साहित्यः-१)५-६ ताजे बांगडे.
२)१०-१२ लाल मिरच्या.
३)हळद्पूड.
४)खवलेला नारळ(अर्धा नारळ)
५)५-६ आमसुले.
६)८-९ तिरफळे.
७)मीठ.
८)एक चमचा धणे.
कॄती :-बांगड्याचे तुकडे करून घ्यावे.खवलेले खोबरे,मिरच्या,धणे,हळद एकत्र वाटावे.वाटण आमटी करणार त्या
भांड्यात काढून घ्यावे.त्यात मीठ व ठेचलेली तिरफळे घालून शिजत ठेवावे.उकळायला आले की त्यात
बांगडे व आमसुले घालावी.व आमटी चांगली उकळून घ्यावी.
अग मिळत नाही की गं बांगडा येथे.
काय चव असते बांगडयाला. आहाहा!
मी भरलेला बांगडा येथे टाकला होता. मला खुप आवडते बांगड्याचा रस्सा अन भात खायला.
वाईट वाईट अवस्था झाली माझी.
एकदा काटे कुठे असतात ते माहित झालं की काही प्रश्न उरत नाही.
चपट्या कडा जिथे संपतात त्या दोन्ही बाजुला छोट्या काट्यांची एक रांग असते ती एका फटक्यात निघते.
मग उरला मधला मोठ्ठा काटा तो बांगडा अर्धा उकलुन काढुन घ्याय्चा, आहे काय त्यात.
लैच काटे असल्यामुळे नीट मन लावून खाता येत नाही पण काटे काढले कि एकदम चवीष्ट मासा.....भरलेला बांगडा तर अप्रतीम.....अपर्णा तुझी भरलेला बांगड्याची लिंक दिलीस तर ह्या वीकेंड ला करिन म्हणतोय :)
लिंक पाहिली आणि रेसीपीची प्रिंटाआउट घेतली आहे. अगं कुवेत मधे काय मीळत नाहि? पण आपण बाबा खायला आणि करायला सोपे अशाच माशांच्या वाटेला जातो...पापलेट, सुरमई, कोलंबी आणि कधी कधी बांगडा ह्या पलीकडे आपली उडि नाय :D
च्यायला काल बांगडा स्वप्नात आला होता आणि आज बघतो तर मिपावर हजर. :)
बादवे बांगड्याला 'फार' काटे असतात हे वाचून 'फार' गंमत वाटली.
यांना कुणी तरी कर्ली, काटेरी दाखवारे रे. ;)
आमटीचा रंग पण खास!
खरच! असल जेवण जेवायला हाताची बोटच चवदार लागतात. चमच्याने वगैरे अजिबात चव येत नाही.
आई ग! मी चक्क मिटक्या मारते आहे इथे बसुन त्या रश्श्याकडे बघुन.
बांगड्याची आमटी तीही तिरफळाची....व्वा! अगदी खासमखास बेत म्हणा की.
सुट्टीच्या दिवशी सणकून भूक लागली असावी बांगड्याची तिरफळंवाली आमटी, वाफाळणारा पांढराशुभ्र भात आणि एकतरी तळणीतली तुकडी.....नंतर तीनेक तास तरी, भणाणत्या पंख्या खाली, अगदी व्यत्यय विरहीत झोप. स्वर्ग..स्वर्ग म्हणतात तो तरी असा काय असतो?
नाही. ह्यात तेल, लसूण वापरत नाहीत. त्यामुळे माशाची चव जास्त उठून येते.
एक पर्यायी पाककृती म्हणून, आवडत असल्यास, कालवण तयार झाल्या नंतर २ मोठे चमचे (टेबल स्पून) खायचे खोबरेल तेल तापवून त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा परतून ते तेल नुसते वरून ओतायचे. त्याचीही एक आगळी वेगळी आणि मस्तं चव येते कालवणाला.
तिरफळे म्हणजे काय..?
In reply to तिरफळे म्हणजे काय..? by मोदक
सवीस्तर माहिती
In reply to सवीस्तर माहिती by चिंतामणी
ते ठीक आहे...पण
शेजवान पेपर
पाकृ छान आहे
अग मिळत नाही की गं बांगडा
In reply to अग मिळत नाही की गं बांगडा by स्पंदना
चव चांगली असते पण लैच काटे
In reply to चव चांगली असते पण लैच काटे by मोदक
एकदा काटे कुठे असतात ते माहित
In reply to एकदा काटे कुठे असतात ते माहित by स्पंदना
+१ टु मोदक आणि अपर्णा
In reply to +१ टु मोदक आणि अपर्णा by दिपक.कुवेत
ही घ्या.
In reply to ही घ्या. by स्पंदना
धन्यवाद अपर्णा
In reply to चव चांगली असते पण लैच काटे by मोदक
अगदी हेच कारण
झकास
तिरफळे म्हणजे काय
आमटी
In reply to आमटी by विनायक प्रभू
मेलो....
मलाही बांगडा आवडतो. मस्त वास
च्यायला काल बांगडा स्वप्नात
In reply to च्यायला काल बांगडा स्वप्नात by गणपा
यांना कुणी तरी कर्ली, काटेरी
यांना कुणी तरी कर्ली, काटेरी दाखवारे रे.कुनीतरी काहून..? तूच कर की एखादी रेशिपी. ;-)In reply to यांना कुणी तरी कर्ली, काटेरी by मोदक
ईथे असले उत्तम मासे मिळत
In reply to च्यायला काल बांगडा स्वप्नात by गणपा
खिक्क!!
नुसता फोटो बघुन तोंडाला पाणी सुट्ले...
मस्तच पाकृ.. पण इथे तिरफळे
खपलो :)
वा!
In reply to वा! by पैसा
+१
सोप्पी पा.क्रु.
आवडत नाही
बांगडा आवडता माझा.
स्वर्गसुख.
In reply to स्वर्गसुख. by प्रभाकर पेठकर
बास बास बास.....
वा वा काय जीवघेणा फोटो आहे.
यम्म
छान दिसत आहे
In reply to छान दिसत आहे by जासुश
खोबरेल तेल.
मला बांगडा पचत नाही
कारवारी हुमण