Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 14/04/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज स्वतंत्र भारताला वेगळे वळण देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. लाखो लोक या लोकोत्तर नेत्याला दैवत मानतात. या महापुरुषाला नम्र अभिवादन. गांधीजी नंतर आपल्या इतिहासावर एवढा परिणाम करणारा नेता अजुन दुसरा कुठला नसेल. या महापुरुषाला माझी आदरांजली
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16794
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

"गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करुन द्या म्हणजे तो बंड करुन उठेल"
मग झाली का गुलामी व गरिबी दूर ह्या गेल्या साठ वर्षात तुमच्या आरक्षणाच्या देणगीने?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

नसेल झाली दूर तर त्यात दोष आरक्षणाचा की भ्रष्ट राजकारणी आणि हरामी जनतेचा?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

तर आरक्षणाच्या परिणामाने गुलामी आणि गरिबी कुठवर कमि झाली ते तुम्हालाच दिसेल. अर्धवटराव

In reply to by चेतनकुलकर्णी_85

साहेब, का आम्हां गुलामांच्या मागं लागला आहात??? :प

> समान संधी ऐवजी आरक्षण घातकच. असो महिलांना शिक्षणात, नोकरीत आणि बसमधे, लोकल ट्रेनमधे आरक्षण दिले जाते त्याबद्दल काय म्हणणे आहे ?

In reply to by आशु जोग

मग फुकटचे खाऊन माजलेल्या लोकांची पण एक जात म्हणजे "कॅटेगरी " आहेच न?