Skip to main content

मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज) : बे रूज (Baie Rouge)

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 12/04/2013 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
‘मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज)’ मालिकेतील आजचे मॉकटेल आहे 'बे रूज' पार्श्वभूमी: बे रूज हा एक फ्रेंच शब्द आहे. त्या अर्थ Red Bay. मोनिन ह्या प्रख्यात फळांचे सिरप बनवणार्‍या फ्रेंच कंपनीचे सिरप रिलायंस मॉल मधे शोधाशोध करताना मिळाले. हे मॉकटेल 'ब्लॅक करंट' ह्या फळाच्या सिरप पासून बनले आहे. त्या बाटलीवर एक कॉकटेल आणि एक मॉकटेल अशी रेसिपी असते. ही रेसीपी त्या सिरपच्या बाटलीवरच मिळाली :) फारच सोपी रेसिपी आहे ही, साहित्यही एकदम लिमीटेड. साहित्य:
मोनिन ब्लॅक करंट सिरप १० मिली
क्रॅनबेरी ज्युस २ औस (६० मिली)
सोडा
बर्फ
स्ट्रॉ
लिंबाची चकती सजावटीसाठी
ग्लास मॉकटेल ग्लास
कृती: सर्व साहित्य (सोडा सोडून) शेकर मध्ये बर्फ टाकून व्यवस्थित शेक करून घ्या. शेकरला घाम फुटला की मॉकटेल झाले असे समजावे. आता ग्लासच्या रीमला लिंबाचा काप लावून मॉकटेल सजवा. लालसर रंगाचे 'बे रूज' तयार आहे :)

वाचने 6206
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

वाह!!!!!! उन्हाळ्यात अगदी गारेग्गार वाटलं, कृती पण एकदम सोपी.

मॉकटेल असल्याने बरं वाटलं पण सोड्याचा सदुपयोग कधी करायचा? क्रॅनबेरी ज्यूसमुळे रंग कोकसारखा आलाय. हे जरा बालकांचं पेय वाटलं.

In reply to by रेवती

हे जरा बालकांचं पेय वाटलं. पालकांसाठी ३० एम एल ,६० एम एल टाकुन शेक करायच हाय काय अन नाय काय.. ;)

सिरप रस बर्फ शेकरमध्ये शेक करून मग सोडा वरून सोडायचा असेलं. उत्सुक मंडळींनी सोडा टाकून शेकर हलवावा. ;)

झक्कास..

मस्त -सोपे आहे. दिसते मात्र कालाखट्टा नावाच्या प्लास्टिक पेप्सी प्रमाणे दिसते आहे. प्लास्टिक पेप्सी ह गाव-ब्रान्ड आता बंद झाला आहे. अमेरिकेतील पेप्सी ने हे नव चोरले व बाटलीत बंद केले.

झकास मॉकटेल उन्हाळ्याच्या दिवसात खासच ह्यात सोड्याच्या ऐवजी रेडबुल टाकले तर धमाल येईल. प्रयोग शाळेत जेवढे प्रयोग होत नसतील तेवढे मधुशाळेत होतात. रेड्बुल हे 'ब्लॅक करंट' सिरप सोबत फर्मास लागते. असा आमचा अनुभव आहे.