लागणारे जिन्नस: १) कोव़ळी गावठी काटेरी वांगी, २) तीन गाजरे ४) अर्धी वाटी हिरव्या मटाराचे दाणे. ५) पाऊण वाटी किसलेले किंवा डेसीकेटेड सुके खोबरे ६)पाउण वाटी शेंगदाणा कुट ७) १ लिंबाचा रस. ८) मिसळ मसाला २ चमचे ९) गरम मसाला १ चमचा. १०) तेल.
वांगी स्वच्छ धुवुन त्याचे डेखाकड्चे टोक कापून टाकावे व संपूर्ण देठ न तोडता वांग्यांना उभी व आडवी चिर द्यावी (+अशी).
चिरताच वांगी पाण्यात बुडवून ठेवावी.
कांदे शक्यतो कांदेपातीला येतात तसे हळवे कांदे घ्यावेत, त्याने चव छान येते. कांदे मंद गॅसवर आख्खे भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर पाकळ्या सुट्या कराव्या
गाजरे धुवून पुलावात घालताना जशी चिरतो तशी चिरावी. जून असल्यास मधला दाठर भाग काढून टाकावा.
खोबरे जरासे भाजून घ्यावे. आता कांद्याच्या पाकळ्या+भाजलेले खोबरे+दाण्याचे कुट हे बारीक वाटून घ्यावे.
मॅरेनेशन साठी मिसळीचा मसाला आणि लिंबाचा रस यांची पेस्ट बनवावी घट्ट वाटल्यास अगदी थोडे पाणी घालावे.
आता ही पेस्ट चिरलेल्या वांग्यांच्या चिरांमधे व्यवस्थीत भरावा. वरूनही लावावा. अर्धा तास ठेवावे.
आता कढईत तेल घेऊन जिरे,हळदीची फोडणी करावी. त्यात कढिपत्या ऐवजी ताज्या पुदीन्याची पाने घालावीत. त्यावर वाटलेला मसाला घालून चांगला परतावा तेल सुटू लागले की गाजरे व मटार घालावे. (चावण्याचा प्रॉबलेम असल्याने मी मटार व गाजरे जरा वाफवून घेते) खमंग परतावे परतल्यावर आता त्यात वांग्याचे मॅरिनेटेड केलेले टप्पे खोचायचे आहेत
वरून एक वाटी पाणी घालावे व जाड झाकण ठेऊन झाकणावर गार पाणी घालावे. चांगल्या २,३ वाफा येऊ द्यावा. आता गरन मसाला घालून ढवळावे. मीठ घालावे. पुन्हा बारीक गॅसवर वाफेवर शिजवावे. ग्रेवी पातळ हवी असल्यास त्या प्रमाणे पाणी घालावे. नेहमीच्या वांग्यांपेक्षा शिजायला जरा वेळ लागतो. हे ओव्हनमधे फारच चांगले होऊ शकते पण मी गॅसवरच करते. शिजल्यावर बैगन टप्पा तयार.
ही डिश खाँसाहेबांची आवडती होती. त्यांचे एक शेत होते त्या शेतावर फैजल म्हणून एक नोकर होता. तो शेतातच पिकणार आयटम वापरून हे टप्पे करायचा. मी कधी तिथे गेले नाही पण घरच्या स्वैपाकघरात सुद्धा हे व्हायचे. त्यांच्या मुलीकडून मी हे शिकले. ते शेंगदाण्याच्या कुटाऐवजी काजू पेस्ट वापरतात. अतिशय छान लागते. खांसाहेब शेतावर गेले की फैजलला ट्प्याची फर्माईश व्हायची. आताच खांसाहेबांची बरसी झाली. त्या वेळेस मी केले होते माझ्या घरी.

वाचने
7560
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही घ्या लिंक.
फक्कड पाकृ
In reply to ही घ्या लिंक. by गौरीबाई गोवेकर
बैंगन अजून 'टप्प्यात' आलेलं
आलं का आता ट्प्यात?
In reply to बैंगन अजून 'टप्प्यात' आलेलं by प्यारे१
फटू दिसत नाहीत.
In reply to आलं का आता ट्प्यात? by गौरीबाई गोवेकर
https://plus.google.com
In reply to फटू दिसत नाहीत. by प्यारे१
आता बहुतेक दिसावेत फोटू.
छान. तोंपासू फोटू आहेत. आता
वा.. काय मस्त दिसतायत वांगी..
छानचं
ये ब्बात! आता फटू पाहून खरंच
बाळ,
In reply to ये ब्बात! आता फटू पाहून खरंच by आदूबाळ
सहकार्याबद्दल खूप खूप आभार.
फारच चविष्ट दिसते आहे. अगदी
+१ छान दिसतेय भाजी.
In reply to फारच चविष्ट दिसते आहे. अगदी by स्पंदना
छान...!!!
छान खमंग दिसतेय भाजी!
हाय कंबख्त
In reply to छान खमंग दिसतेय भाजी! by अनन्न्या
अनन्या वांगी न आवडणार्यांनी
In reply to छान खमंग दिसतेय भाजी! by अनन्न्या
अफाट चटकदार दिसतो आहे फोटो.
काय जबरी चटकदार दिसताहेत
जबरा पा कृ.
सुपर्ब
टप्पा
छान पाकृ