Skip to main content

दादांना झालय तरी काय???

लेखक वेताळ यांनी रविवार, 07/04/2013 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते श्री. अजितराव(दादा) पवार ह्यांनी आज सकाळी इंदापुर येथिल निबोंडी गावी झालेल्या सभेत एकदम वन्टास फुल्टु झालेल्या माणसासारखे भाषण केले. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाची त्यानी खिल्ली उडवली. त्यानी लाईट येत नसलेमुळे लोक मनोरंजन म्हणुन पोर जन्माला घालतात हाही शोध मांडला आहे. ह्या बाबत सविस्तर वृत मटा मध्ये आले आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19425252.cms अजितदादाना मुख्यमंत्री व्हायचे आहे,तिकडे युवराजाना पंतप्रधान व्हायचे आहे. पण दोघेही आड ना बुड पध्दतीने भाषणे ठोकत आहेत्.आता ह्या दोघाचे करायचे तरी काय? इतक्या गलिच्छ भाषेत भाषण करणारयाना राज ठाकरे किंबा बाळासाहेबाच्या भाषणावर टिका करण्याचा हक्क आहे काय? जाणत्या राज्यानी गावातल्या पोराटोराना सल्ला देण्यापेक्षा आपल्या घरीच संस्कार वर्ग सुरु करावेत काय? मिपाकराना काय वाटते?

वाचने 31992
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

In reply to by विलास अध्यापक

शेतकरी मल्ल्या सारखे कर्जे बुडवून उधळपट्टी करत हिंडत नाहीत.. सर्वच श्रीमंत कर भरतात ?? दर मार्च ला खोट्या भाडे पावत्या आणि मेडिकल बिले देउन कर चोरणारे जास्त आहेत.. आणि पैसा खर्च करायचे स्वातंत्र्य नक्की आहे.. खेड्यातही लाईट द्या तेही बिल भरतात..तेही रोड टॅक्स भरतात , त्यांनाही तेवढाच हक्क आहे.. पाणी हे नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचेही समान वाटप करा ..तुमच्या वाट्याला येइल तेवढी उधळा की !! एकांगी विचार करू नका ! परीस्थिती खुप गंभीर आहे

In reply to by कपिलमुनी

मेडिकल बिले देउन कर चोरणारे जास्त आहेत..
कर चुकवण्यात काय चुक आहे? भारतात कर कशाला भरायचा? राजकारण्यांच्या खिषात जातात ५० टक्के पैसे माझ्या कराचे आणि उरलेले ५०% सरकारी नोकरांच्या पगारावर.

In reply to by प्रसाद१९७१

तुमच्या मुद्दलातच चुक आहे ! आपण ज्या देशात राहतो त्याच्या सैनिकांचे पगार त्या करा मधुन होतात ...एवढा साधा विचार करुन टॅक्स भरत चला .. चोरी करणे चूक आहे ...भले ती चोराच्या घरी केली तरीही

In reply to by अधिराज

>>> खरच अवघड आहे, तिकडे ते लक्ष्मण माने १५ दिवसांपासून फरार आहेत. कालच ते पोलिसांसमोर हजर झाले व छातीत दुखायला लागल्याचे नाटक करून अटक टाळून सातार्‍यातल्या इस्पितळात भरती पण झाले. १९९९ मध्ये उदयन भोसलेला शरद लेवेच्या खुनाच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केल्यावर ५ व्या मिनिटाला छातीत दुखायचे नाटक करून तो इस्पितळात भरती झाला होता व नंतर तब्बल २ वर्षे इस्पितळात राहून खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लावल्यावर ५ व्या मिनिटाला खडखडीत बरा झाला होता.

