Skip to main content

प्राध्यापकांचा विजय असो !

लेखक नाना चेंगट यांनी मंगळवार, 09/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी तर प्राध्यापक मंडळींविषयी आमचा दृष्टिकोन तुम्हाला माहित आहेच. आता हे आमचे नशीब की आम्हाला चांगले प्राध्यापक मिळाले नाहित. आमचे मित्रवर्य(आम्ही मानतो ते मानतात की नाही माहित नाही ;) ) श्रावण मोडक म्हणतात की कसे वागू नये हे तरी त्या प्राध्यापकांनी शिकवलेच ना ! मग त्यांचे उपकार आहेतच हे ! तर हे आम्हाला पटते त्यामुळे कुणी प्राध्यापक दिसला की आम्ही पटकन बाजुला होत त्यांना दंडवत घालतो आणि सटकतो. आमचे दुसरे मित्र प्राडॉ हे सुद्धा आमचे मित्रवर्यच (पुन्हा एकदा आम्ही मानतो ते मानतात की नाही माहित नाही ;) ) ह्यांना सुद्धा आम्ही नेहमीच दंडवत घालण्यासाठी वाकतो आणि ते आम्हाला प्रेमाने धपाटा घालतात. प्रेम जास्त असल्याने धपाटा जोरात लागतो हा मुद्दा वायला. तर प्राध्यापकांच्या संपाच्या घाग्यावर चर्चा चालू असतांना कुणीतरी विचारले की आयायायायाटी मधील प्राध्यापकांबद्दल काय? तर आम्ही सांगितले की सामान्य माणसांनी त्यावर चर्चा करु नये असा दंडक आहे. त्यामागे येथीलच एका चर्चेचा संबंध होता. त्यानुसार कुराण, आय्य्य्य्य्याटी अय्य्य्य्याएम्चे प्राध्यापक आणि मिपाचे संपादन याबद्दल चर्चा करण्यास मनाई आहे. असो तर असो. पण इतरांनी केलेल्या चर्चेचा संदर्भ घेऊ नये असा थोडीच आहे. तर दस्तुरखुद्द आयायायाया (एखाद दुसरा या राहिला तर माफ करा) टीच्या मुलांनीच केलेल्या चर्चेचा आस्वाद घ्यावा ! काय ! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19452909.cms

वाचने 4271
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

मला अगोदर वाटायच की धमकी फक्त गुंड लोकच देतात की काय ,प्राध्यापक पण काही कमी नाहीत अगोदर प्राचार्यांना धमकी दिली की आम्हाला सहकार्य करा नाहीतर आम्ही तुम्हाला नतंर सहकार्य करणार नाहीत आणी आता सरकारलाच धमकी http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4873396526269021248&S…

चर्चेचा आस्वाद घेतला... आता पुढे काय? इथे शिरेसली चर्चा करायची, का टायली करायची, का आस्वाद घेऊन गपचिप (गांजा वढल्यागत)पडून रहायचं? मार्गदर्शन करा...

In reply to by नाना चेंगट

अवो आमी कुटं आय्य्य्य्य्य्य्टी किंवा आय्य्य्य्य्य्य्य्य्मात गेल्तो? आमचे बॅचलर्स कालेजातले प्रोफेसर म्हणजे सगळे पाद्री लोक! कॉलेजच्याच हॉस्टेलमधे फकिरासारखे रहायचे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकतर शिकवायचे किंवा लॅब्रोट्रीत स्वतः प्रयोग करायचे, आणि रातच्याला दहा वाजता लायब्ररी बंद होईपर्यंत लायब्ररीत जर्नलं वाचीत बसायचे!!! पाऽऽऽप! देवमाणसं हो!!!

अगं बै !! नानुलीचा धागा ! आमच्या कालेजातले सुद्धा मोजुन तीनच शिक्षक शिकवायचा त्रास घ्यायचे. बाकीचे वर्गावर उशीरा येउन हजेरी घेउन, पोरांवर ओरडण्यातच वेळ घालवायचे. जमलंच तर शेवटच्या १५ मिंटात फळ्यावर कैतरी खरडुन आम्हाला उतरवुन घ्यायला सांगायचे.

काय सांगता? आयायायायाटीच्या पोरांना शिकवायची गरज पडते? काय ऐकावं ते नवलच! आम्हाला वाटलं आयायायायाटीत जाणारे लोक जन्मतःच लै हुश्शार अस्तात म्हणे? युयुत्सुभौंना बोलवा.

