पुरुष विभाग - धागा क्र. १ - सेक्सी स्टबल आणि गर्लफ्रेंड/बायकोच्या तक्रारी
पुरुषांचे काही खास प्रश्न असतात. त्यांच्या जिव्हाळ्याचे काही विषय असतात. बहुतकरून स्त्रियांना त्यांच्यात रस असतोच असं नाही. आणि काही विषय तर स्त्रियांना लागूच होत नाही. त्यामुळे अशा विषयांवर स्त्रियांचे प्रतिसाद कितपत ग्राह्य धरावे हा प्रश्नच पडतो. तरी पुरुष आयडींनी मनमोकळेपणाने प्रतिसाद द्यावेत ही विनंती. आता तुम्ही म्हणाल, की असं काय आहे जे पुरुषांना असतं आणि स्त्रियांना नसतं? उत्तर सोपं आहे - दाढी. किंबहुना एका प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिद्धांतानुसार अनेक तरुणींना बीअर्ड एन्व्ही निर्माण होते त्यामुळे ती कमतरता झाकण्यासाठी त्या पुरुषांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. ठरलेल्या भेटण्याच्या ठिकाणी बॉयफ्रेंडला पाउण तास ताटकळवणं हे त्याच बिअर्ड एन्व्हीमधून येतं.
दररोज दाढी करायला लागणं हा पुरुषजातीला मिळालेला शाप आहे. पण एके काळी असं नव्हतं. आपल्या संस्कृतीत दाढीला प्रचंड महत्त्व होतं. सर्व ऋषिमुनी पांढऱ्याशुभ्र दाढ्या राखून असायचे. द्रोणाचार्य, भीष्म वसिष्ठ वगैरे लोकांची आपल्याला दाढीशिवाय कल्पनाच करता येत नाही. किंबहुना विश्वामित्र वगैरे मंडळी आपल्या लांबलचक दाढ्या सावरून तपश्चर्येला बसली की इंद्राचं स्वर्गातलं आसन डळमळायला लागायचं. मग तो मेनकेसारख्या कोणालातरी ती तपश्चर्या भंग करायला पाठवून द्यायचा. आणि ती मेनकाही मनोभावे सेवा करायची. विश्वामित्रच दाढी हलवत तिने पुढे केलेलं पोर 'हे माझं नाही' म्हणून मान हलवायचा. ते फारसं महत्त्वाचं नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की सुंदर स्त्रियांवर प्रभाव पाडण्यासाठी पूर्वी दाढी करण्याची गरज पडत नसे. अलिकडच्या काळात (म्हणजे गेल्या चारेकशे वर्षांत) दाढी ही राजांची निशाणी असायची. शिवाजी महाराजांना सुंदर दाढी होती. सर्व मुघल बादशहांना दाढ्या होत्या - एक अकबर सोडला तर (संदर्भ - जोधा अकबर हा अविस्मरणीय चित्रपट. खासकरून त्यातल्या अकबराच्या शरीरप्रदर्शनासाठी) रामदास, गुरु नानक यांना दाढ्या होत्या.
मात्र ब्रिटिशांचं राज्य आलं आणि त्यांनी सगळ्यांच्या दाढ्या कमी केल्या. भारतीय जनतेला आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक बाबतीत खच्ची करून टाकलं. आणि मग सर्वच क्षेत्रांमध्ये पाश्चात्यांचं अंधानुकरण सुरू झालं. देवानंद, राजेश खन्ना, कुमार गौरव (तोच तो जो विजेता पंडित पेक्षाही गोग्गोड दिसत होता तो), आमीर खान वगैरे सर्व चॉकोलेट हिरोंनी गुळगुळीत चिकण्या चेहेऱ्यांनी तत्कालीन तरुणींच्या तोंडून "ऐय्या क्यवढा गोsssड आहे नाही! चो च्वीssssट." वगैरे उद्गार काढवून दाढी वाढवण्याची इच्छा असणाऱ्यांची स्वप्न वस्तऱ्यांनी छाटून टाकली.
आता मात्र परिस्थिती बदलते आहे. चाळिशीत कॉलेजकुमारांची कामं करणारे, पोटं सुटलेले, त्वचा निबर झालेले, आणि एखाद्या तुपाच्या व्यापाऱ्याची असावी तशी शरीरयष्टी असलेले हिरो लयाला गेले आहेत. त्याजागी नवीन रफ ऍंड टफ, सिक्सप्याकवाले, तरुण हिरो आलेले आहेत. आपल्या जवळपास समवयस्क बाईला 'मॉं मै बीए पास होगया' म्हणणारे हिरो जाऊन भाईगिरी करणारे, बकाल वस्तीत फिरणारे, सतत दाखवता येतील असे बायसेप्स बाळगणारे हिरो आले. ही रांगडी प्रतिमा राखण्यासाठी अनेकांनी दाढीकडे एक पुनर्कटाक्ष टाकला. आणि जागोजागी स्टबल राखलेले, डोळे बारीक करून हिंस्र भाव डोळ्यात आणलेले हिरो दिसायला लागले (जागोजागी म्हणजे गल्लोगल्ली, वेबसाइटोवेबसायटी - शरीरावर वेगवेगळ्या जागी नाही).
