सैर भैर
हि १९९१ सालची गोष्ट आहे
मी डॉकयार्ड दवाखान्यात रात्रीच्या तातडीच्या सेवा विभागात कामावर(ड्युटी) वर होतो याचा एक भाग म्हणून आय एन एस आंग्रे मध्ये असलेल्या नौदल पोलिसांच्या कोठडीला भेट देऊन तेथे असलेल्या कच्च्या कैदेतल्या सैनिकांची तपासणी करणे हा होता. अशा तपासणीच्या वेळी मी हटकून प्रत्येक सैनिकास का अटक झाली आहे? काय परिस्थितीत ते झाले आहे याची शहानिशा करीत असे.( मनोविकार शास्त्रात काम केल्यामुळे मला त्यात जर जास्त रस होता). असे त्या कोठडीतील सैनिक पाहत असताना एक संभाजी माने( किंवा जाधव असेल )वय २५ वर्षे या सैनिकासमोर आलो. त्याच्या बद्दल तेथे असलेल्या रक्षकाला विचारले कि याला कशापायी अटक झाली आहे? तो रक्षक म्हणाला कि हा एक वर्ष विना सुट्टी गैरहजर( absent without leave) होता.कालच आला आहे आणि आता त्याचे कोर्ट मार्शल होईल. मी संभाजी ला मराठीतच विचारले का रे बाबा का असा पळून गेलास? तर तो म्हणाला साहेब मला काहीच आठवत नाही. मी विचारले कि तू कुठे होतास तर तो म्हणाला मी येरवड्याला होतो.मी विचारले कि येरवड्याला कोणत्या गुन्ह्यासाठी? तर तो म्हणाला कि मी गुन्ह्यासाठी नव्हे तर तेथील मनोरुग्णालयात होतो.
मी विचारले कशासाठी. तर तो म्हणाला मला आठवत नाही?
किती दिवस होतास-- आठवत नाही.
काय करत होतास --आठवत नाही
तेथिल काय आठवते?-- तेथे मला मारहाण होत असे एवढेच आठवते.
या संवादानंतर मी तेथल्या रक्षकास विचारले कि या संभाजीचे कागदपत्र कुठे आहेत. तर त्याने त्याचे काही कागद दाखवले त्यात त्याला स्किझो फ़्रेनिया आहे तो आता बरा आहे आणि नौदलाच सैनिक असल्याने त्याला नौदलाकडे सुपूर्द करण्यास कोणतीही हरकत नाही असे प्रमाणपत्र होते.
मी तेथल्या रक्षकास विचारले कि इथला अधिकारी कुठे आहे. तर त्याने त्या अधिकार्याला बोलाविले मी त्या अधिकार्याशी बोललो आणि विचारले कि हा माणूस इथे कसा आला? त्याने सांगितले कि येरवड्याच्या मनोरुग्णालयातून आम्हाला पत्र आले कि असा असा नौसैनिक आमच्या रुग्णालयात आहे त्याला घेऊन जावे म्हणून आम्ही ३ माणसे पाठवून त्याला घेऊन आलो.तो येथील एका जहाजावरून सुट्टीवर गेला आणि परत आलाच नाही. त्याच्या घरी संपर्क केला तर घरच्यांनी तो येथे एक वर्षापासून आलाच नाही असे सांगितले. त्याला परत आणण्यासाठी आम्ही पोलिसांना अटक करण्याचे पत्र सुद्धा दिले होते पण हा एक वर्ष पर्यंत सापडला नाही आणि आता येरवड्यावरून पत्र आल्यावर आम्ही त्याला घेऊन आलो आता त्याचे कोर्ट मार्शल होईल आणि त्याला शिक्षा देण्यात येईल.