प्राध्यापकांच्या ३ प्रमुख पोट जाती आहेत. १.पगार प्राध्यापक = पगारापुरते प्राध्यापक २.शिकवणी प्राध्यापक = कोलेज पेक्षा क्लास वर भर ३.मिरवणूक प्राध्यापक = वर्तमानपत्रे , परिसंवाद , परिषदा ह्यातून "स्व"मिरवणे.

मला तरी आत्त्ता पर्यंत अप्रतिम प्राध्यापक मिळालेत जाधव सर , माळी सर शिर्केसर ह्यांनी त्यांचा विषय इतक्या अप्रतिम पध्दतीने शिकवला की आज त्याविषयात करीयर करीत आहे . जगताप सरांनी गणित इतके मस्त शिकवले की जॉब करत असतानाही आज गणितात पी एच डी करायची इच्छा जिवंत आहे ! देव सर , हे खरेतर कॉम्पुटर सायन्स चे ...पण ह्यानी मला भगवदगीता शिकवली ...आयुष्यभराची शिदोरी !! आयेसाय मधले प्राध्यापक तर एक से एक संशोधक होते ...त्यांच्या विषयी काहीही बोलायची औकात नाही माझी !! शेवटी प्राध्यापक हे फक्त दिशादर्शक असतात ... रस्ता विद्यार्थ्यांनाच चालायचा असतो :) आणि जर हेच पुढची पिढी घडवणारे प्राध्यापक त्यांच्या पर्सनल लाईफ मधे खुष नसतील तर कसे शिकवु शकणार ? आयायटीचा मेन प्रॉब्लेम विध्यार्त्यांची भारंभार संख्या अन प्राध्यापकांवरच्या संशोधन व्यतिरिक्त जबाबदार्‍या हा आहे ... अर्थात उडीदामाजी काळे गोरे असणारच ह्यात शंका नाही पण ...तरीही .... प्राध्यापकांविषयी सरसकट विधाने करु नयेत अशी नम्रातिनम्र विनंती :)

In reply to by प्रसाद गोडबोले

मला तरी आत्त्ता पर्यंत अप्रतिम प्राध्यापक मिळालेत जाधव सर , माळी सर शिर्केसर ह्यांनी त्यांचा विषय इतक्या अप्रतिम पध्दतीने शिकवला की आज त्याविषयात करीयर करीत आहे . जगताप सरांनी गणित इतके मस्त शिकवले की जॉब करत असतानाही आज गणितात पी एच डी करायची इच्छा जिवंत आहे ! देव सर , हे खरेतर कॉम्पुटर सायन्स चे ...पण ह्यानी मला भगवदगीता शिकवली ...आयुष्यभराची शिदोरी !!
शिशुविहार/शाळा/क्वालेज मधलं गुरूपोर्णिमेनिमित्त भाषण चालू असल्यासारखं वाटलं. ;) आता कशाला वाईट बोला, म्हणून गुरूजनांविषयी गोग्गोड बोलणार्‍या प्रतिक्रिया पैशाला पासरी मिळतील.
आणि जर हेच पुढची पिढी घडवणारे प्राध्यापक त्यांच्या पर्सनल लाईफ मधे खुष नसतील तर कसे शिकवु शकणार ?
म्हणजे त्यांच्या कुठल्या कुठल्या 'सोयी' करायच्या ते खूष रहावे म्हणून? असो.

In reply to by दादा कोंडके

गुरूपोर्णिमेनिमित्त भाषण =)) ह्यावर प्रतिक्रिया देणे टाळत आहे
कुठल्या कुठल्या 'सोयी' करायच्या ते खूष रहावे म्हणून?
>>> १) सर्वात प्रथम प्राध्यापकांचे मुळ काम प्राध्यापकी हे नाही ...मुळ काम संशोधन... त्याच्या जोडीला , वाटले तर ...प्राध्यापकी... असे हवे २) विद्यार्थ्यांची संख्या कमी करा . प्राध्यापक टू स्टुडन्ट रेशो १:२ असला पाहिजे मॅक्सीमम !! ३) प्राध्यापकांची संशोधन व शिक्षणेतर कामे पुर्ण ऑट सोर्स करावीत ४) प्राध्यापकांना वर्षातुन ३ महिने रीसर्च सबॅटीकल मिळावी पाहिजे त्या विद्यापीठात ५) रीसर्च पेपर पब्लीकेशन आणि रीसर्च कॉन्फरन्स प्रेसेन्टेशन वगळता प्राध्यापकांना कोणतीही टारगेट्स नसावीत. ६) प्रमोशन्स पुर्णपणे अ‍ॅकॅडेमीक परफॉर्मन्स वर ठरावे ७) प्राध्यापकांना बाहेरील कॉर्पोरेट्स ना कन्सल्टन्सी करण्याची परमिशन असावी अशा बर्‍याच सोयी करायला हव्यात ...

