✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पठडीबाह्य/आवर्जून बघण्यासारखे चित्रपट

अ
अभिरत भिरभि-या यांनी
Mon, 09/01/2008 - 17:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28239 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

द
देवदत्त Sun, 09/07/2008 - 13:22 नवीन

मला आवडलेले...

मिरॅकल ऑन ३४थ स्ट्रीटः एका मोठ्या दुकानात सांताक्लॉज म्हणून काम करत असलेल्या माणसाला, तो स्वतः सांताक्लॉज असल्याचे सांगितल्या कारणाने मनोरूग्णालयात दाखल करतात. पण पुढे तोच सांताक्लॉज असल्याचे ज्या प्रमाणे न्यायालयात ठरविले जाते, त्यावरील हा चित्रपट. खूप आधी स्टार मूवीज वर हा कृष्ण-धवल सिनेमा पाहिला होता. तेव्हा खूप आवडला. २००६ मध्ये त्याची व्हीसीडी शोधण्याचा प्रयत्न केला. पण जुना सिनेमा नाही मिळाला. पण त्याच्या रिमेक चित्रपटाची सी.डी. मागविली. पण दोन्ही चित्रपटात सांताक्लॉज असल्याचे ज्या प्रकारे साबित( हा मराठी शब्दच आहे का?) केले जाते, त्यात फार तफावत आहे. जुना सिनेमा जास्त आवडला मला. द फॅन्टॅस्टिक व्हॉयेजः एका माणसाच्या मेंदूतील रक्ताची गुठळी काढण्याकरीता ४/५ डॉक्टरांच्या एका गटाला पाणबूडीत बसवून तिला सुक्ष्म करतात व त्या रुग्णाच्या शरीरात घुसवतात. त्या लोकांचा मेंदूपर्यंतचा प्रवास ह्या सिनेमात दाखवला आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 09/10/2008 - 01:48 नवीन

मिरॅकल ऑन ३४थ स्ट्रीट - माझ्या नावडत्या चित्रपटांपैकी

या चित्रपटाची नायिका ही स्त्री एका मोठ्या दुकानात व्यवस्थापक असते, जरा अतीच रोखठोक असते. आपल्या लहान मुलीला कुठल्याही चमत्कारावर विश्वास ठेवायला मनाई करते. त्यामुळे लहान मुलीत बालसुलभ गोडपणा कमी होऊन एका प्रकारचा कडवटपणा येऊ लागलेला असतो. या सांता-क्लॉजच्या खटल्याच्या अनुषंगाने नायक या करियर-वुमनला हळवी, गृहवत्सल बनवतो, आणि लहान मुलीमध्ये पुन्हा चमत्कारांबद्दल विश्वास जागवतो. सडेतोड करियर स्त्रिया शुष्क असतात, वास्तववादी विचार करणार्‍यांना स्वप्नरंजन करण्याइतपत कल्पनाशक्ती नसते, ते नीरस असतात, आणि लहान मुलांचे सुख घालवतात. चांगला पुरुष सापडला तर अशा शुष्क स्त्रीचीही देवी होऊ शकते, असे या चित्रपटाच्या कथेतून निष्पन्न होते. हा चित्रपट १९४७ मध्ये प्रथम प्रदर्शित झाला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात तरुण पुरुष परदेशी युद्धासाठी गेले, आणि स्त्रियांना रोजीरोटीसाठी घरातून बाहेर पडावे लागले. दुसरे महायुद्ध संपले, तरुण पुरुष यू.एस.मध्ये परत आलेत. नोकरी करणार्‍या आर्थिक-मुक्त स्त्रियांनी भरलेला समाज बघून त्यांचा मोठा गोंधळ झाला. हे मुक्त-करियर-स्त्रीचे भूत पुन्हा गृहदेवतेत कसे बदलायचे? या विचारधारेतून हा चित्रपट तयार झालेला दिसतो. अगदी आजपर्यंतही अशी मनोवृत्ती दिसते. उद्योगधंद्याच्या जगात महत्त्वाकांक्षा असलेल्या स्त्रिया कित्येकदा शुष्क-मातृत्व आणि सत्तेसाठी वखवखलेल्या दाखवतात. स्त्रीमुक्तीची आणि वास्तववादी विचारसरणीची बालवत्सल आव आणून इतकी गोंडस, लोभस, चीरफाड करणारा "मिरॅकल ऑन ३४थ स्ट्रीट" हा माझ्या नावडत्या चित्रपटांपैकी एक आहे. सांता-क्लॉज-सिद्धीतून वास्तववादाच्या नालस्तीचा वारसा (वास्तववाद=कल्पनाशून्यता+भावनाशुष्कपणा हा विचार), हल्लीच्या 'पोलर एक्स्प्रेस' या चित्रपटाने पुढे चालवला आहे. मात्र 'पोलर एक्स्प्रेस' स्त्रीमुक्तीबाबत 'पोलिटिकली करेक्ट' राहातो. (फँटॅस्टिक व्हॉयेज मोठा गमतीदार चित्रपट आहे - आवडला! वास्तववाद मानूनसुद्धा कल्पनारम्य चित्रपटातून आनंद मिळवता येतो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
म
मैत्र Sun, 09/07/2008 - 15:41 नवीन

एट बिलो

अनेक उत्तम चित्रपटांचा वर उल्लेख झाला आहे त्यामुळे पुनरावॄत्ती टाळतो आहे. नुकताच एट बिलो (Eight Below) हा चित्रपट पाहिला. अगदी वेगळा विषय, उत्तम मांडणी, जबरदस्त छायाचित्रण यासाठी जरूर पहावा. अंटार्टिकाशी संबंधित आहे... विषय सांगितला तर मजा जाईल पण जरुर एक वेगळा चित्रपट म्हणून पहा. बरंच काही न सांगता शिकवून जाणारा .. त्यामानाने कमी संवाद आहेत.
  • Log in or register to post comments
स
सचीन जी Tue, 09/09/2008 - 17:26 नवीन

