‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ स्मूथ मॅंन्गो टॅन्गो”
पार्श्वभूमी:
उन्हाळ्याच्या चाहूलीबरोबरच आंब्याची चाहूलही लागली आहे. बाजारात आंब्यांची आवक हळूहळू सुरू झाली असली तरीही घरोघरी आंब्याचा मोहक दरवळ पसरायला म्हणावी तशी सुरूवात अजून झालेली नाहीयेय. ह्या वर्षीचा उन्हाळा, आंबे स्पेशल कॉकटेल्सनी, 'ग्रीष्म ऋतु लाउंजोत्सव' असा दणाणून सोडायचा विचार आहे. त्यातले हे पहिले कॉकटेल, स्मूथ मॅन्गो टॅन्गो.
खर्याखुर्या आंब्याचे नसले तरीही, आंब्याचे आइसक्रीम आणि आंब्याच्या रस यांचा वोडकाला दिलेला ट्वीस्ट म्हणजे आजचे हे कॉकटेल. हे माझे इंप्रोवायझेशन, 'लेडिज स्पेशल' कॅटेगरीमध्ये बसवायचे होते, त्यामुळे फक्त वोडका एवढाच बेस वापरून हा प्रयत्न केला आहे. त्यात पुढ्च्या कॉकटेल्समध्ये आणखिन प्रयोग करून 'मिक्सॉलॉजी'च्या वेगवेगळ्या खुब्या वापरून चव आणि लज्जत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे.
कृती:
खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्लेंडरमध्ये आइसक्रीम, आंब्याचा रस आणि वोडका ओतून घ्या.
ब्लेंडरमध्ये साधारण मध्यम वेगाने हे सर्व मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्लेंडरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे.
आता हळूवारपणे ते मिश्रण ग्लासात ओतून घ्या.
आंब्याच्या अफलातून चवीचे स्मूथ अॅन्ड सिल्की कॉकटेल तयार आहे :)

| प्रकार | वोडका बेस्ड कॉकटेल, लेडिज स्पेशल |
| साहित्य | |
| वोडका | 1 औस (30 मिली) |
| आंब्याचा ज्यूस | 2 औस (60 मिली) |
| आंब्याचे आइसक्रीम | 2 स्कूप |
| बर्फ | |
| ब्लेंडर | |
| ग्लास | वाइन ग्लास |
कृती:
खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्लेंडरमध्ये आइसक्रीम, आंब्याचा रस आणि वोडका ओतून घ्या.
ब्लेंडरमध्ये साधारण मध्यम वेगाने हे सर्व मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्लेंडरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे.
आता हळूवारपणे ते मिश्रण ग्लासात ओतून घ्या.
आंब्याच्या अफलातून चवीचे स्मूथ अॅन्ड सिल्की कॉकटेल तयार आहे :)

वाचने
9586
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेहमी प्रमाणे सुरेख !
ग्रीष्म ऋतु लाउंजोत्सव: दे धमाल !लई भारी...
झकास.
सहमत.
In reply to झकास. by प्रचेतस
हुकुम सर आँखों पर !
In reply to सहमत. by सूड
दिल बाग बाग हो गया सोक्या.
कमाल हो सोत्रि राव. लय भारी
जीतो...मस्तच,,,
वाह वाह झकास मस्त , मोहक आणि
कमाल आहे
@चैत्रातल्या आधुनिक हळदी
In reply to कमाल आहे by स्पा
चैत्रातल्या आधुनिक हळदी
In reply to @चैत्रातल्या आधुनिक हळदी by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to चैत्रातल्या आधुनिक हळदी by पक पक पक
मस्त.
आम्ही असाच प्रकार मोठ्या
वा वा... ती बराच काळ वाट
अं....
In reply to वा वा... ती बराच काळ वाट by गवि
ते टेबलक्लॉथवरचे पक्षी किती
जियो...
वप्या, लग्न झालं त्याला किती
In reply to जियो... by वपाडाव
चांगला प्रकार आहे.
मस्त...