In reply to by तर्री

भारतीय सांख्यिकीय संस्थान , कलकत्ता मधे ह्यातील बर्‍याच सोयी उपलब्ध्द आहेत :) ( खाजगीत : अर्थात ही खुपच प्रीमीयम शिक्षण संस्था आहे. आयायटी , आयायेम पेक्षाही प्रीमीयम कदाचित )

In reply to by प्रसाद गोडबोले

+११११११११११. एसक्यूसी-ओआर डिपार्टमेंटकडे लै कन्सल्टन्स्या आहेत. पण सर्वात भारी लोक आहेत ते स्टॅट-मॅथ युनिटमधले. क्रिप्टो आणि प्रोबॅबिलिटी हे दोन रिसर्च ग्रूप सगळ्यात टॉपला आहेत. शिवाय ट्यूशन फी लॉग(१) इतकी भरभक्कम ठेवणे अजून कुठे पाहिले नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

१) सर्वात प्रथम प्राध्यापकांचे मुळ काम प्राध्यापकी हे नाही ...मुळ काम संशोधन... त्याच्या जोडीला , वाटले तर ...प्राध्यापकी... असे हवे
चूक. संशोधन आणि प्राध्यापकी वेगळी आहे. त्यातून त्यांना आवड असल्यास पदरमोड करून आवड जोपासावी लागेल. कुठल्याही यत्तेतल्या विद्यार्थ्याना शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांपेक्षा त्यांना जास्तं ज्ञान असणं त्या पदाची गरज आहे. त्यासाठी काय करावं लागेल ते प्राध्यापकांनी ठरवावं. सरकारनी काही मदत करावी अशी इच्छा असेल तर 'आउटपूट' दाखवावं.
२) विद्यार्थ्यांची संख्या कमी करा . प्राध्यापक टू स्टुडन्ट रेशो १:२ असला पाहिजे मॅक्सीमम !!
प्राध्यापकच काय अगदी पोलिसांना सुद्धा असले रेशो लागू होतात. पण तसे रेशो झाले तर काय क्रांती होणार आहे ते सांगावं.
३) प्राध्यापकांची संशोधन व शिक्षणेतर कामे पुर्ण ऑट सोर्स करावीत
का? शिक्षण खात्यासंदर्भातलं (निवडणुकीचं काम आता करतात का ते माहीत नाही) काम सोडून बाकीचं काय काम करतात? स्वातंत्र्या नंतरच्या काळात साक्षरतेचं प्रमाण खूप कमी होतं त्यामुळे जवळ जवळ सगळ्या सरकारी कांमांसाठी प्रत्येक गावात लिहता-वाचता येणारे हक्काचे मास्तर लोक होते. ते ही हे काम प्रामाणिकपणे करायचे. आता एव्हड्या वर्षानंतर साधी साधी काम करायला १०-१२वी झालेल्या लोकांना जमत नसेल तर त्याची नैतीक जबाबदारी या प्राध्यापक मंडळींनी घेउन ती कामं फुकटात करायला पाहिजेत. :))
४) प्राध्यापकांना वर्षातुन ३ महिने रीसर्च सबॅटीकल मिळावी पाहिजे त्या विद्यापीठात ५) रीसर्च पेपर पब्लीकेशन आणि रीसर्च कॉन्फरन्स प्रेसेन्टेशन वगळता प्राध्यापकांना कोणतीही टारगेट्स नसावीत. ६) प्रमोशन्स पुर्णपणे अ‍ॅकॅडेमीक परफॉर्मन्स वर ठरावे ७) प्राध्यापकांना बाहेरील कॉर्पोरेट्स ना कन्सल्टन्सी करण्याची परमिशन असावी
या वरच्या सोयी देण्यासाठी त्यांच्या प्रिरिक्वसिटस काय आहेत. त्यांच्या निवडप्रक्रियेचे निकष काय असले पाहिजेत हे ही कळू द्या आम्हाला. आणि या सोयी दिल्या तर या निकषानुसार निवड न झालेल्या प्राध्यापकांना 'न्वाट इलिजिबल फ्वार टीचींगचा' शिक्का __वर मारून हाकलून देणार का?

