मस्त किस्स्सा.. :)
मी ही सध्या बेसनाचे लाडु केले त्यात तुप आणि साखर दोन्ही जास्त झाल्याने मी ते पुरणपोळीत कसे सारण भरतात तसे करून ते संपवत आहे.
पण त्या सारण भरून केलेल्या पोळ्या तुफान लागतात..
ह्यावरून काय शिकायला मिळाले, तर दहावीच्या वर्षात सिनेमा पाहू नये, खेळ बंद, लग्नंकार्ये व इतर समारंभ बंद, शिरा बंद.
मी एकदा आई नसताना दहीवडे केले होते. ते इतके झाले की शेजारपाजार खूष होऊन गेला. घरातलं दही संपलं शेवटी विकत आणलं. बाबा रागावले की ही कीती तास (म्हणजे पाच ते सहा तास) एकच काम करतीये. पुन्हा दहीवडे पाच एक वर्षांनीच केले.
रेवती
मला आठवतं कि एक दोन वेळ आई बाबा बाहेरगावी गेले तेव्हा तुरीच्या डाळी ऐवजी चणाडाळीचे वरण केले, अन उडिद डाळीची खिचडी. बाकी माझं पाककौशल्य तसं बरं आहे.
अनामिक
माझे काका पुण्यात नोकरी निमित्त एकटे रहात होते. त्यांनी रव्याचे लाडू केले. पण ते इतके घट्ट झाले की, की हातोडीने फोडून खाण्याशिवाय पर्याय नव्हता. मग त्यांनी एक युक्ती लढवली. रोज सकाळी ऑफिसला जाताना पाणी कडकडीत गरम करून त्यात एक लाडू सोडून त्याचा शिरा करून खाणे. अशाप्रकारे सगळे लाडू संपवले त्यांनी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
दोन दिवस फक्त शिराच खात होतो!
हा हा हा.. मस्त किस्सा!
मीही एकदा घरी एकटा असतांना, कांद्याचा वर्हाडी पद्धतीचा झुणका करायचा प्रयत्न केला होता. पद्धत तशी ऐकून माहित होती. पण शेवटी बिनसायचे ते बिनसलेच. झुणक्याची पार उकरपेंडी झाली. :D पोळ्या करायची गरजच पडली नाही!! तरीही तो उरलाच..
दुर्दैव असे की आई दुसर्या दिवशी येणार ती त्याच दिवशी संध्याकाळी परत आली. हर हर.. अजुन माझा उजवा कान पिळला गेलेला आठवतोय मला!!
(खादाड) मुमुक्षु
दोन दिवस फक्त शिराच खात होतो>>>>>>.
:))
मस्त किस्सा रे.
मी एकदा घरी उप्पीट करत होतो आणि पाणी एवढ घातल त्यात की एक तास झाला तरी ते उप्पीट काय बनेना. शेवटी वैतागुन "रव्याची तिखट खीर" अशी रेसिपी समजुन प्यायलो. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
प्रतिक्रिया
हा हा हा
कथा..
कढईभर
हा हा हा...
माझी आई
अशीच गंमत.
माझे स्वयंपाकाचे प्रयोग...
मला आठवतं
माझ्या काकांनी..
मस्त
मजेशीर अनुभव
सहसा कधी ही
हे मात्र
मस्त
दोन दिवस