टिकडे काका ट्विटरवर माफी मागटाहेत म्हणे

विनाशकाले विपरीत बुद्धी ! अशी म्हण ऐकली होती. ती सार्थ होताना बघतोय. ( मुळात विपरीत असायला बुद्धी असणे गरजेचे आहे म्हणा, बाकी आपण सुज्ञ आहातच. :) )

अनेक शेतकर्यांनी अनेक वेळी मिळतील तितकी कर्जे घेतलेली आहेत.इतरांना मदतीचे जाऊ द्या पण त्यांनी स्वतःची कर्जेदेखिल फेडली नाहीत.त्यांनी आय.पी.एल.सामने होऊ नयेत असे का म्हणावे ? तुम्ही अध्यापक ना,बरोबर आहे .... तिकडे बहुतेक सातारा जिल्ह्यातील एका धरणावर कुठल्याशा पिक्चर च्या शुटींगला दररोज मोटारी लावुन तिथल्या मैदानावर पाणी मारतात्,तिथला कुठला अधिकारी म्हणत होता की शेतकरी देउन देउन १००० /५०० देतो वर्षाचे,ह्या शुटींग वाल्यांनी दिड का दोन लाख कर भरलाय म्हणे,शेवटी महसुल हवा की नको असेही म्हणाला, असे हे निगरगठ्ठ अधिकारी.

दादाला काय बी झालं नाही, पैकाच्या बंडली मोजून मोजून वाईज खुळावल हाय गडी, रात दीवस पैकच पैक मोजयच खायचं काम नाही गड्या वो… बारामुतीच बेण हाय ते, निगरगट्ट कातडीच कीती बी काय बी बोला …. इकच उत्तर येईल बघा … " काका मी चुकलो माफ करा " पकरण संपल ….

अत्यंत निर्लज्ज आणि अश्लाघ्य वक्तव्य. अशा घाणेरड्या भाषेचा वापर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित नाही. राज आणि उद्धव नेहमीप्रमाणे 'सामना'च्या 'लोकमूत' परंपरेला जागलेले दिसताहेत.

In reply to by आजानुकर्ण

मुळ मुद्द्यावरचा फोकस इतरत्र कसा फिरवावा हे आपल्या कडुन शिकावे !! मुळ मुद्दा दुष्काळग्रस्तांची अशाघ्य भाषेत केलेली मस्करी तर फोकस राज , उध्दव काय बोलले ह्यावर ! राज उध्दव काय बोलतात ह्यावर स्वतंत्र चर्चा करा की राव ... इथे सत्तेतल्या मोठ्ठ्यानेत्याने केलेल्या भाष्याबाब्त बोलुदे लोकांना ... (अशीच अजुनही खुप उदाहरणे पाहण्यात आहेत इतरांकडुन मुळ मुद्दा २६/११ तर फोकस करकरेंना तिथे कोणी पाठवले मुळ मुद्दा गुजरातचा विकास झालाय की नाही तर फोकस मोदी यमदुत आहेत मुळ मुद्दा हुतात्मा चौकात स्मारकाची विटंबना केणी केली तर फोकस आसाम मधे अत्याचार होतात म्हणे मुळ मुद्दा दिल्ली गॅन्ग रेप केस मधले सगळे भय्ये आहेत तर फोकस राज देश तोडताहेत मुळ मुद्दा एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या इतरांच्या प्रमाणात प्रचंड वाढत आहे तर फोकस त्या समाजामधे शिक्षणाचा अभाव आहे म्हणुन मुळ मुद्दा एक पक्ष परंपरागत भ्रष्टाचारात गुंतला आहे तर फोकस भाजपानेही भष्टाचार केला . म्हणजे मुळ मुद्दा क्ष आहे तर फोकस य ही एक मुद्दा आहे ह्यावर हे भारीये ) असो बाकी चालुच द्या

In reply to by प्रसाद गोडबोले

अत्यंत निर्लज्ज आणि अश्लाघ्य वक्तव्य. अशा घाणेरड्या भाषेचा वापर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित नाही.
यापेक्षा आणखी काय लिहायला हवे होते? राज/उद्धव यांनी अगदी सुसंस्कृत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काय?

In reply to by आजानुकर्ण

राज/उद्धव यांनी अगदी सुसंस्कृत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काय?
उद्धव यांच्या प्रतिक्रियेत मला तरी असुसंस्कृत असे काही वाटले नाही. त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणेच सौम्य शब्दांत प्रतिक्रिया मांडली आहे.

