Skip to main content

दूर पळ दूर पळ

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी रविवार, 07/09/2008 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
खोल खोल आत आत उठते जेव्हा एक कळ मन माझे म्हणते तेव्हा दूर पळ दूर पळ ऍडम आणि ईव्हला टाळू म्हणून टळलं नाही तुझी माझी गत गं त्यांच्याहून वेगळी नाही झाडावरती आज पुन्हा पिकलं आहे एक फळ मन माझे म्हणते तेव्हा दूर पळ दूर पळ कधीसुद्धा संपू नये अशी एक रात्र येईल बुद्धी तेव्हा आपली सारी गलितगात्र होईल वासनेच भूत तेव्हा भावनेला लावेल चळ मन माझे म्हणते तेव्हा दूर पळ दूर पळ -अनिरुद्ध अभ्यंकर
लेखनविषय:

वाचने 3714
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

भावनाविष्काराचा खेळ सुरेख मांडला आहे

मुक्त छंदातली ही कविता छान आहे. आंदोलित मनाचा खेळ चांगला उतरलाय! कधीसुद्धा संपू नये अशी एक रात्र येईल बुद्धी तेव्हा आपली सारी गलितगात्र होईल (बुद्धी गलितगात्र होणे फारसे पटत नाही) त्या ऐवजी शेवटच्या ओळीमधे अर्थात आणि तालात एकदम फिट्ट बसण्यासाठी असा काही बदल करता येईल का? मती तेव्हा आपली सारी अगदी गुंग होऊन जाईल (स्वगत - कोणाला टाळून पळून चाललाय हा अनिरुद्ध कोण जाणे? :W :? ) चतुरंग

मस्त कविता.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

एकदम वेगळी हाताळणी. हायक्लास. (चतुरंग : माझ्या मते मुक्तछंद नाही - छंदोबद्धच आहे.) रामदास- मला वाटते पिकलेले फळ बायबलमधले आहे. ऍडम-ईव्ह यांनी हे "विवेकबुद्धीचे" फळ खाल्ल्यावर त्यांची निरागसता नाश पावली, आणि त्यांना नंदनवनातून हाकलले गेले. त्या फळापासून दूर पळायचे (की नाही) हा विचार असावा - कवीच खुलासा करू शकेल.

सुंदर कविता !! क्या से क्या हो गया .. जानेजा तेरे प्यार मे, सोचा क्या .. क्या लिखा तेरे प्यार मे ! (भलाच होता माणुस आधी विडंबने तो टंकित होता, काय जाहले .. कोणी फितवले कवी बनवले विडंबकाला !)

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकंचे मनापासून आभार!! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर