Skip to main content

काही उपाय ?

लेखक पूनम शर्मा यांनी शुक्रवार, 05/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तसं पाहिलं तर ही माहिती मि.पा. वर टाकणे कितपत योग्य आहे माहित नाही, पण म्हटल पाहूया प्रयत्न करून. माझ्या घरी काम करणारी बाई आहे. दोन वर्षापुर्वी काही कारणास्तव आपले दागिने तिने गहाण ठेवले, इथे सांगण्यासारखी गोष्ट अशी की दागिने तिने बँकेत गहाण ठेवले जेणेकरून १% व्याज लागेल. हे बँक खाते तिच्या पतीच्या मित्राच्या नावावर होते. (त्या बँकेत ह्यांचे खाते नव्हते ). ह्या गोष्टीला दोन वर्ष झाली, ही वेळोवेळी व्याज सुद्धा भरत होती. दरम्यान तिच्या पतीचे त्या मित्राबरोबर भांडण झाले. आता जेव्हा हिला दागिने सोडवायचे आहेत तर तो सही द्यायला तयार नाही, त्याचे म्हणने असे कि मला अमुक रक्कम द्या मग मी सही देईन. तर माझा प्रश्न हा कि तिने काय करावे ? कारण पोलीसात जावे तर पावती त्या मित्राच्याच नावावर आहे? तर तिचा प्रश्न कसा सुटेल ? काही उपाय ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6176
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

बाप रे लोकं (मित्र) काय कुलंगड्या करतात, ब्लॅकमेल करतात ..... :( काहीच तत्वं (एथिक्स) कसे नसतात यांना? पैसे देऊन सोडवा म्हणावं दागिने.

चूक तुमच्या कामवाल्या बाईची/तिच्या नवऱ्याची आहे. एखाद्या चांगल्या पोलिसाला विश्वासात घेउन त्याची मदत मागा. त्याच्या करवे नवर्‍याच्या मित्राला हग्या दम द्यायला सांगा. बाकी योग्य तो सल्ला मिपावरची कायदेतज्ञ मंडळी देतीलच. :)

In reply to by आनन्दिता

एखाद्या पोलिसाला विश्वासात घ्या आणि चांगला दम द्या... त्या साठी पोलीसाला रु.२०,०००/- द्यावे लागतील. सोडुन द्या म्हणाव...

In reply to by गणपा

बाकी योग्य तो सल्ला मिपावरची कायदेतज्ञ मंडळी देतीलच.
याचा अर्थ तुमचा सल्ला टाईमपास क्याटेगरीत येतो तर. ;)

In reply to by धन्या

वर दिलेला सल्ला टाईमपास कॅटेगरीतला नसला तरी कायदेतज्ञ कॅटेगरीतही मोडत नाही. नेहमीच काळं आणि गोरं असं विभागता येत नाय ना. करड्या छटाही असतात की. ;) हा जर वर मी म्हणालो असतो की मित्राला ३०,००० देण्यापेक्षा एखाद्या गुंडाला ५००० देउन काम भागेल, वर तुम्हाला मनस्ताप दिल्याबद्दल मित्राला चोप मिळाल्याने मनःशांतीही मिळेल तर ते नक्की टाईमपास कॅटेगरीत मोडलं असत. :)

एका वर्षात खाते अनुत्पादक झाले की बँक त्या दागिन्यांचा लिलाव करते. दरम्यान बँक मॅनेजरच्या संपर्कात राहून त्याला सत्य सांगावे. लिलावाच्या वेळी कर्जाची रक्कम भरून दागिने सोडवून घ्यावेत. कर्ज खाते एन पी ए झाले तर त्या मित्राला त्याचा त्रास होऊन बँकेच्या नोटिसा वगैरे येतील आणि भविष्यात दुसर्‍या कुठल्याही बँकेचे कर्ज मिळताना त्रास होईल हे स्पष्ट करावे. दरम्यान जर त्याने कर्जफेड करून दागिने ताब्यात घेतले तर तुमच्या कामवालीचे नशीब वाईट म्हणायचे. कारण कर्जाच्या रकमेत त्याला (मित्राला)५० हजाराचे दागिने मिळून जातील. बँक कर्जाच्या संदर्भात कायद्याने काही करता येणार नाही. दागिन्यांच्या पावत्या वगैरे असतील तर मित्राने दागिने चोरले असा आरोप मात्र करता येईल.