In reply to by आजानुकर्ण

उध्दव ह्यांची प्रतिक्रिया वाचली नाही , पण राज ह्यांची प्रतिक्रियाही निषेधार्हच आहे , फक्त त्यावर इतरत्र चर्चा व्हाव्ही , राज हेही अश्लाघ्य बोलले हे दाखवुन उपमुख्यमंत्रा काय बोलले हे डायलुट करु नये इतकेच म्हणायचे होते आणि दुष्काळ , युध्द, अंतर्गत धार्मिक कलह सारख्या अंतर्गत गंभीर बाबतीत पक्षीय राजकारण बाजुला ठेवायला आपण कधी शिकणार ? ( इथे आपण म्हणजे भारतीय ह्या अर्थाने )

In reply to by प्रसाद गोडबोले

सत्तधारी निर्लज्ज आहेत म्हणून विरोधकानी पण बेशराम् व्हयाच का? अजित पवार यांचा निषेध करायचा तर या शिवराल विरोधी नेत्यांचा का नको. महाराष्ट्रात शिवराल संस्कृती रुजवन्यात त्यांचा पण खारीचा वाटा आहेच की

In reply to by पिंपातला उंदीर

खारीचा की वाघाचा? या मूत्रप्रकरणावरून सामनामध्ये आलेला वटवटवागळे हा अग्रलेख आठवला. दुर्दैवाने त्याचा दुवा सापडत नाही... पण त्यात आयबीएन लोकमूत व दर्डाशेठचे मूत वगैरे पत्रकारितेचे रासायनिक विश्लेषण मोठ्या प्रमाणावर केले होते.

जालावर हे चित्र सापडले.

घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ मराठवाड्याचा काय महारवाडा करायचा आहे का काय हजरातबाल हजरातबाल लावून ठेवल आहे इथे या आणि (एका विशिष्ट अवयवाकडे इशारा करून) वाटेल तेवढे बाल घेऊन जा -एका विशिष्ट हृदयसम्राताने केलेली भाषण मात्र ही भाषण ठाकरी शैली म्होऊन नावजाली गेली.

In reply to by पिंपातला उंदीर

असं बोलायचं नाही! शिवराळपणा आणि ठाकरी शैली असा फरक ही वक्तव्ये कोण करते यावर अवलंबून असतो. दिवंगत ठाकऱ्यांच्या एका सभेमध्ये 'केवळ हिंदूंना पुरावे विचारले जातात मात्र, हजरतबलचा केस हरवला तेव्हा आम्ही विचारले होते का तो डोक्याचा केस होता की इतर कुठल्या अवयवाचा (येथे कमरेजवळ गिटार वाजवल्यासारखा हात हलवण्याचा अभिनय)" असे वाक्य ऐकल्यानंतर अनेक महिला सभेतून उठून गेल्या होत्या हे आठवते.

In reply to by पिंपातला उंदीर

इतके मागे कशाला जायचे? अगदी परवाच एका विराट सभेत राज ठाकरे 'सकाळी उठून काय उपटायची आहेत?' असे काहीतरी बोलले होते. आता बोला..

In reply to by बंडा मामा

त्यांना बागेतील झाडे वगैरे उपटायची असतील. सकाळी सकाळी दवबिंदुंमुळे माती मऊ असते. (उपटायला सोपे) मिपावर ह्या वाक्याचा निषेध वगैरे झाला नसल्याने विचारजंत म्हणून तुम्हीच चुकीचा अर्थ लावत आहात असे वाटत आहे. (तुम्ही जेएनयूत प्राध्यापक वगैरे आहात की काय?)

In reply to by आजानुकर्ण

ठाकरे चुकीचे बोलत होते म्हणून अजित पवारांच्या चुकीचे समर्थन कसे करता येइल ? ठाकर्‍यांनी ( बाळासाहेब , राज ) यांची भाषा अनेक ठिकाणी चुकीचीच होती ! त्याचाही निषेध.. पण त्या एकाच मुद्द्यावर अजित पवारांचे भाषण समर्थनिय नाहिये ! अजित पवार एका प्रतिष्ठित पदावर आहेत ..ज्या प्रमाणे विधिमंडळ सदस्याला हक्क असतात तसेच सामाजिक जबाब्दारी आणि कर्तव्ये असतात.. बाळासाहेब , राज कोणत्याही राजनैतिक पदावर नाहित .. ( तरीही त्यांचे समर्थन नाहीच ) ..पण पदावर असताना जनते बद्दल असे वक्तव्य पूर्ण चुकिचे आहे .. ही प्रवृती शासना मधे , अधिकार्यामधे आणि कार्यकर्य्तात पोचेल म्हणून जास्तच चुकीचे !!

