत आदर आहे. त्यांच्या कार्याबद्दल प्रेम देखील आहे. हाक मारल्यावर ४-५ लाख लोक जमतील हे देखील मान्य आहे. दुर्गा दौडीमध्ये सांगलीतच १०-१५ हजार लोक असतात हे प्रत्यक्ष पाहिलं आहे. पण म्हणून अमेरिका करते तेच आपण देखील करु, आज त्यांच्याकडे जे आहे ते आमच्याकडे पूर्वी होतं हे सांगण्यासाठी अनाकलनीय तर्क लावणं कशासाठी? तंत्रज्ञानातली प्रगती आज नसली तरी जो आपला चांगला वारसा आहे तो नीट जोपासूया की. संस्कृती श्रेष्ठ होती तर ती आज सगळ्यांपर्यंत पोचते आहे का? तिच्या हस्तांतरणामध्ये जर काही दोष आहेत तर ते दूर करतोय का? ते बघा. तसं झालं तर हे अमेरिकन येतील की जेट प्लेन घेऊन आपल्याकडे मनःशांतीसाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 04/22/2013 - 21:53

In reply to +१/-१ by प्यारे१

Permalink

पण भारत तरी कधी एकसंध होता?...

आज पण नाही आणि उद्या पण नसणार.. केरळ,तामिळनाडु आणि भारत ही ३ वेगळी राष्ट्र आहेत ह्याचा अनुभव गेली १४ वर्षे घेत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 04/22/2013 - 18:58

Permalink

सामर्थ्येंवीण करी सत्ता...

महर्षी म्हणतात कि, हिमालयाचा मध्य धरून खालती समुद्र पर्यंत त्रिज्या जर घेतली आणि एक आपण वर्तुळ काढले तर त्या वर्तुळात येणारी भूमी त्याचे नाव भारत आहे.
नानू सरंजामे आठवला. बाकी लेख रोचकच. जपान, ब्राझिल इ. असले तरी आग्नेय आशियाई राष्ट्रांचा अनुल्लेख खटकला. मजापहित, श्रीविजय इ. नावे केवळ पूर्वरंग वाचून ऐकून आहोत. त्याबद्दल अधिक काही वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती. बाकी काय लिहावे? 'आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति । सांगे वडिलांची कीर्ती । ' असं काहीसं समर्थच म्हणून गेलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by उपास on Mon, 04/22/2013 - 20:54

In reply to सामर्थ्येंवीण करी सत्ता... by नंदन

Permalink

अगदी..

>>'आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति । सांगे वडिलांची कीर्ती । ' नेमका अभिप्राय.. पूर्वीच्या काळचे, पुराणांचे सोयीस्कर दाखले देऊन विशेषतः तरूण पिढीला भावनेच्या आहारी घालून आपण त्यांना सदसदविवेकबुद्धीने, अभ्यासाने निर्णय घेण्याच्या प्रक्रीयेपासून उलट नेतोय असं वाटत नाही का? मग त्या पी एच डी किंवा तत्सम उच्च शिक्षणाचा काय फायदा? तसही उत्तर अमेरिका आणि इतर देशांनी ब्रेन ड्रेन केलेलंच आहे, गेल्या काही दशकांमध्ये जगाला चालना देतिल, दिशा बदलतील असे किती शोध, औषधे भारतात मिळाल्येत आणि त्याच वेळी पश्चिम राष्ट्रांमध्ये किती शोध लागलेत ह्याचा विचार आणि कारणमिमांसा आपण करणार आहोत की नाही? की 'भारतीय वंशाचा/ची' इतक्यावरच आपली कॉलर टाईट होणार! पूर्वजांनी शोधलेल्या कालमापनाचं कोरडं कौतुक किती दिवस? गेला बानार, आज/ उद्या पाऊस पडणार आहे का म्हणजे छत्री घेऊन बाहेर पडायला, हे साधं गणित सोडवण्याइतपत आपलं हवामानशास्त्र, उपग्रह विश्वासार्ह आहे का? उत्तर अमेरिकेत तासागणिक हवामानाचा अंदाज अगदी कानाकोपर्‍यातला सुद्धा अचूक आणि विश्वासार्ह मिळतो, कधीही/ कुठेही आणि फुकट. केवळ इतिहासाच्या गमजा मारणार्‍या आणि त्यातून काहीच न शिकणार्‍यांची आताशा कीव येते, निलकांत म्हणतो त्याप्रमाणे, पूर्वी छाती फुगून यायची आताशा वय झाल्याने झापडं गळून पडलेयत. वाईट अशाच वाटतं, की समाजाला दिशा देण्याची क्षमता असलेले, समाजापुढे आदर्श ठरू पाहाणारे लोक असं सांगतात त्याच! - (हतबल) उपास
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com