मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तिरफळाची बांगड्याची आमटी.

ज्योति प्रकाश · · पाककृती
साहित्यः-१)५-६ ताजे बांगडे. २)१०-१२ लाल मिरच्या. ३)हळद्पूड. ४)खवलेला नारळ(अर्धा नारळ) ५)५-६ आमसुले. ६)८-९ तिरफळे. ७)मीठ. ८)एक चमचा धणे. कॄती :-बांगड्याचे तुकडे करून घ्यावे.खवलेले खोबरे,मिरच्या,धणे,हळद एकत्र वाटावे.वाटण आमटी करणार त्या भांड्यात काढून घ्यावे.त्यात मीठ व ठेचलेली तिरफळे घालून शिजत ठेवावे.उकळायला आले की त्यात बांगडे व आमसुले घालावी.व आमटी चांगली उकळून घ्यावी.

वाचने 12661 वाचनखूण प्रतिक्रिया 37

स्पंदना 20/03/2013 - 04:47
अग मिळत नाही की गं बांगडा येथे. काय चव असते बांगडयाला. आहाहा! मी भरलेला बांगडा येथे टाकला होता. मला खुप आवडते बांगड्याचा रस्सा अन भात खायला. वाईट वाईट अवस्था झाली माझी.

In reply to by स्पंदना

मोदक 20/03/2013 - 05:00
चव चांगली असते पण लैच काटे असतात.. :-( नीट मन लावून खाता येत नाही.. त्यामुळे चव आवडत असूनही हा मासा खायला कंटाळा येतो.

In reply to by मोदक

स्पंदना 20/03/2013 - 05:23
एकदा काटे कुठे असतात ते माहित झालं की काही प्रश्न उरत नाही. चपट्या कडा जिथे संपतात त्या दोन्ही बाजुला छोट्या काट्यांची एक रांग असते ती एका फटक्यात निघते. मग उरला मधला मोठ्ठा काटा तो बांगडा अर्धा उकलुन काढुन घ्याय्चा, आहे काय त्यात.

In reply to by स्पंदना

दिपक.कुवेत 20/03/2013 - 11:58
लैच काटे असल्यामुळे नीट मन लावून खाता येत नाही पण काटे काढले कि एकदम चवीष्ट मासा.....भरलेला बांगडा तर अप्रतीम.....अपर्णा तुझी भरलेला बांगड्याची लिंक दिलीस तर ह्या वीकेंड ला करिन म्हणतोय :)

In reply to by दिपक.कुवेत

स्पंदना 20/03/2013 - 16:26
http://www.misalpav.com/node/15638 कुवेतला बांगडे मिळतात? फारच नशिबवान ब्वा तुम्ही. खावा खावा बांगडा खावा, भाकर्‍या हाणा. आम्ही आप्ले बसतो सुरमाई, कोलंबी करत.

In reply to by स्पंदना

दिपक.कुवेत 20/03/2013 - 19:39
लिंक पाहिली आणि रेसीपीची प्रिंटाआउट घेतली आहे. अगं कुवेत मधे काय मीळत नाहि? पण आपण बाबा खायला आणि करायला सोपे अशाच माशांच्या वाटेला जातो...पापलेट, सुरमई, कोलंबी आणि कधी कधी बांगडा ह्या पलीकडे आपली उडि नाय :D

In reply to by विनायक प्रभू

धमाल मुलगा 12/04/2013 - 04:34
=)) =)) =)) आयला! हे आमचं मास्तर म्हणजे लै डेंजर बाबा! कधी कुठं काय टाकतील काय सांगता यायचं नाही. -(एम.ए. (अप्लाईड आर्ट्स) ऑनर्स) धम्या.

गणपा 20/03/2013 - 13:37
च्यायला काल बांगडा स्वप्नात आला होता आणि आज बघतो तर मिपावर हजर. :) बादवे बांगड्याला 'फार' काटे असतात हे वाचून 'फार' गंमत वाटली. यांना कुणी तरी कर्ली, काटेरी दाखवारे रे. ;)

आधीच बांगडा ... त्यात तिरफळाच्या कालवणातला! तों पा सु हे शब्द खूपच तोकडे आहेत सध्याच्या अवस्थेचं वर्णन करायला...

पैसा 20/03/2013 - 22:31
फोटो एकदम सॉल्लिड आलाय!आणि आमटीचा रंग पण खास!

In reply to by पैसा

स्पंदना 21/03/2013 - 08:13
आमटीचा रंग पण खास! खरच! असल जेवण जेवायला हाताची बोटच चवदार लागतात. चमच्याने वगैरे अजिबात चव येत नाही. आई ग! मी चक्क मिटक्या मारते आहे इथे बसुन त्या रश्श्याकडे बघुन.

बांगड्याची आमटी तीही तिरफळाची....व्वा! अगदी खासमखास बेत म्हणा की. सुट्टीच्या दिवशी सणकून भूक लागली असावी बांगड्याची तिरफळंवाली आमटी, वाफाळणारा पांढराशुभ्र भात आणि एकतरी तळणीतली तुकडी.....नंतर तीनेक तास तरी, भणाणत्या पंख्या खाली, अगदी व्यत्यय विरहीत झोप. स्वर्ग..स्वर्ग म्हणतात तो तरी असा काय असतो?

In reply to by प्रभाकर पेठकर

धमाल मुलगा 12/04/2013 - 04:36
काकानु...एकतर आधी तो वर पाककृतीत टाकलेला फोटू, वर आणि तुम्ही केलेलं हे वर्णन...च्यायला, माझी गत म्हणजे 'नको देवराया अंत असा पाहूऽऽ' अशी झाली हो!

जासुश 28/07/2013 - 00:49
छान दिसत आहे.. ह्यात फोडणी वगैरे साठी तेल वापरावे लागत नाही का? मला बनवायची आहे ..तुमच्या व्यतिरिक्त इतर सदस्यांनी उत्तर दिले तरी चालेल ..

In reply to by जासुश

नाही. ह्यात तेल, लसूण वापरत नाहीत. त्यामुळे माशाची चव जास्त उठून येते. एक पर्यायी पाककृती म्हणून, आवडत असल्यास, कालवण तयार झाल्या नंतर २ मोठे चमचे (टेबल स्पून) खायचे खोबरेल तेल तापवून त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा परतून ते तेल नुसते वरून ओतायचे. त्याचीही एक आगळी वेगळी आणि मस्तं चव येते कालवणाला.

jaypal 28/07/2013 - 11:35
रंग अप्रतीम. च देखिल तशीच असणार. बहुतेक मी बांगड्याला अ‍ॅलर्जीक आहे. तेंव्हा रावस ,सुरमई किंवा पापलेट सारखा दुसरा मासा चालेल का?

कपिलमुनी 29/07/2013 - 08:13
या बांगड्याच्या कालवणाला कारवारकडे हुमण असे म्हणतात.. अतिशय चविष्ट असते ..आणि शिवाय लो कॅलरी :)