ह्या वरुन एक वाचलेले आठवतोय, जे तंतोतंत खरे होवुन राहीले आहे. ते मी ईंग्रजी मध्येच देतो आहे. When Mr. Clement Attlee, Prime Minister of United Kingdom, in June 1947, introduced the Indian Independence Act in the British Parliament, Sir Winston Churchill, war time Prime Minister of England, argued:- "Independence to India? Why??----------Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low caliber & men of straw. They will have sweet tongues & silly hearts. They will fight amongst themselves for power & India will be lost in political squabbles. A day would come when even air & water... would be taxed in India." Who is responsible ; We The Indian People ह्यातील जवळ्पास सगळे खरे झाले आहे, फक्त "sweet tongues" हा प्रकारही नाहीसा होताना दिसतोय.

सिनेमात टिपिकल राजकीय व्हिलन जसा दाखवतात तश्या मग्रुरीत केलेले अर्वाच्य भाषण हे ते ही उपमुख्यमंत्री ह्या उच्च पदावरुन हे मराठी माणसाला लाज आणणारे आहे.

लोकसत्तेच्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेली बातमी 'ते' वक्तव्य माझ्या राजकीय जीवनातील सर्वांत मोठी चूक - अजित पवार मुंबई Published: Monday, April 8, 2013 निंबोळी गावातील सभेत केलेले वक्तव्य ही आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनातील सर्वांत मोठी चूक होती. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुंबईत व्यक्त केली. इंदापूरमधील निंबोळीमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरांतून टीका करण्यात आली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावतीने माफी मागितली. अजित पवारांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेची माफी मागितली. अजित पवार म्हणाले, कोणच्याही भावना मला दुखवायच्या नव्हता. माझा तो हेतू नव्हता. ही गोष्ट खरी आहे की राज्यात महत्त्वाच्या पदावर काम करीत असताना मी शब्दांचा वापर जबाबदारीने करायला हवा. दुष्काळ निवारणाच्या मोहिमेला कोणतीही बाधा पोहोचू नये, अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. आजपर्यंत सार्वजनिक जीवनात काम करताना आतापर्यंत अनेक चढउतार मी पाहिले आहेत. मात्र, हे वक्तव्य माझी सर्वांत मोठी चूक होती. -------------------------------------------------------------------- या सर्व घटनाक्रमावरून एक सुविचार आठवला Nothing shows a man's character more than what he laughs at. यात किंचीतसा बदल केल्यास या प्रकरणातून घ्यावयचा बोध दर्शवता येईल. Nothing shows a man's character more than what he makes fun at.

In reply to by श्रीरंग_जोशी

लोकांनी त्याना माफ करुन पुढच्या निवडणुकीत जिंकुन दिलं नाही म्हणजे मिळवली. समजा विरोध झाला नसता तरी त्यांनी माफी मागितली असती का? शक्यता वाटत नाही.

In reply to by शिल्पा ब

विधानसभेच्या निवडणूकीला अजूनही दिड वर्ष आहे. जनस्मृती फारकाळ टिकत नाही असे म्हणतात. साडेतेरा वर्षांपासून राज्यातील व नऊ वर्षांपासून केंद्रातील सत्तेत सहभागी असूनही राष्ट्रवादीने भरीव असे कोणते कार्य केले यावर मतदारांनी गंभीरपणे विचार केल्यास राष्ट्रवादीचा पराभव होणे काही अवघड वाटत नाही. येणारा काळ उत्तर देईलच...

In reply to by श्रीरंग_जोशी

इंदापूरमधील निंबोळीमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरांतून टीका करण्यात आली.
नाना चेंगट, कृपया इकडे लक्ष द्याल का?