आपल्या मूर्ख पणाला दोष द्या दुसरे काय करणार. हात दगडाखाली अडकले आहेत. कोणाला मध्यस्ती करायला सांगुन ३०००० चे काही कमी होते का ते बघा. ह्यांना बँकेत दागिने ठेवुन कर्ज काढायची अक्कल आहे पण बँकेत खाते काढायला जमत नाही :-( आणि नंतर त्याच्याशी भांडायचे. कमीत कमी दागिने हातात येइ पर्यंत तरी भांडायचे नाही. मारपीट करणे किंवा किडनॅप करणे अजुन मुर्खपणाचे आहे. जे लोक असला सल्ला देत आहेत त्यांनी असे काही केले असते का? जो माणुस इतकी फसवणुक करु शकतो, तो ह्यांना मारहाण नाही का करु शकणार?

In reply to by प्रसाद१९७१

मारपीट करणे किंवा किडनॅप करणे अजुन मुर्खपणाचे आहे. जे लोक असला सल्ला देत आहेत त्यांनी असे काही केले असते का? आम्ही दुसर्याच्या खात्यावरुन व्यवहार केलाच नसताच प्रसाद राव,बाकी ह्या धाग्याच्या विषयात खरे काहीच दिसत नाहीये.फक्त टाइम पास करायला म्हणुन लिखाण केले गेलेले आहे म्हणुन टाइम पास प्रतीसाद येत असावेत,

In reply to by श्री गावसेना प्रमुख

बाकी ह्या धाग्याच्या विषयात खरे काहीच दिसत नाहीये.फक्त टाइम पास करायला म्हणुन लिखाण केले गेलेले आहे म्हणुन टाइम पास प्रतीसाद येत असावेत
पटले. फक्त टीआरपी साठीचा धागा असावा

पूनम - तुम्हाला सल्ला : तुम्ही ह्या लफड्यात पडू नका. नस्ते अंगाशी येइल. ही लोक कीती खरे बोलतात कीत्ती फसवतात ह्याचा तुम्हाला अंदाज येणार नाही. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ!!! कदाचित तुमची कामवाली बाई त्या माणसाला ३०००० देणे लागत असेल, त्यामुळे तो अश्या मार्गाने आपले पैसे वसूल करत असेल. तुम्ही दूर रहा ह्यापासुन

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद यान्च्या सल्यात बरेच तथ्य आहे. कामवाली बाई किती प्रामाणिक आहे ह्याची आधी खातरजमा करा आणि मगच मदत वगैरे भानगडीत पडा..

आता त्या दागिन्यांचा लिलाव होईल,त्यातच ते दागिने विकत घ्या.ते पण परवडत असतील तर.

त्या क्षेत्रातील पोलिस चौकीत तक्रार दाखल करून तक्रारीची कोपी बँकेच्या अधिकार्याला द्यावी. तसेच वकीला मार्फत त्या मित्राला हे दागिने तुझे आहेत हे सिद्ध करण्यास सांगावे. त्या माणसा जवळ असा पुरावा असणे कठीण आहे .बँकेलाही ह्या नोटीस ची प्रत द्यावी . म्हणजे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे बँक त्याला सहजासहजी दागिने सोडवून देणार नाही. हे असे झाले म्हणजे तो मित्र वळणावर येईल . त्याची रक्कम ३०००० वरून ५००० पर्यंत खाली आणता आल्यास सौदाकरून दागिने ताब्यात घ्यावे,सौदा इतर मित्राच्या हजेरीत करावा.