नुकत्याच मिपावर झालेल्या तुम्हाला कोण सेक्सी वाटतं या चर्चेत 'स्टबल ठेवणारे केवढे सेक्सी असतात, भुकेले वाटतात' वगैरे मतं स्त्रीवर्गाकडून मांडली गेल्याचं आठवतं. त्यामुळे स्टबल ठेवण्याकडे पुरुषांचा कल व्हायला लागलेला आहे. आठवड्यातून एकदाच दाढी करायला लागणं हा आणखीनच ऍडेड ऍडव्हांटेज. दररोज दाढी केल्याने गालावरची सुकुमार त्वचा खरवडली जाते. ज्या पुरुषांना आपल्या त्वचेची काळजी घ्यायची असेल त्यांच्यासाठी ही आपत्तीच ठरते. दररोज दिवसांतून पाच ते दहा मिनिटं दाढी करण्यात घालवल्याने वेळही वाया जातो. आजच्या धकाधकीच्या काळात जिथे दिवसातून मोकळा वेळ जिथे फक्त चारेक तास मिळतो, त्यातली पाच मिनिटंही घालवणं म्हणजे तीन टक्के आयुष्य फुकट घालवण्यासारखं आहे. तेव्हा अधूनमधूनच दाढी करणं केव्हाही चांगलं.
एवढे सगळे फायदे असले तरी एक मोठा तोटा आहे - तो म्हणजे गर्लफ्रेंड किंवा बायको 'दाढी टोचते' म्हणून तक्रार करते. आपण रोमॅंटिक मूडमध्ये येऊन तिच्या जवळ जावं, तर ती गालावरून हात फिरवून खुंट कुरवाळते आणि लांब जाते. आणि दाढी केल्याशिवाय जवळ येऊ देत नाही. हा अनुभव सार्वत्रिक आहे. काही अपवाद असतील पण ते विरळा.
एका बाजूने फॅशनची माध्यमं स्टबलधारी सेक्सी पुरुषांच्या चित्रांचा मारा करतात. आणि या पुरुषांची चित्रं कोण बघतं? तर स्त्रियाच. त्यामुळे एका अर्थाने त्याच या सवयीला जबाबदार आहेत. त्याचबरोबर सुकुमार त्वचेची निगा राखणं, वेळेची होणारी बचत, दाढीसामानाच्या खर्चावर होणारी बचत या सर्वच बाजूंनी विचार केला तरीही किंचित दाढी ठेवणं फायद्याचंच आहे. मात्र स्त्रिया दुटप्पीपणा करून एका बाजूने मागणी करतात आणि दुसऱ्या बाजूने आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला ते करण्यापासून वंचित ठेवतात. म्हणजे 'शिवाजी जन्मावा तर शेजारच्या घरात' अशी भूमिका ठेवतात. यामुळे पुरुषमनाची जी कुतरओढ होते ती कळायला पुरुषाच्या जातीतच जन्म घ्यायला हवा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अहाहा.
जाऊ दे !
बोला की....
आं
छे हो
विद्रोही ?
विद्रोही
पुरुष विभागाचा पहिलाच धागा
पुरुष विभागाचा पहिलाच धागा
हा घ्या तेवढाच पुरुषी विषय
पांढरी दाढी
.
गुड वन!
या प्रश्नावर स्त्रियांकडून
आँ?
ज्योती जपून. या "मान ना मान
ऑ?
धाग्याच्या नावातच
पण 'राखीव' हा शब्द नाही तिथे.
वा वा वा
काही विस्कळीत टीप्स.
परिपक्व विचार, पिळदार
देवानं तसा अन्यायच केला आहे.
उदा. ???
गर्लफ्रेंड/बायकोच्या तक्रारी येऊ नये म्हणून
लेख ठीक आहे पण उत्कृष्ट मराठी
आँ ??
पुरुष विभाग - धागा क्र. १ -हे मला कसे काय दिसते आहे ? हा माझा डू आयडी आहे की काय ?दाढीनंतर
खिक्क.
अबब!
काननबाला
काननबाला...
काननबाला हा शब्द भन्नाट
=))
पुरुषांच्या प्रायव्हसीचा मान
आपणच सिक्स पॅक अॅब्स
दररोज दाढी करायला लागणं हा
परफेक्ट
खी...खी.खी.
ऑ ?
हेहेहेहे
परा,अरे त्या सहीचं काय घेउन
च्यायला !
बाण्या, लेका वहिनींनी ही सही
जय हो!! जय हो!!!! घासूगुर्जी
घोटून घोटून गुळगुळीत झालेला /
प्रतिसाद आवडला
रेसिप्रॉसिटी महत्त्वाची.
पुरुष जमाती वरील अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा धागा .
लेखनाच्या भावनेशी सहमत