मी त्या अधिकार्याला सांगितले कि हा माणूस मनोरुग्ण आहे आणि चौकशी खटला किंवा शिक्षा या दिव्यातून जाण्यास अक्षम आहे. त्यावर तो अधिकारी म्हणाला कि ते आम्हाला काही माहित नाही. त्यावर मी त्याच्या तुरुंग पुस्तीकेतील वैद्यकीय मथळ्यावर हा तुरुंगात ठेवण्यास अपात्र (UNFIT) आहे असे लिहून माझा शिक्का मारला. आनि त्या अधिकार्याला सांगितले कि आता तू याला तुरुंगात ठेवलेस आणि याने काही केले( आत्महत्या किंवा स्वतःला इजा तर ती तुझी जबाबदारी आहे.
आता तो अधिकारी सरळ होऊन बोलू लागल कि डॉक्टर याच्या साठी काय करायला लागेल? तेंव्हा मी त्य्याला सांगितले मी आता पूर्ण तपासणी करून त्याला अश्विनी रुग्णालयातील मनोविकार विभागात भरती करण्यासाठी प्रमाणपत्र देतो. तुम्ही त्याला तेथे भरती करा.याला तो आनंदाने तयार झाला( कारण त्याच्यामागची एक कटकट टळत होती. मी संभाजीला आमच्या दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्याची पूर्ण तपासणी केली आणि त्याला अश्विनी रुग्णालयात भरती केले.काही दिवसांनी मी अश्विनी मध्ये गेल्यावर खालील माहिती उजेडात आली.
संभाजी साताऱ्याजवळ एका खेड्यातून आला होता.तो सुट्टी घेऊन घरी गेला होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी देहावसान झाले होते. गावी त्याची आई मोठा भाऊ आणि वहिनी होती.तो सुट्टीवर गेल्यावर त्याच्या आईचे हृदयविकाराने देहावसान झाले. संभाजी मानाने आईच्या अतिशय जवळ आणि लाडका होता. त्याला या गोष्टीचा इतका धक्का बसला कि त्याला वेडाचा झटका आला. त्याच्या भावाने त्याच्या वर काही उपचार केले पण तो सुधारत नाही हे पाहून त्याला उचलून सरळ येरवड्याला भरती केले.तेथे त्याने हा नौदलात सैनिक आहे म्हणून कोणतीही माहिती दिली नाही.
कारण? जमिनीत हिस्सा देण्यापेक्षा भावाला वेडा ठरवून येरवड्याला पाठविले तर आपसूक काम होते.
येरवड्याला त्याच्यावर त्यांनी उपचार केले जेंव्हा तो सुधारू लागला तेंव्हा त्याने आपण कोण काय करतो हे सांगितले तो बरा झाला तरी त्याची गेल्या वर्षातील घटनांची स्मृती गेलेली होती( RETROGRADE AMNESIA) असे स्किझो फ्रेनियात होते हे मला माहित होते त्यामुळे तो खोटे बोलत नाही हे मला माहित होते( नौदल पोलिसांना ते पटत नव्हते कि एक वर्ष भर आपण कुठे होतो ते त्याला आठवत नाही हे
त्यावर त्यांनी नौदलाशी पत्रव्यवहार करून त्याला मुंबईला पाठविले होते.
त्याला एक महिना अश्विनी रुग्णालयात ठेवल्यावर तेथून त्याला मुक्त केले( डिसचार्ज) दिला. त्यानंतर त्याचे रीतसर कोर्ट मार्शल झाले आणी त्याचा एक वर्षाचा पगार( जे त्याने काम केलेले नव्हते) कापून नोकरीत कायम ठेवण्यात आले आणि त्याच्यावरील सर्व आरोपातून त्याची मुक्तता करण्यात आली.