तुमच्या कामवालीने तुम्हाला विश्वासात न घेता स्वतःच्या नवर्‍याच्या मित्रावर विश्वास ठेवला म्हणजेच पर्यायाने तुमच्यावर अविश्वास दाखवला आहे. मग कशाला तिला मदत करायची उठाठेव करता आहात? तो, तिच्या नवर्‍याचा मित्र, कोणी गुंड प्रवृत्तीचा असेल तर, तुम्ही त्यांना सल्ला देत आहात म्हणून, कांही नसते शुक्लकाष्ठ तुमच्याच मागे लागायचे.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमच्या कामवालीने तुम्हाला विश्वासात न घेता स्वतःच्या नवर्‍याच्या मित्रावर विश्वास ठेवला म्हणजेच पर्यायाने तुमच्यावर अविश्वास दाखवला आहे
हे कसं काय ब्वा?? समजा माझा 'अ' व्यक्तिवर विश्वास आहे तितकाच 'ब' व्यक्तिवरही आहे. माझ्या गरजेच्या काळात दोघेही मदत करण्यास समर्थ असता मी 'अ' कडून मदत घेतली तर तो 'ब' वर अविश्वास कसा होईल? फारफार तर १५००-२००० पगार असलेल्या कामवाल्या बाईस कोण मालकीण रु. ५००००/- ची मदत (कर्ज म्हणून का होइना) करेल? हा अविश्वासच आहे, पण तरीही ठेवावा लागतो.

In reply to by अन्या दातार

आपण जेंव्हा कोणाला मदत करतो, कोणाकडून मदतीची अपेक्षा करतो तेंव्हा दोन व्यक्तींमध्ये कांही नातं असतं. इथे मैत्रीचे नाते असावे असे मला वाटले. जेंव्हा कर्ज घेतले तेंव्हा ह्या दूसर्‍या मित्राशी (ज्याच्या कडून आता मदतीची अपेक्षा आहे) सल्लामसलत करायला हवी होती असे माझे वैयक्तिक मत आहे. पण आपल्या ह्या मित्राला अंधारात ठेवून व्यवहार केला असल्यास तो मैत्रीच्या नात्याचा विश्वासघात आहे असे मला वाटते. प्रसंग नाजूक आहे. कोण ह्याकडे कसा बघतो त्यावर त्यानुसार तो तसे अनुमान काढतो. हे माझे अनुमान आहे.

तुमच्या कामवालीने कधी एखाद्या लग्न समारंभात भाग घेताना सध्या गहाण ठेवलेले दागिने घातले असतील आणि त्या प्रसंगाचे फोटो किंवा video उपलब्ध असतील तर त्यामध्ये बाइंचा दागिने घातलेला फोटो पुरावा म्हणून वापरता येईल.

In reply to by रमेश आठवले

फोटोमधले दागीने ओरिजीनल आहेत हे कशावरुन ठरविणार्,ते बेंटेक्स चे असु शकतात कामवालीकडे इतके महागडे दागीने आले कुठुन हाही एक प्रश्न उपस्थीत होतो,

In reply to by श्री गावसेना प्रमुख

ब्यांकेने हे दागिने तारण म्हणून ठेवून घेतले आहेत आणि त्यांच्यावर रुपये ५०,००० चे कर्ज दिले आहे . याचा अर्थ ब्यांकेने त्या दागिन्यांचा खरेपण आधीच पारखून घेतला असणार. कदाचित या दागिन्यांचा बाजारभाव ५०,००० हजारांपेक्षा जास्त असू शकतो.

In reply to by रमेश आठवले

आता ५० हजारात किती सोने येणार? १५ ग्राम. फार तर हलके मंगळसूत्र किंवा चेन असेल. २ बांगड्या सुद्धा होणे शक्य नाही.

In reply to by वपाडाव

तुम्ही कधी ठेवली आणि बदलली आहे का कामवाली बाई? उगा नामी नामी म्हणुन नाचु नका. कामवाली बाई बदलणं हे फोनची ओएस बदलण्याएवढं सोपं वाटलं काय ?