Skip to main content

ब्रोकोली टोमाटो सूप

लेखक सोनलि यांनी शुक्रवार, 05/04/2013 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :३-४ ब्रोकोली चे दाठी सकट मध्यम तुकडे , १ लहान किवा मोठा असेल तर अर्धा टोमाटो , १ लहान चमचा आले लसुन पेष्ट , एक तमाल पत्र ,अर्धा लहान चमचा मिरी पावडर , एक मोठा चमचा कांदा पेष्ट किवा लहान कांदा बारीक चिरून , मीठ , एक मोठा चमचा साजूक तूप, एक चमचा जिरे चिमुट भर हिंग. कृती : सर्वात आधी एक भांड्यात ब्रोकोली , टोमाटो , तमाल पत्र आणि जर चिरलेला कांदा वापरात असले तर कांदा(कांदे चे चिमुट भर तेल वर परतून केले ले पेष्ट वापरले मी ) हे सर्व १-१/२ गिलास पाणीत ७-८ मिंट उकडून घ्यावे.नंतर मिश्रण गार झाले कि मिक्सर मधून त्याचे पाणी सकट वाटून घ्यावे.आता पैन मध्ये एक लहान चमचा तूप गरम करून त्यात हिंग जिरे ची फोडणी करावी आणिक आले लसुन पेष्ट परतून त्यात वाटण , मिरे पूड , चवीनुसार मीठ घालून परत एक उकडी आणावी.नंतर गरम गरम सूप वर कोथिम्बिर पेरून सर्व करावे . मी करून बघितले, छान वाटले मन्हुन टाकले इकडे हे पोस्ट. आपण पण करून पहा आणि हो मी फोटो काडहाय ला विसरते कारण करता न लक्षात राहत नाही कि हे पोस्ट करणे आहे ;)पण खात्री आहे सर्वाना आवडेल .

वाचने 6728
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

झक्कास... फोटो नाही टाकला तरी चालेल..

आणि हो मी फोटो काडहाय ला विसरते कारण करता न लक्षात राहत नाही कि हे पोस्ट करणे आहे रेसीपी वर्णना पेक्शा फोटोतुनच कृती दाखवलीत तर फार छान होइल... ;)

काहिहि .... कुठे वाचलं हो सोना बाई हे ???

In reply to by जेनी...

काही हि काय बोलताय पूजा बाई मी माझे च करून बघितले

In reply to by जेनी...

पुढची रेसिपी शोधली की नाही अजून?

In reply to by बॅटमॅन

आत्त्याबाईंनी आमच बारस चार महिन्यांपुर्विच केलय.. ;) तुम्ही आजच बारश्याची जिलबी मिळाल्या सारखे का हसताय..? :crazy:

In reply to by पक पक पक

मायला इथेपण जिल्बी?? ब्रोकोली सूपचा बोर्‍या का काय म्हंटात तो वाजेल हो =)) =)) (जिल्बीप्रेमी जिल्बीपाडक) बॅटमॅन.

छान..... पण जर फोटो नाही तर रेसीपी व्यवस्थित टप्याटप्यात (स्टेप्स) तरी लिहा..... सानिकास्वप्नील ताईंच्या रेसीपी ह्यासाठी आधार म्हणुन वापरु शकतात. एक प्रश्न..... तमालपत्र वाटताना( ब्लेन्ड करीता ना) ठेवावे कि काढुन टाकावे?

कृपया मराठीची अशी चिरफाड थांबवावी आणि मराठीत व्यवस्थित टंकण्यासाठी (मीपा वर टंकणे आपणास जमत नाही असे दिसते) http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/ इथे टंकण्याचा सराव करावा

In reply to by स्मिता चौगुले

धन्यवाद सुझावा बदल, सराव सुरु आहे अहो स्मिता ताई पण मराठी ची चिरफाड करणे इतके काही वाईट नाही लिहले हो, कारण मराठी टंकण्याचा चे लिंक वापररून टंकण केले आहेत तरी सुधा अजून सुधारणा करता येतील तर नक्की प्रयत्न करीन

छान वाटले मन्हुन टाकले इकडे हे पोस्ट. आपण पण करून पहा आणि हो मी फोटो काडहाय ला विसरते
मराठीच्या असंख्य बोली कानाला ऐकायला किती गोड लागतात नाही?

स्वैर रुपांतर - साहित्य:
  • ब्रोकोलीचे मध्यम आकाराचे तुकडे (देठांसहित) - ३ ते ४
  • लहान टोमॅटो - १ (मोठा असल्यास अर्धाही पुरेल)
  • आले-लसूण पेस्ट - १ चहाचमचा
  • तमालपत्र - १
  • मिरपूड - १/२ चहाचमचा
  • कांद्याची पेस्ट किंवा बारीक चिरलेला कांदा - १ मोठा चमचा
  • जिरे - १ चहाचमचा
  • तूप - १ चहाचमचा
  • हिंग - चिमूटभर
  • मीठ - चवीप्रमाणे
  • कोथिंबिर
कृती - सर्वप्रथम एका पातेल्यात ब्रोकोली, (चिरलेला ? ) टोमॅटो, तमालपत्र अन कांद्याची पेस्ट (कांदा चिरलेला असल्यास किंचित तेलावर परतून घ्यावा) घेऊन त्यात १ ते दीड पेला पाणी घालून ७ ते ८ मिनिटे चांगले उकळून घ्यावे. हे मिश्रण गार झाले की मिक्सर मध्ये पाण्यासकट वाटून घ्यावे. यानंतर एका कढईमध्ये एक चहाचमचा तूप गरम करून त्यावर हिंगाची व जिऱ्याची फोडणी द्यावी. नंतर त्यात आले-लसुणाची पेस्ट परतून घ्यावी. त्यानंतर मिक्सरमधे वाटून घेतलेले मिश्रण व चवीनुसार मीठ घालावे. कढईवर झाकण ठेवून एक उकड येऊ द्यावी. त्यानंतर या गरमागरम सुपावर आवडीप्रमाणे कोथिंबीर पेरावी. गरमागरम ब्रोकोली टोमॅटो सूप चिनिमातीच्या वाडग्यांमध्ये आस्वाद घेण्यासाठी तयार!!

साहित्य: •ब्रोकोलीचे मध्यम आकाराचे तुकडे (देठांसहित) - ३ ते ४ •कांदा - १ ( फार बारिक चिरायची गरज नाही) •गाजर - १ (हवे असल्यास...) •मिरपूड - १/२ चहाचमचा •तूप - १ चहाचमचा •मीठ - चवीप्रमाणे कृती - पॅन मध्ये तेल/ तूपावर कांदा परतुन घ्यावा. मग त्यात ब्रोकोली घालुन परतून घ्यावी. आवडत असल्यास गाजरही परतावा. चांगले परतल्यावर त्यात १ ते दीड पेला पाणी घालून ७ ते ८ मिनिटे चांगले उकळून घ्यावे. हे मिश्रण गार झाले की मिक्सर मध्ये पाण्यासकट वाटून घ्यावे. यानंतर एका कढईमध्ये मिक्सरमधे वाटून घेतलेले मिश्रण व चवीनुसार मीठ घालावे. कढईवर झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यावी. त्यानंतर या गरमागरम सुपावर तूप आणि मिरेपूड घालुन गरम गरम सर्व्ह करावे. गरमागरम ब्रोकोली सूप वाडग्यांमध्ये आस्वाद घेण्यासाठी तयार!! अवांतर :- जळो तो संप.. माझी ब्रोकोली गायब झाली मॉल मधुन.. :(