In reply to by श्रीरंग_जोशी

माध्यमांचा अप्रामाणिकपणा, आऊट ऑफ कन्टेक्स्ट वाक्य, भाषणाचा संदर्भ वगैरे घोळ घालत न बसता चूक मान्य केली हे चांगले झाले. असाच पवित्रा इतर राजकारणी व राजकारणबाह्य संघटनांनी घ्यावा असे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

सगळे वक्तव्य जसेच्या तसे चित्रमुद्रित झालेले असताना लोकांनी चुकीचा संदर्भ घेतला, पत्रकारांनी विपर्यास केला वगैरे नेहमीच्या यशस्वी सबबी देणे अवघड झाले असावे. त्यामुळे त्यांच्या माफी मागण्याची तोंड फाटेपर्यंत तारीफ करण्याआधी त्यावर ते काय प्रायश्चित्त घेणार, मुळात काही प्रायश्चित्त घेणार का याविषयी बोलावे. पाण्याकरता उपोषण करणारे, दुष्काळात होरपळणारे ह्या लोकांची क्रूर थट्टा करून सवंग हशा आणि टाळ्या घेतल्याबद्दल ह्या माणसाला शिक्षा काय होणार? मला वाटते काहीही नाही.

In reply to by हुप्प्या

मुळात त्यांचे भाषण विनोदी अंगाने पाहिले तर कोणाला ते विनोदी वाटू शकते. समोर बसलेले प्रेक्षकही फिदीफिदी हसत आहेत. भाषण करतानाही त्यांनी 'जरा विनोदी बोलतो' म्हणून हा एक ब्ल्याक कॉमेडी टाईप विनोद केला आहे. या स्वरुपाचे स्पष्टीकरण त्यांना देणे शक्य होते. मुळात अजित पवार यांची सर्व भाषणे अशीच असतात. हे एकच भाषण हायलाईट झाल्याचे पाहून आश्चर्य वाटले. मात्र अगदी बलात्कारित पीडित व्यक्तीही भारतातील आहे की इंडियातील हे पाहून तिथेही संस्कृतीचा उदोउदो करणारे वाक्य जसेच्या तसे यूट्यूबवर पाहूनही काही लोकांनी त्याबाबत घोळ घातलाच होता. त्या पार्श्वभूमीवर अशी चूक मान्य करणे मला योग्य वाटले. या भाषणाचे हे समर्थन नाही. हा प्रकार निर्लज्ज व किळसवाणाच आहे.

.माझ्या मते दादांवर टीका ही त्यांच्या भाषाशैलीच्या वरून नव्हे तर कोणाला उद्देशून केली ह्यामुळे झाली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी हा महाराष्ट्रात सध्या कळीचा मुद्दा आहे. त्याच्या एका प्रतिनिधीला उद्देशून त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य केले ह्या बाबत जनतेच्या मनात चीड निर्माण झाली. हे स्वतःला शेतकरी समजतात. इतर पुढाऱ्यांना शेतीमधील काही कळते का असे सुद्धा विचारतात. आणि शेतकऱ्यांच्या भावना समजत नाहीत, ह्यांना समजत नाहीत. का समजून काहीच न समजल्याचं वर्तन करायचे. हतबल झालेल्या शेतकऱ्यांची मागणी जर अव्यवहार्य वाटत असेल तर त्यांना ते पटवून देऊन काही तोडगा काढणे अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडे ,अलीकडे सुद्धा माणसे राहतात ज्यांचे उत्तरदायित्व आपल्यावर मंत्री म्हणून आहे. ह्यांचे भान असणे गरजेचे आहे. आता दादांनी ओविसी वर असे विधान केले असते तर मराठी जनता , प्रसार माध्यमे ह्यांनी एवढे रान उठवले नसते. येथे बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला चुकीचा आहे. कारण ह्यात मुलभूत फरक म्हणजे ह्या तिन्ही विधानाच्या पाठी जे मुद्दे होते त्यावर बाळासाहेबांची एक स्पष्ट भूमिका होती. व त्या भूमिकेच्या पूरक अशी विधाने होती. येथे दादा शेतकऱ्यांचे कैवारी समजले जातात व त्यांच्याच जखमेवर मीठ चोळतात. दादा तुमच्या लघु शंकेने नाही पण खर्या खुर्या पश्चात्तापाचे अश्रू त्या धरणात पडले तर भरून पावलो. तसा वक्तव्यावर खेद किंवा माफी तर माझ्या सारखा सामान्य माणूस सुद्धा हजारवेळा मागतो , अजित दादांचे मित्र नाना पाटकर ह्यांची प्रतिक्रिया अजून पाहण्यास नाही आली. मागे दगड युद्ध झाले तेव्हा त्यांनी वागळे ह्यांना मुलाखत देतांना शेवटी जनता लाचार नाही ह्याची जाणीव ठेवा असे सांगितल्याचे कळते.