मै आजाद हु

>> आणि माझ्या आठवणीप्रमाणं "मै आझाद हूं" हा टिनु आनंद चा नसुन केतन मेहता चा आहे. नाही! "मै आजाद हु" हा टिनु आनंदचाच चित्रपट आहे. १०० % खात्रीने! बाकी श्रेय नामावली - कलाकार - अमिताभ, शबाना, अन्नु कपुर संगीत - अमर - उत्पल (तेच ते अनील - विश्वासचे चिरंजिव)
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Wed, 09/10/2008 - 04:47 नवीन

A Wednesday

हा मागच्या आठवड्यात आलेला चित्रपट..मला आवडला..एक वेगळा आणि बोअर न करणारा वाटला..नाहीतर मी हींदी चित्रपट बघने सोडले होते.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 11/30/2009 - 11:18 नवीन

पोस्टमन इन

पोस्टमन इन द माऊंटन हा चित्रपट काल पाहिला. आवर्जून बघण्यासारखा आहेच. विलोभनीय निसर्ग आणि बॅकग्राउंड मध्ये वाजणारे हळूवार संगीत. एक अप्रतीम चित्रपट पाहण्याचा आनंद जरूर घ्या.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 11/30/2009 - 16:19 नवीन

१९९५ साली

१९९५ साली आलेला अ लिट्टील प्रिंसेस (A Little princes ) कुठे मिळाला तर जरुर पहा.... परिकथे सारखी गोष्ट आहे.. लिसेल मॅथ्युस ने साकारलेली साराची भुमीका खुप आवडली होती.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Mon, 11/30/2009 - 20:07 नवीन

आस्तित्व ****

आस्तित्व *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
स
संग्राम Mon, 11/30/2009 - 20:45 नवीन

मला आवडलेले काही

मला आवडलेले काही ..... - द ब्रिज ऑन रिवर क्वाइ Image removed. - independence day - ऑल टाइम फेवरेट ... स्पेशली Mr President cha bhashan[मोटिवेशनल स्पीच] - The Pursuit of Happyness - Troy - cast away - the terminal - twist of fate - हा मी हिस्ट्री चॅनेलवर पाहिला होता ... एक जर्मन ऑफिसर, ज्यू लोकांना मारल्याची शिक्षा होउ नये म्हनुन प्लॅस्टिक सर्जरी करुन घेतो आणि इस्त्रायल स्वतंत्र झाल्यावर तिथे जातो ... तिथला आर्मी चा हेड बनतो वगैरे ... छान होता सिनेमा - एक लहान मुलांचा सिनेमा पाहीला होता एच बी ओ वर .... त्यांची गँग असते ...क्लुब हाउस असते .. कार रेस ... अल्फा अल्फा अस काही तरी नाव असत हीरोच ... फार सुंदर आहे ... बाकी बरेच आहेत ... आठवेल तस टंकतो ....
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 11/30/2009 - 21:03 नवीन

carry on

carry on series...कॅरी ऑन डॉक्टर पासुन हि सेरीज सुरु झाले..खुप धमाल विनोदि अश्या १३ सेरियल्स पहिल्या..निखळ खळखळुन हसवणारा विनोद...२ घटका करमणुक..मला यातले सारे सिनेमे आवडले..मजा आली पहायला... Image removed.Image removed.From अविनाश एक बेभान स्वैर मुक्त जिवन" alt="" /> ============================== Image removed.Image removed.From अविनाश एक बेभान स्वैर मुक्त जिवन" alt="" />
  • Log in or register to post comments
उ
उपास Mon, 11/30/2009 - 21:18 नवीन

हे राहीले..

वरील चित्रपटांच्या यादीत हे दोन दिसले नाहीत, आश्चर्य वाटले :) १. कासाब्लँका - ह्यातले डायलॉग काय आहेत महाराजा.. २. फेस ऑफ - ज ह ब ह री ही.. माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार
  • Log in or register to post comments
J
jaypal Mon, 11/30/2009 - 21:31 नवीन

मला आवडलेले

७ ईयर्स इन तिबेट school of life bad company spirit(animation film) spy game lion king (part 1&2) iceage (animation film) अजुन खुप आहेत
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 11/30/2009 - 21:53 नवीन

निखळ

निखळ मनोरंजना साठी गॉड मस्ट बी क्रेझी भाग १ (1980) आणि २ (1989) नक्की पहा.. केवळ अफलातुन चित्रपट आहे.. भाग ३ मात्र एकदम वाया घालवलाय..
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 03/03/2010 - 05:43 नवीन

मला मनस्वी अवडलेला चित्रपट = CHOCOLAT

मला मनस्वी अवडलेला चित्रपट = CHOCOLAT (शकोला) एका फ्रेंच खेड्यामध्ये एक जिप्सी स्त्री तिच्या लहान मुलीसोबत येते. आणि चॉकलेट्चं दुकान टाकते. या खेड्यातील लोकं अतिशय संकुचित विचारसरणीचे आणि suppressed असे दाखविलेले आहेत. या चॉकलेट्मुळे हळूहळू तेथील लोकांची inhibitions कशी दूर होतात आणि ते लोक कसे त्या स्त्रीला आणि मुलीला आपलसं करतात ते उलगडणारा हा सिनेमा. या चित्रपटात व्यक्तीरेखा इतक्या सुरेख आणि बारकाव्यांनी फुलविल्या आहेत. प्रेम आणि उत्कटता तसच मानसशास्त्रीय बारकावे हे या चित्रपटचे माझ्या तरी मते वैशिष्ट्य. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा