Skip to main content

धर्मांतर्.....पाकिस्तान आणि बरेच काही

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 27/07/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
मटा ने एक बातमी दिली आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15192839.cms या बातमीनुसार पाकिस्तानाते एका रीअ‍ॅलिटी शो मध्ये टीव्हीवर एका हिंदु तरुणाचे धर्मांतर लाइव्ह दाखवण्यात आले. पाकिस्तानात अल्पसंख्य सुरक्षीत नाहीत हेच खरे. तेथे हिंदु तरुणीना पळवून जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर केल्याच्या बातम्या येत असतातच. हेच जर उलट्या अर्थाने म्हणजे अल्पसंख्यांक इसमाचे हिंदु धर्मात धर्मांतर करताना नाटकात्/चित्रपटात जरी दाखवले असते तरी इथले मेणबत्ती मार्च वाले किती भडकले असते. तथाकथीत पुरोगाम्यानी त्यावर दिवसेन दिवस चर्वण केले असते. अल्पसंख्यांकांचे प्रेमाचे उमाळे येवून संसदेत खुर्च्यांचे फेकाफेक ,वगैरे झाले असते. तमस सिरीयल मध्ये दाखवले तसे दंगलींचे लोण पसरले असते. ( अर्थात मेणबत्तीमार्च वाले दंगलीत भाग घेत नाहीत. त्यांच्यामते दंगल नेहमीच गुंडानी घडवलेली असते) अर्थात असे हिंदु धर्मात धर्मांतर होणे हे सर्वथा अशक्य आहे ( टेक्नीकल मुद्दा : धर्मांतरीत इसमाला जात कोणती द्यायची? त्याने मागितलेली जात त्याला मिळू शकते का? उदा: कोणाला जात म्हणून कोकणस्थ किंवा सी के पी हवी असेल तर ती मिळू शकेल का? त्या जातीतील लोक त्या धर्मांतरीत इसमाशी रोटीबेटी व्यवहार करतील का? त्या धर्मांतरीत इसमास नव्या स्वीकारीत जातीनुसार राखीव जागांचा लाभ मिळू शकेल का? वगैरे वगैरे ) पण इथल्या एकाही तथाकथीत मिडीया सेलेब्रीटी ( जावेद अख्तर/राजदीप सरदेसाई) वगैरेनी मेणबत्ती मार्च वाल्यानी या घटनेचा निषेध केल्याचे अजुनतरी ऐकिवात नाही. पाकिस्तानात घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो.

वाचने 28277
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

In reply to by Trump

सुमारे नऊ वर्षापूर्वीचा हा लेख आहे. हिंदू प्रेमिंचा वेडा धर्म आविष्कार जास्तच उथळ झालेला आहे गेल्या काही वर्षात. या लेखातील भावनेचा एक दोन प्रतिसादकांनी त्यावेळेस खणखणीत समाचार घेतलेला आहे. आत्ताच्या काळात असे प्रतिवाद होणे निव्वळ दुरापास्त.

In reply to by सर टोबी

किंचित सहमत हिंदू प्रेमिंचा वेडा धर्म आविष्कार जास्तच उथळ झालेला आहे गेल्या काही वर्षात. उथळ म्हणण्यापेक्षा, हिंदु इतर अब्राहमिक रिलिजन कडुन शिकु लागले आहेत आणि त्यांना त्यांच्या भाषेत उत्तरे देउ लागले आहेत; असे म्हणणे योग्य ठरेल.

किंचित सहमत
हिंदू प्रेमिंचा वेडा धर्म आविष्कार जास्तच उथळ झालेला आहे गेल्या काही वर्षात.
उथळ म्हणण्यापेक्षा, हिंदु इतर अब्राहमिक रिलिजन कडुन शिकु लागले आहेत आणि त्यांना त्यांच्या भाषेत उत्तरे देउ लागले आहेत; असे म्हणणे योग्य ठरेल.