येथे अजीत पवारांचा विषय चालु असतांना चर्चा उगीच ठाकरे कुटुबिंयाकडे वळवली जात आहे , इथे वर माझ्या आय डी बद्दल बोलणार्यांनी आसाम दंगलीबद्दल किंवा शिख हत्याकांडाबद्दल किंवा आझाद मैदानात झालेला नंगानाच ह्याबद्दल आपले दोन शब्द खर्च करावे ही नम्र इनंती(अगोदर बोलले असतील तरी अजुन बोलावे )

In reply to by श्री गावसेना प्रमुख

ठाकरेंविषयी बोलुन ह्या धाग्याचे अन दादांच्या वक्तव्याचे डायलुटीकरण थांबवा ... येवढेच हवे असेल तर ठाकरी शैली वर स्वतंत्र धागा काढा तिथे चर्चा करा ... ठाकरेही अश्लाघ्य बोलले हे दाखवल्याने दादा काय बोलले ह्याचे महत्व कमी होत नाही !!

सगळेच अजित पवारांची भाषा आणि ठाकरी भाषा एकच मानत आहेत पण, बाळासाहेब हि भाषा त्यांच्या विरोधकांसाठी वापरत होते!!! हे लक्ष्यात घ्यायला हवे. अजित पवारांच्या भाषेतून दुष्काळग्रस्त आणि दुष्काळ ह्यांच्याविषयी त्यांची काय (खालच्या पातळीची) मानसिकता आहे ते कळते !!! आणि हि वक्तव्य करताना त्यांच्या तोंडावरचा आनंद ओसंडून जाताना दिसतोयच, त्यामुळे माफी वगैरे सगळे ढोंग आणि काय.

त्यात राज ठाकरेंनी वापरलेली भाषा देखिल त्याच शैलीत मोडते असे अनेकाचा आक्षेप आहे. परंतु राज ठाकरेनी सरकार मधील कोणत्याही पदावर नसताना आपल्या भाषणात त्या शब्दाचा वापर केला आहे. तसेच राज ठाकरेचा रोख हा व्यक्ती सापेक्ष ह्योता न कि तो कोणत्या समाजा किंवा दुष्काळाने होळपरनार्‍या जनते बद्दल होता.जनतेला राज ठाकरेनी कधीच शिव्या घातल्या नाहीत. इथे दादा चक्क सोलापुर साठि पिणेस पाणी मागणार्‍या उपोषण करणार्‍या शेतकरी संघटनेच्या लोकाना पाण्या एवजी इतर गोष्टीबद्दल बोलले त्याबद्दल लोकांना चीड आहे. त्यांनी परत वीज कपाती मुळे शेतकरी रात्री मनोरंजन म्हणुन मुले पैदा करतात असा जोक मारला.आता ह्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? अहो शेताला दिवसा पाणी देता येत नाही कारण सगळी कडे सिंगल फेज लाईट असते. रात्री १० ते सकाळी ६ अशी ८ तास हे लाईट देतात. मग शेतकरी पिकास पाणी पाजण्यास काय काय उपद्वाप करत असेल हे जे शेतकरी कुटुंबाशी जवळ आहेत त्याना माहित आहे.अश्या परिस्थीतीत तो रात्री पाणी पाजायचे सोडुन कामक्रिडेत वेळ कशाला घालवेल? आणि हो ९९.९९% शेतकर्‍याना एक किंवा दोन अशीच मुले आहेत. त्याना कुटुंब नियोजनाचे महत्व कळाले आहे. मग हे लोक अधिक मुळे पैदा कशाला करतील? तरी राज ठाकरे कधीच अशी सर्वसामान्य लोकांची खिल्ली उडवत नाहीत.

