Skip to main content

बैंगन टप्पा विथ पिक्स.

लेखक गौरीबाई गोवेकर यांनी सोमवार, 15/04/2013 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे जिन्नस: १) कोव़ळी गावठी काटेरी वांगी, २) तीन गाजरे ४) अर्धी वाटी हिरव्या मटाराचे दाणे. ५) पाऊण वाटी किसलेले किंवा डेसीकेटेड सुके खोबरे ६)पाउण वाटी शेंगदाणा कुट ७) १ लिंबाचा रस. ८) मिसळ मसाला २ चमचे ९) गरम मसाला १ चमचा. १०) तेल. वांगी स्वच्छ धुवुन त्याचे डेखाकड्चे टोक कापून टाकावे व संपूर्ण देठ न तोडता वांग्यांना उभी व आडवी चिर द्यावी (+अशी). चिरताच वांगी पाण्यात बुडवून ठेवावी. ताजी वांगी कांदे शक्यतो कांदेपातीला येतात तसे हळवे कांदे घ्यावेत, त्याने चव छान येते. कांदे मंद गॅसवर आख्खे भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर पाकळ्या सुट्या कराव्या भाजलेले कांदे गाजरे धुवून पुलावात घालताना जशी चिरतो तशी चिरावी. जून असल्यास मधला दाठर भाग काढून टाकावा. गाजरे खोबरे जरासे भाजून घ्यावे. आता कांद्याच्या पाकळ्या+भाजलेले खोबरे+दाण्याचे कुट हे बारीक वाटून घ्यावे. भाजलेले खोबरे शेंगदाणा कूट बारीक वाटलेला मसाला मॅरेनेशन साठी मिसळीचा मसाला आणि लिंबाचा रस यांची पेस्ट बनवावी घट्ट वाटल्यास अगदी थोडे पाणी घालावे. मॅरेनेशन आता ही पेस्ट चिरलेल्या वांग्यांच्या चिरांमधे व्यवस्थीत भरावा. वरूनही लावावा. अर्धा तास ठेवावे. मॅरेनेटेड टप्पे. आता कढईत तेल घेऊन जिरे,हळदीची फोडणी करावी. त्यात कढिपत्या ऐवजी ताज्या पुदीन्याची पाने घालावीत. त्यावर वाटलेला मसाला घालून चांगला परतावा तेल सुटू लागले की गाजरे व मटार घालावे. (चावण्याचा प्रॉबलेम असल्याने मी मटार व गाजरे जरा वाफवून घेते) खमंग परतावे परतल्यावर आता त्यात वांग्याचे मॅरिनेटेड केलेले टप्पे खोचायचे आहेत टप्पे शिजणार्या मसाल्यात असे खोचावे वरून एक वाटी पाणी घालावे व जाड झाकण ठेऊन झाकणावर गार पाणी घालावे. चांगल्या २,३ वाफा येऊ द्यावा. आता गरन मसाला घालून ढवळावे. मीठ घालावे. पुन्हा बारीक गॅसवर वाफेवर शिजवावे. ग्रेवी पातळ हवी असल्यास त्या प्रमाणे पाणी घालावे. नेहमीच्या वांग्यांपेक्षा शिजायला जरा वेळ लागतो. हे ओव्हनमधे फारच चांगले होऊ शकते पण मी गॅसवरच करते. शिजल्यावर बैगन टप्पा तयार. बैंगन टप्पा तयार! ही डिश खाँसाहेबांची आवडती होती. त्यांचे एक शेत होते त्या शेतावर फैजल म्हणून एक नोकर होता. तो शेतातच पिकणार आयटम वापरून हे टप्पे करायचा. मी कधी तिथे गेले नाही पण घरच्या स्वैपाकघरात सुद्धा हे व्हायचे. त्यांच्या मुलीकडून मी हे शिकले. ते शेंगदाण्याच्या कुटाऐवजी काजू पेस्ट वापरतात. अतिशय छान लागते. खांसाहेब शेतावर गेले की फैजलला ट्प्याची फर्माईश व्हायची. आताच खांसाहेबांची बरसी झाली. त्या वेळेस मी केले होते माझ्या घरी.

वाचने 7560
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

In reply to by गौरीबाई गोवेकर

अतिशय छान आहे. मी तुमच्या लिंकवरचे फोटो पाहिले. चांगले आहेत. पण त्यांची सेटिंग्ज बदलावी लागतील. सध्या फक्त गुगलवर लॉगिन केले तरचे ते फोटो दिसत आहेत. जर पब्लिकला दिसतील असे सेटिंग केले तर इथेही दिसतील.

छोटी वांगी सहज मिळत नाही, मिळाले की लगेच अश्या पद्धतीची बैंगन टप्पा नक्की बनवून बघेन पाकृ व फोटो आवडले :)

ये ब्बात! आता फटू पाहून खरंच भारी वाटलं. "हळवे" कांदे हा शब्दप्रयोग विशेष आवडला! अवांतरः खांसाहेब म्हणजे कोण?

In reply to by आदूबाळ

बाळ, 'खांसाहेब म्हणजे भेंडिबाजार घराण्याचे महम्म्द तालिब खान. माझे गुरू. "माझी खांसाहेबांची खिचडी" ही रेसिपी चाळ. (वाच).

फारच चविष्ट दिसते आहे. अगदी एखादा राग आळवुन आळवुन म्हणावा तसा हा मसाला शिजवुन शिजवुन भाजी केली आहे.

मस्त दिसते आहे पाकृ. आई/बायकोला सांगुन नक्किच बनवून चाखावी लागणार.

बाकी मसाला चवदार वाट्तोय. वांग्याला पर्याय काय? घरी मला सोडून सगळ्याना आवड्तात. मी वांग्याच्या रेसिपी करत नाही, म्हणजे खायलाच नको.

In reply to by अनन्न्या

अनन्या वांगी न आवडणार्यांनी एकदा तरी करून खावाच. मते बदलतील वांग्याला इथे पर्याय काही नाही ग. वांगीच. :(

तों.पा.सु. नक्कीच करुन खायली जाईल.

वांग्यांचा पहिलाच फोटो बघून खपल्या गेले आहे! - (वांगी भयंकर आवडणारा) सोकाजी

प्रवासात टप्पा , गायनात टप्पा आणि आता व्यंजनात ही टप्पा.

आणि एकदम तोंपासु फोटो