Skip to main content

सावध रहा ! सावध रहा !

लेखक नाना चेंगट यांनी शुक्रवार, 05/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी आपल्या सर्वांसमोर एक मोठे संकट येत आहे. या संकटाचा आपल्याला सर्वांना मिळून मुकाबला करायचा आहे. आपले माननीय सूचना-प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी आपल्यासाठी एक अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या तीव्र आकलन शक्ती सामर्थ्यांने त्यांना जे जाणवले ते त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी अतिशय कनवाळू होऊन सांगितले आहे. आता त्यांनी जे सांगितले आहे त्यामधे कोणतीही खोट न काढता आपण आपले संरक्षण केले पाहिजे. आजपासून तयारीला लागा. स्वतःची काळजी घ्या ! आपल्या कुटुंबाची काळजी घ्या ! परिसरातील नागरीकांना सावध करा. कुठेही काही संशयास्पद हालचाल दिसली तर तत्काळ योग्य त्या ठिकाणी कळवा. परमेश्वर आपल्याला या संकटातून नक्की तारेल असा माझा विश्वास आहे. आपण सर्व जण त्या जगन्नियंत्याची प्रार्थना करुन श्री मनीष तिवारींसारख्या सच्च्या आणि प्रामाणिक नेत्यांना दिर्घ आयुष्य मिळो आणि त्यांच्या बुद्धीचा आम्हा सर्वांना असाच उपयोग होवो अशी याचना करु. बातमी इथे वाचता येईल : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19396684.cms येतो मंडळी ! माझ्या वामकुक्षीची वेळ झाली :)

वाचने 3388
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

आमची झोपमोड का करताय? त्या तिवारी साहेबांना कोणीतरी एक पूस्प्गूच नेऊन द्या रे आणि सोबत एक कार्ड पाठवा, "लौकर बरे व्हा" म्हणून! :D

In reply to by पैसा

पैसातै, त्या 'पूस्प्गूच' वर पूजाचा कॉपीराइट आहे, राइट पूजा? तिला न विचारताच तो पूस्प्गूच तू परस्पर कसा काय कोणाला देवू शकतेस? ;) - (पूस्प्गूच बघायची आस लागलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

राईट्ट नाना ... :) बग्गाना नाना :-/ मला न विचारताच माझा पूस्प्गुच त्या तिवार्‍याला देतिये सासुबै :-/ :-/

पण मटाची लिंक दिलेय त्यात त्या तिवारीचे तोंड अ‍ॅड्राईड मधे टॉकिंग टॉमकॅटच्या तोंडावर उशी मारल्यानंतर जस तो करतो "अ‍ॅअ‍ॅअ‍ॅययय " असे दिसतेय. ह्याच्या तोंडावर की दुसरे कुठे कोणी काय मारलेय ?

In reply to by ऋषिकेश

नक्की कशापासून सावध रहायचे
या संदर्भात कायम समर्थ वचन लक्षात ठेवावेत मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकरण । तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ॥ समास पांचवा : राजकारणनिरुपण-१, दशक ११ - ४ ॥ :-)

परमेश्वर आपल्याला या संकटातून नक्की तारेल असा माझा विश्वास आहे.
इथे, काँग्रेस आपल्याला या संकटातून नक्की तारेल असा माझा विश्वास आहे असे हवे होते.

भविष्यात काय हालात होणार ह्या काळजीने झोप उडाली आहे.त्यामुळे काल मनिषजीनचे देखिल मानसिक संतुलन बिघडले असु शकते.

ह्या मनीष तिवारींचे वक्तव्य वाचण्यापेक्षा संता-बंता चे विनोद वाचलेले बरे म्हणायची वेळ आली आहे.

ओवेसीला दंगल घडवायची आहे याच अर्थाचे हे आणखी एक दुसरे विनोदी वाक्य. चालायचेच.... शेवटी राजकारणी लोक.

In reply to by आजानुकर्ण

सहमत आहे. त्यामुळे मोदी जसे मुख्यमंत्री झाले आणि पंतप्रधान होऊ शकतात (जर्तर्वगैरे) तसे ओवेसींना पण मुख्यमंत्री बनवावे आणि पंतप्रधान झाल्यास देश कसा प्रगत होईल याचे स्वप्न रंजन करावे म्हणतो तर सरकारने त्यांना अटक करुन खटला वगैरे दाखल करुन आमची मोठी गोची केली ! असो.

धाग्याचे शीर्षक पाहून " स्काय इज फॉलींग " ची आठवण झाली. नानांच्या धाग्यावर 'मुकाबला' शब्द वाचून ड्वाले पाण्वले ! :) स्वगत : जगबुडी आल्याचेच तर हे लक्षण नाही? बये सुते, आता तरी सुधार स्वतःला गो!!! @अपर्णा :
नाना तुमच नाव उलटं कस लिहायच?
असं काय विचारतेस ? णानांच्या भावणा* दुखावल्याचं पाप लागेल बघ!! * मिपाकर भारीच शंकेखोर हो ! म्ह्णून आधीच सांगते की चि. टारूबाळ आमच्या नात्यात ( आपलं णात्यात ) नाही.