In reply to by वेताळ

@जनतेला राज ठाकरेनी कधीच शिव्या घातल्या नाहीत. >>>+++++++++११११११११११११११११ जबरी सहमत. हाच तर कालपासुन घोळ चाल्लाय...शिवि असो/ओवि असो/शस्त्र असो... ते कुठे?कोणत्या हेतुनी? आणी कुणावर चालवलं जातं यावर त्याच पावित्र्य अवलंबुन आहे. सुरिनी पोट फाडणे ही क्रिया चोर आणी डॉक्टर दोघेही करतात. हा फरक अजिबात ध्यानात न घेता कालपासुन,''इतर राजकिय लोकंही शिवराळ बोलतात...त्याचे काय?'' असा गाढवपणानी मुद्दा उपस्थित केला जातोय. हे म्हणजे अफजलखान शिवाजिला गळा अवळुन खंजिर मारतो,यापेक्षा शिवाजीनीपण वाघनख/बिचवा मारून हिंसकपणा केला... अशी कागाळी करण्याइतकं अचरटपणाचं आहे.

दादांना काही बोलायचे नाही!!!. आमच्या सारख्या दादा समर्थकांच्या भावना दुखवतात त्याने. दादा म्हणजे राजा माणुस. तुमची लायकी तरी आहे का त्यांचे नाव घ्यायची. दादा आणि आम्ही सज्जन म्हनुन हे सगळे खपवुन घेतोय पण जर एकदा सटकली आमची तर बघा

In reply to by प्रसाद१९७१

याठिकानी मा. ना. (हे म्हन्जे तेच जे तुमच्या डोक्यात आलं) प्रसाद यांनी जी आभार प्रदर्शनाची जी भाशा बोलली आहे ती अतिशय तुत्य(जीभ सटकली... तेच म्हनायचं आहे) आहे. याठिकानी मा. ना.(रिपीट कर रे वरचं!... संध्याकाळची आठवन आली च्यामार्री) दादांणा(कोंडूकाका- सौजन्य पूजादादा- मोट्टाच इनोद झाला. सौजन्य नि पूजा? ह्या ह्या ह्या) कोनीही काहीही बोललेलं आमी खप्पून घेनार न्हाई. याठिकानी सगळ्यांना सगळ्या कामासाटी पानी देन्यात येईल व पाजन्यात देखील येईल... (थांबू? दोन मिन्टं) आम्च्या मंडळाचे पण्णास कारेकर्ते ह्या ठि कानी सगळ्या जणतेला पानी पाजायला चोव्वीस तास उपलब्द हायेत. येवडे बोलून मी माजे भाषण संपवतो. - प्यारेदादा येडे पाटील (उपाध्यक्ष, चवथी गल्ली) ए कुनीतरी बिसलेरी आना रे! कोरड पडली च्यामारी.

http://mdramteke.blogspot.in अजित पवारच्या गलिच्छ विनोदाच्या निमित्ताने असले हरामटेके लोक पुलंवर घसरले आहेत. त्यांच्या मते अजितदादांच्या करारा स्वभावात दडलेली विनोदबुद्धी इंदापूरकरांना लोटपोट करुन गेली. पत्रकारांनी सूडबुद्धीने ह्या निर्मळ विनोदबुद्धीचा विपर्यास केला. पूर्वी पुल देशपांड्यांनी ह्याहीपेक्षा गलिच्छ विनोद केले होते आणि तमाम समाजाने त्यांचा हजरजबाबी म्हणून गौरव केला. ह्या मरतुकड्या रामटेक्याने दिलेली उदाहरणे पाहिली की हसावे का रडावे ते कळत नाही. अजित पवारची लाळ घोटण्याच्या निमित्ताने त्या पुरुषोत्तमावर थुंकायचा नस्ता उपद्व्याप ह्या नालायक माणसाने का करावा हे अनाकलनीय आहे! प्रतिभा, नि:स्वार्थीपणा, सेवाभाव, भाषाप्रभुत्त्व, उदारपणा, कुठल्याही बाबतीत पुलंच्या जवळपासही फिरकू शकणार नाहीत असे लोक त्यांच्याविषयी इतका आकस बाळगून असतील असे वाटले नव्हते. पुलंच्या त्या उद्धृत विनोदात मुख्यतः अनवधानाने घडलेल्या चुकीची चेष्टा हेच आढळून येते. चावटपणा म्हणजे अश्लीलता वा हीनपणा नव्हे. पण झोपेचे सोंग घेतलेल्या रामटेक्यासारख्या रेम्याडोक्याला झोपेतून उठवणार तरी कसे? पण असल्या प्रवृत्ती समाजात आहेत हे कळले पाहिजे.