In reply to by दादा कोंडके

आपण अशीच उद्दात्त शिक्षण संस्कृति निर्माण करा ... २-४ कारकुन माझ्या कंपनीतही घेईन मी तुमच्या देशातुन ;)

धाडस आहे त्या विद्यार्थ्यांचे. इथले आयायटीयन्स काय म्हण्ताहेत म्हणे?

फर्ग्युसन अन आयायटी दोन्हीच्या अनुभवात तुलना करता फर्ग्युसनला ९/१० तर आयायटीला ३/१० मार्कं देते. ०=सपक, रसहीन, १०=विद्यार्थ्यांमधील सुप्त स्फुल्लिंग जागृत करणारे. फर्गुसनमधील "एम प्रकाश, आचार्य आणि अन्य प्राध्यपकांचे गणित शिकवणे ही गणिताची मनोभावे केलेली आळवणी असे, अत्यंत तन्मयतेने व निष्ठेने केलेली पूजा असे. आयायटीत तेच रसहीन, यांत्रिक ,आटोपण्याचे काम होते. कुठे एम प्रकाश सरांनी वर्गावर घातलेले गारुड (चांगल्या अर्थाने) अन कुठे आयायटीतील रुक्ष, सपक कंटाळवाणे तास. नो वंडर दर तासाने विद्यार्थी कॉफी घ्यायला धावायचे. असो. एम प्रकाशांचा वर्ग विसरणे निव्वळ अशक्य आहे.

In reply to by आतिवास

अगदी बरोबर. प्रकाश मूलबागम.

In reply to by शुचि

अ‍ॅज फार अ‍ॅज आय रिर्मेम्बर - सर कानपूर आयायटी चे विद्यार्थी आहेत. त्यांनी पी एच डी करता मुंबइ आयायटीत प्रवेश घेतला होता (ज्या वर्षी मी दाखल झाले नेमका त्याच वर्षी) पण पूर्ण केली की नाही नीट माहीत नाही. सर कॅंपसवर बुद्धीबळ खेळासाठी प्रसिद्ध होते. सरांच्या अन्य काही चांगल्या गोष्टी आहेत. त्या पुन्हा कधीतरी. सरांना सॅल्यूट!!!

'यथा प्रजा तथा राजा' (नाही, उलटं नाही लिहिलं चुकून, बरोबरच आहे ते!) किंवा सायबाच्या भाषेत म्हणतात तसं 'A society gets the leaders it deserves' यांच्या चालीवर 'A student gets teachers s/he deserves.' असं म्हणतो. थोडं अधिक इस्कटून सांगायचं तर चांगल्या शिक्षकाच्या ज्ञानाचा वापर करून घेण्याची कुवत विद्यार्थ्यामधे असायला लागते. बाकी मग सगळे पोलिस चोर असतात, सगळे प्राध्यापक पाट्या टाकतात, सग्गळे सरकारी नोकर भ्रष्ट असतात वगैरे समजणार्‍या नि तसे ठाम प्रतिपादन करणार्‍यांना त्यांच्या गृहितकासहित जगू द्यावे इतपत सहिष्णुता शिकवली ब्वॉ आमच्या मास्तर लोकांनी.

In reply to by रमताराम

सहमत आहे. आम्ही आपले गुरुने शिष्याला स्वतः तयार करावं, त्याची कुवत नसेल तर त्याला आपल्यासारखं घडवावं असंच समजत होतो. आता शिष्य जर इतका हुषार असेल तर त्याला गुरुची गरजच काय हा प्रश्न पडला पण त्याला फाट्यावर मारायला हरकत नाही. सहीष्णूता म्हणजे काय हे विचारणार होतो पण तुमच्या चिंतनात व्यत्यय नको म्हणून गप्प बसतो :)

In reply to by नाना चेंगट

सहीष्णूता म्हणजे काय हे विचारणार होतो पण तुमच्या चिंतनात व्यत्यय नको म्हणून गप्प बसतो >> ह्ये असं नाय करायचं हां. हानायला दंडुका आनलाय न्हवं, त्यो माग दडिवलाय त्यो. हाना बगू. कस्लं चिंतण कस्लं काय येक दांडकं हानलं का जाग्यावर येतंय बगा.