२) असाच एके दिवशी मी डॉक यार्ड दवाखान्यात रात्रपाळीला बसलो होतो तेंव्हा आय एन एस आंग्रे मधून नौदलाचे पोलीस एका सैन्यातील(ARMY) च्या सुभेदार साहेबाना (वय ४८ वर्षे) घेऊन आले. त्याला आंग्रे येथील कोठडीत ठेवण्य़ा पूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ते घेऊन आले होते.सुभेदार साहेबांबरोबर त्यांचा मुलगा सुद्धा आला होता. मी त्याला विचारले कि यांना कशासाठी अटक झाली आहे? त्यावर तो म्हणाल माझे वडील सुट्टी न घेता पळून आले होते. मला एक गोष्ट कळेना कि जो माणूस २८ -२९ वर्षे नोकरी केलेला आहे तो पळून का जाईल?त्यावर तो मुलगा म्हणाला कि ते ८ महिन्यात निवृत्त होणार आहेत तरी का पळून आले ते कळत नाही.मी सुभेदार साहेबाना विचारले कि काय मामला आहे तेंव्हा ते असंबद्ध असे पुटपुटत होते. मला कुठेतरी काहीतरी चुकत होते असे वाटत होते. मी सुभेदार साहेबांची पूर्ण तपासणी करीत होतो तेंव्हा मला त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे जाणवले. मी मुलाला विचारले कि त्यांची तब्येत कशी आहे? त्यावर तो मुलगा म्हणाला कि ते आजकाल विचित्रपणे वागतात धड कुणाशी बोलत नहीत काहीतरी पुट पुटत राहतात. आत्ता २ महिने सुट्टी साठी घरी आले होते आणी परत गेल्यावर एक आठवड्यात परत घरी आले म्हणून मी त्यांना घेऊन आलो आहे.मला त्यांचे वागणे विचित्र वाटत होते पण कोणत्याही मनोरोगाच्या व्याख्येत त्यांचे वागणे बसत नव्हते. मी म्हटले असेल एखाद वेगळा रोग जो आपण पाहिलेला नाही( नाहीतरी माझा मनोविकाराचा अनुभव आहेच किती?)पण त्याला मनोविकार तज्ञांकडे पाठवणे जरुरी आहे.
त्यांची शारीरिक तपासणी मध्ये फारसे काही निष्पन्न झाले नाही.मी त्या नौदल पोलिसांना सांगितले कि सुभेदार साहेब मानसिक दृष्ट्या कोठडीत ठेवण्यास अपात्र आहे. मी तुम्हाला तसे प्रमाणपत्र देतो त्याला अश्विनीच्या मनोरुग्ण विभागात भरती करा. त्यावर त्यांनी त्याला मान्यता दिली.( नाहीतरी अशा कटकटी त्यांना नकोच असतात) सुभेदार साहेब अश्विनीत भरती झाले दोन दिवसांनी मी काय झाले ती हाल हवाल पाहण्यासाठी गेलो तेंव्हा त्यांचा सी टी स्कॅन झाला होता आणी त्यांच्या मेंदूत एक ट्युमर(TEMPORAL LOBE GLIOMA) असल्याचे निदान झाले होते. यथावकाश सुभेदार साहेबांच्या मेंदूतील ट्युमर शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला गेला आणी त्यानंतर सहा महिन्यांनी ते सन्मानाने निष्कलंक रित्या निवृत्त झाले.
क्रमशः
Book traversal links for सैर भैर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अजब तेरी कारीगरी रे ..
वा
डॉक्टरसाहेब, तुमचे लेख डोळे
सहानुभूती वाटते.
छान लिखाण
मनाचिये गुंती..
भावाच्या कृतीचे वाईट वाटले पण
+११११११११११११११.
+११११११११११११११.
एकसेएक विलक्षण अनुभव आहेत.
छान लेख...
सुंदर लेख.. पु.भा.प्र.
विचित्र आणि चमत्कारिक
नशीब, तुम्ही वेळेवर भेटलात त्यांना!!
+११११११११११११११.
बापरे !!
हृदयस्पर्शी लेख
+१
तंतोतंत सहमत !!
ह्म्म
माझ्या माहितीप्रमाणे
ओके. असेलही कल्पना नाही!
मनोविकार आणी लष्कर
डॉ साहेब आपण मनोविकार
मनोविकारांबद्दल जागृती
तुम्ही समयसूचकतेने घेतलेल्या
उत्तम लेख. आवडला. पुलेशु
मस्त लेख...