आषाढी
लेखनविषय:
काव्यरस
दाट दाटल्या जुन्या मैफिली काळ थांबला नाही
शरिर जाहले जीर्ण मनी साचल्या सावल्या कांही
बोल अबोलच आणि चाहुली पंख मिटून विदेही
टिपुर चांदणे चंद्राविण नभ अवसेचे संदेही
रूक्ष तरी शीतल वाटे एकांत दिशांना दाही
छाया पडछाया माळावर वृक्ष जरी न तिथेही
कोण सोसते पोसते सुखे घाव झेलते देही
आभाळ अंबरी आषाढी माया ममता कविता ही
..............................अज्ञात
वाचने
1894
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
आवडली..
व्वाह
वाह ! क्य बात है
वाहव्वा........!
In reply to वाहव्वा........! by अत्रुप्त आत्मा
एखादा अतृप्त आत्मा तृप्त झाला
In reply to एखादा अतृप्त आत्मा तृप्त झाला by अज्ञातकुल
@अतृप्त आत्मा तृप्त झाला की
सुंदर...