लोडशेडिंगचा जोक अजित पवारांनी केला असला तरी असाच जोक (किंबहुना अजित पवारांच्या विधानाचा व्यत्यास) ऑगस्ट २००९ मध्ये गुलाम नबी आझाद या केंद्रीय आरोग्य मंत्र्याने मारला होता. http://www.deccanherald.com/content/13278/azads-population-control-mant… पण या विधानाचा उल्लेखही न करता जणू हा जोक अजित पवारांनीच प्रथम केलाय असे म्हणून ओरडा करणार्‍या ईलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जाहीर निषेध..! ;-) रच्याकने, आमच्या एका मराठी च्यानेलीने तर (तेच ते जापानी तेल आणि "एक स्ट्रॉबेरी काय करू शकते?" च्या जाहीराती ब्रेक्समध्ये दाखवते) त्या भाषणात "महत्त्वाच्या" ठिकाणी "दुंईईईईई" करून आवाज टाकला आणि आपण किती सोज्ज्वळ आहोत हे दाखवले ते बघून ही गंमत वाटली..! बाकी चालू द्या.. -- सुहास

In reply to by सुहास

पुतन्याच्या मुतन्याची तीव्रता कमी व्हावी म्हणुन काकासाहेबांनी चंची थोओओडी ढिली केली असेल आणि ह्या व्यवहारचतुर च्यानेलने आपले उखळ पांढरे करुन घेतले असेल!

http://www.mtmobile.in/regular/details.php?storyid=1&section=mumbai वर वर पाहता सनानुभूतीची वातावरणनिर्मिती करण्याचा एक प्रयत्न दिसतोय. पण अंतस्थ हेतू काय असेल हे सांगता येणे कठीणच आहे. कदाचित सलग ३ वेळा सत्ता मिळूनही उल्लेखनीय कामगिरी न केल्याचे पातक ऐन वेळी इतर कुणाच्या माथी मारले जावे अशी पळवाटही असू शकते.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19537856.cms दादांना खरोखरच पश्चात्ताप झाला असे दिसते आहे कारण एक दिवसाच्या उपोषणाची अत्यंत कठोर शिक्षा घेऊन चित्तशुद्धी करण्याची त्यांची क्रिया मोठी बोलकी आहे. आता हे उपोषण लिंबू पाणी घेऊन सोडणार का कुण्या दुष्काळग्रस्ताकडून काही अन्य पेय घेऊन ते बघितले पाहिजे! आता तरी लोकांचे समाधान होईल आणि ह्या थोर नेत्याचा मुख्यमंत्रिपदाकडे जाण्याचा प्रवास पूर्ववत सुरू होईल अशी आशा! दुष्काळग्रस्तांनी आता नस्त्या उठाठेवी सोडून करवंटीने घागरीत पाणी भरण्याचा उद्योग पुन्हा सुरु करावा ही नम्र इनंती.

In reply to by हुप्प्या

एक दिवसीय उपोषणाचे हे लोण तामिळनाडूतून सुरू होऊन महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्याद्वारे महाराष्ट्रात येऊन पोचले तर. मार्च १९९८ मधील लोकसभा निवडणूकांचे महाराष्ट्रातील निकाल पाहून 'कष्टाने कमावले ते बोलण्याने गमावले' या शीर्षकाचा अग्रलेख आला होता. आता वर्षभराने होणार्‍या लोकसभा व दिड वर्षाने होणार्‍या विधानसभा निवडणुकांत काय होते हे रोचक असेल.

In reply to by हुप्प्या

>>> दादांना खरोखरच पश्चात्ताप झाला असे दिसते आहे कारण एक दिवसाच्या उपोषणाची अत्यंत कठोर शिक्षा घेऊन चित्तशुद्धी करण्याची त्यांची क्रिया मोठी बोलकी आहे. India's Best Dramebaaz !